Author : Sauradeep Bag

Published on Oct 03, 2023 Commentaries 0 Hours ago

जागतिक स्तरावर डॉलर हे शक्तीमान चलन असले, तरी रशिया आणि चीन हे दोन्ही देश डॉलरचे वर्चस्व कमी करू शकतात. 

रशिया-चीन डॉलरचे सिंहासन खेचतील?

आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक नाकाबंदी झाल्यावर रशियाला काही धोरणात्मक बदल करावे लागले. पश्चिमेकडील देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने रशियाने अन्य पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, चीन हा रशियाचा महत्त्वाचा भागीदार बनला आहे आणि चीनच्या युआन या चलनालाही महत्त्व आले आहे. रशियातील व्यापारी व्यवहारांमध्ये युआनने अमेरिकेच्या डॉलरलाही मागे टाकले आहे. युक्रेनच्या संघर्षानंतर वर्षभरात जे काही साध्य झाले, त्यामुळे रशियावर एकापाठोपाठ अनेक निर्बंध लादण्यात आले. रशिया आणि चीन एकत्र आल्याने अन्य कोणते बदल घडतील आणि ते भविष्याला कसे आकार देतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सातत्याने बदल होताना दिसत आहेत आणि रशियाची बाजारपेठ या बदलाची साक्षीदार ठरत आहे. मासिक व्यापारी व्यवहारांमध्ये युआनने प्रथमच डॉलरच्या पुढे धाव घेतल्याने फेब्रुवारी महिन्यात परिवर्तनाचा काळ पाहावयास मिळाला. दोन्ही चलनांमधील दरी वाढल्याने मार्चमध्ये ही गती कायम राहिली. त्यामुळे युआनचा प्रभाव अधोरेखित झाला. पूर्वी रशियाच्या बाजारात युआनचे महत्त्व अगदी नगण्य होते. त्यामुळे ही कामगिरी निश्चितच प्रभावी ठरली. 

युक्रेनच्या संघर्षानंतर वर्षभरात जे काही साध्य झाले, त्यामुळे रशियावर एकापाठोपाठ अनेक निर्बंध लादण्यात आले. रशिया आणि चीन एकत्र आल्याने अन्य कोणते बदल घडतील आणि ते भविष्याला कसे आकार देतील. 

वर्ष जसजसे पुढे जाऊ लागले, तसतसे रशियाच्या अर्थव्यवस्थेत बदलाचे वारे वाहू लागले. रशियाने ज्यांना मित्रदेश मानले नाही, त्या देशांच्या चलनांमध्ये सीमेवरून व्यवहार करण्याचा अधिकार असलेल्या काही उर्वरित बँकांवर अतिरिक्त निर्बंधांचा परिणाम झाला. रायफायसन बँक इंटरनॅशनल एजी या बँकेच्या रशियातील शाखेने देशांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहार सुलभ करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र युरोप आणि अमेरिकेची बारीक नजर रशियावर असल्याने दबाव वाढत गेला. या घटनांमुळे रशिया आणि रशियन कंपन्यांना आपला परदेशी व्यापार व्यवहार ज्या देशांनी निर्बंध लादले नव्हते, अशा देशांच्या चलनाचा आधार घेऊन करणे भाग पडले. 

एकत्रित युती

रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध बिघडत असताना चीन हा रशियाचा प्रमुख भागीदार बनला आहे. चीन रशियाला आर्थिक व राजकीय दबावाशी सामना करण्यासाठी आवश्यक ती मदत देत आहे. दुसरीकडे, चीन विशेषतः युरेशियन भागात जागतिक स्तरावर आपली व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्या देशाला चीन हा आपला महत्त्वाचा मित्रदेश वाटत आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलीकडेच रशियाला भेट दिली आणि उभय देशांमधील सहकार्य वाढवण्याचे वचन त्यांनी रशियाला दिले. त्यामुळे ही भागीदारी आणखी उंच जाण्याची शक्यता दिसत आहे. दोन्ही देश पाश्चात्य देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याने आपसातील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक मजबूत करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रशिया पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित करीत आहे आणि या क्षेत्रातील चीनच्या कौशल्याचा लाभही या प्रकल्पांना होण्याची शक्यता आहे. 

