Published on Sep 12, 2023 Commentaries 0 Hours ago

नव्याने सुधारित सिद्धांत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हितसंबंधांमध्ये विस्तृत ज्ञान आणि हवाई शक्तीचा लाभ घेण्याच्या भूतकाळातील अपुरेपणावर मात करण्याचा प्रयत्न करतो.

एअरस्पेस पॉवर – आयएएफचे सैद्धांतिक विहंगावलोकन

हवाई शक्तीची जटिलता आणि परिणामी ती समजून घेण्यात येणारी अडचण हे जगभरातील हवाई शक्तीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. “हवाई शक्तीच्या संदर्भात लष्करी शक्तीचे मोजमाप करणे किंवा अगदी अचूक शब्दांत व्यक्त करणे सर्वात कठीण आहे” हे चर्चिल यांचे आठ दशकांपूर्वीचे निरीक्षण भारतीय संदर्भात विशेषतः खरे ठरत आहे. जगभरातील बलाढ्य सैन्यांनी आपापल्या लष्करी आणि राष्ट्रीय रणनीतींमध्ये हवाई सामर्थ्याचे महत्त्व स्वीकारले असताना, आजही भारताचा फोकस पृष्ठभाग-केंद्रित सुरक्षावर आहे. महाद्वीपीय आणि सागरी डोमेनच्या सेवा-विशिष्ट ऑपरेशनल धोरणांशी संलग्न असलेल्या हवाई शक्तीला केवळ सपोर्ट सर्व्हिस समजणे चुकीचे आहे.

१९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धाचा अपवाद वगळता, भारताच्या सर्व युद्धांमध्ये हवाई शक्तीचा संयमी वापर करण्य़ात आला आहे हे इतिहासावरून दिसुन आले आहे. परंतु, याचा परिणाम म्हणुन आपल्या देशाची सुरक्षा धोरणे आणि निवडी यांवर मर्यादा आली आहे. विशेषत: चीन आणि पाकिस्तान या भारताच्या दोन्ही शेजारील देशांचा विचार करता आपले हवाई दल भविष्यातील सर्व संघर्षांत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच, भारताची वाढती ताकद आणि आशिया हे भविष्यातील भू-राजनीतीचे केंद्रस्थान आहे हे लक्षात घेता, आयएएफ सिद्धांताचा आढावा घेण्याची ही वेळ अचुक आणि समर्पक आहे. भारतीय वायुसेनेच्या नुकत्याच रिवाईज्ड डॉक्टरीनच्या सुरूवातीस हवाई दल प्रमुखांनी असे नोंदवले आहे की भारतीय वायुसेनेने गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक एरोस्पेस पॉवर म्हणुन आपले स्थान निर्माण केले आहे. भारत आपली राष्ट्रीय आणि सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हवाई आणि अंतराळ वातावरणाचे नियंत्रण आणि निरीक्षण करण्यास सक्षम आहे. ही भारताच्या एरोस्पेस पॉवरची सद्यस्थिती आहेच पण त्याहीसोबत भविष्यात येणाऱ्या आव्हानांची चाहुलही आहे.

जगभरातील बलाढ्य सैन्यांनी आपापल्या लष्करी आणि राष्ट्रीय रणनीतींमध्ये हवाई सामर्थ्याचे महत्त्व स्वीकारले असताना, आजही भारताचा फोकस पृष्ठभाग-केंद्रित सुरक्षावर आहे. महाद्वीपीय आणि सागरी डोमेनच्या सेवा-विशिष्ट ऑपरेशनल धोरणांशी संलग्न असलेल्या हवाई शक्तीला केवळ सपोर्ट सर्व्हिस समजणे चुकीचे आहे.

