Expert Speak Raisina Debates
Published on Jan 03, 2025 Updated 0 Hours ago

ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणे सोपे करूनच सर्वसमावेशक आणि शाश्वत शहरे निर्माण करता येतील.

वृद्धांच्या सोयींसाठी सिल्व्हर सिटीजचा नवीन दृष्टिकोन

Image Source: Getty

चालण्याची क्षमता, सुलभता आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता यामुळे नागरिकांची ये-जा सुनिश्चित होते. यात चालणे, धावणे, वेगाने चालणे किंवा त्यांच्या हालचालीसाठी व्हीलचेअर, स्कूटर किंवा काठी वापरणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. चालण्यामुळे आरोग्यात वाढ होऊन उत्सर्जन कमी होते. शिवाय, शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी जोडल्यास पहिल्या आणि शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होते. शाश्वत विकास उद्दिष्ट ११.७ (एसडीजी) मध्ये महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी चालण्याच्या क्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सुलभ सार्वजनिक जागांच्या प्रवेशाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. हे संयुक्त राष्ट्रांच्या रस्ते सुरक्षा दशक २०२१-२०३० शी सुसंगत आहे आणि २०३० पर्यंत रस्ते वाहतुकीशी संबंधित मृत्यू निम्मे करण्याचे उद्दीष्ट आहे.

झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे पादचाऱ्यांपेक्षा मोटारचालित वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.

दर तासाला ३१ पादचाऱ्यांचा मृत्यू होतो. जागतिक स्तरावर रस्ते अपघातात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २१ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे आहेत. या आकडेवारीत प्रामुख्याने शहरी भागातील अपघातांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे पादचाऱ्यांपेक्षा मोटारचालित वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. २०५० पर्यंत जगभरातील २२ टक्के लोकसंख्या ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची असेल. भारतातही या काळात या वर्गाचा वाटा २० टक्क्यांनी वाढणार आहे. २०२२ मध्ये भारतातील एकूण पादचारी मृत्यूंपैकी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण १७.०४ टक्के होते. सुरक्षित पायाभूत सुविधा आणि चालण्यायोग्य मिश्रित वापराचे शेजारील क्षेत्र याची गरज यामुळे अधोरेखित होते.

ज्येष्ठ नागरिकांसमोर चालण्याचे आव्हान

चालण्यासाठी योग्य वातावरण निरोगी, सक्रिय वृद्धत्व गरजेचे आहे. यामुळे सोशल नेटवर्किंग आणि संसाधनांचा वापर सुनिश्चित करून एकाकीपणा कमी होतो. या सर्व गोष्टींमुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा होत आहे. ज्येष्ठ नागरिक अनेकदा मोटार नसलेल्या वाहतुकीचा वापर करून म्हणजेच चालून आरोग्य सेवा आणि मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. परंतु गतिशीलतेचा अभाव, दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होणे, संज्ञानात्मक घट आणि पडण्याची भीती किंवा एकटेपणा ज्येष्ठ नागरिकांच्या चिंतेत भर घालतो. पादचाऱ्यांच्या एकूण मृत्यूंपैकी ९२ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. ग्लोबल साऊथमधील शहरांमध्ये ही आव्हाने अधिक आहेत. याचे कारण तेथील पायाभूत सुविधा कमकुवत आणि सामाजिक सुविधा अपुऱ्या आहेत. या पार्श्वभूमीवर पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सुविधा वाढविण्याची नितांत गरज आहे.

दर तासाला ३१ पादचाऱ्यांचा मृत्यू होतो. जागतिक स्तरावर रस्ते अपघातात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २१ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे आहेत. 

चुकीच्या डिझाइनचे फुटपाथ, खडबडीत रॅम्प आणि फुटपाथवर बसलेले रस्त्यावरील विक्रेते तसेच बेशिस्त वाहतुकीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, मेक्सिकन शहरामध्ये राहणाऱ्या वाढत्या ज्येष्ठ लोकसंख्येला असमान भूभाग, अवजड रहदारी आणि अपुऱ्या पादचारी सुविधांमुळे धोका वाढला आहे. दाट लोकसंख्या आणि अपुऱ्या पादचारी सुविधांमुळे मुंबईत अपघातांचे प्रमाण अधिक असले, तरी वाहतुकीवरही मर्यादा येतात. साओ पाउलोमधील फूटपाथवर जाणे खूप कठीण आहे. याशिवाय वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजारात जाणे किंवा रस्ता ओलांडणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही शहरी आव्हाने अधिकच आव्हानात्मक ठरतात. जोहान्सबर्गचे झपाट्याने वाढणारे शहर, त्यासोबत असलेली सामाजिक-आर्थिक विषमता आणि दक्षिण आफ्रिकेच्या परिघीय भागात पादचाऱ्यांसाठी मर्यादित पायाभूत सुविधा यामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

