Published on May 01, 2023 Commentaries 15 Days ago

तैवानच्या प्रतिसादाचे स्वरूप तपासण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने अलीकडे लष्करी कवायती केल्या आहेत.

तैवान सामुद्रधुनीत चीनचे लष्करी डावपेच

अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैपेईच्या भेटीनंतर, संतप्त झालेला चीन तैवान सामुद्रधुनीमध्ये चिथावणीखोर लष्करी डावपेच आखीत आहे. तैवानला विद्रोही प्रांत मानणाऱ्या चीनच्या दिलेल्या ताकीदीकडे आणि धमकीवजा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पेलोसी गेल्या मंगळवारी तैपेईमध्ये आल्या होत्या. तैवानमध्ये उतरल्यानंतर, पेलोसी यांनी तैवानच्या चैतन्यशील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या अदम्य वचनबद्धतेचा पुनरुच्चार करीत ट्विट केले आणि ‘स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या प्रगतीसह सामायिक हितसंबंधांना’ अमेरिकेचे समर्थन असल्याची पुष्टी केली, ज्यामुळे आधीच खवळलेला चीन अधिकच डिवचला गेला.

पूर्वीच्या प्रथेपासून फारकत घेत, चीनने तैवानच्या मुख्य बेटाजवळ सराव केला आहे. अशी चार क्षेत्रे आहेत जिथे चिनी सैन्याने तैवानवर दबाव वाढवला आहे, ज्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत;

  1. तैवानच्या मुख्य बेटाच्या आसपास अनेक संयुक्त लष्करी मोहिमा.
  2. उत्तर, दक्षिण पश्चिम आणि दक्षिण पूर्व तैवान बेटांच्या आसपासच्या परिसरात संयुक्त हवाई आणि सागरी सराव.
  3. विस्तारित श्रेणींमध्ये गोळीबाराचा सराव.
  4. पारंपरिक स्फोटकांसह क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे.

तैवानमध्ये उतरल्यानंतर, पेलोसी यांनी तैवानच्या चैतन्यशील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या अदम्य वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत ट्विट केले आणि ‘स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या प्रगतीसह सामायिक हितसंबंधांना’ अमेरिकेचे समर्थन असल्याची पुष्टी केली, ज्यामुळे आधीच खवळलेला चीन आणखी डिवचला गेला.

चिनी विमानांनी आणि नौदलाच्या जहाजांनी तैवानच्या मुख्य बेटाला चिनी मुख्य भूमीपासून विभक्त करणारी मध्यरेषा ओलांडली. संभाव्य संपूर्ण आक्रमणाची तयारी म्हणून तैवानच्या विरुद्ध घेराव घालणाऱ्या हल्ल्याचा समावेश असलेल्या कवायतींचे आयोजन चीनने केले होते.

१९९५-१९९६ तैवान सामुद्रधुनी संकट

सध्याचे सराव १९९५-९६ मधील शेवटच्या मोठ्या तैवान सामुद्रधुनी संकटाच्या अगदी विरुद्ध आहेत, ज्यामध्ये अनेक लष्करी कवायती असूनही ते मर्यादित होते. त्यानंतर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवानला लक्ष्य करणाऱ्या मोहिमांसाठी चीनमध्ये केंद्रिकृत मुख्यालय स्थापन केले होते. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या विविध सेवा शाखांद्वारे आणि नानजिंग आणि ग्वांगझू या पूर्वीच्या लष्करी क्षेत्रांसह समन्वय साधणे आणि प्रत्यक्ष सराव करणे ही मुख्यालयाची जबाबदारी होती. मात्र, तैवानशी थेट सामना टाळण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि तैवानच्या मुख्य बेटापासून बर्‍याच अंतरावर थेट दारुगोळासंबंधीचा प्रशिक्षण सराव आणि सामरिक कौशल्याच्या चाचणीसाठी लष्करी सराव आयोजित केले गेले.

आकृती-१

तैवान सामुद्रधुनी संकट १९९५-९६ आणि सध्याचे तैवान सामुद्रधुनी संकट ४-७ ऑगस्ट २०२२ या दोहोंमधील फरक दर्शवणारे दोन नकाशे.