या डॉक्युमेंटची सुरूवात हवाई आणि अंतराळातील सातत्यपुर्ण कामगिरीमुळे आयएएफचा एरोस्पेस पॉवर म्हणुन उदय, हवाई सेवेचे अंतराळ अवलंबित्व आणि भविष्यात राष्ट्राच्या अंतराळ-आधारित आणि अवकाश-संबंधित मालमत्तेच्या मजबूत सुरक्षिततेची गरज हे अधोरेखित करून होते. तंत्रज्ञानाने बदललेली क्षमता, लवचिकता आणि अष्टपैलुत्व, गतिशीलता, प्रतिसाद, ऑफेन्सिव्ह लिथालिटी, ट्रान्स-डोमेन क्षमता ही मुख्य वैशिष्ट्ये देखील युद्धाच्या तत्त्वांचे मिश्रण आणि परिवर्तन कसे करतात, हे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ही डॉक्टरीन एरोस्पेस पॉवरच्या प्रमुख समकालीन आणि भविष्यातील आव्हानांसह राष्ट्रीय सुरक्षेची वैचारिक गुंफण स्पष्ट करतेच पण त्यासोबतच सिद्धांताच्या उत्क्रांती प्रक्रियेला आणि सेवेच्या उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाला देखील आधार देते. नोवल इंक्लुजन हा हवाई रणनीतीवरील एक अध्याय आहे, ज्यामध्ये संपूर्ण स्पेक्ट्रम आणि संघर्षाच्या स्तरांवर राष्ट्रांच्या संयुक्त लष्करी रणनीती, तसेच जमीन आणि सागरी धोरणांसह त्याच्या सैद्धांतिक आणि संरचनात्मक सहभागाचा समावेश आहे. सार्वभौमत्वाचे संरक्षण, प्रतिबंध, हवाई मुत्सद्देगिरी आणि राष्ट्रनिर्मिती यांचा समावेश शांतताकालीन रणनीतीत होतो. तर शांतता आणि युद्ध यांच्यातील अंतर कव्हर करणारी पहिली-नो-वॉर नो-पिस ही रणनीती देखील या डॉक्टरीनमध्ये मांडण्यात आली आहे. भौगोलिक आणि प्रादेशिक सुरक्षा वास्तविकता, राज्य पुरस्कृत दहशतवाद, भारताची धगधगत राहणारी सीमा आणि अंतर्गत सुरक्षा आव्हाने इत्यादी बाबी या माहितीचे वर्चस्व, विविध ऑपरेशन्स आणि बाह्य व अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन्समध्ये एरोस्पेस पॉवरचा आधार म्हणून काम करतात.

