Expert Speak Raisina Debates
Published on Jun 18, 2024 Updated 0 Hours ago

चीन, रशिया आणि भारत या त्रिमितीय समीकरणामध्ये चीनने भारत आणि रशिया यांच्यातील सखोल संबंध स्विकारायला हवेत. अन्यथा इंडो- पॅसिफिकच्या भूराजकारणामध्ये रशिया चीनपासून दूरावेल किंवा भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाईल.

चीन-रशिया संबंधांमध्ये भारताचा वाढता प्रभाव

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर, चीन आणि रशिया यांच्यातील मैत्रीचा नकारात्मक परिणाम भारत – रशिया पारंपारिक संबंधांवर होईल व भारताच्या राष्ट्रीय हिताला धक्का लागेल आणि जर असे झाले तर चीनी धोक्यापासून भारत असुरक्षित होईल अशा प्रकारची चर्चा भारतात व भारताच्या बाहेरही होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अलीकडेच चीन दौरा केला आहे. ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा आहे. याच पार्श्वभुमीवर भारताने रशियापासून दूर जावं अशी मागणी जोर धरत आहे.

चीन, रशिया आणि भारत या त्रिमितीय समीकरणामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील सखोल संबंध स्विकारण्याशिवाय चीनकडे इतर पर्याय उपलब्ध नाही. चीनने हे संबंध स्विकारले नाहीत तर इंडो- पॅसिफिकच्या भूराजकारणामध्ये रशिया चीनपासून दूरावेल किंवा भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाईल, असा युक्तिवाद चीनी साहित्याच्या अभ्यासाच्या आधारे करण्यात येत आहे.

जून २०२३ मध्ये, जेव्हा चीन आणि काही इतर जी २० सदस्य देशांनी भारताने काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या जी २० पर्यटन शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला होता, तेव्हा रशियाने बहिष्काराकडे दुर्लक्ष करत हाय प्रोफाइल प्रतिनिधित्वासह शिखर परिषदेला उपस्थिती लावलेली होती. या घटनेकडे चीनचे बारीक लक्ष होते व यामुळे चीनमधील रशियाचे समर्थक काहीशा कात्रीत अडकल्याचे चित्र होते. पुढे ऑगस्ट २०२३ च्या मध्यात, भारत आणि चीन यांच्यात कमांडर-स्तरीय चर्चेच्या फेरीचे आयोजन केले जात असताना, नियोजित वेळेनुसार रशिया एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भारताला सुपूर्द करेल अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये झळकली. यामुळे चीनमध्ये जनक्षोभ निर्माण झाला आणि चीन-रशियामधील अमर्याद मैत्री आणि धोरणात्मक समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

चीनसोबत सीमासंघर्ष असणाऱ्या भारताला लष्करी मदतीचा हात देऊन, चीनच्या पाठीत वार केल्याबद्दल अनेकदा रशियावर टीका केली जाते.

चिनी प्रसारमाध्यमांच्या सर्वेक्षणामधून भारत-रशिया यांच्यातील मजबूत संबंधांवरील चीनची तीव्र नाराजी स्पष्ट झाली आहे. चीनसोबत सीमासंघर्ष असणाऱ्या भारताला लष्करी मदतीचा हात देऊन, चीनच्या पाठीत वार केल्याबद्दल अनेकदा रशियावर ऑनलाईन टीका केली जाते. रशियाने भारताला फोर्थ जनरेशन टँक टेक्नॉलॉजी ऑफर केल्यामुळे व शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनपासून सुदूर पूर्वेपर्यंत चीन-रशियाच्या प्रत्येक उपक्रमात भारताचा समावेश करण्यासाठी रशिया आग्रही असल्याने रशियाच्या हेतूवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. भविष्यात चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध झाल्यास रशिया कोणाची बाजू घेईल ? अशाप्रकारचा प्रश्नही काही चिनी तज्ञांना पडलेला आहे.  

चीन - रशिया - भारत सामरिक समीकरण हे रशिया व भारत सामरिक संबंधांकडे झुकल्याची कबुली चिनी सामरिक समुदायातील काहींनी दिली आहे. रशिया आणि चीन ही दोन्ही राष्ट्रे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून उद्भवणाऱ्या समान आव्हानांना तोंड देत आहेत म्हणूनच एकत्र राहणे दोन्ही राष्ट्रांसाठी सोयीचे आहे. तर दुसऱ्या बाजूस भारत आणि रशिया यांची कोणतीही सामायिक सीमा नाही, दोन्ही देशांत कोणताही वाद अथवा संघर्ष नाही, त्यामुळे या देशांतील संबंध नैसर्गिक सहयोगाचे आहेत.

