Image Source: Getty
अर्थविषयक तंत्रज्ञान (फिनटेक) या संकल्पनेचा संदर्भ तंत्रज्ञान प्रेरित अर्थविषयक कल्पकतेशी जोडलेला आहे. फिनटेकमुळे वित्तीय बाजार, संस्था आणि सेवा पुरवठ्यावर लक्षणीय परिणाम होतो आणि उद्योगाची नवी मॉडेल, उपयोजना, प्रक्रिया, उत्पादने किंवा सेवा निर्माण होतात. कार्यक्षम व सुविधाजन्य वित्तीय सेवा पुरवण्यासाठी माहिती व संवाद तंत्रज्ञानाचा (आयसीटी) वापर करणाऱ्या आर्थिक उपायांचा फिनटेकमध्ये समावेश होतो.
फिनटेक केंद्रे ही भारताच्या उदयोन्मुख आर्थिक परिसंस्थेचा गाभा आहेत. त्याचप्रमाणे ही केंद्रे फिनटेक कंपन्या, स्टार्टअप्स आणि त्यांचे कल्पक उपाय रुजण्यासाठी, मोजण्यासाठी आणि विकासासाठी आदर्श वातावरण निर्माण करतात. या परिसंस्थेचा विकास बँका, फिनटेक स्टार्टअप्स, स्केल-अप्स, थर्ड पार्टी तंत्रज्ञान पुरवठादार (टीपीपी), वित्तीय संस्था आणि नियामक यांच्यातील परस्परसंबंधांच्या जाळ्यावर होत असतो. संयुक्तपणे काम करून आणि उद्दिष्टांचा मेळ घालून एक सहायक आराखडा तयार केला जातो. त्यामुळे ग्राहकांना वित्तीय सेवांच्या उपलब्धतेत वाढ होते. अशा परिसंस्थेमुळे तंत्रज्ञानविषयक कल्पकतेला चालना मिळते, कार्यक्षमतेत व वित्तीय बाजारांच्या प्रभावात सुधारणा होते आणि ग्राहकांना मिळणाऱ्या एकूण अनुभवाच्या दर्जातही वाढ होते.
फिनटेक केंद्रे ही भारताच्या उदयोन्मुख आर्थिक परिसंस्थेचा गाभा आहेत. त्याचप्रमाणे ही केंद्रे फिनटेक कंपन्या, स्टार्टअप्स आणि त्यांचे कल्पक उपाय रुजण्यासाठी, मोजण्यासाठी आणि विकासासाठी आदर्श वातावरण पुरवतात. या परिसंस्थेचा विकास बँका, फिनटेक स्टार्टअप्स, स्केल-अप्स, थर्ड पार्टी तंत्रज्ञान पुरवठादार (टीपीपी), वित्तीय संस्था आणि नियामक यांच्यातील परस्परसंबंधांच्या जाळ्यावर होत असतो.
देशाच्या फिनटेक क्षेत्रात जोरदार वाढ होत असून त्यामुळे जागतिक नेतृत्व म्हणून देशाची प्रतिमा भक्कम होत आहे. फिनटेक उद्योगातील एकूण निधीपुरवठ्यात अमेरिका, ब्रिटन आणि चीनच्या पाठोपाठ भारत जगभरात चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ७७ कोटी ८० लाख डॉलरची गुंतवणूक मिळवून भारताने निधी पुरवठ्यामध्ये जगभरात दुसरे स्थान मिळवले आहे. २०२३ च्या तिसऱ्या तिमाहाची तुलना केली, तर ही वाढ उत्तम म्हणजे ६६ टक्के आहे. यावरून या क्षेत्राचा जलद विस्तार होत असल्याचेही अधोरेखित होते. २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत अव्वल कामगिरी करणाऱ्या उपक्षेत्रांमध्ये पर्यायी कर्जाने विक्रमी म्हणजे ५१ कोटी ७० लाख डॉलर एवढा निधी मिळवला. त्या पाठोपाठ तंत्रज्ञान क्षेत्रातील १० कोटी ९० लाख डॉलर आणि पेमेंट्स क्षेत्रातील ९ कोटी ३० लाख डॉलर एवढी गुंतवणूकही मिळवली आहे. या आकड्यांवरून गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचा आणि देशाच्या फिनटेक क्षेत्राच्या गतिशील स्वरूपाचा प्रत्यय येतो.
