क्वांटम तंत्रज्ञान (QT) त्याच्या प्रारंभिक टप्प्यात असतानाही, भविष्यातील एक मूलभूत तंत्रज्ञान बनण्याच्या मार्गावर आहे, जसे सेमिकंडक्टर्स आज आहेत. सेमिकंडक्टर तंत्रज्ञानामध्ये आपली प्रावीण्यता ठामपणे दर्शविल्यानंतर, तैवान आता क्वांटम तंत्रज्ञान (QT) मध्ये मजबूत पाय रोवून नवोन्मेषात जागतिक नेतृत्व म्हणून आपली स्थिती पुन्हा एकदा कायम ठेवण्यासाठी योग्य स्थितीत आहे. याव्यतिरिक्त, हे तंत्रज्ञान भारताला तैवानसोबत या क्षेत्रात सहकार्य करण्याचा एक नवीन मार्ग प्रदान करते, ज्यामुळे भारत या क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करणारे देश जसे की अमेरिका (US) आणि चीनद्वारे लादलेल्या निर्यात नियंत्रणांच्या अडचणी सहजपणे टाळू शकतात.
तैवानची क्वांटम तंत्रज्ञानातील प्रगती
क्वांटम तंत्रज्ञानाला एक रणनीतिक प्राधान्य देत, तैवान राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद (NSTC) ने २०२१ मध्ये तैवान क्वांटम प्रोग्राम ऑफिस (TQPO) स्थापन केले. NSTC ने अकॅडेमिया सिनिका आणि आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने २०२२ मध्ये राष्ट्रीय क्वांटम टीम तयार केली, ज्यासाठी पाच वर्षांत २५९ मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. या टीममध्ये ७२ तज्ज्ञ आणि २४ कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये खासगी क्षेत्र, तैवान सरकार, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांचे प्रतिनिधी आहेत. या संशोधनाचा फोकस युनिव्हर्सल क्वांटम कॉम्पुटर हार्डवेअर तंत्रज्ञान, क्वांटम ऑप्टिकल तंत्रज्ञान, क्वांटम सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग विकासावर आहे.
तैवान क्वांटम संगणक सॉफ़्टवेअर आणि सिम्युलेशनमध्ये देखील प्रगती करत आहे, ज्यासाठी होन हाय संशोधन संस्था आणि जपानच्या क्युनासिस यांच्यात एक रणनीतिक भागीदारी सुरू करण्यात आली आहे.
तैवानने अगोदरच क्वांटम संगणक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. जानेवारी 2024 मध्ये, अकॅडेमिया सिनिका ने तैवानचा पहिला स्वदेशी तयार केलेला क्वांटम संगणक लाँच केला, जो पाच सुपरकंडक्टिंग क्यूबिट्सवर आधारित होता. ऑक्टोबर 2024 मध्ये, राष्ट्रीय त्सिंग हुआ विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने एका फोटोनचा उपयोग करून जगातील सर्वात लहान क्वांटम संगणक विकसित केला. त्यानंतर, नोव्हेंबर 2024 मध्ये, तैवान सेमीकंडक्टर संशोधन संस्थेने (TSRI), जी नॅशनल ॲपलाएड रिसर्च लॅब्स (NARLabs) अंतर्गत एक सरकारी संस्था आहे, फिनलॅन्डमधील IQM या क्वांटम संगणक कंपनीकडून IQM स्पार्क नावाचा 5-क्यूबिट सुपरकंडक्टिंग क्वांटम संगणक अधिग्रहण केला. तैवान क्वांटम संगणक सॉफ़्टवेअर आणि सिम्युलेशनमध्ये देखील प्रगती करत आहे, ज्यासाठी होन हाय संशोधन संस्था आणि जपानच्या क्युनासिस यांच्यात एक रणनीतिक भागीदारी सुरू करण्यात आली आहे.
क्वांटम कम्युनिकेशन क्षेत्रात, तैवानच्या नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी (NTHU) ने 2019 मध्ये स्व-निर्मित सिंगल-फोटोन स्रोताचा वापर करून क्वांटम की वितरण (QKD) यशस्वीरित्या प्रदर्शित केले. त्यानंतर, या टीमने यावर आणखी काम केले, ज्यामुळे 2023 मध्ये तैवानचा पहिला क्वांटम सिक्युअर कम्युनिकेशन नेटवर्क तयार झाला. तैवानने पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी (PQC) कडे स्थलांतर करण्याचे महत्त्व ओळखले आहे, विशेषत: चीनच्या सायबर सुरक्षा धोख्याच्या वाढत्या प्रमाणामुळे. अकॅडेमिया सिनिका PQC संशोधनात सक्रियपणे सहभागी झाली आहे. चेलपिस क्वांटम कॉर्प, एक PQC संशोधन फर्म जी तैपेईत स्थित आहे, त्यांस राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्था (NIST) ने मान्यता दिली आहे. NIST ने ऑक्टोबर 2024 मध्ये याच चेलपिस क्वांटम कॉर्प, PQC संशोधन फर्मच्या तीन अल्गोरिदम्सना PQC मानकीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून निवडले होते. याशिवाय, अकॅडेमिया सिनिका आणि चेलपिस 2006 पासून नेदरलँडच्या आइंडहॉवेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीसोबत पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहेत. यामुळे 2023 मध्ये चेलपिस क्वांटम सेफ माईग्रेशन सेंटरची स्थापना झाली, ज्याचा उद्देश संशोधन वेगवान करण्यासाठी आणि PQC माईग्रेशनला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रोत्साहित करणे आहे.
