Published on Oct 26, 2023 Commentaries 0 Hours ago

वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये एलपीजीचा वापर स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावणारा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत एलपीजी स्वच्छ जीवाश्म इंधन देखील आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी इंधन: भारतातील एलपीजीचे धोरण

हा लेख कॉम्प्रिहेन्सिव्ह एनर्जी मॉनिटर: इंडिया अँड द वर्ल्ड या मालिकेचा भाग आहे.

जगभरातील अनेक भागांमध्ये LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) हे “ऑटोगॅस” म्हणूनही ओळखले जाते. अन्य उपलब्ध इंधनाच्या तुलनेत सर्वात सामान्य मिश्रित पर्यायी वाहन इंधन म्हणून एलपीजी कडे पाहिले जाते. एकूण ऑटोमोटिव्ह इंधन वापराचा विचार केल्यास ऑटोगॅसचा वाटा युनायटेड स्टेट्समध्ये फक्त 0.04 टक्के दुसरीकडे युक्रेनमध्ये जवळजवळ 28 टक्के आहे. 2021 या वर्षांमध्ये रशिया तुर्की कोरिया पोलंड आणि युक्रेन या पाच देशांनी जागतिक आटो गॅस वापराच्या तुलनेत 50 टक्के वापर केला. त्याबरोबरच 25 देशांचा वाटा 80 टक्के इतका होता. भारताचा विचार केल्यास 348 दशलक्ष नोंदणीकृत वाहनांपैकी फक्त दोन दशलक्षाहून अधिक पेट्रोल एलपीजी असा दुहेरी वापर करणारी वाहने नोंदणीकृत आहेत. जी एकूण नोंदणीकृत वाहनांच्या केवळ0.5 टक्के इतकी आहे. 2023 मध्ये केवळ 131,125 एलपीजी वाहने एकूण नोंदणीकृत वाहनांच्या 0.04 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. वाहतूक इंधन म्हणून एलपीजीच्या वापराच्या वाट्यामध्ये दिसणारा व्यापक फरक हा सरकारी धोरणांमध्ये फरकाशी संबंधित आहे.

नियामक आराखडा

मोटर वाहन कायद्याच्या 1988 च्या कलम 52 मधील सुधारणा पहिल्यास मोटर वाहन ऑर्डर मध्ये एलपीजी वापराचे नियमन त्याबरोबरच 2001 मध्ये केंद्रीय मोटर वाहन (दुरुस्ती) लागू करण्यात आला, ज्यामध्ये एलपीजीचा वापर ऑटो इंधन म्हणून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MOPNG) जारी केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन (ALDS) डीलरची नियुक्ती सरकारी तेल कंपनी किंवा समांतर मार्केटरद्वारे केली जाईल. स्टॅटिक अँड मोबाईल प्रेशर वेसेल्स (अनफायर्ड) नियम, 1981 अंतर्गत वितरण सुविधांच्या संदर्भात सुरक्षिततेच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी विक्रेत्याने मुख्य स्फोटक नियंत्रकांकडून आवश्यक परवाना घेणे आवश्यक आहे. आदेशात असेही म्हटले आहे की अधिकृत ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन डीलरद्वारे ऑटो एलपीजीचीच विक्री केली जाईल. प्रत्येक ऑटो एलपीजी डिस्पोसिंग स्टेशन डीलरने सरकारी तेल कंपनी किंवा समांतर मार्केटरकडून ऑटो एलपीजी खरेदी करणे आवश्यक आहे. वाहनांमध्ये ऑटो एलपीजी टाकी कायमस्वरूपी फिट केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मोटार वाहन खरेदी किंवा वापरणार नाही. 2001 मध्ये केंद्रीय मोटर वाहन नियम अधिसूचित केल्यानुसार अधिकारी चाचणी एजन्सी द्वारे मंजूर केलेल्या एलपीजी किट चा वापर वाहनांमध्ये करणे आवश्यक राहणार आहे.

इतर गोष्टींबरोबरच, डीलरला डिस्पेंसिंग स्टेशनवर ऑटो एलपीजीच्या साठ्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. दुसरीकडे एलपीजी ची किंमत ही प्रशासित किंमत यंत्रणेच्या बाहेर असलेल्या मार्केटनुसार नियमित केली जाते. परंतु सरकार गैरदेशी एलपीजीच्या किमतीवर संपूर्ण नियंत्रण ठेवत आहे. मागणी पूर्ण करण्याच्या साठी लागणारे एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन अपूर्ण असल्याने ऑटो एलपीजी आया तिथून पुरवठा केला जातो. मोटर वाहन सारख्या एलपीजीच्या गैर घरगुती वापरासाठी घरगुती सिलेंडर अनधिकृत पणे वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

