Expert Speak Raisina Debates
Published on May 13, 2025 Updated 0 Hours ago

हाय प्रिसीशन आणि मल्टी डोमेन ऑफेन्सिव्ह ही वैशिष्ट्य असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या दहशतवादविरोधी सिद्धांताच्या धोरणात्मक उत्क्रांतीचे दर्शन झाले आहे.

ऑपरेशन सिंदूर – लष्करी कारवाईचा संदर्भ आणि परिणाम समजून घेताना

Image Source: Getty

    ६-७ मे २०२५ ला मध्यरात्रीच्या सुमारास ०१:०५ ते ०१:३० या वेळेत, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' या सांकेतिक नावाने तीन्ही सशस्त्र दलाचा समावेश असलेली लष्करी कारवाई केली. भारतीय भूमीवर सीमापार दहशतवादासाठी जबाबदार असलेल्या गटांच्या ऑपरेशनल क्षमता निष्प्रभ करण्याच्या उद्देशाने, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले.

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यात २६ नागरिक (२५ भारतीय आणि एक नेपाळी) ठार झाले होते. याच पार्श्वभुमीवर, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला "प्री - एम्प्ट" आणि "डिटर (प्रतिबंध) " करण्यासाठी कारवाई करण्यात आली, असे भारताने म्हटले आहे. भारत सरकारने या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या प्रॉक्सी असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या गटाला जबाबदार ठरवले आहे. या गटाने सुरुवातीला हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि नंतर "सायबर घुसखोरी" असल्याचा आरोप करत ती नाकारली.

    भारताने त्याच्या कारवाईचे वर्णन "केंद्रित, मोजमाप केलेले आणि नॉन एस्कलेटरी" असे केले आहे. या कारवाईत तणावात वाढ होण्याचा धोका कमी करण्यासाठी पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचे जाणूनबुजून टाळण्यात आले. ऑपरेशन सिंदूर हे "चालू असलेले किंवा ऑनगोईंग ऑपरेशन" असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. या हल्ल्यामधील मृतांमध्ये जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चा नेता अब्दुल रौफ अझहर याचा समावेश आहे. अब्दुल रौफ अझहर हा डिसेंबर १९९९ मध्ये झालेल्या आयसी-८१४ अपहरणात आणि अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येत सहभागी होता. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांची हत्या झाल्याचे वृत्त आहे.

    १९७१ च्या युद्धानंतर भारतीय सशस्त्र दलांनी केलेले हे सर्वात व्यापक लष्करी ऑपरेशन आहे. शिवाय, २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ च्या बालाकोट एअरस्ट्राईकसारख्या मागील ऑपरेशन्सच्या विपरीत, ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि PoJK मधील हाय प्रिसीशन आणि मल्टी डोमेन ऑफेन्सिव्ह ही वैशिष्ट्य असलेले आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या दहशतवादविरोधी सिद्धांताच्या धोरणात्मक उत्क्रांतीचे दर्शन झाले आहे.

    या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या भारतविरोधी दहशतवादी गटांशी संबंधित नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले. यातील चार ठिकाणे पाकिस्तानमधील तर पाच ठिकाणे पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील आहेत. लक्ष्य करण्यात आलेल्या या ठिकाणांमध्ये मुरीदके (एलईटी मुख्यालय) आणि बहावलपूर (जेईएम मुख्यालय) यांचा समावेश आहे.

    आकृती १: पाकिस्तान आणि पीओजेकेमध्ये लक्ष्य करण्यात आलेली स्थळे दर्शविणारे नकाशे

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्त्रोत – ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन

    तक्ता १: ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेल्या पाकिस्तान आणि पीओजेकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधांची यादी

    नाव

    स्थळ

    संलग्नता / कार्य

    निवडीमागचे कारण

    सवाई शावाई नाला

    मुजफ्फराबाद, पीओजेके

    एलईटी प्रशिक्षण केंद्र

    नियंत्रण रेषेपासून (एलओसी) जवळजवळ ३० किमी अंतरावर; सोनमर्ग (ऑक्टोबर २०२४), गुलमर्ग (ऑक्टोबर २०२४) आणि पहलगाम (एप्रिल २०२५) हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले.