उर्जा हे सहकार्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. त्यामध्ये रशिया तेल व वायूचा प्रमुख निर्यातदार देश आहे आणि चीन या स्रोतांचा जगातील सर्वांत मोठा आयातदार देश आहे. तंत्रज्ञान हेदेखील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत दोन्ही देशांनी स्पर्धेत राहण्यासाठी संशोधन आणि विकासात भरघोस गुंतवणूक केली आहे. रशिया आणि चीन यांच्या आघाडीचे दूरगामी भू-राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशांची उद्दिष्टे समान असली, तरीही आपापले हितसंबंध साध्य करून घेण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन देशांमधील नातेही गुंतागुंतीचे आहे. 

रशिया आणि चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ होत आहेत. दोन्ही देश जागतिक पटलावर आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दोन देशांचे संबंध लष्करी, आर्थिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापले आहेत. 

पाश्चात्य निर्बंधांचा परिणाम म्हणून रशियाने आपले विदेशी व्यापार व्यवहार डॉलर आणि युरोपासून लांब निर्बंध नसलेल्या देशांच्या चलनाकडे हलवले आहेत. त्यामुळे रशिया आणि रशियन कंपन्या पाश्चात्य आर्थिक पद्धतीवरील आपले अवलंबित्व कमी करतील आणि त्यांच्या व्यापारी व आर्थिक व्यवहारांसाठी नवे मार्ग शोधतील, अशी आशा आहे. जागतिक आर्थिक व्यवस्थेत व्यवहार करण्यावर निर्बंध असूनही धोरणातील हा बदल आर्थिक स्थैर्य राखण्याचा रशियाचा दृढनिश्चय दर्शवतो. 

रचनात्मक फेरबदल

रशियाच्या अर्थमंत्रालयातही बदलाचे वारे पोहोचले होते. या वर्षाच्या सुरुवातीला व्यापारी व्यवहारांसाठी रशियाने डॉलरऐवजी युआनला आपलेसे केले. नॅशनल वेल्थ फंडासाठी नवी रचना तयार करून रशियाने आपली ६० टक्के मालमत्ता युआनसाठी आरक्षित करून एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. बँक ऑफ रशियाने या सूरात सूर मिसळून आपल्या खातेदारांना आणि उद्योगांना आपली मालमत्ता रूबल किंवा अनुकूल समजल्या जाणाऱ्या अन्य चलनांमध्ये हलवण्याचा विचार करण्यास उद्युक्त केले. या पावलामुळे त्यांचे निधी रोखण्याचा किंवा गोठवण्याचा धोका कमी करण्यास मदत होईल. जग प्रचंड मोठ्या भू-राजकीय बदलातून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर रशिया आपले आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्याचा मार्ग शोधत आहे, असे दिसते. 

असे असले, तरी रशियाच्या बाजारात अद्याप डॉलरचेच वर्चस्व आहे. इतके बदल होत असतानाही डॉलर हेच सर्वाधिक वापरले जाणारे चलन ठरले आहे. फक्त अधूनमधून ते आपले सिंहासन युआनला देऊ करते. हे डॉलरचे कायमचे वर्चस्व अधोरेखित करते. अनेक वर्ष रशियाच्या आर्थिक परिप्रेक्ष्यात डॉलरनेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र जगाचा विकास होत असलेला पाहता डॉलर आपला मुकुट किती काळ राखू शकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

 

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sauradeep Bag

Sauradeep Bag

Sauradeep is an Associate Fellow at the Centre for Security, Strategy, and Technology at the Observer Research Foundation. His experience spans the startup ecosystem, impact ...

Read More +