Image Source: Getty
मानवी नियंत्रणाखालील तसेच मानवरहित हवाई वाहने, रणगाडे, तसेच क्रायोजेनिक रॉकेट इंजिन्स ( याच्या बनावटीमध्ये भारताने पूर्णपणे प्रभुत्व मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे.) सारख्या स्पेस लॉन्च व्हेईकल (एसएलव्हीज) साठीची स्वदेशी इंजिने तयार करण्यासाठी भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) आणि जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल एमके-थ्री (एलव्हीएमथ्री) मध्ये भारताला काही प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल एमके-थ्री (एलव्हीएमथ्री) चा विचार करता लो अर्थ ऑर्बिट (लिओ) मध्ये ४ ते ८ टन पेलोड ठेवणे शक्य आहे. असे असले तरी भारताला संशोधन आणि विकास तसेच इंजिनच्या उत्पादनाशी संबंधित मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सामरिक, संरक्षण आणि वैज्ञानिक आस्थापनांमध्ये एसएलव्हीज आणि एरो इंजिन्सना अधिक महत्त्व दिले जात असले तरी रणगाड्यांसारख्या जमिनीवरील लढाऊ वाहनांच्या इंजिनांच्या विकासामधील अडथळ्यांवर भारत मात करत असल्याचे काही विश्लेषणांत समोर आले आहे.
सामरिक, संरक्षण आणि वैज्ञानिक आस्थापनांमध्ये एसएलव्हीज आणि एरो इंजिन्सना अधिक महत्त्व दिले जात असले तरी रणगाड्यांसारख्या जमिनीवरील लढाऊ वाहनांच्या इंजिनांच्या विकासामधील अडथळ्यांवर भारत मात करत असल्याचे काही विश्लेषणांत समोर आले आहे. या वाटचालीत बरीच आव्हाने असली तरी भारत प्रगतीपथावर आहे. सर्वप्रथम आपण अर्जुन मार्क- १ (एम - १) चा विचार करू या. अर्जुन मार्क- १ ला जर्मनने तयार केलेले १४०० हॉर्सपॉवर (एचपी) एमटीयू एमबी ८३८ केए – व्ही १० डिझेल इंजिन लावण्यात आले होते. या इंजिनावरील अवलंबित्वामुळे बराच काळ अर्जुन मार्क- १ ला बिघाड तसेच दुरूस्तीमधील अडचणी, सैन्यात तैनात होण्यास विलंब अशा आव्हानांचा सामना करावा लागला होता. तेजस एमके – १ए साठी अमेरिकन एफ ४०४ इंजिने मिळवण्यात पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे अडथळे येत होते. याचाच थेट परिणाम एमटीयूसोबतच्या व्यवहारावर होऊन इंजिने मिळणे कठीण झाले. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या एफ - ४०४ इंजिनच्या डिलिव्हरीवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच एमके - ए१ साठी बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या एरोइंजिनांमध्ये विशेष प्रगती झालेली नाही.
रणगाड्यांमधील स्वदेशी बनावटीच्या इंजिनाबाबत आशावाद व्यक्त करताना सावधगिरीची भुमिका ठेवणे गरजेचे आहे. स्वदेशी बनावटीच्या इंजिन प्रोटोटाईपचा विकास याआधीच सुरू करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन - डीआरडीओ), आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांच्या प्रयत्नांमुळे, डेट्रान १५०० एचपी इंजिन पूर्ण झाल्यास, ही इंजिने अर्जुन एमबीटी ( एमके १ आणि एमके २) व फ्यूचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल (एफआरसीव्ही) या भारताच्या दोन मेन बॅटल टँकमध्ये वापरण्यात येणार आहेत. साधारणपणे २० डेट्रान १५०० एचपी इंजिनांच्या बांधणासाठी बीईएमएलसोबत करार करण्यात आला आहे. या इंजिनांची चाचणी अर्जुन एमबीटीवर करण्यात आली आहे व ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. ही इंजिने सेवांतर्गत टी - ७२, टी – ९० आणि एफआरसीव्हीपेक्षा अधिक वजनाची आहेत. एफआरसीव्हीचा स्वतंत्रपणे विचार केल्यास त्यामध्ये दोन वेगळ्या प्रोटोटाईपचा समावेश असणार आहे व त्यांना आगामी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) मध्ये प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. इंजिनांमधील मानकीकरण सुनिश्चित करण्यासाठी, दोन्ही एफआरसीव्हीमध्ये डेट्रान १५०० एचपी इंजिनांचा वापर करण्यात येईल. याचा थेट फायदा लॉजिस्टीक हाताळणीमधील सुलभतेमध्ये होणार आहे.
