-
CENTRES
Progammes & Centres
Location
गोल्डन डोम’च्या माध्यमातून ट्रम्प सर्वसमावेशक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीवर विश्वास दाखवत आहेत — तंत्रज्ञान, राजनिती व अटकाव क्षमतेच्या मर्यादांची कसोटी पाहत.
Image Source: Getty
संयुक्त राष्ट्रांचे (US) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वॉशिंग्टनच्या इतिहासातील सर्वात परिणामकारक अध्यक्ष ठरण्याच्या महत्त्वाकांक्षेने सूचकपणे प्रेरित असल्याचे दिसते. त्यांनी स्वाक्षरी केलेल्या १५० हून अधिक कार्यकारी आदेशांमधून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय धोरणांच्या रचनेत व्यापक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. या आदेशांपैकी अनेकांना न्यायालयीन आव्हाने देण्यात आली असली, तरी ऊर्जा, आर्थिक, व्यापार व सुरक्षा धोरणांच्या क्षेत्रांतील ट्रम्प यांचा परिवर्तनाचा व्यापक आणि पूर्वी न दिसलेला प्रयत्न उठून दिसतो. या सर्वांमध्ये, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेची पुनर्रचना करण्यावर दिलेला त्यांचा विशेष भर उल्लेखनीय आहे. सुरक्षा प्रक्षेपणाच्या चार महत्त्वाच्या पैलूंमध्ये ट्रम्प यांनी नवीन उपक्रम राबवले आहेत: सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी प्रस्तावित अमेरिकन डॉलर 1 ट्रिलियनचा लष्करी अर्थसंकल्प, अमेरिकेच्या सागरी वर्चस्वाचे ‘पुनर्स्थापन’ करण्यासाठीची पावले, F47 नावाच्या नव्या सहाव्या जनरेशनच्या लढाऊ विमानाची घोषणा, आणि ‘गोल्डन डोम’ नावाने ओळखली जाणारी राष्ट्रव्यापी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली. ही सर्व धोरणे महत्त्वाकांक्षी असली, तरी त्यांपैकी बरीचश्या योजना कालांतराने प्रत्यक्षात उतरू शकतात, मात्र ‘गोल्डन डोम’ प्रकल्पावर वेळेत अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अडथळे आहेत, आणि अमेरिकेच्या हवाई संरक्षणाच्या ऐतिहासिक मर्यादांमुळे हे विशेष आव्हानात्मक ठरते.
जेव्हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान वितरण पद्धती, अचूकता आणि वेग यामध्ये वेगाने प्रगती करत आहे, तेव्हा क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीनेही त्याच्या जोडीने विकसित होणे आवश्यक ठरते. क्षेपणास्त्र संरक्षणाचे मर्म हे आक्रमक प्रणालींपेक्षा आघाडीवर राहण्यात आहे, आणि त्यामुळेच अमेरिका आणि चीनमधील धोरणात्मक स्पर्धेतील हे एक महत्त्वाचे मापदंड ठरते.
जेव्हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान वितरण पद्धती, अचूकता आणि वेग यामध्ये वेगाने प्रगती करत आहे, तेव्हा क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीनेही त्याच्या जोडीने विकसित होणे आवश्यक ठरते. क्षेपणास्त्र संरक्षणाचे मर्म हे आक्रमक प्रणालींपेक्षा आघाडीवर राहण्यात आहे, आणि त्यामुळेच अमेरिका आणि चीनमधील धोरणात्मक स्पर्धेतील हे एक महत्त्वाचे मापदंड ठरते. कारण हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आता खेळाचे नियम बदलणारी म्हणजेच गेमचेंजर क्षमता बाळगणारी म्हणून त्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे त्यांना अडवण्यासाठी हवाई संरक्षण बळकट करणे ही मोठ्या शक्तींमधील स्पर्धेच्या व्यापक चौकटीतील एक अपरिहार्य गरज बनली आहे. चीन आणि रशिया हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची शक्यता असताना, अमेरिकेवर त्याच्या भूमीभोवती एक प्रभावी हवाई संरक्षण कवच उभारण्याचा वाढता दबाव आहे. या संदर्भात, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 27 जानेवारी 2025 रोजी काढलेला एक अत्यंत महत्त्वाचा कार्यकारी आदेश दशकापूर्वीच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आहे, ज्याला आता ‘गोल्डन डोम’ या नव्या नावाने सादर करण्यात आले आहे. हा उपक्रम माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशीएटीव (SDI) चे एक आधुनिक स्वरूप मानला जातो, ज्याचा उद्देश अमेरिकेला लष्करी पायाभूत सुविधा आणि लोकवस्ती असलेल्या केंद्रांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून अभेद्य संरक्षण प्रदान करणे हा होता.