महत्त्वाचे धडे

प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी चालणे आणि सायकल चालविणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित वॉकवे, हवामान आणि वर्दळीच्या भागात रहदारीची परिस्थिती म्हणजेच गर्दीचे क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अलर्ट जारी केले जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षेविषयीची त्यांची धारणा बळकट होईल. उदाहरणार्थ, २०३० पर्यंत सिंगापूरच्या लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांची संख्या २५ टक्के असेल. स्मार्ट नेशन इनिशिएटिव्ह अंतर्गत रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून क्रॉसिंगची वेळ समायोजित करणारे स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. याशिवाय या उपक्रमांतर्गत सुरक्षित मार्ग, हवामान, गर्दी यांची माहिती देऊन सुरक्षितता बळकट करण्यासाठी सोयीस्कर वियरेबल डिव्हाइसेस देण्यात येतात. वयोवृद्ध भागात सिल्व्हर झोनबरोबरच झेब्रा क्रॉसिंग आणि फलक वाढविण्यात आले आहेत.

शहरांचे वय वाढत असताना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुलभ शहरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल नेटवर्क फॉर एजीई-फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज (जीएनएएफसीसी) मध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर कोची आहे. मरीन ड्राइव्ह फूटपाथचे आता नूतनीकरण करण्यात आले असून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मोकळी आसनव्यवस्था, एलईडी लाइटिंग, ड्रेनेज आणि झाडांचा पट्टा आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित, सर्वसमावेशक चालण्याची जागा उपलब्ध झाली आहे.

शहरांचे वय वाढत असताना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुलभ शहरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

अमेरिकेचा व्हिजन झिरो इनिशिएटिव्ह ज्येष्ठांना पायी चालताना त्यांची हालचाल वाढवण्यासाठी मार्गदर्शन करतो. जुन्या पायाभूत सुविधा, निधीची आव्हाने आणि स्थानिक विरोधामुळे विकासाची गती मंदावली असली तरी न्यूयॉर्क शहरात २०१४ ते २०२३ या कालावधीत पादचाऱ्यांच्या संख्येत २९ टक्क्यांनी घट झाली आहे. वाहतुकीला येणाऱ्या उपाययोजना कमी करून हे साध्य करण्यात आले. याउलट लॉस एंजेलिसमधील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या याच कालावधीत ३२ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातही चेन्नईतील नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) धोरण ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आखण्यात आले होते. परंतु ढिसाळ अंमलबजावणी आणि विखुरलेले फूटपाथचे जाळे यामुळे त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. दुसरीकडे, टोकियोमधील अडथळा-मुक्त फूटपाथ, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, ऊर्जा निर्माण करणारे वॉकवे आणि बार्सिलोनाचे "सुपरब्लॉक्स" पादचाऱ्यांना अनुकूल क्षेत्र प्रदान करतात. या भागात वेगमर्यादेचे तसेच मोटार वाहतुकीचे नियमन केले जाते.

चालण्यायोग्य मार्गांच्या दिशेने

बेस्ट-प्रॅक्टिसेस

भारताच्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण २०११ शी सुसंगत असलेल्या वय-एकात्मिक समाजात यशस्वी धोरणे आणि अनुभव सामायिक करणाऱ्या बहु-भागधारक आघाडींना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा समन्वयाने सरकार, नागरी समाज आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ज्येष्ठांचे, विशेषत: महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या यंत्रणांना प्राधान्य दिले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेचे ग्लोबल नेटवर्क ऑफ एज-फ्रेंडली सिटीज, युरोपियन इनोव्हेशन पार्टनरशिप ऑन ॲक्टिव्ह अँड हेल्दी एजिंग आणि सी ४० सिटीज सारख्या जागतिक नेटवर्कमध्ये चालण्यायोग्यता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी शहर भागीदारीला प्रोत्साहित केले जात आहे. रुंद व विनाअडथळा फूटपाथ असलेला पुण्याचा कम्प्लीट स्ट्रीट इनिशिएटिव्ह आणि भुवनेश्वरच्या एमएएएस-इंटिग्रेटेड पादचारी अनुकूल प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेला स्मार्ट जनपथ यांचा अवलंब करता येईल.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

