Published on Sep 12, 2019 Commentaries 0 Hours ago

विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर न उतरल्याने चांद्रयान-२ मोहिमेला फटका बसला, पण यामुळे भारताच्या नियोजित मानवी अंतराळ मोहिमेला विलंब होण्याची शक्यता नाही.

चांद्रयान-२कडे कसे पाहायचे?

भारताचे विक्रम लँडरचंद्रावर नियोजित पद्धतीने उतरण्यात अपयशी ठरल्याने देशभर उदासिनता पसरली आहे. आपला प्रज्ञान रोव्हर घेऊन जाणाऱ्या या विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला आहे. ताज्या अहवालांनी सूचित केले आहे की, चांद्रयानाच्या ऑर्बिटरने विक्रमला शोधून काढले आहे. हे मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित होते आणि प्रज्ञान रोव्हरमार्फत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिणेकडील भागांवर महत्त्वाचे प्रयोग केले जाणार होते. विक्रम लँडरची सध्याची स्थिती काहीही असो, भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) मिशन जवजवजळ जिंकल्यातच जमा होते. अर्थातच इस्रोने हाती घेतलेली ही आगळीवेगळी पहिली मोहीम आव्हानात्मक असणारच होती.

अशा प्रकारच्या जटिल मोहिमेच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलेली इस्रो ही काही पहिली संस्था नाही. अगदी अलिकडे, अवकाशात उतरलेल्या इस्त्रायलच्या स्पेसआयएल या स्वयंसेवी अंतराळ गटाच्या मोहिमेत चंद्राचा लँडर- बेरेशीटचेलँडीग (अवतरण) आघातयुक्त झाल्याने त्याचा चक्काचूर झाला. चंद्राच्या वातावरणासंबंधीचे ज्ञान असूनही, चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीसंबंधीची रहस्ये अद्यापही उलगडलेली नाहीत, जी संभाव्यत: धूळ निर्माण करते; ज्यामुळे लँडिंग करणाऱ्या अवकाशयानाच्या लॅण्डरच्या सेन्सरना दिसू शकणे अशक्यप्राय होते. याच कारणामुळे विक्रम लँडरचे अवतरण यशस्वी ठरले नाही, असा कयास व्यक्त केला जातो.

२००८च्या चांद्रयान-१ मोहिमेमुळे भारतीय अवकाश संस्थेला चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा अनुभव गाठिशी होता. तथापि, नंतर झाले ते “हार्ड लँडिंग” (आघातयुक्त अवतरण)होते. अंतराळयान उतरताना, जी तांत्रिक गुणवत्ता अवगत असणे आवश्यक होते, ती चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या अवकाशयानाचा स्वयंपूर्ण भाग असलेल्या विक्रम लँडरला साध्य नव्हती. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्याचा पाठपुरावा करणे धोकादायक होते. काहींना विक्रमचे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यात आलेले अपयश हा केवळ मोहिमेला बसलेला काहीसा फटका वाटू शकेल, मात्र, याचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता, भविष्यात चंद्रावरच्या कोणत्याही मानवी मोहिमेवर याचा परिणाम होऊ शकतो. जर इस्रो चंद्रावर मानवरहित अंतराळ यानाचे “अलगद अवतरण” करू शकत नसेल तर भविष्यातील चंद्रावरील मानवी मोहिमेला अनिवार्यपणे विलंब लागू शकतो.

चांद्रयान- २ मोहीम ही भविष्यातील चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या मानवी मोहिमेच्या दृष्टीने खरोखरीच, एक पुढचे पाऊल ठरणार होते. दुसरीकडे, भारताच्या ‘गगनयान मिशन’ या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेला यामुळे कसा फटका बसू शकतो? हे समजून घ्यायला हवेत. भविष्यातील मोहिमांवर या अपयशाचे परिणाम मर्यादित असतील. कारण चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमा आणि पृथ्वीवर उतरणाऱ्या मोहिमा या दोन प्रकारच्या मोहिमांमधील फरक जाणणे आवश्यक आहे.

पहिल्यांदाचंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवणे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणे हे एकसारखे नाही. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या तुलनेत एक षष्ठ्यांश आहे. म्हणून सारख्याच उंचीवरून जर हातोडी आणि पक्ष्याचा पंख एकाचवेळी खाली सोडला, तर या दोन्ही वस्तूंचे वस्तुमान जरी असमान असले तरी ते चंद्राच्या पृष्ठभागावर एकाच वेळी आदळतील. दुसरे म्हणजे, चंद्रावर काही प्रमाणात गुरुत्व असले तरी तिथे हवा नाही. वातावरणीय दाब हा पृथ्वीवरच असल्याने चंद्रांवर याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे खरोखरीच, एकदा अंतराळ यानाने चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा चंद्राच्या दिशेने खाली कोसळण्याचा वेग हा पृथ्वीपेक्षा कितीतरी अधिक असू शकतो. म्हणूनच चंद्रावर लँडर उतरवणे हे पृथ्वीवर उतरण्यासारखे असू शकत नाही. या साऱ्या गोष्टींबद्दल काही त्रुटी राहिल्याने विक्रम लँडरचे अलगद अवतरण होऊ शकले नाही, आणि पर्यायाने ही मोहीम यशस्वी ठरली नाही.