1972 मधील अँटी-बॅलिस्टिक मिसाईल (ABM) कराराने या कल्पनेस संस्थात्मक रूप दिले की आक्रमक क्षमता निर्माण करणे अधिक खर्चिक असते, आणि त्यामुळे आक्रमक शस्त्रास्त्रांच्या मर्यादांमुळे संरक्षण प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा कमी होईल. 1970 च्या उत्तरार्धात अमेरिकेने अँटी-सॅटेलाईट (ASAT) क्षमतेचा विकास केला, जो तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या अणुशस्त्रविरहित ASAT चाचणीला तांत्रिक प्रतिसाद म्हणून सुरू झालेल्या क्रिया-प्रतिक्रिया चक्राचा एक भाग होता. तथापि, ASAT तंत्रज्ञान अमेरिकन धोरणकर्त्यांना समाधान देऊ शकले नाही. माजी अध्यक्ष फोर्ड यांच्या कार्यकाळात, ASAT क्षमतेसाठीचा जोर मुख्यतः युद्धाच्या परिस्थितीत सोव्हिएत उपग्रहांना निष्क्रिय करण्याच्या उद्देशाने होता फक्त सोव्हिएत क्षमतांशी समता साधण्यापुरता नव्हे. अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचीस्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशीएटीव (SDI) साठीची धडपड जो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधातील संरक्षण कवचाचा एक प्रकार होता. ह्यामुळे सोव्हिएत युनियनसोबत कोणत्याही द्विपक्षीय शस्त्रनियंत्रण चर्चेला वाव उरला नाही. यामुळे शीतयुद्ध काळात अवकाश तंत्रज्ञान (स्पेस टेक्नोलॉजी) आणि आउटर स्पेसचे ‘पुनःसैनिकीकरण’ (remilitarisation) झाले.
प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ हा विरोधकांच्या स्वरूप आणि क्षमतांविरुद्ध एक संपूर्ण-कक्ष कवच म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे, जो विशेषतः चीन आणि रशिया सारख्या सामर्थ्यशाली प्रतिस्पर्ध्यांकडून येणाऱ्या बॅलिस्टिक, हायपरसोनिक, क्रूज आणि इतर प्रगत क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणे हे उद्दिष्ट ठेऊन तयार करण्यात येणार आहे.
1980 च्या उत्तरार्धात, गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत धोरणकर्त्यांनी सक्रिय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात करण्याच्या योजना सोडून दिल्या आणि त्याऐवजी ASAT (अँटी-सॅटेलाइट) तंत्रज्ञानासारख्या असममित प्रतिकारात्मक उपायांकडे लक्ष केंद्रित केले. शीतयुद्धानंतर, अमेरिकेचे धोरणात्मक लक्ष रशिया व चीनकडून हटून उत्तर कोरियासारख्या अधिक अनिश्चित प्रादेशिक घटकांकडे वळले. उत्तर कोरियाच्या 1998 मधील टेपोडोंग क्षेपणास्त्र चाचणीनंतर, अमेरिकेने 1999 मध्ये नॅशनल मिसाईल डिफेन्स (NMD) कायदा आणला, ज्यामुळे मर्यादित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण देणाऱ्या क्षमतांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला, तसेच रशियन अणुशस्त्र साठ्यांमध्ये कपात करण्यासाठी वाटाघाटीही सुरू राहिल्या.
बुश प्रशासनाने ABM करारातून माघार घेऊन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली व अण्वस्त्र अडथळा धोरण (nuclear deterrence) यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कोणत्याही कमकुवत बाजू (vulnerabilities) दूर करता येतील आणि प्रतिहल्ल्याचा धोका अधिक ठोस करता येईल. या निर्णयामुळे हे मत बळकट झाले की क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विरोधकांच्या धमक्या व आक्रमणांना निष्प्रभ करू शकते आणि अमेरिका व तिच्या सहयोगींवर होणाऱ्या राजकीय दबावातही घट करू शकते. या क्षमतांचे भौतिकीकरण (materialised) जमीन-आधारित आणि समुद्र-आधारित इंटरसेप्टर्सच्या स्वरूपात झाले, जे इराण आणि उत्तर कोरियासारख्या बंडखोर देशांकडून उद्भवणाऱ्या मर्यादित आंतरखंडीय क्षेपणास्त्र (इंटर काँटिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल ICBM) धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आले होते. ही प्रवृत्ती ओबामा प्रशासनाच्या काळातही कायम राहिली.
ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळातील 2019 च्या मिसाईल डिफेन्स रिव्ह्यू (MDR) मध्ये जाणूनबुजून ‘बॅलिस्टिक’ हा शब्द टाळण्यात आला, जेणेकरून विरोधकांच्या धमक्या प्रतिबंधात्मक उपायांची व्याप्ती अधिक व्यापक करता येईल. तसेच, विद्यमान 44 ग्राउंड-बेस्ड इंटरसेप्टर्स (GBIs) पूर्ण करण्यासाठी नेक्स्ट-जेनरेशन इंटरसेप्टर (NGI) चीही ओळख करून देण्यात आली. बायडेन प्रशासनाच्या 2022 च्या MDR मध्ये या धोरणाला कायम ठेवून NGIs साठी अधिक निधी पुरवण्यात आला, जो एकत्रित प्रतिबंधात्मक धोरणाच्या चौकटीत समाविष्ट आहे.
सतत बदलणाऱ्या प्रशासनांतर्गत क्षेपणास्त्र संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासह आणि वाढत्या गुंतागुंतीच्या धोक्याच्या वातावरणामुळे, अध्यक्ष ट्रम्प यांना एक व्यापक क्षेपणास्त्र संरक्षण अजेंडा राबवण्याची संधी मिळाली आहे. प्रस्तावित ‘गोल्डन डोम’ हा विरोधकांच्या स्वरूप आणि क्षमतांविरुद्ध एक संपूर्ण-कक्ष कवच म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे, जो विशेषतः चीन आणि रशिया सारख्या सामर्थ्यशाली प्रतिस्पर्ध्यांकडून येणाऱ्या बॅलिस्टिक, हायपरसोनिक, क्रूज आणि इतर प्रगत क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करणे हे उद्दिष्ट ठेऊन तयार करण्यात आला आहे.
गोल्डन डोम या चौकटीखालील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अमेरिकेच्या भूमीतील नागरी लोकसंख्या आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी इंटरसेप्शन सिस्टमच्या गती, अचूकता आणि घातकतेत वाढ करण्यासाठी डिझाइन केली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशात एक द्विगुणित धोरण ठरवले आहे: विद्यमान जमीन-आधारित सेन्सर नेटवर्कचा विस्तार करणे आणि समुद्र, आकाश व अवकाश यामध्ये बहु-क्षेत्रीय सेन्सर विकसित करून धोका ओळखणे, वर्गीकरण करणे, इंटरसेप्शन करणे आणि धोका निष्प्रभ करणे यामध्ये सुधारणा करणे. या आदेशात दोन महत्त्वाच्या उपग्रह कार्यक्रमांवर भर दिला आहे: हायपरसोनिक आणि बॅलिस्टिक ट्रॅकिंग स्पेस सेन्सर (HBTSS) च्या वेगवान विकासाला प्रोत्साहन देणे आणि प्रोलिफेरेटेड वॉरफायटर स्पेस आर्किटेक्चर (PWSA) चा विकास करणे. याशिवाय, काउंटरव्हॅल्यू हल्ल्यांपासून संरक्षणासाठी अंडरलेअर आणि टर्मिनल-फेज इंटरसेप्शन क्षमतांना वाढवणे ही आणखी एक महत्त्वाची भर आहे. पुरवठा साखळीच्या घटकांसह, हे सर्व घटक एकत्र येऊन गोल्डन डोम या ‘सिस्टम ऑफ सिस्टिम्स’ चे रूप घेतात. हे एक समन्वित आर्किटेक्चर आहे जे प्रगत क्षेपणास्त्रांच्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी तयार केलेले आहे.
