Author : Aleksei Zakharov

Expert Speak Raisina Debates
Published on Apr 28, 2025 Updated 1 Hours ago

बांगलादेशमध्ये अवामी लीग सत्तेवरून खाली आल्यानंतर रशियाचा राजकीय प्रभाव कमी झाला होता, पण रशियाने पटकन आपली धोरणे बदलली आणि नवीन सरकारशी संबंध मजबूत केले.

बांगलादेशच्या राजकारणात रशियाचा असलेला प्रभाव

Image Source: Getty

शेख हसीना यांच्याशी दीर्घ काळापासूनचे ऐतिहासिक संबंध आणि यशस्वी भागीदारी असूनही, ऑगस्ट 2024 मध्ये निर्माण झालेल्या राजकीय गोंधळानंतर रशियाला आपली रणनीती बदलावी लागली. जेव्हा हसीना ढाकाहून निघून गेल्या, तेव्हा रशियाने मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनुस यांच्याशी संपर्क साधला आणि चांगले सहकार्य व्हावे अशी आशा व्यक्त केली. त्यांनी महत्वाचे प्रकल्प आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे बांगलादेशसोबत संबंध सहजपणे चालू राहिले.

परराष्ट्र सचिव एम.डी. जसीम उद्दिन हे भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त, ब्रिक्स 2024 परिषदेसाठी काझान येथे गेलेले काही काही राजनैतिक प्रतिनिधींपैकी एक होते. बांगलादेश अजूनही BRICS मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करत असल्यामुळे, रशिया भविष्यातील संबंध मजबूत करण्यासाठी हे मुद्दे वापरू शकतो. सध्या तरी, BRICS विस्तारणाच्या शक्यतेमध्ये बांगलादेशला मोठी भूमिका द्यावी अशी रशियाची भूमिका आहे.

अवामी लीग सध्या कमकुवत झाल्यामुळे, रशिया बांगलादेशमधील विविध राजकीय पक्षांशी संबंध प्रस्थापित करत आहे. रशियन राजदूत अलेक्झांडर खोझिन यांनी जमात-ए-इस्लामी नेत्यांसोबत अलीकडेच बैठक घेतली, ज्यात दोन्ही बाजूंनी कौतुकाची भाषा केली आणि निवडणुकांबद्दल चर्चा झाली. रशिया बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसोबत (BNP) संबंध सुधारेल का हे अजून स्पष्ट नाही. BNP ने जानेवारी 2024 निवडणुकांमध्ये रशियावर हस्तक्षेपाचा आरोप केला होता. BNP सत्तेवर आल्यास रशियाच्या हितांना धोका असू शकतो. पण एक सकारात्मक गोष्ट म्हणजे अमेरिकेचे लक्ष आता बांगलादेशावरून हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने आपले लक्ष दक्षिण आशियेकडून दूर केले असून, रशियाला अधिक राजनैतिक मोकळीक मिळाली आहे.

राजकीय अस्थिरतेनंतरही रशियाने बांगलादेशमध्ये आर्थिक व विकासात्मक मदतीमुळे आपले स्थान मजबूत ठेवले आहे. दोन्ही देशांमध्ये ऊर्जाविषयक सहकार्य अत्यंत महत्वाचे असून, रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प (RNPP) या भागीदारीचा मुख्य केंद्रबिंदू आहे.

दोन VVER-1200 प्रकारचे रिऍक्टर असलेल्या या प्रकल्पाची एकूण क्षमता 2,400 मेगावॅट असून, हे बांगलादेशच्या ऊर्जेच्या गरजेपैकी 10% भाग भागवेल. रशियाने 11.38 अब्ज अमेरिकन डॉलर्स कर्ज दिले असून, हे प्रकल्पाच्या खर्चाचा 90% भाग आहे. पण 2022 मध्ये रशियावर लादलेल्या अमेरिकी व युरोपीय निर्बंधांमुळे बांगलादेशाला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी आल्या आणि सध्या सुमारे 1 अब्ज डॉलर्स थकबाकी आहे. मुख्य सल्लागार युनुस यांनी नुकतेच सांगितले की "आर्थिक प्रश्न सुटले आहेत आणि बांगलादेशने पैसे खात्यात जमा केले आहेत." मात्र रशियन कंपन्या हे पैसे फक्त बांगलादेशमध्येच वापरू शकतील.

रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प 2024 च्या अखेरीस सुरू होणार होता, पण तो लांबणीवर गेला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले असले तरी, हा विलंब तांत्रिक कारणांमुळे झाला आहे. आता बांधकाम आणि टर्बाइन बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, पहिल्या युनिटसाठी इंधन भरण्याची आणि त्यानंतर सुरूवात करण्याची तयारी सुरू आहे. रॉसअ‍ॅटोम या रशियन कंपनीचे उद्दिष्ट आहे कि 2025 च्या शेवटी पहिली वीज निर्माण करणे. जरी रशिया-बांगलादेशमधील व्यापार सुमारे 1 अब्ज डॉलर्स एवढाच आहे आणि रशिया बांगलादेशच्या प्रमुख 20 व्यापारी भागीदारांमध्ये नसला तरी, रशिया काही महत्त्वाच्या वस्तू जसे की शेती उत्पादने आणि खतांचा मोठा पुरवठादार आहे.