समाजप्रणीत परिवहन सेवेसारख्या तळागाळातील उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांची काळजी घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ, ममनिलाच्या एज-फ्रेंडली सिटी प्रोग्राममध्ये, पादचाऱ्यांना ओव्हरपास, रुंद फूटपाथ आणि सुलभ सार्वजनिक वाहतुकीसह पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करताना उद्याने आणि हरित क्षेत्र वापरण्यास प्रोत्साहित करतो. जिथे लोकांना बसण्याची जागा आणि कमी गर्दी असलेल्या बसेस उपलब्ध आहेत. कोपनहेगनने सामायिक रस्ते किंवा "वूनर्फ" तयार करून रहदारी कमी करून सुरक्षित पादचारी वातावरण तयार केले आहे. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि नगर रचनाकार यांच्यात परस्पर विश्वास निर्माण होतो, ज्यामुळे सर्वसमावेशक वातावरण निर्माण होते. त्याचप्रमाणे स्थानिक निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेणे आणि शाश्वत नागरी गतिशीलता योजना विकसित करणे हे सामाजिक कार्यक्रम त्यांच्या गरजांना प्राधान्य देतील. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांमध्येही आपलेपणाची भावना निर्माण होईल आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होत नाही, असे त्यांना वाटेल.

मूल्यमापनासाठी प्रमाणित निकषांचा अवलंब करणे

पायी चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सुलभतेचे मूल्यमापन करण्यासाठी शहरांनी प्रमाणित मापदंडाचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी पादचारी लेव्हल ऑफ सर्व्हिस (पीएलओएस) सारख्या फ्रेमवर्कचा वापर करता येईल. याचा उपयोग क्रॉसिंग वेळ, विश्रांती क्षेत्रे, श्रवण संकेत, स्पर्श चिन्हे आणि सुविधांमध्ये प्रवेशाचा कालावधी वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. वॉकेबिलिटी इंडेक्समध्ये जवळच असलेल्या फूटपाथांचा आणि सतत आणि सुबक सुविधा असलेल्या फूटपाथांचाही समावेश असावा. मोबिलिटी-एज-ए-सर्व्हिस (एमएएएस) वापरुन, वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आणि चालण्याच्या सुविधांवर रिअल-टाइम डेटा प्रदान केला जाऊ शकतो. परफॉर्मन्स रिकग्निशन योजना राबवून शहरांच्या पायाभूत सुविधा वाढवता येतील. त्याचप्रमाणे, आयओटी आणि कनेक्टेड डिव्हाइसचा वापर करून रिअल-टाइम अपडेटस प्रदान करून सुविधांचा रिमोट ॲक्सेस सुनिश्चित केला जाऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांच्या सुरक्षेत आणखी सुधारणा होईल. भारतातील एनएमटी उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांची गतिशीलता सुधारली जाऊ शकते, परंतु ती काळजीपूर्वक तयार केली गेली पाहिजे. उदाहरणार्थ, सुधारणा होऊनही अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टला सुलभतेच्या समस्या, सुरक्षेचे धोके आणि जागरुकतेचा अभाव यांचा सामना करावा लागत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

डिझाईनच्या टप्प्यापासून सहाय्यक तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यास मदत होईल. यात पेव्हिंग, क्रॉसिंगवरील ऑडिओ सिग्नल आणि स्मार्ट ट्रॅफिक सिस्टमचा समावेश असू शकतो. स्मार्ट वॉकिंग कॅन, आय-ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी, जीपीएस- ॲक्टिव्हेटेड वियरेबल डिव्हाइस आणि मोबिलिटी ॲप्स देखील शारीरिक समर्थन,  मार्गदर्शन आणि रिअल-टाइम अपडेट्सला प्रोत्साहन देऊ शकतात. परंतु त्यासाठी डिजिटल साक्षरता आणि शहरातील सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करूनच वरील उपाययोजनांमध्ये व्यापक सहभाग साधता येईल. सिंगापूरमध्ये, सानुकूलित डिजिटल इंटरफेस आणि तंत्रज्ञान सार्वजनिक वाहतूक, सांस्कृतिक केंद्रे, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये एकत्रित केले जात आहे, ज्यामुळे सर्वांसाठी सुलभता सुनिश्चित केली जात आहे. अंध आणि दृष्टिहीनांना ऑडिओ संकेत देण्यासाठी हेलसिंकीच्या भुयारी मार्गांमध्ये ऑडिओ दिव्यांचा वापर केला जात आहे. यामुळे त्यांना विविध स्थानके आणि सार्वजनिक वाहतूक यांच्यात फरक करणे सोपे जाते. भारतातही बेंगळुरूने पादचाऱ्यांची संख्या पाहून त्यांच्या वेळेवर नियंत्रण ठेवणारे स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसवले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हळू चालणे सोपे जाते.

ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे जगता यावे आणि त्यांच्या समाजाशी संपर्क साधता यावा, यासाठी पादचारी पायाभूत सुविधांना प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक नागरी नियोजनाची गरज आहे. 

डेटा प्लॅटफॉर्मचा विकास

शहरांनी वय आणि लिंग डेटा स्वतंत्रपणे गोळा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. याचा वापर करून पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालींचा मागोवा घेऊन पायाभूत सुविधा आणि अपघातस्थळांचा दर्जा प्रभावीपणे मॅप करता येईल. सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आणि स्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने बार्सिलोनामधील अतिजोखमीच्या पादचारी भागांवर नजर ठेवली जाते. याशिवाय असमान फूटपाथ, अपुरे क्रॉसिंग अशा पायाभूत सुविधांच्या समस्या ओळखण्यासाठी शहरांनी जिओ टॅगिंग रिपोर्टिंग सिस्टिम राबवावी. तसे झाल्यास हे प्रश्न तात्काळ सोडवता येतील. जॉर्जिया टॅक्स ऑटोमॅटिक फूटपाथ क्वालिटी असेसमेंट सिस्टीम अँड्रॉइड ॲपचा वापर करून फूटपाथच्या परिस्थितीचे मूल्यांकन करते. हे मूल्यमापन जीपीएस-टॅग केलेल्या व्हिडिओ आणि सेन्सर डेटावर आधारित आहे. सेमी ऑटोमॅटिक सिस्टिम फुटपाथवरील तडे, खड्डे आणि अडथळे शोधून काढते. या यंत्रणेच्या साहाय्याने मजूर विरहित नियमित आढावा घेता येतो. अशा बांधकामांमुळे स्थानिक प्रशासनाला आढावा घेण्यास मदत होते. यामुळे, ते त्यांच्या फुटपाथ पायाभूत सुविधांवर सतत देखरेख आणि सुधारणा करण्यास सक्षम आहेत.

निधी आणि संशोधनाला प्राधान्य

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता मर्यादित असून संसाधनांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत यूएलबींनी तात्काळ संसाधने उपलब्ध करून देऊन क्षमता वाढीच्या कार्यक्रमावर काम केले पाहिजे. तरच महापालिका विभागांना नागरी वाहतुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येईल. युएलबीने रॅम्प बसविणे, फूटपाथांचे रुंदीकरण आणि चांगले फलक लावण्यासाठी निधी द्यावा. भारत सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) सारख्या उपक्रमांमध्येही ज्येष्ठ नागरिकांच्या पादचाऱ्यांची वर्दळ लक्षात घेतली पाहिजे. पायी चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष गरजांवर संशोधन केले तर मूलभूत सुविधांच्या उणिवा सहज ओळखता येतील. अहमदाबादसारख्या चांगल्या क्रॉसिंग आणि बसण्याची व्यवस्था असलेल्या शहरांमध्ये वयोमानानुसार सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथल्या व्यवस्थेकडे मॉडेल म्हणून पाहता येईल.

निष्कर्ष

ज्येष्ठ नागरिकांना चालणे सुलभ करूनच सर्वसमावेशक आणि शाश्वत शहरांची उभारणी होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे जगता यावे आणि त्यांच्या समाजाशी संपर्क साधता यावा, यासाठी पादचारी पायाभूत सुविधांना प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक नागरी नियोजनाची गरज आहे. उपलब्ध संरचनेतून शिकून त्यांची अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट आव्हानांना सामोरे जाणे शहरांमध्ये सुरक्षित आणि सहज सुलभ वातावरण तयार करू शकते. तरच ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुनिश्चित होऊ शकेल. समन्वय, नावीन्य आणि लक्ष्यित गुंतवणुकीच्या माध्यमातूनच शहरे त्यांच्या वाढत्या लोकसंख्येचे जीवनमान सुधारून अधिक समन्यायी, सर्वसमावेशक आणि शाश्वत शहरी भागांची निर्मिती करू शकतात.


अनुषा केसरकर-गव्हाणकर या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सिनियर फेलो आहेत.

सिद्धी जोशी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.

लेखक धवल देसाई, उपाध्यक्ष आणि वरिष्ठ फेलो यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आभारी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Anusha Kesarkar Gavankar

Anusha Kesarkar Gavankar

Anusha is Senior Fellow at ORF’s Centre for Economy and Growth. Her research interests span areas of Urban Transformation, Spaces and Habitats. Her work is centred ...

Read More +
Siddhi Joshi

Siddhi Joshi

Siddhi Joshi is a Research Intern at the Observer Research Foundation. ...

Read More +