निश्चितपणे, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या आधी या सर्व घटकांचा अभ्यास केलेला असेलच. तरीही, चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर विक्रम मॉड्यूलचे इंजिन ते खाली उतरण्याच्या उलट दिशेने अचूक दाबाने प्रज्ज्वलित होणे आवश्यक होते.ते कदाचित न झाल्याने हार्ड लँडिंग (आघातयुक्त अवतरण) घडले. मोहिमेच्या प्रत्यक्ष अमलबजावणीसाठी, चंद्राच्या कक्षामध्ये उतरंड होण्याच्या दराची मोजणी करणारे सर्व प्रकारचे अचूक सिम्युलेशन,  जिथे उतरणार त्या स्थळाची भौगोलिक रचना आणि अलगद अवतरण व्हावे, याकरता अचूक जोर प्रदान करणाऱ्या इंजिनाची रचना करणे या गोष्टी अत्यावश्यक होत्या. चांद्रयान- २ च्या यशासह आकाशीय आणि ग्रहीय अशा सर्व अंतराळ मोहिमा हजारो मैलांच्या अंतरावर असलेल्या पूर्व-प्रोग्रामिंगवर अवलंबून असतात, या मोहिमांची रचना, प्रत्यक्ष निर्मिती आणि प्रक्षेपण करणारा अंतराळ संघ त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही.

चांद्रयान- २ मध्ये विक्रमचे अलगद अवतरण न झाल्याने मोहिमेला काहीसा फटका बसला असला तरीही, यामुळे भारताच्या नियोजित मानवी अंतराळ मोहिमेला विलंब होण्याची आणि त्यावर थेट मर्यादा येण्याची सुतराम शक्यता नाही. याचे कारण असे की, भारताने अवकाशयानांचे पृथ्वीवर यशस्वीरित्या अलगद अवतरण केले आहे. २०२२ मध्ये सुरू होणार्‍या गगनयान मोहिमेसाठी इस्रो अधिक ठाम पाऊल रोवू शकेल. पृथ्वीच्या वातावरणाची कक्षा भेदून अंतराळात अवकाशयान धाडण्याचा तसेच पुन्हा वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करण्याचा भारताला जो अनुभव आहे, तो चंद्रावर उतरण्यापेक्षा वेगळा आहे.

उदाहरणार्थ, बंगालच्या उपसागरात भारतीय किनाऱ्याच्या आग्नेय दिशेपासून अंदाजे १६५ किलोमीटर (कि.मी.) अंतरावर भारतीय नौदलासह इस्रोने पूर्वनियोजित स्थळी, यशस्वीरित्या स्पेस रिकव्हरी मिशन (एसआरई) दाखल केले होते. १२ वर्षापूर्वी- २००७ मध्ये, ‘एसआरई’च्या पुनर्प्रवेशाची यशस्वी अंमलबजावणी करून इस्रोने या क्षमतेची पुष्टी केली. १२ दिवसांच्या सान्निध्यातून अर्ध्या टनाची ही कॅप्सूल परिभ्रमित झाली होती. ‘एसआरई’ने सूक्ष्म गुरूत्व स्थितीत प्रयोग केले, प्रक्षेपणासाठी पुन्हा वापरण्यायोग्य वाहनांची माहिती तयार केली आणि भविष्यातील मानवी आणि मानवरहित चांद्रमोहिमेसाठी आवश्यक ठरणाऱ्या गोष्टींविषयी उपयुक्त माहिती दिली. याव्यतिरिक्त, अर्ध्या-टनाच्या ‘एसआरई’ने अंतराळातून कॅप्सूलच्या यशस्वी पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या इतर असंख्य क्षमतांची यशस्वीरित्या चाचणी केली होती. यामध्ये हलक्या वजनाची औष्णिक संरक्षण प्रणाली, एरो-थर्मल स्ट्रक्चर डिझाइन, हायपरसॉनिक एरोथर्मोडायनामिक्स, नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि पुनर्प्रवेश वाहनाचे नियंत्रण, उतरंड, फ्लोटिंग सिस्टीम आणि रिकव्हरी सिस्टीम आणि संवाद ठप्प होण्याच्या कालावधीचे व्यवस्थापन या बाबी समाविष्ट आहेत. गगनयान मोहिमेच्या यशासाठी ज्या सर्व यंत्रणांची चाचणी घेण्यात आली आहे, ती निर्णायक ठरणार आहे.

या सर्व यंत्रणेचे प्रमाणीकरण झाल्याने आणि चांद्रयान-२ मध्ये अंशत: बिघाड झाल्यानंतरही ऑर्बिटर या मोहिमेची प्रतिमेच्या सहाय्याने माहिती यशस्वीरित्या धाडत आहे आणि चंद्र पृष्ठभागाच्या नकाशांचे आरेखनही करीत आहे. गगनायन मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता नगण्य आहे. मानवी अवकाश उड्डाणासाठी आज भारताने अंतराळवीरांची निवडही केली आहे. अंतराळ संशोधन आणि अंतराळ प्रवास हे सर्वसाधारणपणे असंदिग्धता आणि अनिश्चितेचा घेतलेला ध्यास आहे. तरीही याची पर्वा न करता, भारताच्या अंतराळ संशोधनाचे प्रयत्न अथक सातत्याने सुरूच राहतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.