Author : Soumya Bhowmick

Published on Oct 26, 2023 Updated 0 Hours ago

विविध उद्योग २१ व्या शतकातील आव्हानांचा सामना करत मार्गक्रमण करत असताना, शाश्वतता हा फक्त एक पर्याय नसून तो पुढे जाण्याचा मार्ग आहे, हे स्पष्ट झाले आहे.

पुरवठा साखळीचे व्यवस्थापन – डिजिटायझेशनद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांकडे वाटचाल

२०१५ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने सर्वसमावेशक जागतिक विकासाला चालना देणाऱ्या २०३० अजेंडाद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टे अंमलात आणण्याची योजना आणली. १६९ लक्ष्यांचा समावेश असलेल्या या १७ उद्दिष्टांद्वारे स्थल (समानता) आणि काळ (शाश्वतता) यांची परिमाणे विचारात घेऊन सर्वसमावेशक आणि शाश्वत अटींमध्ये विकासाचे मोजमाप करण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्क प्रदान केले आहे. परंतु, कोविड महामारीनंतरच्या काळात या शाश्वत विकास उद्दिष्टांना प्राधान्य देणे धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यावश्यक ठरले आहे. सध्याच्या काळात ही १७ उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे चित्र आहे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाश्वत व्यवसाय पद्धती अनिवार्य असल्याने अलीकडच्या काही वर्षांत त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या पद्धती आपल्या पृथ्वीवरील हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आणि मानवतेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या धोरणांमुळे कंपन्यांना नफा वाढवण्यासोबतच शाश्वततेच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक या तीन स्तंभांना संबोधित करणे सुलभ झाले आहे.

अल्पकालीन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा लक्षणीय बदलावर भर देत खाजगी आणि बहुपक्षीय क्षेत्रे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अशा प्रकारे, विविध उद्योगांची कामगिरी आणि शाश्वत विकास यांच्यातील संबंधांमध्ये द्वि-मार्गी कार्यकारणभाव समाविष्ट असतो. अल्पकालीन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा लक्षणीय बदलावर भर देत खाजगी आणि बहुपक्षीय क्षेत्रे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याचाच परिणाम म्हणून विविध उद्योग दीर्घकालीन धोरणे तयार करण्यासाठी स्थिरता मापदंडांना अधिकाधिक प्राधान्य देत आहेत.

हा बदल अनेक घटकांनी प्रेरित आहे. सर्वप्रथम, शाश्वत विकास उद्दिष्टांवर भर दिल्यामुळे पर्यावरणीय, राजकीय आणि सामाजिक परिमाणांमुळे उद्भवणाऱ्या दीर्घकालीन जोखीमा कमी होण्यास मदत होते व नियामक धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी बाजारातील स्पर्धात्मकतेचे रक्षण होते. दुसरी बाब म्हणजे, ही उद्दिष्टे साध्य केल्याने शाश्वतेबाबची जोखीम आणि त्याच्या परिणामांमध्ये पारदर्शकता वाढीस लागते, माहितीतील विषमता कमी होण्यास मदत होते आणि प्रशासन प्रक्रिया वाढीस लागते. याव्यतिरिक्त, या उद्दिष्टांसह व्यावसायिक उपायांचे संरेखन केल्याने धोरणात्मक भागीदारीद्वारे बाजाराचा विस्तार करणे, महसूल वाढवणे आणि रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे शक्य होते. या उद्दिष्टांचा समावेश राष्ट्रीय आणि कॉर्पोरेट बजेटमध्ये केल्यास व्यवसायातील स्पर्धात्मकता, बाजारातील लवचिकता आणि एकूणच कंपनीची विश्वसार्हता वाढीस लागते.

