Author : Shairee Malhotra

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 22, 2024 Updated 0 Hours ago

तुर्की आणि हंगेरीकडून प्रारंभीच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले तरी, स्वीडनने अखेरीस ‘नाटो’चे सदस्यत्व प्राप्त केले आहे, जो युरोपच्या उत्तरेकडील प्रदेशात असलेल्या राष्ट्राकरता एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.

स्वीडन आणि सामर्थ्यशाली नाटो

फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन विरोधात रशियाने पुकारलेले युद्ध हे काही प्रमाणात, नाटोचा विस्तार रोखण्यासाठी होते. गमतीची गोष्ट अशी की, याच्या नेमके उलट घडले आहे. फिनलंडच्या प्रवेशासह ३१ सदस्यांपर्यंत विस्तारलेली पूर्वीची ३० सदस्यीय युती लवकरच ३२ सदस्यांची होईल.

२०० वर्षांहून अधिक काळ स्वीडनने आणि फिनलँडने लष्करी तटस्थता राखली, जी दोन महायुद्धांमध्ये आणि शीतयुद्धादरम्यान सुरू होती. शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे स्वीडनने आपला संरक्षण खर्च कमी केला आणि त्याऐवजी जागतिक शांतता मोहिमांवर आपले लक्ष केंद्रित केले. केवळ २०२१ मध्ये स्वीडनचे माजी संरक्षण मंत्री पीटर हल्टक्विस्ट यांनी घोषित केले की, स्वीडन कधीही ‘नाटोमध्ये सामील होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणार नाही’, परंतु रशियाच्या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, ज्यामुळे त्यांनी शतकानुशतके राखलेली तटस्थता सोडली आणि मे २०२२ मध्ये, ‘नाटो’मध्ये सामील होण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केले.

शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे स्वीडनने आपला संरक्षण खर्च कमी केला आणि त्याऐवजी जागतिक शांतता मोहिमांवर आपले लक्ष केंद्रित केले.

पूर्व युरोपीय देशांच्या प्रवेशासह १९९१ मध्ये ‘नाटो’च्या झालेल्या अखेरच्या विस्तारानंतर, फिनलंड एप्रिल २०२३मध्ये युतीत सहभागी झाला. मात्र, स्वीडनच्या प्रवेशास मार्गातील अडथळ्यांमुळे अधिक वेळ लागला आहे, याचे कारण ‘नाटो’मध्ये सदस्य राष्ट्रांच्या सहमतीने निर्णय घेतला जातो.

स्वीडनला मिळाला हिरवा कंदील

पहिला अडथळा होता तुर्किये, ज्या देशाने युरोपीय युनियनने दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केलेल्या ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’सारख्या कुर्दिश अतिरेकी संघटनांना स्वीडनच्या असलेल्या कथित समर्थनाच्या आधारावर आणि तुर्कीच्या सुरक्षेची चिंता कमी करण्यास स्वीडनने दाखविलेल्या असमर्थतेमुळे स्वीडनला मान्यता देण्यास विलंब केला. स्वीडनमध्ये कुराण जाळण्याचा निषेध, आणि अंकाराला एफ-१६ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेच्या मंजुरीला होणारा विलंब यांमुळे ही गुंतागुंत अधिक वाढली. जून २०२३ मध्ये, स्वीडनने दहशतवादविरोधी कठोर कायदा स्वीकारला, ज्यामुळे जानेवारी २०२४ मध्ये स्वीडनच्या ‘नाटो’ प्रवेशासाठी तुर्कियेची मान्यता मिळाली.

याशिवाय, स्वीडनचे सदस्यत्व हंगेरीच्या लहरीपणाने आणि परिचित अडथळावादाने विशिष्ट अटींच्या पूर्तीकरता ताटकळले होते. अनेक युरोपीय युनियनच्या धोरणांबाबतची स्थिती प्रत्यक्षातील तथ्यांपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणून सर्वसामान्य निष्कर्ष काढता येणार नाही, हंगेरीने रशियाशी घनिष्ठ संबंध राखले आहेत आणि अनेकदा युरोपीय युनियनला- युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदत करण्यास विरोध केला आहे. या प्रकरणी, हंगेरीने पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन आणि त्यांच्या राष्ट्रवादी फिडेझ पक्षाच्या नेतृत्वाखालील हंगेरियन लोकशाही सरकारवर स्वीडनने केलेल्या टीकेचा बदला म्हणून हंगेरीने स्वीडनच्या ‘नाटो’ सदस्यत्वाला विरोध केला. ऑर्बनचे प्रवक्ते झोल्टन कोवाक्स यांनी स्वीडिश अधिकाऱ्यांवर “नैतिक श्रेष्ठतेच्या ढासळत्या सिंहासनावर” बसल्याचा आरोप केला.

