-
CENTRES
Progammes & Centres
Location
पाकिस्तानी सैन्याने तहरीक़-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) विरुद्ध सैनिकी यश मिळवले असले तरी, ते डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील TTP च्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरले आहे, जे राष्ट्राच्या अपयशांचा आणि वैचारिक रिक्ततेचा वापर करून अल्पसंख्यक नागरिकांना कट्टरपंथी बनवत आहे.
Image Source: Getty
नोव्हेंबर २०२४ मध्ये, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने १७ पृष्ठांचा एक दस्तऐवज प्रसिद्ध केला, ज्यात "इस्लामी पद्धती"नुसार "इस्लामच्या शत्रूंना" युद्धात फाशी आणि शिरच्छेद करण्याबाबतचा निर्देश दिला होता. केंद्रीय दर-उल-इफ्ता, TTP च्या फतवा समितीने जारी केलेला हा दस्तऐवज निवडक धार्मिक संदर्भांवर आधारित आहे आणि TTP गटाच्या कार्यकर्त्यांना "गैर इस्लामिक" हत्या पद्धतींना टाळण्यास सांगितले आहे. हा दस्तऐवज TTP च्या मीडिया शाखा उमर मीडियाने इंटरनेट आर्काइव या फाइल आणि मीडिया शेअरिंग वेबसाइटवर प्रसारित केला. TTP कडून आलेल्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे दुसरे उदाहरणे म्हणजे गटाचे मीडिया वापरण्याचे कसब आणि दृष्टीकोन, जे त्याच्या प्रचार प्रसारात वाढत्या सूक्ष्मतेचे आणि त्याच्या नरेटिव्हला डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रसार करण्याच्या क्षमतेचे उदाहरण आहे.
हा दस्तऐवज TTP च्या मीडिया शाखा उमर मीडियाने इंटरनेट आर्काइव या फाइल आणि मीडिया शेअरिंग वेबसाइटवर प्रसारित केला.
TTP, पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या आपल्या अविरत प्रयत्नात, सोशल मीडिया आणि सायबरस्पेसचा उपयोग मानसिक युद्ध आणि हिंसा भडकवण्यासाठी महत्त्वाच्या साधनांप्रमाणे केला आहे. हा लेख TTP च्या डिजिटल प्रचार धोरणाचा अभ्यास करतो आणि असे सांगतो की, हा गट हळूहळू सोशल मीडियाचा वापर एक शक्तिशाली साधन म्हणून करत आहे जे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी, नागरिकांच्या धार्मिक भावनांचा वापर करून त्याच्या वैचारिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी वापरते. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या सैनिकी उपाययोजनांनी TTP चे युद्धक्षेत्रात तर मोठे नुकसान केले आहे, पण या दहशतवादी संघटनेची डिजिटल स्पेसमध्ये अनुकूल होण्याची आणि त्याचा वापर करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केली गेली.
TTP ने २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून पाकिस्तान सरकार आणि त्याच्या संस्थांना लक्ष्य केले आहे. तथापि, ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाण तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यामुळे TTP ला वैचारिक प्रेरणा आणि सीमेच्या पलीकडे आश्रय मिळाला, ज्यामुळे त्याच्या कार्यामध्ये पुनरुत्थान झाले. याच वेळेस पाकिस्तान सरकारने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि आदिवासी प्रदेशांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा वाढवल्या. जिथे लष्करी कारवायांनी TTP गटाचे नेटवर्क तर तोडलेच पण त्याचवेळी सामान्य जनतेला अप्रत्यक्षित नुकसान झाले, जीव गेले आणि विस्थापित होण्याची परिस्थिती निर्माण केली. TTP च्या नेतृत्वाने या तक्रारींचा वापर करून स्थानिक समर्थन मिळवले, विशेषतः पख्तून समुदायांमध्ये ज्यांनी सरकारवर दुर्लक्ष आणि कडक धोरणांचे आरोप केले.
ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाण तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यामुळे TTP ला वैचारिक प्रेरणा आणि सीमेच्या पलीकडे आश्रय मिळाला, ज्यामुळे त्याच्या कार्यामध्ये पुनरुत्थान झाले.
दोन्ही पक्षांच्यामधील २०२२ चा युद्धविराम करारा तुटला आणि म्हणून पाकिस्तान सरकार आणि TTP दरम्यानचे शत्रुत्व अधिक तीव्र बनले. प्रतिसाद म्हणून, TTP गटाने पोलिस स्टेशन, लष्करी ठिकाणे आणि गुप्तचर संस्थांवर लक्ष्य केलेले हल्ले पुन्हा सुरू केले. पाकिस्तानच्या वाढत्या आर्थिक संकटामुळे आणि चालू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे सरकारच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आणखी तगडा फटका बसला, ज्याचा फायदा TTP ने घेतला आणि स्वत:ला "दुराचारित आणि अन्यायकारक" व्यवस्थेचा पर्याय म्हणून प्रकट केले. या घडामोडींनी एकत्रितपणे पाकिस्तान सरकार विरुद्धच्या त्याच्या अलीकडील मोहिमेला चालना दिली, ज्यात गटाने वैचारिक वादविवाद आणि तक्रारींचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांच्या अधिकृततेला धक्का दिला. परिणामी, २०२४ मध्ये पाकिस्तानमध्ये TTP च्या हल्ल्यांमध्ये २०२३ च्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
तहरीक़-ए-तालिबान TTP चे मीडिया धोरण, जे उमर मीडिया द्वारा नेतृत्त्व केले जात आहे. ज्या मधून हे समजते की विविध प्रेक्षकांवर म्हणजेच लोकांवर लक्ष केंद्रित करणारे, भावनिकदृष्ट्या उत्स्फूर्त केलेले साहित्य/कंटेंट तयार करण्यासाठी एक संघटित आणि प्रणालीबद्ध प्रयत्न केले जात आहेत. TTP चे ऑनलाइन मासिक, "तालिबान", तसेच काळजीपूर्वक तयार केलेले व्हिडिओ, सार्वजनिक विचारधारा त्यांच्या बाजूने घडवण्याचा, हिंसाचाराचा गौरव करण्याचा, आणि पाकिस्तान सरकार व कायदा अंमलबजावणी संस्थांविरोधात संताप भडकवण्याचा प्रयत्न करते. पाकिस्तानच्या लष्करी आणि पोलिस दलांना भ्रष्ट आणि इस्लाम-विरोधी म्हणून प्रस्तुत करून, गट त्याच्या पीडिततेचे आणि शहीदत्वाचे वादविवाद अधिक दृढ करतो, सुरक्षा दलांच्या मनोबलाला कमजोर करण्याचा आणि सार्वजनिक असंतोष वाढवण्याचा प्रयत्न करतो.
ऑगस्ट २०२१ नंतर, उमर मीडिया पुन्हा सुधारित करण्यात आली आहे, आणि आता ती एका व्यावसायिक आणि केंद्रीकृत संरचनेसह कार्यरत आहे. यामुळे TTP च्या कंटेंटची वारंवारता, सातत्य आणि गुणवत्ता सुधारली आहे, जी अनुभवी मीडिया प्रोपगांडा करणाऱ्या प्रचारकांनी सुगम केली आहे, जे पूर्वी भारतीय उपखंडातील अल-कायदा सोबत संबंधित होते.
TTP चे ऑनलाइन मासिक, "तालिबान", तसेच काळजीपूर्वक तयार केलेले व्हिडिओ, सार्वजनिक विचारधारा त्यांच्या बाजूने घडवण्याचा, हिंसाचाराचा गौरव करण्याचा, आणि पाकिस्तान सरकार व कायदा अंमलबजावणी संस्थांविरोधात संताप भडकवण्याचा प्रयत्न करते.
