Published on Jul 26, 2021 Commentaries 0 Hours ago

कोरोना काळात ग्राहकांच्या वर्तनामध्ये फार मोठा बदल दिसून आला आहे. ग्राहक काय विकत घेतात, यासोबत कुठून विकत घेतात यातही बदल झालाय.

कोविडनंतर ग्राहकांचे वर्तन बदललेय!

कोरोना महामारीने आपले जीवन अनेक प्रकारे बदलले आहे. एक समाज म्हणून याची प्रचिती आपल्याला पुढील काळात येणार आहेच. आपला व्यवसाय, रोजगार, राहणीमान, अन्न तसेच आपण करतो ते मतदान या प्रक्रियांमध्ये मूलभूत फरक झालेला आहे. याआधी झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की आपत्तींच्या काळात ग्राहकांच्या वर्तनामध्ये बदल दिसून आला आहे.

सार्स तसेच मेर्ससारख्या आपत्तींमधून असे दिसून आले आहे की लोक आपला अवांतर खर्च कमी करत जीवनावश्यक गोष्टींवर अधिक खर्च करतात. याला इंग्लिशमध्ये ‘इकनॉमिक इलास्टिक बिहेव्हिअर’ असे म्हणतात. लोक आपल्या वस्तू उपभोगावर मर्यादा आणतानाच या वस्तूंची किंम्मत तसेच निर्मिती ठिकाण याबाबत अधिक जागरूक झालेले दिसून येतात. यामुळे ग्राहक काय विकत घेतात यासोबतच कुठून विकत घेतात यालाही अधिक महत्त्व दिले जाते.

वस्तू आणि सेवांचा उपभोग हा निव्वळ सवयीचा भाग नसून त्याला काही विशिष्ट संदर्भ आहे. यामुळे या संदर्भाला अधिक महत्व आहे आणि भूकंप, चक्रीवादळे, युद्धे व सध्या चालू असलेल्या महामारीसारख्या आपत्ती या अत्यंत महत्वाच्या आणि अंदाज बांधण्यास कठीण अशा आपत्तींच्या प्रकारात मोडतात. परिणामी जोखमीचे आकलन आणि जोखमीबाबतचा दृष्टिकोन यासोबतच तीन महत्वाच्या सवयी निर्माण होतात.

अर्थात या सवयींमध्ये सरकारी ( सार्वजनिक) धोरण, तंत्रज्ञान आणि लोकांचा कल यांचा समावेश होतो. ग्राहक विशिष्ट उत्पादने खरेदी करतात आणि ही उत्पादने ग्राहकापर्यंत सहजतेने उपलब्ध होणे यावर सरकारी धोरणांचा प्रभाव दिसून येतो. त्या उत्पादनाला काही पर्याय उपलब्ध आहेत का हे ही त्यातून दिसून येते. हवाई वाहतूक ही अधिक कार्यक्षम मानली जाते. परंतु महामारीच्या काळात वाहतूक आणि या प्रक्रियेचा वाढलेला वेळ, सुरक्षा तपासणी, कोविड टेस्ट यामुळे बहुतांश वेळा कमी पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक इतर वाहतूक पर्यायांची निवड करतात. तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे इच्छा या गरजांमध्ये परिवर्तीत होतात.

मोबाइल फोन आणि इंटरनेट या आता लोकांच्या गरजा बनलेल्या आहेत. सोबतच ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बिल भरणे, गेम्स खेळणे, जीपीएस नॅविगेशन यांसारख्या बाबींमुळे उपभोक्त्यांमध्ये वेगळे वर्तन दिसून आले आहे. लोकसंख्येतील बदल हा ग्राहक वर्तनावर मोठा परिणाम करतो. उदाहरणार्थ, विकसित देशातील वृद्धत्वाकडे झुकलेली लोकसंख्या इतर लोकसंख्येच्या तुलनेत करमणूक, आरोग्य इत्यादी बाबींवर अधिक खर्च करेल.

या नवनवीन सवयी आणि त्यांच्या निर्मितीशी जोडले गेलेले घटक यांच्यावर व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, संस्कृती, भूगोल आणि कालावधी हे घटक परिणाम करतात. एखाद्या परिस्थितीत एखादी व्यक्ती किती काळ आणि कुठे राहते यावर तिच्या सवयी अवलंबून असतात. एखादी नवी सवय जडण्यासाठी जवळपास १८ ते २५४ दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजेच सरासरी ६६ दिवस लागतात.