अनेक युरोपीय युनियनच्या धोरणांबाबतची स्थिती प्रत्यक्षात तथ्यांपेक्षा खूप वेगळी आहे, म्हणून सर्वसामान्य निष्कर्ष काढता येणार नाही, हंगेरीने रशियाशी घनिष्ठ संबंध राखले आहेत आणि अनेकदा युरोपीय युनियनला- युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदत करण्यास विरोध केला आहे.

१८ महिन्यांच्या भांडणानंतर, हंगेरीच्या संसदेने अखेरीस स्वीडनच्या ‘नाटो’ सदस्यत्वाला मान्यता देण्याच्या बाजूने १८८ (आणि विरोधात ६) असा कौल दिला. हंगेरीच्या विद्यमान ग्रिपेन ताफ्यात आणि संरक्षण क्षमतांमध्ये भर घालण्यासाठी चार स्वीडिश ग्रिपेन लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या संरक्षण विषयक करारावर हंगेरीने आणि स्वीडनने सहमती दर्शवल्यानंतर ही मान्यता प्राप्त झाली.

‘नाटो’चा भागीदार देश या नात्याने युतीचे अधिकृत सदस्यत्व मिळण्यापूर्वी, स्वीडन आणि ‘नाटो’ यांनी १९९० पासून संयुक्त सराव आणि प्रशिक्षण, अफगाणिस्तान व इतरत्र मोहिमा आणि अमेरिकेला त्यांच्या १७ लष्करी तळांवर प्रवेश देण्याबाबत निकटचे सहकार्य केले आहे; २०१४ पासून, ‘नाटो’तील सहयोगी देशांमधील संवादाच्या आणि सहकार्याच्या संधीतील भागीदार असा दर्जा प्राप्त झालेल्या स्वीडनच्या अधिकृत सदस्यत्वाचा अर्थ असा आहे की, स्वीडनला ‘नाटो’च्या कलम ५ अंतर्गत सुरक्षा हमी आणि संरक्षण राहील, ज्याद्वारे सदस्य राष्ट्रावरील हल्ला हा सर्वांवरील हल्ला म्हणून गणला जातो.

स्वीडन लाभदायक का ठरू शकतो?

स्वीडनचा बहुप्रतिक्षित असा ‘नाटो’ युतीतील प्रवेश त्याच्यासोबत ‘नाटो’साठी अनेक लाभ आणि क्षमता घेऊन येतो. स्वीडनचा प्रवेश म्हणजे १०० पेक्षा जास्त लढाऊ विमाने आणि मजबूत औद्योगिक संरक्षण क्षमता असलेली हवाई दलाची मालमत्ता आहे, विशेषत: ‘नाटो’ला युक्रेनच्या समर्थनाच्या संदर्भात उत्पादनापेक्षा जास्त शस्त्रे आवश्यक आहेत.

स्वीडिश प्रवेशामुळे युतीचा उत्तरेकडील बाजूचा बचाव बळकट होतो. ‘नाटो लेक’ हे टोपणनाव मिळवून, बाल्टिक समुद्र- एक महत्त्वाचा परिवहन आणि नौकानयन मार्ग- हा आता रशिया वगळता ‘नाटो’ देशांनी वेढलेला आहे. जागतिक दर्जाच्या पाणबुड्यांसह ‘नाटो’च्या मर्यादित नौदल मालमत्तेला चालना देण्याच्या क्षमतेसह स्वीडनचे महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान उपयुक्त ठरते. त्या व्यतिरिक्त, स्वीडनचे अतुलनीय अत्याधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान ‘नाटो’च्या संकरित धोक्यांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

‘नाटो लेक’ हे टोपणनाव मिळवून, बाल्टिक समुद्र- एक महत्त्वाचा परिवहन आणि नौकानयन मार्ग- हा आता रशिया वगळता ‘नाटो’ देशांनी वेढलेला आहे.