तहरीक़-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आपल्या प्रचारासाठी मुख्यधारा मीडिया आणि एन्क्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म्स जसे की टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप, तसेच फाइल आणि मीडिया शेअरिंग साइट्स जसे की इंटरनेट आर्काईवचा वापर करून व्हिडिओ, दस्तऐवज आणि भाषणांचे वितरण करतो. प्रॉक्सी खात्यांचा आणि एन्क्रिप्टेड साधनांचा वापर करून, TTP सुनिश्चित करते की त्यांचे साहित्य किंवा कंटेंट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सापडला जाण्यापासून आणि बंदी घालण्यापासून वाचला पाहिजे. TTP कडून प्रसारित केला जाणारा कंटेंट विविध प्रकारच्या लोकांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केली जातो, ज्यात धार्मिक वैधतेचे, सरकार विरोधी वादविवाद, आणि साहस-आधारित कथा समाविष्ट असतात, ज्या दुर्लक्षित मुस्लिम समाजातील युवकांना, विशेषतः पख्तून पट्टा आणि देशांतरित मुस्लिम समुदायांमधून, आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
TTP आपल्या संघर्षाला एक ईश्वरीय जिहाद म्हणवते, जो एका गैर इस्लामिक पाकिस्तानी राष्ट्राविरुद्ध आहे, आणि सुरक्षा दलांना पश्चिमी शक्तींचे भ्रष्ट व विश्वासघातक एजंट्स म्हणून बदनाम करते. त्यांच्या व्हिडिओंमध्ये अनेकदा कुराणाचा उच्चार, लढाईची दृश्ये आणि आत्मघाती बॉम्बधारकांचे (फिदायीन) गौरवीकरण केलेले चित्रण असते, ज्यात शहीद होणे हे अंतिम यश म्हणून प्रस्तुत केले जाते. याव्यतिरिक्त, मानसिक युद्धाचा वापर, जसे की फाशीचे व्हिडिओ आणि लष्करी विजयांच्या अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांद्वारे, पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि जनतेमध्ये आपल्याबद्दल भय निर्माण केले जाते.
ही समन्वित आणि व्यावसायिक प्रचार यंत्रणा स्थानिक तक्रारींचा फायदा घेत आहे, विशेषतः पख्तून समुदायांमध्ये, अन्याय, विस्थापन आणि सरकारच्या दुर्लक्षाचे विस्तारित कथन करीत आहे. TTP चे हे धोरण तंत्रज्ञानातील प्रगतीप्रती त्याच्या अनुकूलतेला आणि सामाजिक-राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्याच्या क्षमतेला अधोरेखित करते.
TTP च्या मानसिक पाकिस्तानच्या लष्करी आणि पोलिस दलांवरील मानसिक प्रभाव खोलवर आहे, कारण हा दुष्प्रचार थेट त्यांच्या मनोबल आणि ओळखीस लक्ष्य करतो. सुरक्षा दलांना "मुर्तद" (विश्वासघाती) आणि परदेशी हितासाठी लढणारे भाडोत्री म्हणून ओळखले जाते. TTP गटाचे हे संदेश सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक ओळखीचे संकट निर्माण करतात, जे सामान्यतः मजबूत धार्मिक विश्वास ठेवतात. या प्रकारे, TTP त्यांच्या व्यवसायाला इस्लामचा विश्वासघाती म्हणून दाखवते, ज्यामुळे सैन्यांत मानसिक संघर्ष निर्माण होतो, जो त्यांच्या निर्धाराला कमजोर करू शकतो आणि अत्यंत परिस्थितीत, ते दल सोडू शकतात. यासोबतच "मृत्यूची महत्त्वता" हा संकल्पना आहे, ज्यात TTP आत्मघाती बॉम्बधारकांना शहीद म्हणून गौरविते आणि जिहादात मृत्यूला एक ईश्वरीय विजय म्हणून प्रस्तुत करते. ह्या कथा, समोरील जवानांमध्ये अस्तित्वाच्या भीतीला वाढवते, विशेषतः कारण TTP गट हिंसक चित्रण, फाशीचे व्हिडिओ आणि युद्धभूमीवरील यश प्रसारित करत राहते, ज्याचा हेतू त्यांचे विरोधक म्हणजेच सैनिकांना भयभीत करणे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला हानी पोहोचवणे यासाठी आहे.
