Published on Dec 09, 2021 Commentaries 0 Hours ago

कोरोनासारख्या रोगांच्या साथीला तोंड देताना, इतर विकसनशील देशांसाठी केस स्टडी म्हणून धारावीचे प्रारूप अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

असमानतेच्या रोगापासून शहरे वाचवायला हवी

कोविड-१९च्या साथीमुळे आणि अचानक लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या टाळेबंदीमुळे, प्रामुख्याने शहराच्या अर्थव्यवस्थेत योगदान करणारे शेकडो स्थलांतरित हताशपणे घरी परतले. त्यांच्या घरी जाण्याच्या प्रतिमा अनेकांच्या मनावर कोरल्या गेल्या. या प्रतिमा या शहरांमधील बहिष्कृततेची जाणीवर करून देणाऱ्या आहे. कोविड-१९ साथीच्या रोगाने शहरांच्या काही त्रृटी उघड केल्या आहेत, एवढेच म्हणणे अगदीच गुळमुळीत ठरेल. कारण, ज्या शहरांचा भूतकाळ वसाहतवादाच्या शोषणात गुंतलेला आहे आणि जिथे जागतिकीकरण म्हणजे काही लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे, अशा शहरांमधील मूलभूत असमानता या साथीने उघड केली.

साथीच्या रोगामुळे आलेल्या आर्थिक मंदीमध्ये पुनर्बांधणी, पुनरावृत्ती आणि शहरांचा नव्याने संकल्पनात्मक विचार करून पुनर्रचना करण्यावर चर्चा झाली. मात्र, साथीच्या रोगाचा प्रतिसाद आणि त्यातून सावरण्याच्या पद्धती सामान्यत: भूतकाळातील वारसा गिरवणाऱ्याच आहेत. कोविड-१९ मुळे, काहींच्या वाट्याला वेदना आणि ओझे खूपच अधिक आले.

सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील साथीच्या रोगांचा धोका मोठा असतानाही, कोरोनाच्या साथीमुळे नव्याने झालेल्या विवेकाची जाणीव कमी होत जाण्याचा खरा धोका आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या प्रसारासाठी शहरांना अत्यंत असुरक्षित बनविणार्‍या पायाभूत दोषांची आठवण करून देणे आवश्यक आहे आणि कदाचित वर्तमानातील आणि भविष्यातील धोरणांसाठी एक चाचणी म्हणून त्याकडे पाहायला हवे. वैशिष्ट्यपूर्ण संरक्षणवादासह विकासात्मक राज्य याचा अर्थ उद्योगांना वेशीबाहेर काढून, बहुतांश लोकांना झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत जोखीम-प्रवण परिस्थितीत राहण्यास आणि काम करण्यास भाग पाडणे होय.

अधिक उत्पादन, अधिक व्यापार आणि अधिक कमाई करण्याच्या सततच्या प्रयत्नांत, शहरे कॉर्पोरेट, आर्थिक भांडवलशाहीची शिखरे बनली आहेत, जी राष्ट्रीय आणि प्रादेशिक सीमा ओलांडतात आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काही ऐतिहासिक वळणावर तयार केलेल्या प्रणालीत आणि संस्थांमध्ये शिरकाव करतात. अशा परिस्थितीत, एकीकडे बेघर आणि झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांची वाढती संख्या तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणातील रिकामी घरे तसेच एकीकडे कुपोषित मुलांची व मातांची मोठी संख्या तर दुसरीकडे जागतिक खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल यांसारखे मोठे विरोधाभास आपण पाहतो.