भारतीय फिनटेक कंपन्यांनी सर्व क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्सने उभारलेल्या एकूण निधीपैकी २१ टक्के निधी प्राप्त केला आहे. त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील त्याचे महत्त्व अधोरेखित होते. सन २०२० पर्यंत सर्वाधिक संख्येने फिनटेक स्टार्टअप्स असलेली पाच शहरे म्हणजे बेंगळुरू ४४७, मुंबई ४३७, नवी दिल्ली २०८, हैदराबाद १३३ आणि गुरुग्राम १२८.
देशाच्या फिनटेक यशोगाथेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधांमधील प्रगती. २०२४ च्या केवळ सप्टेंबर महिन्यासाठी यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारांमध्ये २०.६४ ट्रिलियन रुपये मूल्य असलेले १५.०४ अब्जांचे व्यवहार झाले होते.
सध्या भारतात १२,८९४ फिनटेक कंपन्या आहेत. त्यांमध्ये १६१२ अनुदानित कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आजपर्यंत एकत्रितपणे ३३.८ अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. त्यांपैकी एकाचे वर्गीकरण डेकाकॉर्नमध्ये करण्यात आले असून २५ युनिकॉर्न आणि ८७ सूनीकॉर्नचा समावेश आहे. या फिनटेक कंपन्यांचे संयुक्त मूल्यांकन १२५ अब्ज डॉलर एवढे भरीव आहे. त्यावरून या क्षेत्राची भरघोस वाढ आणि आर्थिक सहयोग अधोरेखित होतो.
आयएफआयएच हे शहराचे फिनटेक इनक्युबेटर आणि गतिवर्धक आहे. त्यामुळे फिनटेक स्टार्टअप्सना निधी प्राप्त करणे, कायद्यासंबंधाने मार्गदर्शन मिळवणे आणि व्यवसायवृद्धी करणे शक्य होऊ शकते.
भारताच्या फिनटेक केंद्रांचा आढावा
फिनटेक केंद्रे ही वित्तीय परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आली आहेत; तसेच त्यांच्याकडे वित्तीय कल्पकता आणि उपाय यांचा अवलंब करण्याच्या दिशेने बाजाराला चालना देण्याची क्षमता आहे. खालील टेबलवरून सध्या कार्यरत असलेल्या काही प्रमुख फिनटेक केंद्रांची झलक दिसू शकेल.
गुजरात
|
गुजरात इंटरॅशनल फिनान्स-टेक सिटी (गिफ्ट सिटी) - गिफ्ट सिटीचे काही प्रमुख घटक म्हणजे, गिफ्ट इंटरनॅशनल फिन्टेक इन्स्टिट्यूट (आयएफआय), गिफ्ट इंटरनॅशनल फिन्टेक इनोव्हेशन हब (आयएफआयएच) आणि इंटरनॅशनल फिनॅन्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी). ‘आयएफआय’कडून उद्योगाशी जोडलेले फिन्टेक शिक्षण, उपयोजित संशोधन व कल्पक कार्य केले जाते. त्याचप्रमाणे आयएफआय शैक्षणिक संस्था, फिन्टेक कंपन्या आणि सरकारी संस्था यांच्याशी सहयोग करते. आयएफआयएच हे शहराचे फिन्टेक इनक्युबेटर व गतिवर्धक असून त्यांमुळे फिन्टेक स्टार्टअप्सना निधी प्राप्त होतो आणि उद्योगाचा स्तर वाढतो. यात उद्योगातील तज्ज्ञ, मार्गदर्शक व कॉर्पोरेट संस्थांचे नेटवर्किंग असेल. या नेटवर्किंगमुळे नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल आणि वाढीच्या काळात उदयोन्मुख कंपन्यांना मदत मिळेल. चार प्रमुख भारतीय नियामकांच्या नियामक अधिकारांसह सुसज्ज : रिझर्व्ह बँक (आरबीआय), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (इर्डा), आयएफएससी हे वित्तीय, वित्तीय उत्पादने आणि सेवा यांच्या सीमापार पुरवठ्याची सुविधा मिळवून देतात. परदेशात चालणारे भारताशी निगडीत आर्थिक व्यवहार भारतात आणणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. गिफ्ट सिटी ही भारतातील पहिली आयएफएससी आहे. ही सिटी ‘डोमेस्टिक टेरिफ एरिया,’ ‘मल्टी सर्व्हिसेस स्पेशल इकनॉमिक झोन,’ आणि कार्यक्षम प्रत्यक्ष पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. या पायावर व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयसीटी, फिन्टेक आणि वित्तीय सेवांमधील कुशल प्रतिभांचा पुरेसा पुरवठा होत आहे.