मल्टी-डोमेन-मल्टी-स्पेक्ट्रम भारतीय सुरक्षा संदर्भात युध्दकालीन रणनीतीत एरोस्पेस पॉवरच्या वापरामध्ये भूतकाळातील, समकालीन आणि संभाव्य भविष्यातील नियमांच्या परिभाषित पैलूंचा विचार करण्यात आला आहे. तिन्ही सेवांतील लढाऊ शक्तीच्या सर्वांगीण वापरासाठी हवाई नियंत्रणाची महत्त्वपूर्ण सैद्धांतिक अत्यावश्यकता सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या संयुक्त ऑपरेशन्सबाबतीत आयएएफची वचनबद्धता त्याची लढाऊ क्षमता सक्षम करणे, वाढवणे आणि ऑपरेशन्स टिकवून ठेवणे यातुन स्पष्ट झाली आहे. तसेच यामध्ये युद्धकालीन हवाई रणनीती व इतर सेवांसह समन्वित हवाई ऑपरेशन्स आणि आयएएफच्या स्वतंत्र धोरणात्मक हवाई ऑपरेशन्समधील फरक या डॉक्टरीनमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे. १९७१ च्या युद्धात भारतीय सेना पश्चिम पाकिस्तानमध्ये खोलवर शिरलेली होती. त्याप्रकारची व्यवस्था अधिक बळकट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. प्रतिस्पर्ध्याची युद्ध क्षमता कमकुवत करणे त्याच्या दीर्घकालीन राष्ट्रीय क्षमतेवर परिणाम करणे आणि त्याच्या राजकीय इच्छाशक्तीवर दबाव आणणे यासारखी लक्ष्ये या डॉक्टरीनमध्ये समाविष्ट आहेत. ऑफेन्सिव्ह एअर ऑपरेशन्स व एअर डिफेन्स ऑपरेशन्स या दोन हवाई रणनितीचा परिणाम थेटपणे भविष्यातील सर्व संघर्षांवर आणि हवाई संरक्षण ऑपरेशन्सच्या क्षमतांवर होणार आहे. भारताच्या भविष्यातील लढाईची जागा अत्यंत स्पर्धात्मक असणार आहे ही शक्यता लक्षात घेताना वर उल्लेखलेले घटक सामरिक लढाईत आघाडीच्या ऑपरेशन्समध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहेत. यात लॉजिस्टिक नोड्स, संप्रेषण आणि तैनात लष्करी मालमत्ता व सखोल धोरणात्मक लक्ष्यीकरण या बाबीही महत्वाच्या ठरणार आहेत. युद्ध व अंतराळ पारदर्शकतेची क्षमता, लढाऊ नेटवर्किंग, सायबर आणि माहिती युद्ध, इलेक्ट्रॉनिक युद्ध, तंत्रज्ञान-लॉजिस्टिक्स, प्रशासन आणि मानव संसाधन व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या सर्व बाबी भविष्यातील संघर्षांमध्ये मल्टी -डोमेन ऑपरेशन्ससाठी कसे एकत्रित येतात हे देखील या सिद्धांतात स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वभौमत्वाचे संरक्षण, प्रतिबंध, हवाई मुत्सद्देगिरी आणि राष्ट्रनिर्मिती यांचा समावेश शांतताकालीन रणनीतीत होतो. तर शांतता आणि युद्ध यांच्यातील अंतर कव्हर करणारी पहिली-नो-वॉर नो-पिस ही रणनीती देखील या डॉक्टरीनमध्ये मांडण्यात आली आहे.

भविष्यातील आयएएफ क्षमतांमधील अंतराळ क्षेत्रातील प्रासंगिकतेची स्पष्ट समज आणि नागरी-लष्करी औद्योगिक क्षमतांच्या विकासासह संशोधनाचा जवळचा परस्परसंबंध या डॉक्टरीनमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे. स्पेस ही एक मोठी राष्ट्रीय सामाईक बाब आहे आणि यात राष्ट्रीय हित सामावलेले आहे हे स्पष्ट करण्यासाठी घेतलेला सूक्ष्म आणि परिपक्व दृष्टीकोन देखील उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या पलीकडे असलेल्या भविष्यातील भूमिका, काइनेटिक हार्ड पॉवर आणि एरोस्पेस पॉवर प्रदान करणाऱ्या अफाट नॉन-कायनेटिक सॉफ्ट पॉवर क्षमता डॉक्टरीनच्या शेवटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात राष्ट्रबांधणी, राजकारण आणि परराष्ट्र धोरण, प्रादेशिक सुरक्षा आणि आयओआर आणि इंडो-पॅसिफिकमधील स्थिरता आणि इतर राष्ट्रीय हितांचा समावेश आहे. सेवेतील तंत्रज्ञान-चपळता आणि रणनीती सिद्धांतांतील झपाट्याने जुळवून घेण्याची क्षमता आणि विशिष्ट स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला चालना देऊन संयुक्त क्षमतांमध्ये वाढ करणे सुलभ ठरू शकते.

आयएएफची बांधणी, नैतिकता, उद्दिष्टे, भूमिका आणि क्षमता स्पष्ट करून आणि काय करता येऊ शकते व येऊ शकत नाही याची मांडणी करून, हा सिद्धांत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि हवाई शक्तीचा व्यापक ज्ञान आणि उपयोगात भूतकाळातील अपुरेपणा दूर करण्याचा प्रयत्न करतो. भविष्यासाठी राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा धोरणे विकसित करण्यासाठी सुरक्षा आस्थापनामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळाली आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.