जगाचे नियंत्रण करणाऱ्या केंद्रांपासून दूर असलेल्या, जागतिक श्रेणीबद्ध नेटवर्कच्या खालच्या स्तरावर अशा जागा अधिक दृश्यमान आहेत, हे मान्य आहे. तरीही, या विरोधाभासांचा त्या ठिकाणच्या ‘गरिबी’शी कमी आणि तिथल्या व्यवस्थांच्या आणि संस्थांच्या संरचनेशी आणि स्वरूपाशी जास्त संबंध आहे. अशा प्रकारे, स्पष्ट विरोधाभासांच्या पलीकडे अनेक अदृश्य आणि मूलभूत पद्धतशीर असमानता आहे, ज्यामुळे साथीचे रोग कसे, कुठे आणि का पसरले याची रूपरेषा तयार केली. हा समाज, परिसर आणि सरकार यांचा प्रतिसाद आहे आणि जगभरातील शहरांमधल्या लोकांच्या विविध गटांमध्ये अशा प्रतिसादांमुळे निर्माण होणारे परिणाम आहेत.

शहरे हेच रूपक

रूपक हे वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी- आपण गोष्टी कशा पाहतो आणि त्यांच्याशी कसा व्यवहार करतो याकरता महत्त्वाचे असते. साथीच्या रोगाबद्दल लिहिताना, बोव्हेंटुरा डी सॅंटोस यांनी असा युक्तिवाद केला की, ‘विषाणूविरूद्ध युद्ध’ असे सामान्यतः उपयोजित रूपक व्यर्थ आहे; त्याऐवजी, ‘सह-उपस्थिती’ किंवा ‘विषाणूसह जगणे’ असा त्याचा अर्थ लावणे अधिक उपयुक्त असू शकेल. हा दृष्टिकोन मानवी-निसर्ग संघर्षाचा एक भाग म्हणून विषाणूचा स्वीकार करावा, असे सांगतो; जो आपल्यामध्ये असलेल्या राक्षसासारखे आहे, जो तर्कशक्ती झोपल्यावर जागा होतो. मी हा दृष्टिकोन शहरांना लागू करते.

शहरांमध्ये निसर्ग आणि रोग यांच्यामधील पारंपरिक युद्ध आढळते, अर्थव्यवस्था, लोक आणि त्यांचे उपक्रम यांना शहरे एकत्र आणतात आणि वेळ, भौगोलिकता आणि प्रमाण यांचा अवमान करतात. शहरे ठिकाणांच्या जागतिक नेटवर्कचा भाग म्हणून मानवांच्या उत्पादक आणि नियंत्रण क्षमतांवरही खोलवर परिणाम करतात. प्राचीन शहरांच्या अधःपतनाची बीजे त्यांच्या दुष्काळाच्या आणि युद्धाच्या असुरक्षिततेमध्ये होती; औद्योगिक शहरे कॉलरा, प्लेग व संसर्गजन्य रोग आणि आगीच्या धोक्यांमुळे असुरक्षित होती आणि या सगळ्याला तोंड देण्यासाठी शहरांना नवनवीन प्रयोग करावे लागले.

हा विषाणू, मानवी शरीरात स्वतःची प्रतिकृती बनवतो, मानवाने तयार केलेल्या वातावरणात भराभर वाढतो आणि मानवाने तयार केलेल्या व्यवस्थांच्या आराखड्यात पसरतो. हे मानवजातीच्या रूपात आपल्या कर्तृत्वाचे अभिव्यक्त आहे, परंतु त्याच्या दोषरेषाही आहेत. रॉबर्ट पार्क2ने जेव्हा म्हटले होते की, “जर हे शहर मानवजातीच्या महान निर्मितींपैकी एक आहे, तर हे असेही एक जग आहे, ज्यात त्याला शापित जिणे आहे”, तेव्हा तो अशा दु:ख आणि अन्यायाच्या काल्पनिक राज्याकडे इशारा करत होता का?

प्राचीन शहरांच्या अधःपतनाची बीजे त्यांच्या दुष्काळाच्या आणि युद्धाच्या असुरक्षिततेमध्ये होती; औद्योगिक शहरे कॉलरा, प्लेग व संसर्गजन्य रोग आणि आगीच्या धोक्यांमुळे असुरक्षित होती आणि त्यांना तोंड देण्यासाठी शहरांना नवनवीन प्रयोग करावे लागले.