|
महाराष्ट्र
|
महाराष्ट्राचे फिन्टेक केंद्र आणि धोरण – जागतिक फिन्टेक हबची स्थापना करून आणि २०१८ मध्ये फिन्टेक धोरणाची अंमलबजावणी करून ‘स्मार्ट फिन्टेक सेंटर्स’च्या माध्यमातून राज्यातील फिन्टेक क्षेत्राचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे बँका व वित्तीय सेवा देणारे; तसेच नियामकांजवळ पायाभूत सुविधा व लाभ आणि प्रत्यक्ष सुविधा निर्माण करते. ही केंद्रे फिन्टेक युनिट्सना पाठिंबा देण्यासाठी लागू केलेल्या आयटी/आयटीज २०१५ शी जोडलेल्या वीज दर आणि सुविधा करांवर वित्तीय प्रोत्साहन व सवलतही देतील. कल्पकतेला चालना देण्यासाठी, स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इंडस्ट्री सँडबॉक्स आणि जागतिक फिन्टेक हबसाठी अंमलबजावणी खर्चास पाठिंबा देण्यासाठी २५० कोटी रुपयांचा फिन्टेक निधी उभारला जाईल. या व्यतिरिक्त बँका, उद्योजक आणि भागधारकांच्या भागीदारीमध्ये उभारलेला २० कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी, फिन्टेक गतिवर्धक आणि इन्क्युबेटर्सना वित्तपुरवठा करील. स्रोत, कार्यक्रम आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून आशादायक स्टार्ट-अप्ससाठी वाढीच्या संधींना चालनाही देईल. प्रारंभीच्या काही वर्षांत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या फिन्टेक स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या भत्त्याचे वाटप केले जाईल, तर २० प्रमुख स्टार्टअप्सना वर्षाला प्रत्येकी दहा लाख रुपयांचे अनुदान मिळेल.
|
अन्य काही केंद्रांच्या निर्मितीचे कामही सध्या सुरू आहे आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचे नियोजन व अंमलबजावणी जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कर्नाटक
|
बेंगळुरूमध्ये दि सेंटर ऑफ एक्सलन्स – बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील एनएसआरसीईएल (नादथूर एस. राघवन सेंटर फॉर एंत्रप्रेन्युअल लर्निंग) येथे फिन्टेकमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्सी’ स्थापन करणे, हे इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी (जैवतंत्रज्ञान) आणि माहिती तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने पुढील पाच वर्षांसाठी एकूण १३.२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सेंटर ऑफ एक्सलन्स स्टार्टअप इन्क्युबेशन, गतिवर्धक कार्यक्रम आणि कौशल्य विकास उपक्रमांचा विस्तार करील. त्याच वेळी जागतिक चाचणीसाठी नियामक सँडबॉक्ससह सँडबॉक्स वातावरण तयार करील. त्यासाठी ८.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय प्रमाणीकरण कार्यक्रमांसह कौशल्य व प्रशिक्षणही पुरवले जाईल. त्यामुळे फिन्टेक स्टार्टअप्सना त्यांच्या उपायांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तांत्रिक प्रगती करण्यासाठी सक्षम केले जाईल. यासाठी ५.०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
|
पश्चिम बंगाल
|
न्यू टाउन, कोलकाता येथे फिन्टेक हब - न्यू टाउनचे फिन्टेक केंद्र प्रत्यक्ष मजबूत व सामाजिक पायाभूत सुविधांच्या आधाराने गतिशील इन्क्युबेशन ग्राउंड म्हणून काम करण्यासाठी सज्ज आहे. विकासाच्या विविध टप्प्यांवर २८ वित्तीय संस्था आणि कायदेशीर संस्थांसह फिन्टेक केंद्र बँकिंगला प्रोत्साहन देते आणि फिन्टेक कंपन्यांसाठी समन्वय साधते. त्याचे धोरणात्मक स्थान आयटी हब आणि प्रस्थापित विद्यापीठांजवळ असल्याने ते बुद्धिमंतांचा अखंड पुरवठा करते; तसेच वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात कल्पकता व वाढ यांच्यासाठी आवश्यक परिसंस्थेला बळ देते.