स्वीडनच्या सदस्यत्वाचा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या आर्क्टिक प्रदेशातील धोका रोखून धरण्यावर वाढीव परिणाम होतो, जिथे रशिया वगळता सर्व देश लवकरच ‘नाटो’ सदस्य बनतील आणि जिथे चीनसारखा बाह्य देश- या प्रदेशातील समृद्ध नैसर्गिक संसाधनांमुळे तिथे स्वारस्य घेत आहे.

स्वीडन आधीच ‘नाटो’च्या रशियाविरोधातील एकता दर्शवणाऱ्या ‘स्टेडफास्ट डिफेन्डर २०२४’ या लष्करी कवायतींमध्ये सहभागी होत आहे. शीतयुद्धानंतरचा युरोपातील हा सर्वात मोठा लष्करी सराव आहे, ‘संरक्षणासाठी आघाडीवर तैनात केलेले ‘नाटो’च्या सहयोगी राष्ट्रांचे सैन्य दल’ या संकल्पनेअंतर्गत स्वीडन २०२५ मध्ये लॅटव्हियामध्ये सैन्य पाठवून संरक्षण बळकट करण्यास वचनबद्ध आहे. २०२४ च्या संरक्षण विषयक विधेयकात, स्वीडिश सरकारने देशाच्या संरक्षण बजेटमध्ये २८ टक्क्यांनी वाढ करण्याचे आणि लष्करी खर्च २.४ अब्ज अमेरिकी डॉलर्सने वाढवण्याचे वचन दिले आहे. स्वीडनने आपल्या सैन्यात वर्षाकाठी होणारी भरती साडेपाच हजारांवरून दहा हजारांपर्यंत वाढवण्यासोबत, शीतयुद्धानंतर पूर्वी रद्द केलेली अनिवार्य नागरी लष्करी सेवाही पुन्हा सुरू केली आहे. ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी पुनरुच्चार केल्याप्रमाणे, "स्वीडनचे सदस्यत्व ‘नाटो’ला अधिक मजबूत बनवते आणि आपल्या सर्वांना अधिक सुरक्षित".

मात्र, विश्लेषकांनी- कॅलिनिनग्राडद्वारे अथवा केबल्स व पाइपलाइन यांसारख्या समुद्राखालील असुरक्षित पायाभूत सुविधांद्वारे या प्रदेशाला धोका निर्माण करण्याच्या रशियाच्या क्षमतेचा सामना करण्यातील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे, ज्याची देखरेख करणे कठीण आहे.

‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी पुनरुच्चार केल्याप्रमाणे, "स्वीडनचे सदस्यत्व ‘नाटो’ला अधिक मजबूत बनवते आणि आपल्या सर्वांना अधिक सुरक्षित".

ज्यांच्या मवाळ पक्षाला सोशल डेमोक्रॅट्स आणि अत्यंत उजव्या स्वीडन डेमोक्रॅट्सच्या तुलनेत कमी रेटिंग आहे, अशा क्रिस्टरस्सनकरता- विशेषत: त्यांच्यापुढील देशांतर्गत आव्हाने वाढत आहेत- ज्यात टोळी गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होण्याचा समावेश आहे, अशा वेळी स्वीडनचा ‘नाटो’मध्ये प्रवेश हा त्यांच्याकरता एक महत्त्वाचा राजकीय विजय आहे. २०२३ मध्ये स्वीडनमध्ये ३४६ गोळीबाराच्या घटना घडल्या, अल्बानियानंतर स्वीडनमध्ये युरोपातील सर्वाधिक बंदुकी गुन्ह्यांची नोंद आहे.

दुसरीकडे, स्वीडनला मिळालेला हिरवा कंदील पाश्चात्य देशांना आलेल्या युद्ध-थकव्याच्या दरम्यान युतीकरता महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या क्षणी मिळाला आहे; संभाव्य डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परतण्याची भीती; युक्रेनसाठी मदत पॅकेज सुरक्षित करण्यात अडचणी; आणि इस्रायल-हमास युद्ध या कारणांनी या युतीचे लक्ष विचलित झाले.

‘नाटो’करता, स्वीडनच्या झालेल्या प्रवेशाचा अर्थ म्हणजे सर्वोत्तम बातमी आहे.


शायरी मल्होत्रा ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shairee Malhotra

Shairee Malhotra

Shairee Malhotra is Associate Fellow, Europe with ORF’s Strategic Studies Programme. Her areas of work include Indian foreign policy with a focus on EU-India relations, ...

Read More +