Author : Aleksei Zakharov

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 27, 2024 Updated 0 Hours ago

आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एकटेपण सोडण्यासाठी आणि नवीन देशांशी मैत्री करण्यासाठी रशिया विविध देशांच्या युक्रेनबद्दलच्या भूमिकेशी तडजोड करताना दिसतो आहे.

दक्षिण आशियामध्ये रशियाचा पुन्हा उदय

पश्चिमात्य देशांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे रशिया जागतिक दक्षिणेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे.  दक्षिण आशियामध्ये मॉस्को दीर्घकाळापासून सुप्त खेळाडू आहे. रशियाने भारताच्या पलीकडे प्रादेशिक भागीदारांशी संबंध विकसित करण्यात फारसा रस दाखवलेला नाही. परंतु आता ही परिस्थिती बदलते आहे कारण दक्षिण आशियाकडे रशिया आपल्या भौगोलिक आणि आर्थिक हितसंबंधांचा प्रदेश म्हणून बघतो आहे.  त्यामुळे भारताच्या शेजारी देशांशी रशियाच्या गुंतवणुकीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

युक्रेनमधील युद्धाचे परिणाम

रशिया-युक्रेन संघर्षाचे दक्षिण आशियाई राष्ट्रांवर भौगोलिक-राजकीय ते आर्थिक आव्हानांपर्यंत अनेक परिणाम झाले आहेत. हे देश मध्यम मार्गाने चालत असले तरी त्यांची पाश्चिमात्य देश आणि रशिया यांच्या संघर्षात फरपट होते आहे. भारताने याबाबत एक उत्तम आणि अनुकरणीय भूमिका घेतली आहे. आपल्या शेजारी देशांबद्दल काही बाह्य घटकांमुळे असुरक्षितता आहे हे भारत जाणून आहे. त्यामुळेच भारताने आपली तटस्थता वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शित केली आहे.

नेपाळने रशियाच्या ‘विशेष लष्करी कारवाई’चा निषेध केला आहे आणि रशियाविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या बहुतेक ठरावांना मंजुरी दिली आहे.

बांगलादेशने युक्रेनमधील रशियन कृत्यांचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांना दोनदा पाठिंबा दिला आहे आणि रशियाविरुद्ध पाश्चात्य निर्बंधांचे पालन करण्यात सावधगिरी बाळगली आहे. नेपाळने मॉस्कोच्या ‘विशेष लष्करी कारवाई’चा निषेध केला आहे आणि रशियाविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या बहुतेक ठरावांना मंजुरी दिली आहे. दोन्ही युद्धग्रस्त सैन्यांमध्ये नेपाळी सैनिक सेवा देत असल्याच्या वृत्तानंतर नेपाळला रशिया आणि युक्रेनसाठी आपल्या नागरिकांना कामगार परवाने देणे थांबवण्यास भाग पाडले गेले. युक्रेनमधील युद्धाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतानाही श्रीलंकेनेही कोणतीही बाजू घेण्यास नकार दिला आहे. इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानचा या संघर्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वात वादग्रस्त आहे. 'कठोर तटस्थता' पाळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने जागतिक स्तरावर या मुद्द्याबद्दल भूमिका घेण्यात सातत्याने टाळाटाळ केली परंतु पाकिस्तानी लष्कराने युक्रेनला दारुगोळा पुरवल्याची माहिती आहे.

युक्रेनमधील युद्धाबद्दल रशियाला दक्षिण आशियातील देशांच्या वेगवेगळ्या प्रतिसादांचा सामना करावा लागला आहे. परंतु अलीकडेच रशियाने या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवली आहे. हे अधिकृत भेटी आणि आर्थिक संबंध पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांवरून दिसून येते.

राजकीय यंत्रणा

2023 मध्ये रशियाची दक्षिण आशियाशी अनेक बाबतीत उच्च-स्तरीय देवाणघेवाण झाली. यामुळे या देशांना रशियामध्ये विशेष स्वारस्य आहे हे दिसून आले. 2023 मध्ये भारत G20 आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे अध्यक्षपद भूषवत असल्याने ते रशियन मंत्री आणि संसद सदस्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले. उदाहरणार्थ रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी 2023 मध्ये तीन वेळा भारताला भेट दिली आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही पाच दिवसांचा रशिया दौरा केला. लॅव्हरोव्ह यांनी सप्टेंबर 2023 मध्ये ढाकाला भेट दिली. रशियन मंत्र्यांनी बांग्लादेशचा केलेला हा पहिलाच दौरा होता. यामध्ये शाश्वत संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आणि बांगलादेशसोबतचे सहकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न झाला.