प्रतिकूल पर्यावरणीय आणि खडतर लष्करी परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी इंजिन्सच्या डिझाईनबाबत उच्च पातळीची विश्वासार्हता असणे आवश्यक आहे.
एकीकरणाच्या क्रमिक प्रक्रियेचा भाग म्हणून, २०२३ मध्ये पहिली चाचणी घेण्यात आली आहे. या इंजिनांचे इन्स्टॉलेशन अर्जुन टँकमध्ये करण्यात येणार असले तरी त्या आधी या इंजिनाला मोबिलीटी टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. मार्च २०२४ मध्ये, बीईएमएलने डेट्रॉन १५०० एचपी इंजिनची आणखी एक यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे . या चाचणीस संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी “९०% भारतीय बनावटीचे” म्हणून घोषित केले आहे. पुढील चाचण्यांचा एक भाग म्हणून एकूण २० इंजिनांची चाचणी केली जाणार आहे. कठोर आणि यशस्वी चाचण्यांनंतरच या इंजिनांना एफआरसीव्ही प्रोटोटाईपमध्ये वापरले जाणार आहे. भारतीय लष्कर आणि एफआरसीव्हीद्वारे कार्यान्वित करण्यात आलेल्या कोणत्याही एमबीटीमध्ये इंटिग्रेशनसाठी इंजिनांना मंजुरी मिळण्यापूर्वी अर्जुन एमबीटी हे प्रारंभिक चाचणी केंद्र म्हणून काम करणार आहे. या इंजिनांच्या विकासामुळे स्वदेशी बनावटीच्या आर्मर्ड व्हेईकल विकसित करण्याच्या दिशेने भारत महत्त्वपुर्ण प्रगती करणार आहे. प्रतिकूल पर्यावरणीय आणि खडतर लष्करी परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी इंजिन्सच्या डिझाईनबाबत उच्च पातळीची विश्वासार्हता असणे आवश्यक आहे. डेट्रॉन १५०० इंजिनाची पुर्ण चाचणी यशस्वी झाल्यानंतर आणि ते विकसित केल्यानंतर हाय पॉवर टू वेट रेशो निर्माण करण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे एफआरसीव्ही आणि इतर रणगाड्यांमध्ये त्याचे एकत्रिकरण केल्यानंतर अधिक अक्सलरेशन, मोबिलीटी आणि इन्ड्युरन्स दिसून येईल. यात देखभालीचे काम कमी करणारे सेल्फ-क्लीनिंग फिल्टर्ससारखी वैशिष्ट्येही समाविष्ट आहेत. यामुळे ऑपरेशनल तत्परता (रेडीनेस) वाढण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिकली डिटरमाईन्ड फ्युअल इंजेक्शनचा समावेश असलेली कॉमन रेल डायरेक्शन इंजेक्शन (सीआरडीआय) सिस्टीमही इंजिनांमध्ये समाकेलित केली जाणार आहे. यामुळे उर्जेची इष्टतम पातळी गाठणे आणि इंधन वापरामध्ये कार्यक्षमता निर्माण करणे तसेच - ४५ अंश सेल्सिअस ते + ५५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या ५,००० मीटर उंचीवर परिवर्तनशील परिस्थितीत प्रभावी ऑपरेशन हाताळणे शक्य होणार आहे.