    सय्यदना बिलाल

    मुजफ्फराबाद, पीओजेके

    जैश-ए-मोहम्मदचे स्टेजिंग क्षेत्र; शस्त्रे, स्फोटके, जंगलातील बचाव प्रशिक्षण

    जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसाठी प्रमुख स्टेजिंग आणि प्रशिक्षण केंद्र.

    गुलपूर

    कोटली, पीओजेके

    राजौरी-पूंछमधील लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय तळ

    नियंत्रण रेषेपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या तळावर पूंछ (एप्रिल २०२३) आणि हिंदू यात्रेकरूंच्या बस (जून २०२४) हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले होते.

    बर्नाला

    भिंबर, पीओजेके

    शस्त्रे हाताळणी, आयईडी, जंगलातील बचावासाठीचे लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र

    नियंत्रण रेषेपासून ९ किमी अंतरावर असलेले शस्त्रे आणि आयईडी प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र.

    अब्बास

    कोटली, पीओजेके

    एलईटी फिदाईन (आत्मघाती हल्ले) प्रशिक्षण केंद्र

    नियंत्रण रेषेपासून जवळजवळ १३ किमी अंतरावर असलेले आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण केंद्र; या प्रशिक्षण केंद्राची क्षमता १५ दहशतवाद्यांची आहे.

    सरजल

    सियालकोट, पाकिस्तान

    जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्ल्यांचे प्रशिक्षण देणारे जैश-ए-मोहम्मदचे केंद्र

    आंतरराष्ट्रीय सीमेपासून (IB) सुमारे ६ किमी अंतरावर असलेल्या या केंद्रावर मार्च २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना ठार मारलेल्या दहशतवाद्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे.

    मेहमूना जोया

    सियालकोट, पाकिस्तान

    हिजबुल मुजाहिदीनचा मोठा तळ; कठुआ-जम्मू प्रदेशासाठी नियंत्रण केंद्र

    आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील जानेवारी २०१६ च्या हल्ल्याची योजना आणि निर्देश येथूनच करण्यात आले होते.


    मरकज तैयबा

    मुरिदके, पाकिस्तान

    एलईटी मुख्यालय; प्रशिक्षण केंद्र

    आयबीपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या या केंद्रावर अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह २६/११ च्या हल्लेखोरांनी येथे प्रशिक्षण घेतले होते.


    मस्जिद/मरकझ सुभान अल्लाह

    बहावलपूर, पाकिस्तान


    जैश-ए-मोहम्मद मुख्यालय; भरती, प्रशिक्षण, विचारसरणीच्या प्रसाराचे प्रमुख केंद्र

    आयबीपासून सुमारे १०० किमी अंतरावर स्थित; जेईएम नेतृत्व आणि कारवायांचे मुख्य केंद्र.

    स्त्रोत – लेखकांनी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती 

    खालील प्रतिमा आणि नकाशांमध्ये ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूरवरील भारत सरकारच्या ब्रीफिंगमध्ये सादर केलेल्या ओएसआयएनटी प्रतिमा आणि स्लाइड्सचा समावेश करण्यात आला आहे.

    साईट क्र. १ : मस्जिद सय्यदना बिलाल/हजरत बिलाल, मुझफ्फराबाद (पीओजेके)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. २: गुलपूर, कोटली (पीओजेके) येथील प्रशिक्षण शिबिर

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    साईट क्र. ३: सवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद (पीओजेके)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    साईट क्र. ४: मस्जिद अहल-ए-हदीस, बर्नाला, भिंबर (पीओजेके)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. ५: मस्जिद अब्बास, कोटली (पीओजेके)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. ६: सरजल कॅम्प, सियालकोट (पाकिस्तान)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. ७: मेहमूना जोया, सियालकोट (पाकिस्तान)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. ८: मरकज तैयबा, मुरीदके (पाकिस्तान)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    साईट क्र. ९: मस्जिद सुभान अल्लाह, बहावलपूर (पाकिस्तान)

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: नाथन रुसर यांच्या एक्स हँडलवरून घेण्यात आलेली ओएसआयएनटी प्रतिमा

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: मातृभूमी इंग्लिश

    ७ मे रोजी झालेल्या ब्रीफिंगमध्ये, भारत सरकारने पाकिस्तान आणि पीओजेकेमधील २१ दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांची यादी देखील सादर केली आहे. (यात लक्ष्य करण्यात आलेल्या नऊ ठिकाणांचा समावेश आहे).