|
उच्च कार्यक्षम फिनटेक केंद्रांचे संभाव्य घटक
सध्याच्या आणि आगामी फिनटेक केंद्रांचा आढावा घेतला, तर असे दिसते, की जास्तीतजास्त परिणाम साधण्यासाठी या केंद्रांसाठी काही प्रमुख घटक महत्त्वाचे आहेत. सध्या फिनटेक हब आणि त्यांच्या नियामक संस्थांची रचना कशी केली जाते, यात काही प्रमाणात विसंगती दिसते. ‘आयएफएससी’च्या भोवती आखलेले ‘गुजरात मॉडेल’ हे एक प्रशंसनीय मानक असून देशाच्या अन्य भागांत त्याच्या प्रतिकृती तयार केल्या जाऊ शकतात.
प्रमाणीकरण कार्यक्रमांसह कौशल्य व प्रशिक्षणही पुरवले जाईल. त्यामुळे फिनटेक स्टार्टअप्सना त्यांच्या उपायांमध्ये सुधारणा करणे आणि तांत्रिक प्रगतीला चालना देणे शक्य होईल.
आदर्श आणि यशस्वी फिनटेक परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने खालील घटकांचे अस्तित्व आणि कार्य यांची गरज असू शकते :
- एक अनुकूल नियामक आणि धोरणात्मक वातावरण: सरकारी धोरणे समतोल नियमनास प्रोत्साहन देऊ शकतात. असे नियमन कल्पकतेला मदत करते आणि मजबूत सुरक्षा व अवलंब यांबाबत आश्वस्त करते. ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारचे नियमन प्रणालीतील धोका कमी करण्यात, वित्तीय पद्धतीत एकूण स्थैर्य राखण्यात, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यात आणि भरीव औद्योगिक वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे भांडवलाची उभारणी प्रभावीपणे करण्यासाठी आयपीओ (प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग)च्या माध्यमातून सार्वजनिक बाजारांमध्ये कंपन्यांना प्रवेश करणे सुलभ करते.
- पायाभूत सुविधा सक्षम करणे: आवश्यक डिजिटल आणि प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उपलब्ध करायला हव्यात. विशेषतः वित्तीय सेवा नवकल्पना मांडण्यासाठी आणि परिसंस्थेतील सर्व भागधारकांना उपलब्ध आराखड्यात स्थान मिळण्यासाठी त्याची गरज आहे.
- कुशल मानवी स्रोतांची उपलब्धता: किफायतशीर आणि उच्च गुणवत्तेच्या तांत्रिक, उद्योजकीय आणि वित्तीय सेवांसाठी कर्मचारी उपलब्ध असणेही आवश्यक आहे.
- भांडवल वृद्धी/निधीची उपलब्धता: स्टार्टअप आणि अन्य उद्योगांमध्ये नवी संस्कृती; तसेच मापनासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी जोखीम भांडवलाची उपलब्धता असणेही आवश्यक आहे.
- फिनटेक परिसंस्थेच्या अन्य भागांमध्ये सहज प्रवेश: फिनटेक परिसंस्थेच्या अन्य भागांसह गतिवर्धक, नियामक आणि बँकिंग व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसह मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आव्हाने
- संयुक्त धोरण आणि नियामक यंत्रणेची गरज: फिनटेक केंद्रे ही भारतीय वातावरणातील तुलनेने अलीकडे झालेली घटना आहे. त्यामुळे साध्य करावयाची विशिष्ट उद्दिष्टे, पायाभूत सुविधा आणि विशिष्ट कालमर्यादेत ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या संस्था व अर्थसंकल्पीय उद्देशांवर सुसंगत आणि एकसंध देशव्यापी अथवा राज्यवार धोरणाचा अभाव आहे. या शिवाय, फिनटेक परिसंस्थेच्या सर्व बाजू पाहणाऱ्या एकसमान नियामक यंत्रणेच्या अभावामुळे नियामक अनिश्चितता निर्माण होऊ शकते; तसेच देशभरात समान समर्थनाच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण होऊ शकतो.