स्रोत: द्वान दांग

१९९५-९६ साली घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण, त्याची कार्यक्षमता, हाताळणी वैशिष्ट्ये इत्यादी तपासणीसाठीच्या चाचण्या चिथावणीखोर असल्या तरी त्यांची रचना रोखण्यासाठी करण्यात आली होती. त्या संकटाच्या काळात, अमेरिकेच्या प्रतिसादाचा चीनवर इतका टोकाचा दबाव आला की चीनला तैवानवर आक्रमण करण्याची इच्छा नाही, परंतु स्वातंत्र्य घोषित करण्यापासून त्यांना रोखण्याकरता ते केवळ लष्करी सराव करतील, हे सांगण्याकरता चीनतर्फे मार्च १९९६ च्या सुरुवातीला तत्कालीन उपमंत्री लियू हुआक्यु यांना अमेरिकेला पाठवण्यात आले.

मुख्यालयाची जबाबदारी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विविध सेवा शाखांद्वारे आणि नानजिंग आणि ग्वांगझू या पूर्वीच्या लष्करी क्षेत्रांसह समन्वय साधणे आणि प्रत्यक्ष सराव करणे ही होती.

१९९५च्या उत्तरार्धात- अमेरिकेने संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिलेल्या संदिग्ध प्रतिसादामुळे अमेरिकेचा संकल्प कमकुवत असल्याचे चीनच्या लक्षात आले होते. या प्रतिसादाच्या उलट असा प्रतिसाद अमेरिकेने १९९६ च्या सुरुवातीस दिला, जो जोमदार होता. १९९६ सालच्या सुरुवातीला उत्साही चिनी लोकांनी अधिक प्रक्षोभक क्षेपणास्त्र चाचण्यांसह कृती सुरू ठेवण्याकरता उत्तेजन दिले होते, केवळ अमेरिकेच्या त्यानंतरच्या दोन नौदल ताफ्यांच्या तैनातीमुळे ते चकित झाले होते. चीनने याला टोकाची प्रतिक्रिया असे म्हटले.

१९९६ साली, चीनला माहीत होते की, जर अमेरिकेने आक्रमण केले तर ते अमेरिकेविरुद्धचे युद्ध गमावतील, आणि परिणामी, एका सुरक्षित मर्यादेपर्यंत धोकादायक धोरण अमलात आणण्याची कला अवलंबण्यापासून ते परावृत्त झाले. सध्याची परिस्थिती अगदी वेगळी आहे. अमेरिका-चीन लष्करी समतोल तुल्यबळ असल्याने, अमेरिकेनेच आता पेलोसीच्या भेटीला चीनने दिलेल्या प्रतिसादाला टोकाची प्रतिक्रिया म्हटले आहे.

चीनचे फायदे

सध्याच्या संकटात चीनकडे दोन विमानवाहू युद्धनौका, नवीन क्षेपणास्त्रे आणि जगातील सर्वात मोठे नौदल आहे. चीन प्रजासत्ताकाने डझनभर लढाऊ विमाने आणि मोठे पराक्रम करण्याची क्षमता प्रदान करणारी विमाने ताफ्यात दाखल केली आहेत, ज्याचा उद्देश तैवानच्या एफ-१६ तसेच या प्रदेशात कार्यरत असलेल्या अमेरिकी विमानांचा पाडाव करणे हा आहे. नव्वदीच्या दशकाच्या मध्यास, चीनकडे आता तैवान सामुद्रधुनीमुळे वेगळ्या झालेल्या पट्ट्यात आक्रमण करण्यासाठी असलेली हवाई किंवा जमिनीवरील वा सागरी आक्रमण क्षमता नव्हती.

