Published on Jan 05, 2024 Updated 0 Hours ago

इस्रायल आणि हमास युद्धात मध्यस्थ्याची भूमिका निभावणं आणि मध्यपूर्वेतील राजकीय शक्ती म्हणून पुढे येण कतारचं उद्दिष्ट असल्याचं दिसत आहे. मात्र यासोबत त्यांच्या पुढ्यात बरीच आव्हानं देखील येत आहेत.

इस्रायल-हमास युद्धात कतारची भूमिका
खरं तर 1971 मध्ये कतार हे आखाती प्रदेशातील एक लहान राष्ट्र म्हणून पुढं आलं. या छोट्या देशाने मध्य पूर्व (पश्चिम आशिया) मध्ये प्रादेशिक संघर्ष आणि समस्यांमध्ये आपली उपस्थिती दाखवून सगळ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. कतारचं परराष्ट्र धोरण हे सध्याच्या इतर आखाती राष्ट्रांसारखंच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश सौदी अरेबियाच्या रथावर स्वार झाला. संरक्षणासाठी ते या देशावर अवलंबून होते. परंतु 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी आपलं धोरण बदललं. हा बदल दोन घटकांनी घडवून आणला. पहिलं म्हणजे कुवैत (1990) वरील इराकी आक्रमण जे सौदी अरेबियाने रोखलं नाही.  यातून कतारला संकेत मिळाले की ते त्यांच्या सुरक्षेसाठी सौदीवर अवलंबून राहू शकत नाहीत. आणि दुसरं म्हणजे शेख हमाद बिन खलिफा 1995 मध्ये सत्तेवर आले आणि त्यामुळे समीकरण बदलली.

कतारचे परराष्ट्र धोरण हे सध्याच्या इतर आखाती राष्ट्रांसारखेच आहे.

कतारच्या स्वातंत्र्यावर जोर देण्यासाठी शेख हमाद बिन खलिफा यांनी  परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. यात इराण आणि सौदी हे त्यांचे दोन शेजारी होते, जे एकमेकांचे विरोधक होते, यांच्यातील हितसंबंधात संतुलन राखण्यास सुरुवात केली. या परराष्ट्र धोरणातील बदलाचा एक भाग म्हणून कतारने सॉफ्ट पॉवरमध्ये गुंतवणूक करून आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली. 1996 मध्ये अल जझीराची स्थापना करणं याच हालचालीचा एक भाग होता. पुढे  1996 मध्ये इस्रायलशी अधिकृतपणे संबंध प्रस्थापित करणारे ते पहिले आखाती राष्ट्र बनले. थोड्याच दिवसांत त्यांनी युनायटेड स्टेट्स (यूएस) सैन्यासाठी अल उदीद एयर बेसच्या माध्यमातून अमेरिकेसाठी आपले दरवाजे उघडले. 9/11 च्या हल्ल्यानंतर इथूनच अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अल-कायदावर हल्ले सुरू केले. 

इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी 

त्यांच्या परराष्ट्र धोरणातील समतोल कृती व्यतिरिक्त, कतारने मध्यपूर्वेतील विविध संघर्षांमध्ये मध्यस्थ म्हणून देखील काम केले. उदाहरणार्थ, हमास आणि फतह (पॅलेस्टाईनमधील एक प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष) मध्ये राजकीय मध्यस्थी करणे. गेल्या दोन दशकांपासून  लिबिया, दक्षिण सुदान, लेबनॉन, येमेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात कतारच्या मध्यस्थी भूमिकेमुळे त्यांना या प्रदेशात मजबूत व्हायला मदत झाली आहे.
हमासने गाझा पट्टीतून तत्कालीन पॅलेस्टिनी प्राधिकरणाची हकालपट्टी केल्यानंतर 2006 पासून कतार आणि हमासचे संबंध आणखीन मजबूत झाले आहेत. तेव्हापासून, कतार विविध शिखर परिषदांमध्ये आणि बैठकांमध्ये हमासच्या अधिकाऱ्यांना बोलवत आहे.  2016 पासून, हमासचा सध्याचा नेता इस्माइल हनीयेह देखील देशात ये जा करत आहे. हमासच्या काही वैचारिक गोष्टी सोडल्या तर गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांचे जीवन सुधारले जाऊ शकते यासाठी कतार हा एकमेव मार्ग आहे. या विश्वासामुळे कतारने गेल्या काही दशकांमध्ये या प्रदेशात 1 अब्ज युएस डॉलर पाठवले आहेत.

2011 च्या अरब स्प्रिंग दरम्यान कतारच्या मध्यस्थी भूमिकेमुळे त्यांना या प्रदेशात मजबूत व्हायला मदत झाली आहे.