    आकृती २: पाकिस्तान आणि पीओजेकेमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे

    Operation Sindoor Understanding Context And Consequencesस्रोत: ऑपरेशन सिंदूर बद्दल ७ मे २०२५ रोजी भारत सरकारने दिलेल्या माहिती वरून  

    ऑपरेशन सिंदूरचे अधिक तपशील

    ऑपरेशन सिंदूर हे गुप्तचर यंत्रणेवर आधारित ऑपरेशन होते ज्यामध्ये उपग्रहाद्वारे टेहाळणी -  देखरेख, ड्रोन तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) लढाऊ विमानांनी प्रशिक्षण सरावाच्या कारणाने उड्डाण केले, तसेच त्यांच्या हालचाली लपवण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रभावासाठी रडार ब्लॅकआउट आणि नोटम (नोटीस टू एअरमेन) चा वापर केला. ही कारवाई स्टँड-ऑफ शस्त्रास्त्रांच्या मदतीने करण्यात आली, ज्यामध्ये भारतीय हद्दीतून लढाऊ विमानांच्या माध्यमातून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या ऑपरेशनसाठी भारताने स्कॅल्प आणि हॅमर या दोन प्रमुख शस्त्र प्रणाली वापरल्या. याशिवाय, भारताने १० किलोग्रॅमपर्यंतचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेल्या स्कायस्ट्रायकर या आत्मघाती ड्रोनचा देखील वापर केला.

    •  स्काल्प या शस्त्र प्रणालीला स्टॉर्म शॅडो म्हणूनही ओळखले जाते. हवेतून सोडले जाणारी क्रूझ क्षेपणास्त्र त्याच्या गुप्ततेबाबतच्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. या प्रणालीचा वापर प्रामुख्याने शत्रूच्या प्रदेशात लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी याचा वापर केला जातो.
         
    • हॅमर (हायली अ‍ॅजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज) ही फ्रान्समधील सफ्रान कंपनीने बनवलेली ऑल-वेदर एअर-टू-ग्राउंड प्रिसिजन-गाइडेड म्युनिशन (पीजीएम) आहे. पीजीएम हे जॅमिंगसाठी इनसेंसिटीव्ह असते आणि खडबडीत भूभागावर कमी उंचीवरून लॉंच करता येते.

    नागरिकांच्या जीवितहानीसारख्या मोठ्या प्रमाणात हानी न होता, लक्ष्यित ठिकाणी अचूकपणे हल्ला करण्यासाठी अचूक-मार्गदर्शित शस्त्रसामग्रीची निवड करण्यात आली होती.

    आकृती ३: स्काल्प क्षेपणास्त्राची तांत्रिक माहिती

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: इंडिया टुडे

    आकृती ४: हॅमर पीजीएमचे तांत्रिक तपशील

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: इंडिया टुडे

    ऑपरेशन सिंदूरनंतर: तणाव वाढीचे बदलते चक्र

    ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने केलेली कारवाई ही नागरिकांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने आक्रमक कृत्य असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताच्या या कारवाईत २६ पाकिस्तानी नागरिक ठार झाले आणि ४६ जण जखमी झाले आहेत, असाही दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या कलम ५१ ला अधोरेखित करत भारताविरुद्ध "स्वतःच्या निवडीच्या वेळेनुसार आणि ठिकाणी" बदला घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा दावा केला आहे.

    पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या लगतच्या भागात जोरदार गोळीबार करून प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामध्ये किमान १२ भारतीय नागरिक, एक लष्करी जवान ठार आणि ५१ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये पूंछमधील एका गुरुद्वाराचा देखील समावेश आहे.

    आकृती ५: जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील मेंढर येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात नुकसान झालेली एक मालमत्ता.