 पुरवठा साखळीचे डिजिटलायझेशन

आजवर पुरवठा साखळी पद्धतींच्या विविध पैलूंचा शोध घेण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. यातील अभ्यासामध्ये विविध उद्योगांमध्ये लागू होणाऱ्या सर्वसमावेशक फ्रेमवर्कचा अभाव प्रकर्षाने दिसून आला आहे. आजची जागतिक अर्थव्यवस्था ही उत्पादने आणि सेवा वितरीत करण्यासाठी क्लिष्ट पुरवठा साखळी नेटवर्कवर अवलंबून आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंटमुळे वस्तू आणि सेवांचा अखंड प्रवाह, उत्पादक, मध्यस्थ आणि अंतिम वापरकर्ते यांच्यातील संबंध व्यवस्थापित करण्यात येतो. या पुरवठा साखळ्या जटिल आणि अपारदर्शक नेटवर्कमध्ये विस्तारत असताना त्यांच्यासमोरील आव्हाने विपुल आहेत. संसाधनांची कमतरता आणि त्याबाबतची जाणीव, लोकसंख्या वाढ, शहरीकरणाचा ट्रेंड, बाजारातील गतिशीलता, आंतरराष्ट्रीयीकरण, ग्राहकांच्या बदलत्या पसंती, तांत्रिक प्रगती आणि जोखीम यांमुळे अनेक मोठे अडथळे निर्माण होतात. या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत.

सप्लाय चेन मॅनेजमेंटमुळे वस्तू आणि सेवांचा अखंड प्रवाह, उत्पादक, मध्यस्थ आणि अंतिम वापरकर्ते यांच्यातील संबंध व्यवस्थापित करण्यात येतो.

डिजिटायझेशन ही एक परिवर्तनशील शक्ती आहे. यामुळे विविध उद्योगांना त्यांच्या पुरवठा साखळ्यांचे सर्वसमावेशक व वास्तव चित्र पाहता येते. यामुळे विविध उद्योगांना शाश्वत विकास उद्दिष्ट १२ (शाश्वत उपभोग आणि उत्पादन) शी जुळवून घेत इन्व्हेंटरी ऑप्टिमाइझ करणे, वितरणाचे सुलभीकरण करणे आणि विविध प्रक्रियांमधून निर्माण होणारा घन व इतर कचरा कमी करणे शक्य होते. यामुळे, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण करणे आणि ती अंमलात आणणे यासाठीचा मार्ग मोकळा होतो. डिजिटल तंत्रज्ञानातील ऑटोमेशन, डेटा अॅनालिटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यामुळे एकूण पुरवठा शृंखलेतील कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते.

डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास रिअल-टाइम डेटा ऍक्सेस, अखंड संप्रेषण आणि सुव्यवस्थित प्रक्रिया सुलभ होते. ग्राहकांची मागणी प्रभावीपणे पूर्ण करणे, खर्च कमी करणे आणि एकूण व्यवहार्यता सुधारणे याद्वारे स्पर्धात्मकता वाढवणे शक्य होते. सहभागी घटकांमध्ये अचूक माहितीची वेळेवर देवाणघेवाण केल्याने टाकाऊ घटक कमी होऊन नाशवंत पुरवठा साखळीची शाश्वतता वाढली असे पश्चिम बाल्कन प्रदेशात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे. या पुरवठा साखळीद्वारे उत्पादन प्रवाहाचा कालावधी ११ टक्के आणि उत्पादकासाठी इन्व्हेंटरी खर्च ८.६९ टक्के आणि किरकोळ क्षेत्रासाठी इन्व्हेंटरी खर्च २०.६० टक्के कमी झाला. अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनात, पुरवठा साखळींमध्ये शाश्वततेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची क्षमता दर्शवण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस-आधारित तंत्रज्ञानाचा विचार करणाऱ्या संस्थांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. सर्क्युलर इकॉनॉमी (वर्तुळाकार अर्थव्यवस्था), कचऱ्यामध्ये घट, संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे यांवर आधारित नवीन व्यवसाय मॉडेल्सचा मार्ग डिजिटायझेशनने मोकळा केला आहे.

आय ओ टी आणि बिग डेटा अॅनालिटिक्स या दोन डिजिटल टेक्नॉलॉजीज सध्याच्या उद्योग विश्वात आघाडीवर आहेत. डेटा गोळा करणार्‍या आणि प्रसारित करणार्‍या उपकरणांचे नेटवर्क असलेल्या आयओटीकडून ऑपरेशन्समध्ये रीअल-टाइम इंसाईट प्रदान करण्यात येते. एक्सेंचर आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी संयुक्तपणे केलेल्या मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार विविध क्षेत्रांमध्ये झाल्यास २०५० पर्यंत आवश्यक असलेली उत्सर्जनातील कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने आखलेल्या नेट झिरो मार्गाशी जुळवून घेण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. या क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब केल्याने उत्सर्जनात ४ ते १० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

शाश्वत पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये इंडस्ट्री ४.० च्या भूमिकेचे परीक्षण करण्यात येत आहे. डिजिटलायझेशनमुळे होणाऱ्या मोठ्या डेटा विश्लेषणाद्वारे ऊर्जा व्यवस्थापन आणि साखळीतील ज्ञान हस्तांतरणातील शाश्वतता वाढीस लागेल असा उद्योग जगताचा अंदाज आहे.

