Published on Aug 24, 2023 Commentaries 0 Hours ago

चीन आपल्याच देशात वाढत असलेल्या कोविड संसर्गाबाबत फारशी माहिती देत नसल्यामुळेच, याबाबतीत चीनने नेमकी आणि स्पष्ट माहिती द्यावी अशी जागतिक समुदायाची मागणी आहे.

कोविड संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चीनकडून गुप्तता

चीनने 2020 च्या सुरुवातीपासून लागू केलेले कोविड-19 प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर, तिथे कोविडबाधीत रुग्ण आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे, आणि यामुळे जगापुढे असलेल्या समस्यांमध्ये पुन्हा एका नवीन समस्येची भर पडली आहे. चीनने देशांतर्गत निर्बंध शिथिल केल्यामुळे, त्यांच्या नागरीकांना मोठ्या खंडानंतर, विशेषतः येत्या 22 जानेवारी 2023 ला चांद्र नववर्ष साजरं होत आहे, आणि कौटुंबिक गाठीभेटींचाही काळ आहे, अशावेळी परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खुद्द चीनमध्येच स्थिरावलेले लाखो स्थलांतरित लोकही आपापल्या मुळ ठिकाणी मुळ गावी जाण्याच्या बेतात आहेत, आणि त्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

शी जिनपिंग यांनी तिथे लागू केलेले आणि वादग्रस्त ठरलेले झिरो-कोविड धोरण, या धोरणाविरोधात झालेल्या देशव्यापी निदर्शनांनंतर मागे घ्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोविड-१९ मुळे तिथे डिसेंबर महिन्यापासून   केवळ २२ जणांचाच मृत्यू झाला आहे.

तिथल्या लोकांचे हे स्थलांतर चिंता आणि धास्ती वाढवणारे आहे. कारण कोविड संसर्गाच्या चीनमधील या नव्या लाटेशी संबंधीत तपशीलांबद्दल जग मोठ्या प्रमाणात अंधारात आहे. या नव्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी प्रकाशित करणे बंद केले आहे, इतकेच नाही तर कोविड -19 मुळे होणारे मृत्यू म्हणजे काय याची व्याख्यादेखील त्यांनी बदलली आहे असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. शी जिनपिंग यांनी तिथे लागू केलेले आणि वादग्रस्त ठरलेले झिरो-कोविड धोरण, या धोरणाविरोधात झालेल्या देशव्यापी निदर्शनांनंतर मागे घ्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोविड-१९ मुळे तिथे डिसेंबर महिन्यापासून   केवळ २२ जणांचाच मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, आणि तिथल्या स्मशानभूमींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संख्येने होत अंत्यसंस्कार केले जात असल्याची पसरत असलेली माहिती म्हणजे, तिथले कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या नेतृत्वातले सरकार स्वतः निर्माण केलेल्या परिस्थितीवर पडदा टाकायचा प्रयत्न करत असल्याचेच निर्देशक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निर्बंधांनंतर जनजीवन पुन्हा खुलेपणाने सुरू झाल्यानंतर आता, परदेशात जाणाऱ्या चीनी नागरीकांची कोविड चाचणी केली जावी अशी मागणी इतर देशांकडून वाढू लागली आहे, मात्र त्यामुळे चीनला काहीएका प्रमाणात माघार घ्यावी लागली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या कियुषी या नियतकालिकात अलिकडेच एक लेख छापून आला आहे. हा लेख म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या नेतृत्वातले सरकार स्वतःलाच पिडीत असल्याचा कांगावा करण्याचा आणि सातत्याने पाश्चिमात्य जगतच या परिस्थितीला दोषी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत असल्याचाच पुरावा आहे. पाश्चिमात्य जगतातली प्रसारमाध्यमे चीनच्या साथ प्रतिबंध आणि नियंत्रण धोरणाविषयी चुकीची मांडणी आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यांची ही संपूर्ण कृती राजकीय पूर्वग्रहांनी प्रेरित असल्याचे या लेखात म्हटले आहे.