सध्याच्या महामारीमुळे ग्राहकांच्या वर्तनात घडून आलेला बदल या क्षेत्रात झालेल्या संशोधनातून समोर आला आहे. डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे सध्या ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. विविध ई कॉमर्स साईट्सवरून वस्तूंची खरेदी करण्याला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. कोरोना महामारी रोखण्यासाठी व्यक्तीच्या वावरावर आणि हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. ग्राहकांपर्यंत पोहोचणे, विविध उत्पादनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, ऑनलाइन व्यवहार घडवून आणणे आणि ग्राहकांना आकर्षित करणे यासाठी तंत्रज्ञान आणि विविध डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म सज्ज आहेत.

वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याने तसेच हालचालींवर मर्यादा असल्याने ग्राहकही विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. नवनवीन पर्याय उपलब्ध होत असल्याने जुने मार्ग मागे टाकून नवीन अनुसरण्याकडे लोकांचा अधिक कल दिसून येत आहे. चैनीच्या वस्तूंपेक्षा अत्यावश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहक अधिक उत्सुक आहेत.

अधिक खर्च करू शकणार्‍या ग्राहकांनीही चैनीच्या वस्तू विकत घेण्यास नापसंती दर्शवली आहे. तर अधिक शाश्वत आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिले आहे. पेंट अप डिमांड ही या महामारीच्या काळात निर्माण झाली आहे. गाड्यांसारख्या महागड्या व टिकाऊ वस्तू खरेदी करणे काही काळासाठी ग्राहक पुढे ढकलतात. आणि परिस्थिती पूर्वपदावर आली की ह्या वस्तूंच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येते.

या महामारीमुळे नवनवीन गोष्टी करण्यास आपल्याला भाग पाडले आहे, सध्या अस्तित्वात असलेल्या आणि पारंपरिक पद्धतींमध्येही बदल करण्याची वेळ आहे, परिणामी संपूर्ण परिसंस्थेत प्रदीर्घ कालावधीसाठी आमुलाग्र बदल घडून आला आहे. म्हणूनच, आपत्ती दरम्यान लोकांमध्ये निर्माण झालेल्या नवीन सवयी आपत्ती नंतरही तशाच सुरू राहतील की ग्राहक पूर्वीच्या सवयींना पसंती देतील? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जर नवीन मार्ग हे अधिक सोयीचे, किफायतशीर आणि सहज उपलब्ध असतील तर त्यांचाच अवलंब ग्राहक करतील हे निश्चित. नेटफ्लिक्स, डिस्ने, प्राइम यांसारख्या सेवांकडे ग्राहकांचा असलेला कल हीच गोष्ट सिद्ध करते. कोविडनंतरच्या काळात ग्राहकांच्या अन्न सेवनाबाबतच्या सवयी यांवर २०२१ मध्ये न्यूमरेटर इनसाईट्स डेटाने सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणात ३२ टक्के लोकांनी असे मत नोंदवले की कोविड येण्याच्या आधीच्या परिस्थितीच्या तुलनेत कोविडनंतच्या काळात ते बार आणि रेस्टोरंटना जाण्यास अधिक पसंती देतील. तर २३ टक्के लोकांच्या मते महामारीच्या काळात बाहेर जाणे टाळण्यात येत होते त्याच सवयी पुढील काळात ते सुरू ठेवतील. १८ टक्के लोकांच्या मते हॉटेलातून जेवण मागवणे ते चालू ठेवतील आणि १९ टक्के लोकांच्या मते कोविड येण्याआधी त्यांच्या सवयी ते तशाच चालू ठेवतील.

मनोरंजन आणि छंद म्हणून सोडलेल्या सवयीं पुन्हा सुरू करणे ही मानवी वर्तनातील एक विलक्षण घटक आहे. दुकानात जाऊन प्रत्यक्ष खरेदी करणे, नोकरीधंद्यासाठी प्रवास करणे, हॉटेलमध्ये जाणे यांसारख्या दैनंदिन सवयींमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. कोविड नंतरच्या काळात या दैनंदिन सवयींपैकी किती सवयी टिकून राहतात हे पाहणे महत्वाचे आणि कुतूहलाचे ठरणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Siddharth Sawhney

Siddharth Sawhney

Siddharth Sawhney is a Research and Media professional with extensive experience in the fields of research ethnographic filmmaking and development communication. He has a MA ...

Read More +
Aditi Madan

Aditi Madan

Dr. Aditi Madan is Fellow and an ICSSR post-doctoral fellow at Institute for Human Development (IHD) with a PhD in Disaster Management from Asian Institute ...

Read More +