TTP पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या ऑपरेशनल अपयशांचा अपप्रचार जास्तच वाढवून करते आणि याच कारणाने मानसिक ओझे आणखी वाढवले जाते. कथितपणे रचलेले हल्ले, पोलिसांवर लक्ष केंद्रित हल्ले, आणि पाकिस्तानी लष्करी आणि पोलिस दलांवर विजयाचे दावे असलेले व्हिडिओ, देशाच्या सुरक्षा राखण्याच्या क्षमतेवर जनतेचा विश्वास कमजोर करण्यासाठी तयार केले जातात. या प्रकारच्या चित्रणांनी TTP ला वर्चस्व राखणारा म्हणून प्रस्तुत केले जाते, ज्यामुळे सैन्याच्या मनात एक अशक्य आणि अजेय शत्रूची भावना निर्माण होते, जी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मानसिक तगदावर मोठे ओझे टाकते, जे या सडत जाणाऱ्या बंडखोरीला विरोध करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
लष्करी जवान आणि पोलिस दलांचे मनोबल घटवून, TTP गट हा भावनिक आणि धार्मिक वादविवादांचा उपयोग करून समोरच्या लढवय्या सैनिकांमध्ये मध्ये शंका, भीती आणि निराशा निर्माण करतो.
तहरीक़-ए-तालिबान पाकिस्तान TTP द्वारे सोशल मिडियाचा सतत वापर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांसाठी एक शक्तिशाली आणि विकसित होणारा धोका म्हणून तयार होत आहे, जो त्यांच्यावर मानसिक आणि लष्करी कारवाईची आव्हाने आणखी वाढवतो. लष्करी मोहिमांनंतरही, पाकिस्तानची दहशतवादविरोधी रणनीती TTP च्या प्रचार युद्धाशी प्रभावीपणे लढवण्यास अपयशी ठरत आहे.
एका मजबूत प्रतिकारात्मक नरेटिव्हची अनुपस्थिती म्हणजेच अत्याचारी संदेशाचा विरोध न करता त्याचा प्रसार होऊ देणे, कारण पाकिस्तानने इस्लामी शिकवणींवर आधारित एक स्पष्ट वैचारिक प्रत्युत्तर देण्यात अपयश मिळवले आहे, जे टीटीपीच्या हिंसक इस्लामच्या व्याख्यांचे भांडे फोडते. यामध्ये एक अतिरिक्त समस्या म्हणजे पाकिस्तानी सरकारकडून योग्य सायबर निरीक्षणाची कमतरता, ज्यामुळे एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म्स जसे की टेलीग्राम आणि व्हॉट्सऍप हे कट्टरपंथी संघटनांची भरती आणि प्रचार व प्रसारासाठी उत्तम मार्ग ठरतात. पाकिस्तानी सुरक्षादलांसाठी हा डिजिटल धोका एक अत्यंत जटिल लढाईला आणखी किचकट बनवतो, कारण प्रत्येक लष्करी कारवाईत येणारे अपयश आणि प्रतिकारात्मक नरेटिव्हचा अभाव, तहरीक़-ए-तालिबान पाकिस्तान TTP सारख्या एका वेगवान आणि वैचारिकदृष्ट्या प्रेरित शत्रूला आणखी मजबूत करतो.
समीर पाटील हे ऑबझर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरीटी, स्ट्रॅटजी आणि टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर आहेत.
सौम्या अवस्थी ह्या ऑबझर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरीटी, स्ट्रॅटजी आणि टेक्नॉलॉजीच्या फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Sameer Patil is Director, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. His work focuses on the intersection of technology and national ...
Read More +Dr Soumya Awasthi is Fellow, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. Her work focuses on the intersection of technology and national ...
Read More +