चीनमधला खदखदता असंतोष

ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या २० व्या अधिवेशनात शी जिनपिंग यांनी मांडलेल्या अहवालातून जसे दिसून आले, तसाच धोका या पक्षासमोर वाढला आहे. या अहवालातून जीनपींग यांनी बाह्य शक्ती चीनवर नियंत्रण ठेवण्याचा, त्यांची नाकेबंदी करण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा तसेच त्यांच्यावर दबाव आणायचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिला आहे. जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर लगेचच, त्यांनी लागू केलेल्या झिरो कोविड धोरणाविरोधात तिथल्या शहरांमध्ये निदर्शनांना सुरूवात झाली. खरे तर चीनमध्ये स्थानिक मुद्द्यांवरून जी निदर्शने होतात, ती फारशी विशेष, दखल घेण्याजोगी होत नाहीत. मात्र १९८९ मधे ज्याप्रमाणे तिथल्या तियानमेन चौकात आंदोलन झाले होते, त्यानंतर पहिल्यांदाच २०२२ मध्ये चिनी जनतेने कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारी निदर्शने केली, आणि त्यामुळेचे, सत्ताधारी हादरून गेले होते. हे आंदोलन इतके मोठे होते की, चीनमधल्या उच्चभ्रू वर्गालाही या खदखदणाऱ्या असंतोषाची दखल घेणे भाग पडले. याचाच परिणाम म्हणजे नव्या  वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जिनपिंग यांनी असे म्हटले की, चीन हा एक मोठा देश आहे, आणि त्यामुळेच इथल्या नागरीकांमध्ये अगदी स्वाभाविकपणे मतभेद निर्माण होऊ शकतात, पण त्यावर संवादाच्या माध्यमातून तोडगाही निश्चितच निघू शकतो. अर्थात असं असूनही अलीकडील निदर्शने आणि शून्य-कोविड धोरणाच्या बाबतीत माघार घेतल्यामुळे झालेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने देशांतर्गत राजकीय परिस्थितीचे केलेले मूल्यांकन म्हणजे परीस्थितीकडे डोळेझाक करणे आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या केंद्रीय राजकीय आणि कायदेशीर व्यवहार आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही याचेच प्रतिबींब दिसले. या बैठकीत असा निष्कर्ष काढला गेला की, समाजातील काही घटक या साथरोगाचा वापर अफवा पसरविण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य बिघडविण्यासाठी करू शकतात, आणि त्यामुळेच अशा घटकांपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्थेचे रक्षण करणे हे सुरक्षा संस्थांचे सर्वोच्च कर्तव्य असायला हवे आहे. शी जिनपींग यांनीही स्वत: सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना, ही परिस्थिती म्हणजे “कठीण आव्हाने असलेला नव टप्पा” असे म्हटले आहे. पण आगदी आताही  कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने सद्याच्या परिस्थितीचे केलेले मुल्यांकन पाहीले तर (यालाच आपण त्यांचा दृष्टीकोन असेही म्हणू शकतो), त्यातून त्यांना असेच म्हणायचे आहे  की झिरो-कोविड धोरण आणि धोरणाच्या बाबतीत सध्या घेतलेली माघार या दोन्ही बाबी “योग्यच” आहेत. खरे तर  कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आत्तापर्यंत सत्तेत राहू शकण्यामागचे कारण हेच आहे की, त्यांनी माहितीवर आणि त्यातून निघणारे अर्थ आणि तर्कांवर पूर्ण नियंत्रण राखले आहे. त्यामुळेच तर आत्ताच्या अतिशय संवेदनशील अशा काळात, सत्ताधारी पक्षाने कोविडमुळे होत असलेल्या मृत्यूंच्या खऱ्या संख्येला कोणत्याही पद्धतीने स्विकारले तर त्याचे देशांतर्गत परिस्थितीवर अनेपेक्षीत असे परिणाम निश्चितच होणार आहेत.

शी जिनपींग यांनीही स्वत: सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना, ही परिस्थिती म्हणजे “कठीण आव्हाने असलेला नव टप्पा” असे म्हटले आहे. पण आगदी आताही  कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने सद्याच्या परिस्थितीचे केलेले मुल्यांकन पाहीले तर (यालाच आपण त्यांचा दृष्टीकोन असेही म्हणू शकतो), त्यातून त्यांना असेच म्हणायचे आहे  की झिरो-कोविड धोरण आणि धोरणाच्या बाबतीत सध्या घेतलेली माघार या दोन्ही बाबी “योग्यच” आहेत.

भिंतीआडचे वास्तव

खरे तर कम्युनीस्ट विचारधारेत वावरत असलेल्या चीनमध्ये पहिला बळी ठरला आहे ते म्हणजे सत्य! हा संसर्ग आणि त्याचा वुहान संसर्गजन्य आजार संशोधन संस्थेशी (वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीशी) संबंध असल्याचे असंख्य तर्कवितर्क मांडले गेले आहेत. खरे तर यालाच उद्रेकाचे मूळ ठिकाण (ग्राऊंड झिरो ) असे म्हटले जात आहे. या संस्थेतील ढिसाळ सुरक्षा नियम, ते जैविक युद्धाच्या गंभीर आरोपांपर्यंत असंख्य अटकळी बांधल्या जात आहेत. तरीदेखील कोरोना विषाणूचा उगम नेमका कसा झाला याबाबतचे सत्याचा शोध घेण्यात आपण कोणत्याही बाबतीत जवळपासही पोहचू शकलेलो नाही. कारण या विषाणूच्या उत्पत्तीच्या कोणत्याही प्रकारच्या अर्थपूर्ण तपास आणि संशोधनात चीनने वारंवार अडथळेच आणले आहेत. पण या उलट चीनने ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबत आर्थिक दडपशाही हत्यार उपसत, कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची स्वतंत्र चौकशी व्हावी अशा मागणीपोटी ऑस्ट्रेलियाच्या वाइन, कोळसा आणि सागरी अन्नोत्पादनांच्या आयातीवर शुल्क लादले आहे. या अशा पार्श्वभूमीवर आपल्याच देशात सामाजिक स्थिरतेविषयी निर्माण झालेल्या समस्येनंतर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने 2020 मध्येच कोविड -19 संसर्गाबद्दल सावध करणाऱ्या डॉ. ली वेनलियांग यांच्यावरच टीका केली. इथे आपण हे कायम लक्षात ठेवायला हवे की, जिनपिंग यांना जानेवारी 2020 च्या सुरुवातीला या विषाणुच्या अस्तित्वाबद्दल माहिती झाली होती. पण प्रत्यक्षात जिनपींग हे आपला सुमारे पंधरा दिवसांचा म्यानमार दौरा आटोपून मायदेशी परतल्यानंतरच कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली. या विलंबामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने जे काही नुकसान झाले आहे, त्यातून चीनने अद्यापही कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. पण किमान आत्ताच्या परिस्थितीत आपल्याच लोकांच्या रक्षणासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने किमान आता तरी पारदर्शकता दाखवायला हवी ही जागतिक समुदायाची मागणी निश्चितच योग्य आहे, असे म्हणायलाच हवे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Kalpit A Mankikar

Kalpit A Mankikar

Kalpit A Mankikar is a Fellow with Strategic Studies programme and is based out of ORFs Delhi centre. His research focusses on China specifically looking ...

Read More +