भारत-तैवान सहकार्याचे परस्पर फायदे
भारत आणि तैवान यांच्यातील क्वांटम तंत्रज्ञान (QT) सहकार्यात प्रचंड क्षमता आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांना महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात. भारत त्याच्या महत्त्वाकांक्षी 6,000 कोटी रुपयांच्या (730 मिलियन अमेरिकी डॉलर्स) राष्ट्रीय क्वांटम मिशन (NQM) मार्फत क्वांटम तंत्रज्ञानाच्या दिशेने काम करत आहे, ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सर्स, आणि क्वांटम मटेरियल अँड डिव्हायसेस यांना चार मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते. त्यानुसार, भारत सरकारने देशभरातील प्रमुख संस्थांमध्ये चार थीमेटिक हब्स (T-Hubs) स्थापन केले आहेत, जे अलीकडेच कार्यरत झाले आहेत.
चीनपासून स्वतंत्र सेमिकंडक्टर पुरवठा साखळ्या स्थापन करण्यासाठी झालेल्या जागतिक प्रयत्नांमुळे इतर महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांसाठीही अशी आवश्यकता समोर आली आहे.
क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य देश, जसे की अमेरिका, चीन, आणि बहुतेक युरोपियन युनियन (EU) राष्ट्रांनी लागू केलेल्या निर्यात नियंत्रणामुळे भारताला QT मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य साधण्यात सर्वात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, तैवानसोबत QT सहकार्य हे या अडचणीवर मात करण्याचा एक मार्ग ठरू शकते, फक्त दोन्ही देशांनी एकमत केले तर. याव्यतिरिक्त, अलीकडीलच चीनपासून स्वतंत्र सेमिकंडक्टर पुरवठा साखळ्या स्थापन करण्यासाठी झालेल्या जागतिक प्रयत्नांमुळे इतर महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांसाठीही अशी आवश्यकता समोर आली आहे. कारण QT पुरवठा साखळ्या अजून ठोसपणे स्थापन झालेल्या नाहीत, समान दृष्टिकोन असलेल्या राष्ट्रांमधील सहकार्य हे सुनिश्चित करेल की पुरवठा साखळीच्या कमतरतेची स्थिती पुन्हा घडणार नाही. तसे पाहिले तर अमेरिकेने या दिशेने काम सुरू केले आहे. अमेरिकेने सॅन डिएगो स्थित कंपनी क्वांटम डिझाईन इंटरनॅशनल कंपनी द्वारे पहिले पाऊल टाकले आहे, ही कंपनी तैपेईत क्वांटम डिझाईन तैवान नावाची कंपनी स्थापन करून, क्वांटम कम्प्युटिंग आणि क्वांटम कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचा घटक असलेले डायल्यूशन रेफ्रिजरेटर तयार करीत आहे. म्हणून, भारत आणि तैवान यांच्यात QT पुरवठा साखळ्या स्थापन करण्यामध्ये सहकार्य भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
तैवानच्या बाबतीत, सेमिकंडक्टर तंत्रज्ञानात तैवानने विकसित केलेली तज्ञता, चीनकडून येणाऱ्या सततच्या धमक्या रोखण्यासाठी तैवानला महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळवून देत आहे. तथापि, स्वतंत्र सेमिकंडक्टर पुरवठा साखळ्या स्थापन करण्यासाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या दडपणामुळे तैवान लवकरच हा फायदा गमावू शकतो. क्वांटम तंत्रज्ञान (QT) सारख्या मूलभूत तंत्रज्ञानात आपली मुळे स्थापन करणे हे तैवानला भविष्यात आपली रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थिती कायम ठेवण्यासाठी सुनिश्चित करू शकते.
भारताने सेमिकंडक्टर क्षेत्रात अलीकडेच केलेल्या प्रगतीनंतर आणि तैवानच्या कंपन्यांसोबत, जसे की फॉक्सकॉन आणि पावरचिप सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) सोबत सुरु केलेल्या सहकार्यामुळे, भारत-तैवान तंत्रज्ञान सहकार्याला वेग मिळालेला आहे.