- मानवी आणि संस्थात्मक क्षमता: वर विचार केल्याप्रमाणे, यशस्वी फिनटेक परिसंस्थेला मजबूत पायाभूत सुविधा (डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष पायाभूत सुविधा), मानवी स्रोतांची सहज उपलब्धता, वृद्धी भांडवल किंवा निधीची उपलब्धता व स्रोतांची उपलब्धता, मागणी येण्यासाठी प्रयत्न आणि विकसित फिनटेक उत्पादकांचे मार्केटिंग यांची आवश्यकता आहे. देशातील प्रत्येक राज्यात यशस्वीपणे कार्यरत राहण्यासाठी फिनटेक केंद्राला आवश्यक असलेल्या क्षमतेत या सर्व चार घटकांचा समावेश असेलच, असे नाही. त्यामुळे त्याचा फिनटेक केंद्रांच्या व कंपन्यांच्या एकसमान विकासाला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम होऊन स्थानिक वृद्धीला वेग येऊ शकतो.
- कर्मचाऱ्यांसंबंधी अडथळे आणि बेरोजगारीची समस्या: सध्याच्या वित्तीय बाजार रचनांमध्ये फिनटेकचा हस्तक्षेप आणि उपाययोजना जलद वापर यांमुळे विद्यमान कर्मचारी रचनांमध्ये अडथळा येऊ शकतो; तसेच सध्या असलेल्या कार्यक्षमता निरुपयोगी ठरू शकतात. यामुळे नोकऱ्या जाऊ शकतात आणि फिनटेक केंद्र व कंपन्यांच्या स्थिर वाढीचे सकारात्मक परिणाम व अशा उपायांचा अवलंब या सर्वांचा एकत्रित उलट परिणाम होऊ शकतो.
- सायबरसुरक्षेचा चिंतेचा मुद्दा: जागतिक स्तरावर गेल्या २० वर्षांमध्ये २०२४ पर्यंत आर्थिक क्षेत्रावर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये २० अब्ज डॉलर गमवावे लागले आहेत. अशा घटनांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातो आणि लोकांचा फिनटेकचा अवलंब करण्याचा वेग कमी होतो. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात निधी मिळवण्यासाठी झगडत असलेल्या फिनटेक स्टार्टअप्ससाठी ते फारच हानीकारक असते.
फिनटेक कंपन्यांच्या भागीदारीने भारत सरकार सायबर सुरक्षा उपायांचा आढावा घेणार असून फिनटेक सायबर परिदृश्यात (लँडस्केप) नियंत्रण अधिक मजबूत करून सायबर सुरक्षेच्या धोक्यांशी सामना करणार आहे.
पुढील दिशा
संयुक्त धोरणाची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारे प्रथम विद्यमान फिनटेक बलस्थानांची आणि कार्यक्षमतांची रूपरेषा सांगणारी एक वैयक्तिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू शकते. याचा पाठपुरावा तपशीलवार कालमर्यादित उद्दिष्टे आणि राज्याच्या फिनटेक धोरणांमध्ये नमूद करण्यात आलेली योजना, केंद्रीय आराखडा किंवा भारत सरकारकडून आखण्यात आलेले धोरण यांच्या माध्यमातून करता येऊ शकतो. भारतीय वित्तीय परिदृश्यात फिनटेक उपायांची अंमलबजावणी करताना काम करताना कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक रचनात्मक धोरण आवश्यक आहे. हे धोरण तांत्रिक गरजा व त्यासाठी कौशल्याच्या पुनर्प्रशिक्षणाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेचे सातत्याने मूल्यांकन करणे, या पद्धतीने अवलंबिले जाऊ शकते. यामुळे रोजगारक्षमतेत वाढ होऊ शकते आणि कर्मचाऱ्यांकडे उपयुक्त कौशल्यही असू शकते. फिनटेक कंपन्यांच्या भागीदारीने भारत सरकार सायबर सुरक्षा उपायांचा आढावा घेणार असून फिनटेक सायबर परिदृश्यात (लँडस्केप) नियंत्रण अधिक मजबूत करून सायबर सुरक्षेच्या धोक्यांशी सामना करणार आहे. फिनटेक उत्पादनांवर जनतेचा विश्वास आणखी वाढवण्यासाठी ग्राहकांना सायबर सुरक्षा उपायांचे महत्त्व सांगणाऱ्या सार्वजनिक स्तरावरील जागरूकता मोहिमा राबवणे, हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असू शकते.
देबज्योती चक्रवर्ती हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’मध्ये संशोधन सहाय्यक आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.