गोल्डन डोमचा मूळ उद्देश म्हणजे विरोधकांच्या हल्ल्यांपासून जवळजवळ अजरामर संरक्षण आणि मातृभूमीची निश्चित सुरक्षा प्राप्त करणे. रेगन युगापासून, अमेरिकेने या क्षमतांच्या विकासासाठी सुमारे 250 अब्ज अमेरिकन डॉलर MDA मध्ये गुंतवले आहेत. प्रभावी क्षेपणास्त्र संरक्षण (MD) अमेरिकेच्या व्यापक धोरणासाठी दोन महत्त्वाचे फायदे देऊ शकते. एक म्हणजे, विरोधकांच्या आक्रमक कारवायांचा खर्च वाढेल; आणि दुसरे म्हणजे, कोणत्याही विरोधकाच्या धोरणात्मक तणावाच्या वेळी आघाडी घेऊन हल्ला करण्याचा आत्मविश्वास वाढेल. गोल्डन डोम एक बहुस्तरीय आणि समाकलित नेटवर्क म्हणून विरोधकांसाठी ऑपरेशनल गुंतागुंत आणि धोरणात्मक अनिश्चितता निर्माण करते, ज्यामुळे ते एक प्रभावी प्रतिबंधक ठरते. मात्र, गोल्डन डोमच्या यशस्वीतेचा खरी परीक्षा त्याच्या प्रभावी कार्यान्वयनावर अवलंबून असेल, जे तंत्रज्ञान आणि प्रणालींच्या सततच्या विकासावर खोलवर अवलंबून आहे. हे तांत्रिक अवलंबित्व त्याचा सर्वात मोठा धोका ठरू शकते विशेषतः अशा युगात जेव्हा लष्करी आणि अवकाशीय साधने अधिकाधिक इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून आहेत. शांततेच्या काळातही, अशा संपूर्ण अमेरिकाभरातील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी सातत्याने सुधारणा, मोठे आर्थिक संसाधन आणि वेगवान प्रतिसाद क्षमता आवश्यक असेल.
गोल्डन डोमच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर अनेक आव्हाने आहेत, ज्यामध्ये प्रशासकीय अडथळे, उच्च खर्च आणि तांत्रिक व्यवहार्यतेच्या प्रश्नांचा समावेश होतो. क्षेपणास्त्र संरक्षण वाढवून कमकुवतपणा कमी करण्याच्या अमेरिकन धोरणामुळे बाह्य अवकाश (आउटर स्पेस) कराराच्या शांततामय वापराविषयीही शंका निर्माण झाल्या आहेत.
गोल्डन डोम प्रकल्पाची व्यवहार्यता आणि त्यासंबंधित तांत्रिक आव्हानांची व्याप्ती हे अमेरिकेतील क्षेपणास्त्र संरक्षणाच्या तितकशा यशस्वी नसलेल्या इतिहासाची आठवण करून देते. हा प्रकल्प बहुधा ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यावरही सुरू राहू शकतो, आणि त्याच्या प्रचंड खर्चामुळे तो अनेक वर्षे अमेरिकेच्या वार्षिक संरक्षण बजेटवर दीर्घकालीन ओझे ठरू शकतो. मात्र, हा प्रकल्प ट्रम्पसाठी राजनैतिक वाटाघाटीचा एक महत्वाचा मुद्दाही ठरू शकतो, विशेषतः त्याच्या अणूनिर्मूलन अजेंडाच्या पार्श्वभूमीवर, ज्याचा उद्देश रशिया आणि चीन यांना शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी टेबलावर आणणे आहे. याशिवाय, गोल्डन डोम प्रकल्प जर त्यांच्या प्रदेशांना विस्तारित प्रतिबंध प्रदान करण्यासाठी वापरला गेला, तर ट्रम्प आपले सहयोगी आणि भागीदारांकडून अमेरिकेत गुंतवणूक करण्याची मागणीही करू शकतो. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, अमेरिकेने यापूर्वीच आपल्या शेजारी आणि मित्र राष्ट्र कॅनडाला असा प्रस्ताव दिला आहे.
गोल्डन डोमच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर अनेक आव्हाने आहेत, ज्यामध्ये प्रशासकीय अडथळे, उच्च खर्च आणि तांत्रिक व्यवहार्यतेच्या प्रश्नांचा समावेश होतो. क्षेपणास्त्र संरक्षण वाढवून कमकुवतपणा कमी करण्याच्या अमेरिकन धोरणामुळे बाह्य अवकाश (आउटर स्पेस) कराराच्या शांततामय वापराविषयीही शंका निर्माण झाल्या आहेत. अखेर, अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षणाच्या आधुनिकीकरणामुळे वॉशिंग्टनला आपल्या महान शक्ती प्रतिस्पर्ध्यांसोबत म्हणजेच चीन आणि रशियासोबत एका प्रकारच्या वरचढीच्या स्पर्ध्ये (one-upmanship) मध्ये अडकण्याची शक्यता आहे.
विवेक मिश्रा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे डेप्युटी डायरेक्टर आहेत.
राहुल रावत हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामसाठी रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Vivek Mishra is Deputy Director – Strategic Studies Programme at the Observer Research Foundation. His work focuses on US foreign policy, domestic politics in the US, ...
Read More +Rahul Rawat is a Research Assistant with ORF’s Strategic Studies Programme (SSP). He also coordinates the SSP activities. His work focuses on strategic issues in the ...
Read More +