ऑटोमोटिव्ह इंधन एलपीजी

विस्फोट न करता अंतर्गत ज्वलन इंजिनामध्ये प्रतिकारशक्ती म्हणून ऑक्टेन रेटिंग हे कॉम्प्रेशन कार्यकर्ते ऑक्टेन रेटिंग हे कॉम्प्रेशन सहन करण्याच्या इंधनाच्या क्षमतेचे मानक आहे. ऑक्टेन क्रमांक जितका जास्त असेल तितका इंधन स्फोट होण्यापूर्वी अधिक कॉम्प्रेशन सहन करू शकेल. विहित ऑक्टेन क्रमांकापेक्षा कमी असलेल्या इंधनाचा वापर केल्याने हवा-इंधन मिश्रण इग्निशन सिस्टम स्पार्क होण्यापूर्वी अकाली स्वयं-प्रज्वलित होऊ शकते. दुरुस्तीच्या वेळी इंजिन ठोकणे किंवा “पिंगिंग” आवाजासह येणे यामुळे इंजिनचे घटक खराब होऊ शकतात. या परिस्थितीमध्ये उच्च दाबांना, स्पार्क-इग्निशन इंजिनमध्ये, कॉम्प्रेशन सायकल दरम्यान हवा-इंधन मिश्रण गरम होते आणि त्यानंतर स्पार्क प्लग वेगाने जाळण्यासाठी ट्रिगर होते. उच्च कॉम्प्रेशन रेशो इंजिनला दिलेल्या वस्तुमान-इंधन मिश्रणातून अधिक यांत्रिक ऊर्जा निर्माण करण्यास पुरेशी ठरते. त्यामुळे उच्च थर्मल कार्यक्षमता वाढते. उच्च कॉम्प्रेशन रेशो सामान्यत: एलपीजीमध्ये पेट्रोलप्रमाणेच वापरले जातात, परंतु एलपीजीचा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलपेक्षा जास्त असतो. भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या पेट्रोल ब्रँड्सना किमान 91 ऑक्टेन रेटिंग आवश्यक आहे. एलपीजी हे प्रोपेन ब्युटेनचे मिश्रण आहे आणि प्रोपेनसाठी ऑक्टेन क्रमांक 112 आहे, तर ब्युटेनचा 94 आहे. पेट्रोलच्या तुलनेत एलपीजीची उच्च-ऑक्टेन संख्या  कार्यक्षमतेचे फायदे देऊ शकतात.

पेट्रोल इंजिनच्या तुलनेत प्री इग्निशन, नॉक साठी कमी संवेदनशील ते सह एलपीजी इंजिन मधील अधिक प्रगत इग्नेशन उच्च कॉम्प्रेशन रेशो सह वापरले जाऊ शकते. स्पार्क प्रज्वलित इंजिन मध्ये पोर्टफ्युअल इंजेक्शन आणिडायरेक्ट इंजेक्शन हे एलपीजीशी संबंधितइंधन तंत्रज्ञान आहेत. इंधन म्हणून LPG सह, सिलिंडरमधील हवेच्या प्रवाहातील फरकाच्या आधारे विशिष्ट सिलेंडर्सना कमी किंवा जास्त इंधन वितरीत करण्यासाठी पोर्ट फ्युएल इंजेक्शन सिस्टम वैयक्तिक इंजेक्टर नियंत्रित केले जाऊ शकतात. हे इंजेक्टर संपूर्ण इंजिनसाठी हवा ते इंधन गुणोत्तर नियंत्रण प्रदान करते. त्यानंतर अधिक कार्यक्षम त्रिमार्गी उत प्रेरक रूपांतरण जे HC (हायड्रोकार्बन), NOx (नायट्रस ऑक्साईड), NH3 (अमोनिया) आणि कण यांसारख्या हानिकारक प्रदूषकांचे उत्सर्जन कमी करते.

विशिष्ट इंजिन मधील पेट्रोलच्या वापराच्या तुलनेत PM निर्मितीच्या संदर्भामध्ये  LPG चा अंतर्निहित फायदा आहे. एलपीजी ची उच्च अस्थिरता ज्वलन कक्षात मिसळण्यास प्रोत्साहन देते, त्यामुळे कमीस्तरीकृत हवा, इंधन मिश्रण प्रदान करते. पेट्रोलच्या तुलनेचा विचार केल्यास कमी कार्बन तीव्रता असलेली काजळी निर्माण करते. पर्यायाने CO2 च्या उत्पादन क्षमतेला मर्यादित करते. याशिवाय द्रव अवस्थेमध्ये LPG थेट इंजेक्शन राखून ठेवते दुसरीकडे प्रगत पेट्रोल इंजिनच्या कार्यक्षमता त्यामुळे वाढण्याची शक्यता असू शकते.