रशिया आणि भारत यांच्यातील घनिष्ट संबंधांमुळे चीनवर भौगोलिक व राजकीय मर्यादा येत असली आणि चीनमधील जनभावना दुखावल्या गेल्या असल्या तरी या मतभेदांच्या पलीकडे जाऊन कृती करण्याची अनेक कारणे चीनकडे आहेत.

सर्वप्रथम, रशियासोबतची संयुक्त आघाडी ही केवळ चीनच्या नेतृत्वाखालील जागतिक व्यवस्था पुढे नेण्यासाठी नव्हे, तर इंडो-पॅसिफिकमधील वाढत्या हितसंबंधांमधील अलिप्तता टाळण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजिक गेममध्ये भाग घेण्यासाठी अमेरिका आणि भारत अनेक युरोपीय देशांना हिंदी महासागराच्या प्रदेशातील राजकारणात सहभागी करून घेत असल्याने व हे देश या प्रदेशात त्यांचे लष्करी अस्तित्व सक्रियपणे शोधण्याच्या प्रयत्नात असल्याने चीन चिंतेत आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये रशियाच्या भूमिकेचे पुनरुज्जीवन करण्यामागील भारताचे हित चीनला चांगलेच ठाऊक आहे. परंतू, युक्रेन युद्धामुळे अशा शक्यतांना विराम मिळाला आहे ही चीनसाठी दिलासादायक बाब आहे. मिलन या भारताच्या सर्वात मोठ्या सागरी सरावामध्ये रशिया आणि अमेरिकेची उपस्थिती ही चीनसाठी धोक्याची घंटा आहे. आजच्या घडीला चीन व रशिया यांच्या मैत्रीबाबत जगभर चर्चा होत असताना चीन मात्र युक्रेन युद्धानंतर या पुढील काळात या संबंधांच्या शाश्वततेवर गांभिर्याने विचार करत आहे, हे बाब लक्षात घेण्याजोगी आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत रशिया भारताकडे शेवटच्या काही आर्थिक आणि भू-राजकीय जीवनरेखांपैकी एक म्हणून पाहतो. याच पार्श्वभुमीवर चीनला रशियाशी संबंध टिकवून ठेवणे आणि भारत – रशिया संबंधांमुळे चीन व रशिया यांच्यातील संबंध बिघडू नये यासाठी चीन आग्रही आहे.  

दुसरी बाब म्हणजे, जर रशिया-भारत संबंध खरोखरच बिघडले आणि चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने रशियन शस्त्रास्त्रांची खरेदी कमी केली, तर तो अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशांकडून अधिक खरेदी करेल, ही बाब चीनला माहीत आहे.

दुसरी बाब म्हणजे, जर रशिया-भारत संबंध खरोखरच बिघडले आणि चीनच्या हस्तक्षेपामुळे भारताने रशियन शस्त्रास्त्रांची खरेदी कमी केली, तर तो अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशांकडून अधिक खरेदी करेल, ही बाब चीनला माहीत आहे. असे झाले तर भारत पाश्चिमात्य देशांच्या अधिक जवळ जाईल आणि ही बाब चीनच्या हितासाठी अत्यंत हानिकारक आहे. भारत व अमेरिका यांच्यातील संबंध जर मजबूत झाले तर त्यामुळे सर्वात जास्त नुकसान चीनचे होणार आहे. सध्या रशिया फॅक्टरमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध काही प्रमाणात ताणलेले आहेत. म्हणूनच, इंडो पॅसिफिकच्या मुद्द्यावर चीनवर तुलनेने कमी दबाव आहे आणि तैवान व दक्षिण चीन समुद्र विवादांमधील घडामोडींवर प्रभाव टाकणे चीनसाठी तुलनेने अधिक सोपे आहे.

रशिया व भारत संबंधांबद्दल चीनमधे खोलवर असुरक्षितता आहे. युद्धग्रस्त रशियावर आपला प्रभाव वापरून रशिया - भारत संबंधांचा वापर आपल्या हितासाठी करण्याचा मोह चीनला आवरता आलेला नाही. इंडो-पॅसिफिकच्या भू-राजनीतीमध्ये संयुक्त आघाडी तयार करण्यात रशियाचे महत्त्व लक्षात घेता, भारताच्या मुद्द्यावरून रशियाला दूर करण्यास चीन तयार नाही. भारताला अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी रशियाला बुद्धिबळातील प्यादे म्हणून वापरणे चीनच्या हिताचे आहे.  

चीनमुळे भारत - रशिया संबंधात अंतर येईल अशाप्रकारची चर्चा करण्याआधी भारत-रशिया-चीन यांच्यातील जटील समीकरणाचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.


अंतरा घोषाल सिंग ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Antara Ghosal Singh

Antara Ghosal Singh

Antara Ghosal Singh is a Fellow at the Strategic Studies Programme at Observer Research Foundation, New Delhi. Her area of research includes China-India relations, China-India-US ...

Read More +