याउलट, कतार 1996 पासून इस्राएलशी देखील संलग्न आहे आणि 2009 पर्यंत त्यांचे संबंध नाममात्र होते. पण गाझावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी इस्त्रायलशी संबंध तोडले. इस्त्राईलसोबतचे त्यांचे संबंध हे अमेरिकेसोबतच्या संबंधाचा एक भाग होते. कारण त्यांचे आणि अमेरिकेचे व्यापार आणि लष्करी संबंध मजबूत होते. शिवाय इराण आणि अफगाणिस्तान (विशेषतः तालिबान) यांच्याशी अमेरिकेच्या शत्रुत्वात मध्यस्थी करण्यात मदत केली आहे. अशाप्रकारे, यूएस आणि कतारच्या संबंधांमध्ये संतुलन राखण्याच्या इच्छेमुळेच ते अधिकृतपणे तोडूनही इस्रायली अधिकार्‍यांशी बॅक-चॅनल संपर्क राखू शकले आहेत. 

वर्तमान मध्यस्थी आणि दृष्टीकोन

बहुतेक निरीक्षकांच्या मते, हमास आणि इस्रायलमधील युद्धविराम किंवा तणाव कमी करण्यासाठी कतारने प्रयत्न करावेत, त्याशिवाय हे शक्य नाही. वाटाघाटीमध्ये इस्त्रायल आणि हमासच्या दोन्ही नेत्यांना बोलवून कमीतकमी दोनदा युद्धविराम साध्य करण्यात कतारला यश आलं आहे. एकंदरीत, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षात कतारची भूमिका महत्वाची आहेच. पण युद्ध संपल्यानंतरही शांतता आणि पुनर्रचना करण्यासाठी त्यांना कतारच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
मात्र, या मध्यस्थीमुळे कतारचा मध्यपूर्वेमध्ये एक मध्यम शक्ती आणि राजकीय शक्ती म्हणून पुढं येण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रदेश संघर्षांनी भरलेला आहे. इतर अरबांनी सुरू केलेली नाकाबंदी यांसारख्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आणखी समस्या उद्भवल्यास कतार पाश्चात्य देशांसाठी एक महत्वाचं राष्ट्र म्हणून स्वतःला पुढे आणू इच्छित आहे. जसं की, 2017 आणि 2021 दरम्यान अरब राष्ट्रांनी त्यांच्या विरोधात केलेली नाकाबंदी.
या हालचालींद्वारे, कतारचे परराष्ट्र धोरण काळानुरूप बदलले आहे. सौदी अरेबियाने पुरविलेल्या सुरक्षेपासून ते त्याचा प्रभाव वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या स्वतंत्र धोरणापर्यंत पाहायचं झाल्यास कतारला  सध्याच्या संघर्षामुळे एक मजबूत स्थिती प्राप्त झाली आहे. मात्र यासोबत काही आव्हाने देखील आहेत.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षात कतारची भूमिका युद्ध संपल्यानंतर शांतता आणि पुनर्बांधणीची सुनिश्चिती करणे आहे.

पॅलेस्टिनींच्या बाजूने मजबूत धोरण आखण्याबद्दल बहुतेक अरब आणि मुस्लीम जग कतारकडे सकारात्मकतेने पाहत आहेत. मात्र, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या संबंधांचीही किंचित चाचणी घेतली जात आहे. यूएस धोरणकर्त्यांची अशी मागणी आहे की, हमासने  इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना कतारने बाहेरचा रस्ता दाखवावा. इस्रायलनेही हमासचा संपूर्णपणे नाश करण्याची शपथ घेतली आहे.
हे दोन्ही पर्याय कतारसाठी अनुकूल नाहीत. जर हमासला (कतारमधून किंवा अस्तित्वातून) काढून टाकायचं असेल तर कतार त्याचा सर्वात मोठा संपर्क गमावेल. पण पुढच्या काळात हमासने हल्ले वाढवले तर कतारवर दबाव येऊ शकतो. तसेच अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो. अवघड पेचात अडकलेल्या, कतारला आता आशा आहे की अमेरिकेला गॅस आणि उर्जेचा मजबूत पुरवठा, यूएस लष्करी तुकडीला दिलेला पाठिंबा यामुळे इतर संघर्षांमध्ये मध्यस्थी करता येईल. एकदा प्रकरण थंड झालं की कतारला अमेरिकेला कतारबरोबर संबंध सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल.
मोहम्मद सिनान सियेच हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अनिवासी सहयोगी फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Mohammed Sinan Siyech

Mohammed Sinan Siyech

Mohammed Sinan Siyech is a Non – Resident Associate Fellow working with Professor Harsh Pant in the Strategic Studies Programme. He will be working on ...

Read More +