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोले पात्रुशेव्ह यांनी डिसेंबर 2023 मध्ये श्रीलंकेला भेट दिली आणि राजकीय, सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक मुद्द्यांवर श्रीलंकेच्या  नेतृत्वासोबत बैठका आयोजित केल्या. मॉस्को आणि कोलंबो यांच्यातील सुरक्षा सल्लामसलत हे एक नियमित वैशिष्ट्य बनले आहे.

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोले पात्रुशेव्ह यांनी डिसेंबर 2023 मध्ये श्रीलंकेला भेट दिली आणि राजकीय, सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक मुद्द्यांवर देशाच्या नेतृत्वासोबत बैठका आयोजित केल्या.

रशियाच्या प्रादेशिक धोरणाचा एक अस्पष्ट भाग म्हणजे त्याचे पाकिस्तानशी असलेले संबंध. सर्व अडचणींना तोंड देत हे संबंध पुढे नेण्यात आले आहेत. इस्लामाबादमधील राजकीय गोंधळ आणि युक्रेनला पाकिस्तानचा लष्करी पाठिंबा असूनही द्विपक्षीय संवाद टिकून राहिला आहे. अलिकडेच मॉस्कोमध्ये धोरणात्मक स्थैर्यावर उच्चस्तरीय चर्चा झाली. रशियन फेडरेशन कौन्सिलच्या (संसदेचे वरिष्ठ सभागृह) शिष्टमंडळाने इस्लामाबादलाही भेट दिली. पाकिस्तानचे सिनेट आणि काळजीवाहू सरकारच्या प्रतिनिधींसोबत रशियाच्या बैठका झाल्या. तसेच 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रशियाने आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काम केले.

या प्रदेशांतल्या नाजूक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण एक संरक्षक ढाल म्हणून काम करत आहोत, असा रशियाचा दावा आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानचे पाश्चिमात्य भागीदार त्यांच्या निवडणुकांबद्दल शंका व्यक्त करत असताना रशियाने मात्र या देशांतील निवडणूक प्रक्रियेचे स्वागत केले. ही भूमिका वरवर पाहता दोन उद्दिष्टांचा पाठपुरावा करते. पहिला म्हणजे ‘बाह्य हस्तक्षेप’ मोडून काढणे आणि टिकेचा धनी बनलेला देश आणि पाश्चिमात्य देश यांच्यात फूट पाडणे. रशियामधील भविष्यातील निवडणुकांमध्ये या प्रदेशाचा पाठिंबा मिळवणे हाही रशियाचा हेतू आहे.

नवे आर्थिक संबंध

रशिया दक्षिण आशियामध्ये निर्यात आणि आयात या दोन्हीसाठी नवे मार्ग शोधतो आहे. रशियावरचे कठोर निर्बंध आणि अनिश्चित पुरवठा साखळी लक्षात घेता रशियाला हे करणे भाग आहे. युक्रेनमधील युद्धाचे परिणाम कमी करण्याच्या प्रयत्नात रशियाने या प्रदेशातल्या देशांना विविध वस्तू, प्रामुख्याने ऊर्जा संसाधने, खते, धान्य आणि सूर्यफूल तेल देऊ केले आहे. 

ऊर्जा क्षेत्र हे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे क्षेत्र त्याच्या बाह्य गुंतवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या भारत हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. सर्व पुरवठ्यापैकी याचे प्रमाण 40 टक्के एवढे आहे. रशिया बांगलादेश आणि श्रीलंकेला कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याची शक्यता शोधतो आहे. या देशांच्या   रिफायनरीजच्या तांत्रिक मर्यादांमुळे या देशांना प्रामुख्याने भारत किंवा पश्चिम आशियामार्गे रशियन तेल घ्यावे लागते. 

रशिया दक्षिण आशियामध्ये निर्यात आणि आयात या दोन्हीसाठी नवे मार्ग शोधतो आहे. रशियावरचे कठोर निर्बंध आणि अनिश्चित पुरवठा साखळी लक्षात घेता रशियाला हे करणे भाग आहे.  

पाकिस्तानने व्यावसायिक आधारावर रशियन कच्चे तेल आयात करण्याचा करार केला आहे. पाकिस्तानला आतापर्यंतचा तेलाचा पुरवठा खूपच कमी आहे आणि पाकिस्तानी बंदरांच्या मर्यादित क्षमतेमुळे दोन्ही बाजूंमधील दीर्घकालीन करार अनिश्चित आहे. यामुळे  तेलाचा पुरवठा आणि त्यांची किंमत ठरवण्यामध्ये गुंतागुंत होते. रशियाच्या हिताचे आणखी एक प्रभावी क्षेत्र म्हणजे नागरी अणुऊर्जा. रशिया दक्षिण आशियामध्ये दोन अणुऊर्जा प्रकल्प बांधतो आहे आणि नवीन बाजारपेठही शोधतो आहे.