मुंबई आणि साथीचा रोग

मुंबई हे ऐतिहासिकदृष्ट्या एक वसाहतवादी शहर आहे, जे त्याच्या विरोधाभासांसाठी ओळखले जाते. शहर अनेक प्रभावांनी आकारास आले आहे—आर्थिकीकरणाच्या दिशेने अर्थव्यवस्थेत झालेले जागतिक बदल; स्थानिक भूगोल, मक्तेदारी आणि गरिबीची उच्च पातळीने जगातील सर्वात उच्च-किमतीच्या स्थावर मालमत्ता बाजारपेठांपैकी एक तयार केली आहे आणि परिणामी, निम्म्याहून अधिक लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते; उद्योगाचे अनौपचारिकीकरण; आणि स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणाचे संयोजन राजकारणाचा एक अत्यंत सांप्रदायिक ब्रँड तयार करते.

देशातील इतर अनेक शहर शासनव्यवस्थेपेक्षा वेगळी बाब म्हणजे, मुंबईत आर्थिकदृष्ट्या मजबूत महापालिकेचे शासन आहे. मात्र, अधिकार आणि जबाबदाऱ्यांच्या दृष्टीने बहुविध, परस्परांत गुंतलेल्या संस्थांमुळे ते खंडित झाले आहे आणि राज्य सरकारच्या अत्याधिक केंद्रीकरणामुळे, नियंत्रणामुळे व स्पर्धात्मक राजकारणीकरणामुळे कमकुवत झाले आहे. शहराची पोहोच कमी आहे आणि ‘नागरिक’ आणि ‘अनौपचारिक’ अशा लोकांच्या दोन गटांमध्ये- शासनाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर विभागलेले आहे, ‘नागरिक’ कायद्याकडे तर ‘अनौपरिक वर्ग’ योजनांकडे आणि धोरणांकडे त्यांच्या हक्कांचा स्रोत म्हणून पाहात होते.

यातील प्रत्येक गतिशीलता, शहर कसे चालते याला आकार देते. शहरीपणाच्या कामातील जुगाड अनौपचारिकांना त्यांचे योग्य हक्क आणि काम आणि राहणीमानाचा पुरेसा दर्जा नाकारतो. त्याच वेळी, शहाना चट्टराज यांनी त्यांच्या ‘शांघाय ड्रीम्स: अर्बन रिस्ट्रक्चरिंग इन ग्लोबलायझिंग मुंबई’ या पुस्तकात युक्तिवाद केल्याप्रमाणे, जागतिक दर्जाच्या शहराचा प्रकल्प साकारण्यात ते असमर्थ ठरले.

शहराची राजकीय अर्थव्यवस्था दीर्घकालीन स्थावर मालमत्तेवर ‘आधारभूत’ आहे आणि म्हणूनच, सरकार झोपडपट्टीतील रहिवाशांना मोफत घरे देत असताना, अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक व सामाजिक मानके राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा, सुविधांमध्ये अपुरी गुंतवणूक केली जाते. राज्याचा माघार घेण्याकडे असलेल्या एकूण कलाचा अर्थ म्हणजे कल्याणकारी सेवांमध्ये घट आणि शहरी गरीबांना पुरेशी उपलब्धता नसलेल्या सुरक्षितता- आणि वित्त-आधारित कल्याणाकडे वळणे असा आहे.

वरील वास्तव सर्वज्ञात असून त्याचे दस्तावेजीकरण झालेले आहे, तरीही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठीची सार्वजनिक धोरणे डिजिटल तंत्रज्ञान, पुरेशी जागा आणि घरात सोयीसुविधा आणि पुरेशी बँकेची बचत उपलब्ध असलेल्या सदनिकेत राहणाऱ्या नागरिकाभोवती केंद्रित आहेत.

प्रदीर्घ राष्ट्रीय टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांमध्ये आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रवास करण्यावर आणलेल्या मर्यादांमुळे त्यांचा घरी परतण्याचा प्रवास निराशाजनक आणि अनेकदा धोकादायक झाला. कल्याणकारी उपाय खूप उशिरा सुरू करण्यात आले होते, खूप कमी होते आणि फारच कमीजणांपर्यंत पोहोचले होते. स्थानिक टाळेबंदीच्या अमलबजावणीदरम्यान घराबाहेर आणि रस्त्यावरचा वावर प्रतिबंधित झाला होता; सार्वजनिक वाहतूकही काही काळासाठी बंद होती. शिक्षण ऑनलाइन झाले.