त्याचसोबत, ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आणि डेटा शेअरिंगद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्याच्या क्षमतेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. डिजिटायझेशनमुळे पुरवठा साखळींमध्ये सहकार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने शाश्वतता केंद्रस्थानी आली आहे. शाश्वत पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये इंडस्ट्री ४.० च्या भूमिकेचे परीक्षण करण्यात येत आहे. डिजिटलायझेशनमुळे होणाऱ्या मोठ्या डेटा विश्लेषणाद्वारे ऊर्जा व्यवस्थापन आणि साखळीतील ज्ञान हस्तांतरणातील शाश्वतता वाढीस लागेल असा उद्योग जगताचा अंदाज आहे.

 पुरवठा साखळीतील व्यवस्थापन पद्धतीतील बदल

पारंपारिकपणे, पुरवठा साखळी व्यवस्थापनाने कार्यक्षमता आणि नफा याला प्राधान्य दिले आहे. परंतु, आता मात्र पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिमाणे स्विकारून स्थिरतेकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. हा बदल विशेषतः भारत, चीन आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये दिसून आला आहे. या देशांमध्ये कामगिरीचे एकूण विश्लेषण आणि पुरवठा साखळी कामगिरीचे मोजमाप करणे महत्त्वाचे ठरत आहे. उदयोगांच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी मॅट्रिक्स आणि व्यवस्थापन फ्रेमवर्कची आवश्यकता याद्वारे समोर आली आहे. परिणामी,   पद्धतशीर पुनरावलोकनामुळे शाश्वततेबाबतच्या वाढत्या चिंतेवर जोर देण्यात येत आहे.

शाश्वत पुरवठा साखळी तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर आधारलेली आहे. यामुळे संतुलित आणि लवचिक पुरवठा साखळी नेटवर्कचा पाया तयार होण्यास मदत होते. हे आधारस्तंभ पुढीलप्रमाणे  –

अ)   आर्थिक शाश्वतता – आर्थिक शाश्वततेमुळे जोखमीचे व्यवस्थापन, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा कमीतकमी व्यत्यय आणि प्रतिष्ठेचे रक्षण करून दीर्घकालीन नफा सुनिश्चित होतो;

आ) पर्यावरणीय शाश्वतता – पर्यावरणीय शाश्वततेमुळे कार्बन फूटप्रिंट्स कमी होऊन उद्योग पद्धतींचे सकारात्मक पर्यावरणीय योगदानामध्ये रूपांतर करण्यात येते.

इ)     सामाजिक शाश्वतता – सामाजिक शाश्वततेमुळे मानवी हक्कांचे पालन, सामाजिक कल्याणासाठी योगदान, न्याय्य श्रम पद्धतींना प्रोत्साहन आणि सामाजिक जबाबदारी यांवर भर दिला जातो.

Figure 1: A framework of Supply Chains’ Impacts on Sustainability

Source: Salinas-Navarro et. al.

शेवटी, शाश्वत ऑपरेशन्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन हे केवळ परोपकारी प्रयत्न नाहीत तर जबाबदार आणि अग्रेषित-विचार करण्याच्या व्यवसाय धोरणांचे मूलभूत घटक आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, प्रोक्योरमेंट आणि सोर्सिंगमध्ये टिकाऊपणा स्वीकारणे हे अधिक लवचिक आणि नैतिक उदयोग जगातील एक मूलभूत बदल आहे. ही धोरणात्मक अत्यावश्यकता केवळ नफा, लवचिकता आणि स्पर्धात्मकता वाढवत नाही तर संपूर्ण पृथ्वी आणि समाजावर सकारात्मक परिणाम करते. विविध उद्योग २१ व्या शतकातील आव्हानांचा सामना करत मार्गक्रमण करत असताना, शाश्वतता हा फक्त एक पर्याय नसून तो पुढे जाण्याचा मार्ग आहे, हे स्पष्ट झाले आहे.

सौम्या भौमिक ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसीचे असोसिएट फेलो आहेत.

इंद्राणी मुखर्जी ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च इंटर्न आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.