तैवानच्या अलीकडील तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नांनंतरही, तैवान QT क्षेत्रात अद्यापही नवखा आहे आणि भारताच्या अनुभवापासून त्यास महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात. तैवानची सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास, सेमिकंडक्टर क्यूबिट्सवर आधारित क्वांटम संगणक विकसित करण्यासाठी सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी एक लाभदायक पर्याय ठरते. भारताने सेमिकंडक्टर क्षेत्रात अलीकडेच केलेल्या प्रगतीनंतर आणि तैवानच्या कंपन्यांसोबत, जसे की फॉक्सकॉन आणि पावरचिप सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) सोबत सुरु केलेल्या सहकार्यामुळे, भारत-तैवान तंत्रज्ञान सहकार्याला वेग मिळालेला आहे. याव्यतिरिक्त, भारताने क्वांटम कम्युनिकेशन आणि क्वांटम सेन्सिंग यांसारख्या QT क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे, या क्षेत्रात तैवानची प्रगती करणे अजून बाकी आहे. या तंत्रज्ञानांचे विविध संभाव्य अनुप्रयोग तैवानला भारताशी QT सहकार्य करण्यासाठी आणखी प्रोत्साहन देतात.
सहकार्याचे संभावित मार्ग
क्वांटम तंत्रज्ञान हे एक नवखे क्षेत्र आहे जे अजूनही विकसित होण्याच्या मार्गावर आहे, क्वांटम तंत्रज्ञानाच्या (QT) विकासात सध्या संशोधन आणि विकास (R&D) हे मुख्य फोकस असलेले क्षेत्र आहे, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि कौशल्याची आवश्यकता आहे. संयुक्त R&D कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे, म्हणूनच, अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत-तैवान विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रम 2007 मध्ये स्थापन करण्यात आला, ज्याचा उद्देश सेमिकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैव तंत्रज्ञान, आणि एरोस्पेस सारख्या क्षेत्रांतील R&D प्रकल्पांना आर्थिक समर्थन प्रदान करणे होता. या चौकटीत QT समाविष्ट करणे सूज्ञ ठरेल, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि NSTC या कार्यक्रमासाठी नोडल एजन्सी आहेत. वरील दोन एजन्सी त्यांच्या संबंधित देशांमध्ये क्वांटम उपक्रमांसाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करत आहेत, म्हणजेच भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नॅशनल क्वांटम मिशन (NQM) ला संचलित करते आणि तैवानमध्ये राष्ट्रीय क्वांटम टीमला NSTC संचलित करते.
भारत-तैवान विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रम 2007 मध्ये स्थापन करण्यात आला, ज्याचा उद्देश सेमिकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), जैव तंत्रज्ञान, आणि एरोस्पेस सारख्या क्षेत्रांतील R&D प्रकल्पांना आर्थिक समर्थन प्रदान करणे होता.
याशिवाय दोन्ही देशांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांमधील शैक्षणिक विनिमय देखील फायदेशीर ठरू शकतो. उदाहरणार्थ, तैवानमधील अकॅडेमिया सिनिका आणि NTHU आणि भारतातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि भारतीय विज्ञान संस्था (IISC) बेंगळुरू यांच्यातील विनिमय कार्यक्रम विशेषत: उपयुक्त ठरू शकतात. हे भारत आणि अमेरिकेदरम्यान आधीच स्थापन केलेल्या क्वांटम एंटॅंगलमेंट एक्सचेंज प्रोग्रॅमच्या आधारावर तयार केले जाऊ शकते. यामुळे दोन देशांमध्ये QT वर संयुक्त शोधपत्रिका प्रकाशित करण्यास मदत होईल, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासास वेग येईल.
तैवानच्या नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी काऊन्सिल (NSTC) ने 2023 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात तैवान विज्ञान आणि तंत्रज्ञान हब स्थापन केला, ज्याचा उद्देश संशोधन, स्टार्टअप्स आणि कौशल्य संवर्धनाला प्रोत्साहन देणे आहे. NSTC भारताच्या NQM अंतर्गत स्थापन केलेल्या वरील उल्लेखित T–Hubs पैकी एका ठिकाणी, विशेषतः QT वर लक्ष केंद्रित करून, अश्या प्रकारचा हब निर्माण करण्याची गोष्ट विचारात घेऊ शकतात.
पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी (PQC) च्या क्षेत्रात, भारताकडे QNu Labs सारखी स्टार्टअप्स आहेत, ज्यांनी या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे, जसे की तैवानमधील Chelpis. या संस्था आपसात बिझनेस-टू-बिझनेस सहकार्य करू शकतात, जे क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याची एक व्यावहारिक संधी प्रस्तुत करतात.
निष्कर्ष
1995 मध्ये औपचारिकपणे स्थापन झालेल्या भारत आणि तैवान यांच्यातील कूटनीतिक संबंध अद्याप तुलनेने नवीन आहेत. या संदर्भात, QT सहकार्याचे आणखी एक परिणाम म्हणजे दोन्ही देशांमधील वाढते कूटनीतिक संबंध आणि सहकार्य मजबूत करणे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तैवानचे माजी अध्यक्ष साई इंग-वेन यांच्यासह, आपापल्या देशांसाठी QT चे महत्त्व मान्य केले आहे. म्हणून, भारत आणि तैवान दोन्ही देश या क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यासाठी एका योग्य स्थितीत आहेत, ज्यामुळे भविष्यात अधिक मजबूत राजनीतिक संबंध निर्माण होण्याचा मार्ग प्रशस्त होईल.
प्रतीक त्रिपाठी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरीटी स्ट्रेटजी अँड टेक्नॉलॉजीमध्ये ज्युनियर फेलो आहेत.