या क्षेत्रात काही प्रमाणात उल्लेखनीय प्रगती करण्यात आली असली तरीही भारतीय सैन्याच्या गुणात्मक आवश्यकतांचे पालन करणारी अचूक मानके आणि बेंचमार्क पूर्ण करण्यास अजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे. इंजिन पूर्णपणे विकसित होण्यापूर्वी आणि उत्पादनाच्या टप्प्यात प्रवेश करण्यापूर्वी अनेक अडथळ्यांवर मात करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, डेट्रॉन १५०० इंजिनाची रचना यु आकाराच्या कॉम्पॅक्ट जर्मन घडणीच्या एमटीयु इंजिनापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्याचा वापर अर्जुन रणगाड्यामध्ये करण्यासाठी त्यात बदल करणे आवश्यक आहे. बदल करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. दुसरी बाब म्हणजे, मूळत: जर्मन-निर्मित एमटीयू एमबी ८३८ केए – ५०१ व्ही १०लिक्विड टर्बोचार्ज्ड इंजिनचा त्यात वापर केला जाईल हे नजरेसमोर ठेवून अर्जुन डिझाइन करण्यात आले होते. एमटीयूने केलेल्या चार वर्षाच्या विलंबामुळे, डीआरडीओ आणि त्याच्या उद्योग भागीदारांना स्वदेशी बनावटीच्या इंजिनाकडे वळावे लागले आहे. याची आता डेट्रॉन १५०० एचपी इंजिनच्या रूपात चाचणी केली जात आहे. तरीही, सुधारित अर्जुनमध्ये इंजिनची चाचणी आणि ट्रायलिंग करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. २०२७ – २८ पासून भारतीय लष्कराच्या टी – ९० रणगाड्यांमध्ये या इंजिनांचा वापर करण्यासाठी परिक्षण आणि एकत्रीकरणासाठी काही बदल केले जाणार आहेत. यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
ग्राउंड कॉम्बॅट वाहनांच्या इंजिनांकडे एरो-इंजिन आणि एसएलव्हीसाठी लागणाऱ्या इंजिनांइतकेच लक्ष द्यावे लागणार आहे.
या सर्व घडामोडी सकारात्मक आहेतच परंतु त्यासोबत, त्यांच्या यशस्वी वितरणासाठी सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे. हे साध्य करण्यासाठी डीआरडीओ, बीईएमएल, त्यांचे औद्योगिक भागीदार आणि मुख्य म्हणजे भारतीय लष्कर यांच्यातील सहकार्य महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. भारताच्या सैन्य दलांसमोरील आव्हानाची गंभीरता लक्षात घेता, इंजिनांचा वेळेवर आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी इंजिन तंत्रज्ञानाच्या दिशेने संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. इंजिन तंत्रज्ञानातील भरीव यशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्राचा मजबूत पाया भरणी आवश्यक आहे. सध्यातरी या क्षेत्रातील भारताची प्रगती काहीशी अपुरी आहे. डीआरडीओ आणि मोदी सरकारने विविध प्लॅटफॉर्म्सवर ठोस दृष्टीकोन आणि योजना मांडल्यास त्याचा थेट फायदा इंजिनच्या विकासासाठी होणार आहे. ग्राउंड कॉम्बॅट वाहनांच्या इंजिनांकडे एरो-इंजिन आणि एसएलव्हीसाठी लागणाऱ्या इंजिनांइतकेच लक्ष द्यावे लागणार आहे. खरंच, जर अशा प्रकारचे प्राधान्य दिले गेले तर, लढाऊ विमानांच्या इंजिनपेक्षा आणि जड एसएलव्हीमध्ये लागणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनपेक्षा, ग्राउंड वॉरफेअर प्लॅटफॉर्मसाठी इंजिन विकसित करणे सोपे होऊ शकते. तसेच, कमी कालावधीत तांत्रिक लक्ष्ये गाठणेही शक्य होणार आहे.
कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे वरिष्ठ फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.