गेल्या दशकात, पीपल्स लिबरेशन आर्मीने रोटरी-विंग विमानांच्या विकासात आणि संपादनात लक्षणीय प्रगती केली आहे आणि सध्याचे संकट कसे संपेल याची पर्वा न करता, या क्षेत्रातील त्यांची क्षमता पुढील दशकात अधिक वाढणार आहे. रोटरी-विंग विमाने हवाई हल्ल्याच्या मोहिमेसाठी सज्ज आहेत आणि पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यापैकी अनेकांना मैदानात उतरवले आहे, तसेच त्यांना चालविण्यासाठी अनेक कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले आहे.

तैवानच्या हवाई संरक्षणावर मात करण्याच्या प्रयत्नात चीन सध्याच्या कवायतींचा भाग म्हणून अशा लष्करी डावपेचांच्या कवायती करत आहे, ज्यामध्ये आक्रमण करणारा बचाव पक्षाच्या तांत्रिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेला प्रभावीपणे प्रतिसाद देऊन फायदा उठवता येईल का ते पाहतो.

चीनच्या फिक्स्ड-विंग विमानांच्या ताफ्यातही गेल्या दशकभरात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे आणि कवायती दरम्यान ही विमाने लक्षणीय संख्येने सहभागी झाली आहेत. हवाई आक्रमण मोहिमांमध्ये चीनचे प्रावीण्य अद्याप विकसित होत असले तरी, तैपेईला काळजी करण्यासारखे बरेच काही आहे, कारण मुख्य भूप्रदेशाच्या सध्याच्या क्षमता हे देखील एक मोठे आव्हान आहे. तैवानच्या हवाई संरक्षणावर मात करण्याच्या प्रयत्नात चीन सध्याच्या कवायतींचा भाग म्हणून अशा लष्करी डावपेचांच्या कवायती करत आहे, ज्यामध्ये आक्रमण करणारा बचाव पक्षाच्या तांत्रिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेला प्रभावीपणे प्रतिसाद देऊन फायदा उठवता येईल का ते पाहतो. खरोखरच, मोठा खर्च आणि जीवितहानी न करता चीनला तैवानवर यशस्वीरीत्या आक्रमण करायचे असेल तर तैवानच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले, तैवानच्या हवाई संरक्षणाचा बीमोड करण्याची क्षमता चीनकडे असावी लागेल.

निष्कर्ष

थोडक्यात, सध्याच्या कवायती, ज्यात अभूतपूर्व प्रमाणात शत्रूला धडकी भरवणारे लष्करी शक्तीप्रदर्शन चीनने केले आहे, त्या प्रत्यक्षात युद्ध न लढता स्वतःच्या क्षमतेच्या चाचणीची पडताळणी करण्यायोग्य आहेत. तैवानच्या प्रतिसादाचे स्वरूप तपासण्यासाठीही कवायती तयार केल्या आहेत. कवायतींना प्रतिसाद म्हणून तैवानच्या क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेच्या सक्रियतेमुळे, चीनमधील लष्करी नियोजकांना तैवानचे क्षेपणास्त्र संरक्षण रडार, सैन्याची एकाग्रता तसेच बेटांच्या प्रदेशातील सैन्याच्या तैनातीचे नमुने कसे निष्प्रभ करायचे याची झलक मिळण्याची शक्यता आहे. १९९५-९६ साली तैवान सामुद्रधुनी संकटाच्या नेमके उलट दृश्य आता दिसून येत आहे, ज्यात क्षेपणास्त्र चाचण्या आणि कमी कालावधीत झालेल्या नवीनतम सरावातून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विविध शाखांमधील समन्वय अनेक महिन्यांत दिसून आला, आणि प्रत्यक्ष रणांगणातील परिस्थितीतील वास्तविक गुंतागुंत अत्यंत जवळून पीपल्स लिबरेशन आर्मी अनुभवत आहे. यांतून बहुधा पीपल्स लिबरेशन आर्मी फार दूर नसलेल्या भविष्यातील वास्तविक युद्धासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होईल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Aditya Bhan

Aditya Bhan

Dr. Aditya Bhan is a Fellow at ORF. He is passionate about conducting research at the intersection of geopolitics national security technology and economics. Aditya has ...

Read More +
Kartik Bommakanti

Kartik Bommakanti

Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...

Read More +