तक्ता १. २०१९-२०२४ मध्ये बांगलादेशचा रशियासोबतचा व्यापार (अमेरिकन डॉलर्समध्ये)

 

2019-2020

2020-2021

2021-2022

2022-2023

2023-2024

आयात

782

482

480

497

863

निर्यात

487

665

638

460

394

एकूण

1269

1147

1118

957

1257

स्रोत: बांगलादेश बँक, बांगलादेश सांख्यिकी कार्यालय आणि निर्यात प्रोत्साहन कार्यालय

रशियाकडून बांगलादेशने आयात करणाऱ्या वस्तूंमध्ये धान्यांचा वाटा 87% आहे. बांगलादेश रशियन धान्य खरेदी करणाऱ्या टॉप तीन देशांमध्ये आहे आणि दक्षिण आशियामध्ये तो सर्वात मोठा ग्राहक आहे. 20

23-2024 मध्ये, रशियाने बांगलादेशला विक्रमी 3.5 दशलक्ष टन गहू निर्यात केला, जो देशाच्या एकूण गहू आयातीच्या निम्म्याहून अधिक होता. हा पुरवठा अजूनही जोरात सुरू आहे. जुलै 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान 2.3 दशलक्ष टन गहू पाठवण्यात आला आहे. या काळात इतर पीकांचाही निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. हरभऱ्याची निर्यात 44 पट आणि मोहरीच्या बियांची 10 पट वाढ झाली आहे.

तक्ता २. रशियाकडून बांगलादेशची गव्हाची आयात हजार टनांमध्ये (२०२१-२०२४)

पीक / कृषी वर्ष

2021-2022

2022-2023

2023-2024

गहू

307

1400

3500

मटार

282

4.7

206.4

मोहरी

NA

2.4

24.5

स्रोत: रशियन फेडरल सर्व्हिस फॉर वेटरनरी अँड फाइटोसॅनिटरी सर्विलांस आणि ॲग्रोएक्सपर्ट

खतांच्या निर्यातीमध्येही रशियाचा मोठा वाटा आहे. जुलै 2024 मध्ये झालेल्या करारानुसार, रशिया जून 2025 पर्यंत बांगलादेशला किमान 300,000 टन पोटॅशियम क्लोराइड पुरवेल. ऑगस्ट 2024 पासून, रशियाने 30,000 टन म्युरिएट ऑफ पोटॅश (MOP) खत “मैत्री व आपुलकीचे चिन्ह” म्हणून देण्याची ऑफर दिली आहे, पण ती अजून आलेली नाही.

बांगलादेश आणि रशियामधील मजबूत आर्थिक संबंध 27 मार्च रोजी चीनमध्ये झालेल्या बोआओ फोरमदरम्यान रशियन उपपंतप्रधान अलेक्सी ओव्हरचुक आणि मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांच्या बैठकीत दिसून आले. बांगलादेशातील गोंधळानंतर दोन्ही देशांतील ही सर्वात उच्चस्तरीय बैठक होती. त्यांच्या छोट्या चर्चेतून असं स्पष्ट झालं की बांगलादेश रशियाकडून अजून गहू आणि खत आयात करण्यास तयार आहे आणि दोन्ही देश सामान्य नागरिकांमधील संबंध वाढवू इच्छितात.

सध्या रशियाला कामगारांची कमतरता भासत असल्यामुळे नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्याला नवीन महत्त्व मिळाले आहे. जरी परदेशातून कामगार आणण्याची प्रक्रिया अजूनही कठीण आणि सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तरी बांगलादेशी लोकांनी रशियात काम करणे सुरू केले आहे. जानेवारी ते मार्च 2025 या काळात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार पट अधिक व्हिसा बांगलादेशींना दिले गेले आहेत.

तक्ता ३. बांगलादेशी नागरिकांना रशियन व्हिसाची संख्या (२०१९-२०२४)

व्हिजाचे प्रकार

2019

2020

2021

2022

2023

2024

नोकरी

3

12

12

7

12

24

पर्सनल

146

16

23

71

115

112

व्यापारीक

210

37

12

69

103

170

पर्यटन

388

29

0

27

37

86

शिक्षण

468

229

268

545

577

1452

कार्य

5

0

0

3

70

1904

मानवीय

80

6

28

23

29

160

ट्रांझिट

1

0

0

3

0

0

एकूण

1301

329

344

748

943

3908

स्रोत: रशियन परराष्ट्र मंत्रालयाचे वाणिज्यिक विभाग

बांगलादेशाला अशी अपेक्षा आहे की रशिया व्हिसा प्रक्रिया सुलभ करेल आणि विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची अधिक संधी देईल. मात्र काही बांगलादेशींना फसवून रशियन लष्करात भरती करण्यात आले आणि युक्रेनच्या युद्धात पाठवले गेले, त्यामुळे बांगलादेशी विमानतळांवर सुरक्षेची अधिक काळजी घेतली जात आहे. हे प्रकरण दोन्ही देशांच्या सार्वजनिक चर्चेत आले नाही, पण बांगलादेशात या संदर्भातील एजन्सींवर तपास सुरू आहे.

अवामी लीग सत्तेतून बाहेर गेल्यावर रशियाचा राजकीय प्रभाव काहीसा कमी झाला होता, पण त्याने लगेचच नवीन सरकारशी संबंध सुधारले आणि आता नवीन भागीदारी घडवत आहे. कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असो, जर रशिया बांगलादेशच्या उर्जा व अन्न सुरक्षेच्या गरजा भागवत राहिला, तर दोन्ही देशांचे सहकार्य चालूच राहील. हे बांगलादेशच्या "एकाच वेळी अनेक देशांशी मैत्री" धोरणालाही पूरक आहे.


अलेक्सेई जाखारोव्ह ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे फेलो आहेत.   

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.