सदनिकांचे व्यवस्थापन हा राज्याचा विस्तारित स्तर बनला आहे, ज्याने येण्या-जाण्यावर प्रतिबंध लागू केला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे अनौपचारिक क्षेत्रातील लोकांच्या उपजीविकेची मोठी हानी झाली. तयार अन्न आणि आश्रयस्थानांच्या स्वरूपात राज्य आणि कॉर्पोरेटने सुरू केलेल्या मोठ्या प्रमाणातील प्रयत्नांमध्ये खराब वितरण यंत्रणा, सामाजिक पायाभूत सुविधांचे अपुरे स्थानिक वितरण आणि अनौपचारिक वसाहतींमध्ये काळजी घेण्याच्या जागांचा अभाव यांमुळे अडथळा आला. प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक झाली नसल्याने आणि स्थानिक समुदायांपासून दूर राहिल्यामुळे तपासणी, चाचणी आणि प्रतिबंध असमानपणे लागू केले गेले.

शहराची राजकीय अर्थव्यवस्था दीर्घकालीन स्तावर मालमत्तेवर ‘आधारभूत’ राहिली आहे आणि म्हणूनच, सरकार झोपडपट्टीतील रहिवाशांना मोफत घरे देत असताना, अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक व सामाजिक मानके राखण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा, सुविधांमध्ये अपुरी गुंतवणूक केली जाते.

कोविड साथीदरम्यानच्या सर्व उपचार सुविधा आणि शिष्टाचार ‘सदनिकेत-राहणाऱ्या नागरिकां’साठी अनुकूल होत्या. त्यामुळे, रुग्णालयातील खाटा आणि प्राथमिक उपचार सुविधा, अत्यावश्यक औषधे, निदान सुविधा व ऑक्सिजन यांचे वितरण आणि प्रतिबंधात्मक तपासण्या व लसीकरणाचे नियमन करण्याचा प्रयत्न होत असताना, शहरातील गरीब या सुविधांपासून मोठ्या प्रमाणात दुरावले गेले आणि बर्‍याचदा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना टाळण्यात आले की, कोविड-१९ हा ‘श्रीमंत व्यक्तीचा आजार’ म्हणून त्यांना पाहायला मिळाला.

शहरातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्य सरकार, महापालिका, खासगी क्षेत्र आणि नागरी समाज यांच्यातील प्रखर समन्वित प्रतिसादाद्वारे संसर्ग त्वरित आटोक्यात आणल्या गेलेल्या धारावीमध्ये या व्यवस्थेने चांगला प्रतिसाद दिला असला तरी खरा प्रश्न आहे, तो असा की, अशा प्रकारचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर का मिळाला नाही?

निष्कर्ष

प्रत्येक संकट ही शिकण्याची संभाव्य संधी असते, परंतु संकट कसे तयार केले जाते हे चिंताजनक आहे. जरी विषाणू पूर्णपणे निघून जाण्याची शक्यता नाही, असे जरी विषाणूचे स्वरूप असले, तरी साथीच्या रोगाला ‘विषाणू विरोधातील युद्ध’ म्हणून पाहणे आणि त्याचा ‘पाठलाग’ करणे शक्य आहे. म्हणूनच, योग्य प्रश्न विचारणे आवश्यक आहे, आपल्या शहरांत आणि शहरांच्या व्यवस्थेत खोलवर रुतलेल्या असमानतेवर चिंतन करणे व त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. जेव्हा व्यवस्थेतील असमानतेची जोड मिळते, तेव्हा संसर्ग आणि मृत्यू असमानपणे घडवून आणण्याच्या विकसित क्षमतेसह विषाणूने सतत आपले स्वरूप बदलत, आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. यातून धडा शिकणे आणि त्यासोबत कसे जगायचे ते निवडणे आपल्यावर अवलंबून आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.