भारतात रशियन सरकारी मालकीची अण्वस्त्र कंपनी असलेल्या Rosatom कंपनीने कुडनकुलममध्ये दोन युनिट्स बांधली होती. त्यानंतर चार युनिटचे काम सुरू झाले. ही युनिट वीज ग्रीडशी जोडलेली होती आणि 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने चालू होती. बांगलादेशात हीच कंपनी रूपपूर प्रकल्प उभारते आहे. याचे पहिले युनिट 2024 च्या उत्तरार्धात कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच रशियाने श्रीलंकेत एक छोटा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार केला आहे. ही चर्चा सुरू असताना काही संभाव्य पर्याय आहेत. भारताचे ऊर्जा क्षेत्र तुलनेने वैविध्यपूर्ण आहे. त्यात अणुऊर्जेचा छोटा वाटा आहे. बांगलादेश किंवा संभाव्य श्रीलंकेच्या बाबतीत मात्र हे नवे प्रकल्प रशियाचे आर्थिक आणि राजकीय भार वाढवू शकतात.

भारतात रशियन सरकारी मालकीची अण्वस्त्र कंपनी असलेल्या Rosatom कंपनीने कुडनकुलममध्ये दोन युनिट्स बांधली होती. ही वीज ग्रीडशी जोडलेली होती आणि 2014 मध्ये पूर्ण क्षमतेने चालू होती.   

रशियाच्या प्रादेशिक आर्थिक धोरणात शेती हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. खते आणि कृषी उत्पादनांचा या प्रदेशातील व्यापारात मोठा वाटा आहे. 2023/2024 च्या पहिल्या सहामाहीत बांगलादेश हा युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या बाहेर रशियाच्या धान्याचा तिसरा आयातकर्ता आहे. पाकिस्तान हा धान्याचा आणखी एक मोठा आयातदार आहे. रशियाकडून पाकिस्तानला होणारी धान्याची निर्यात एकूण व्यापाराच्या 75 टक्क्यांपर्यंत आहे.

बहुतेक प्रादेशिक देश रशियाविरूद्ध निर्बंधांचे पालन करण्यात सावधगिरी बाळगत असले तरी काही प्रकरणांमध्ये ते निर्बंध टाळण्यासाठी रशियासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उदाहरणार्थ, मे 2022 नंतर मालदीव हे रशियाच्या सेमीकंडक्टर शिपमेंटसाठी एक महत्त्वपूर्ण संक्रमण केंद्र म्हणून उदयास आले आहे.  चीननंतर मालदीवचा दुसरा क्रमांक लागतो. चीनच्या सहभागाशिवाय रशियाचा दक्षिण आशियापर्यंतचा आर्थिक संपर्कही अशक्य झाला असता. सध्या रशियन संस्थांसोबतचे व्यवहार मग ते ऊर्जा असो किंवा शेती असो- युआनमध्ये आणि चीनी क्रॉस-बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टम (CIPS) द्वारे चालवले जातात. चीनच्या आर्थिक पायाभूत सुविधांचा वाढता वापर रशियाच्या प्रादेशिक आर्थिक प्रकल्पांसाठी जीवनरेखा ठरतो आहे. रशिया इथे चीनच्या सदिच्छांवर अवलंबून आहे.

संपूर्ण दक्षिण आशियातील रशियाचा सहभाग पाहता या प्रादेशिक शक्तींसोबत नियमित राजकीय संवाद सुरू ठेवण्याचा त्याचा हेतू दिसून येतो. आंतरराष्ट्रीय बहिष्कारातून पडण्यासाठी आणि नव्या मैत्रीपूर्ण देशांची निवड करण्यासाठी रशियाने नवे धोरण आखले आहे. अशा देशांच्या युक्रेनबद्दलच्या भूमिका संमिश्र असल्या तरी त्याच्याशी तडजोड करण्याची रशियाची तयारी आहे.


अलेक्सेई झाखारोव्ह हे वर्ल्ड ऑर्डर स्टडीजवरील आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा आणि जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची नवीन प्रादेशिकता फॅकल्टी, नॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी, हायर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, रुस येथे रिसर्च फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.