भारतात दुहेरी वापराची LPG वाहने आहेत जी पेट्रोल आणि LPG आणि LPG फक्त मॉडेल्समध्ये बदलू शकतात. दुहेरी इंधनाच्या वाहनांना एलपीजीसाठी अतिरिक्त इंधन इंजेक्टर बसवणे आवश्यक असते तर एलपीजी फक्त वाहने पेट्रोल इंजेक्टरच्या जागी एलपीजी इंजेक्टर लावतात. एलपीजीच्या प्रति व्हॉल्यूमची कमी ऊर्जा आणि वेगवेगळ्या इंजेक्टर डिझाइनची आवश्यकता असलेल्या वंगणता फरकांमुळे हे आवश्यक आहे. एलपीजी वाहने प्रत्येक सिलिंडरसाठी समर्पित इंजेक्टर वापरतात आणि त्यामुळे प्रति सिलिंडर आधारावर सिंगल पॉइंट इंजेक्शन सिस्टीमच्या तुला नाही मध्ये शुद्ध हवेचे अधिक नियंत्रण प्रदान करतात.

ऑटो एलपीजीच्या वापरात वाढ

इतरांच्या तुलनेमध्ये एलपीजी वाहने सीएनजी ( नैसर्गिक वायू) आणि पेट्रोल वाहनांपेक्षा स्वस्त आहेत. एलपीजी साठी लागणारे रूपांतरण किट सीएनजीच्या रूपांतरण कीट पेक्षा कमी खर्चिक आहे. त्याबरोबरच एलपीजी वाहने सीएनजीच्या वाहनांच्या तुलनेत समान प्रमाणात इंधनाच्या दृष्टीने तीन पट जास्त अंतर कापू शकतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एलपीजी वाहनांची देखभाल सीएनजी वाहनांपेक्षा तुलनेने सोपी आहे. LPG वाहने आणि डिस्पेंसिंग स्टेशन्स तुलनेने अधिक सुरक्षित आहेत. कारण LPG वातावरणातील दाबाच्या 10 – 12 पटीने साठवले जाते तर CNG वातावरणातील दाबाच्या 200 – 250 पटीने साठवले जाते. 12 किमी/लिटर (किलोमीटर/लिटर) ची मायलेज असलेले पेट्रोल वाहन दिवसाला 50 किमीसाठी वापरणे सध्याच्या किमतींनुसार एलपीजी वाहन वापरण्यापेक्षा दुप्पट खर्च करणारे आहे. हे फायदे असूनही भारतात वाहतुकीसाठी एलपीजीचा वापर तुलनेने कमी होत आहे.

2011-12 मध्ये, ऑटो एलपीजीचा वापर 233,000 टन किंवा एकूण एलपीजी वापराच्या फक्त 1.4 टक्के इतका होता. 2022-23 मध्ये ऑटो एलपीजीचा वापर 106,000 टन होता जो एकूण एलपीजी वापराच्या 0.3 टक्क्यांपेक्षा कमी होता. 2011-12 आणि 2022-23 दरम्यान एकूण एलपीजीचा वापर वार्षिक सरासरी 5.3 टक्क्यांनी वाढला तर ऑटो एलपीजीचा वापर वार्षिक सरासरी 6 टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो एलपीजी वितरण केंद्रे 2011-12 मध्ये 652 वरून 2014-15 मध्ये 681 पर्यंत वाढली आहेत. तेव्हापासून, ऑटो डिस्पेन्सिंग स्टेशन्सची संख्या सतत घसरून 2022-23 मध्ये 526 वर पोहोचली आहे. भारतामध्ये एलपीजीच्या वापरासाठी वाहतूक इंधन म्हणून प्रोत्साहन देण्याऐवजी स्वयंपाकाचे इंधन म्हणून वापरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एलपीजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत तुलनेने स्वच्छ जीवाश्म इंधन असल्याने, वाहतूक क्षेत्रात त्याचा वापर केल्यास स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. ऑटो एलपीजी चा वापर वाढविण्यासाठी व्यवहाराचे खर्च कमी करणे याबरोबरच ऑटो एलपीजी वापरताना असलेल्या नियमांचे ओझे कमी करणे आवश्यक आहे. यासारख्या काही उपाययोजना केल्यास भविष्यामध्ये ऑटो एलपीजी च्या वापराला चालना मिळण्याची शक्यता वाढते.

Source: Petroleum Planning & Analysis Cell

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Lydia Powell

Lydia Powell

Ms Powell has been with the ORF Centre for Resources Management for over eight years working on policy issues in Energy and Climate Change. Her ...

Read More +
Akhilesh Sati

Akhilesh Sati

Akhilesh Sati is a Programme Manager working under ORFs Energy Initiative for more than fifteen years. With Statistics as academic background his core area of ...

Read More +
Vinod Kumar Tomar

Vinod Kumar Tomar

Vinod Kumar, Assistant Manager, Energy and Climate Change Content Development of the Energy News Monitor Energy and Climate Change. Member of the Energy News Monitor production ...

Read More +