    Operation Sindoor Understanding Context And Consequences

    स्रोत: प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

    याव्यतिरिक्त, ७-८ मे २०२५ च्या मध्यरात्री, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू आणि काश्मीर (अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू), पंजाब (पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड), राजस्थान (नल, फलोदी, उत्तरलाई) आणि गुजरात (भूज) मधील ठिकाणांचा समावेश आहे. भारताने इंटिग्रेटेड काउंटर यूएएस (अनमॅन्ड एरियल सिस्टीम्स) ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणाली वापरून हे हल्ले निष्प्रभ केले.

    प्रत्युत्तरादाखल, ८ मे रोजी भारताने रावळपिंडी, लाहोर आणि कराचीसह अनेक पाकिस्तानी शहरांमधील हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. या कारवाईमध्ये लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या छाप्यांमध्ये भारताने इस्रायली हारोप ड्रोनचा वापर केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरसह पश्चिम सीमेवरील अनेक ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल्याचे समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि इतर हवाई संरक्षण प्रणाली वापरली आहे. यात एस-४०० ट्रायम्फ, बराक-८ एमआरएसएएम (मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र) आणि स्वदेशी बनावटीचे आकाश यांचा समावेश होता. यामुळे हल्ले रोखण्यास मदत करणारी हवाई संरक्षण छत्र उभारण्यास मदत झाली.

    जागतिक भुमिका

    राजनैतिक संकेत - भारताने अमेरिका (अमेरिका), युनायटेड किंग्डम (यूके), सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि रशियाला त्यांच्या लष्करी कारवाया आणि संबंधित घडामोडींबद्दल माहिती दिली. "भारताने केलेल्या कारवाया केंद्रित आणि अचूक स्वरूपाच्या होत्या. या कारवायांमुळे दोन देशांतील तणाव वाढीस लागणार नाही अशा प्रकारे जबाबदारीने आणि योग्य अंदाज घेऊन त्या डिझाइन करण्यात आल्या होत्या.  या कारवायांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी नागरी, आर्थिक किंवा लष्करी लक्ष्यांना लक्ष्य करण्यात आले नाही. तर फक्त ज्ञात दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले," असे वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या आणि परराष्ट्र मंत्रालयाने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि परराष्ट्र खात्याचे सचिव मार्को रुबियो यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना भारताच्या कृतींबद्दल माहिती दिली. दोन देशांमधील तणाव वाढीस लागेल असा भारताचा हेतू नाही परंतू पाकिस्तानने हा तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला तर भारत त्यास चोख प्रत्युत्तर देईल, असे म्हणत डोवाल यांनी भारताची भुमिका स्पष्ट केली आहे.

    मीडिया कव्हरेज

    ग्लोबल मिडीयाने भारताच्या कारवायांबाबत सकारात्मक कव्हरेज केले असल्याचे चित्र आहे. "काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले, यामुळे अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील संघर्ष तीव्र झाला", असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. "भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की हे हल्ले... २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना "जबाबदार" धरण्याच्या "प्रतिबद्धतेचा" एक भाग होते. पहलगाममधील हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे", असे वृत्त बीबीसीने दिले आहे.  पहलगाम हल्ला हा "दोन दशकांतील या प्रदेशातील नागरिकांवर झालेला सर्वात वाईट हल्ला होता आणि त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला", असेही बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

    फ्रेंच ले मॉंडने ७ मे रोजी झालेल्या हल्ल्यांची तुलना उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या प्रत्युत्तरांशी केली आहे. आधीच्या तुलनेत यावेळी करण्यात आलेली कारवाई अधिक तीव्र होती आणि प्रत्युत्तराचे हल्ले खूपच तीव्र होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी "भारताच्या या विनाकारण हल्ल्याला निर्णायकपणे प्रत्युत्तर देण्याचा त्यांच्या देशाचा अधिकार आहे" या भाष्याचा संदर्भ देत, अशाप्रकारची धमकी देणाऱ्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या नाहीत, हेही वृत्तपत्राने नमूद केले आहे.

    तुर्कीतील सरकारी वृत्तसंस्था अनादोलूने, भारताच्या हल्ल्यानंतर "पाकिस्तान आणि पाकिस्तानी काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले" असे म्हटले आहे. भारतीय लष्कराच्या स्टेटमेंटसोबत, त्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी आणि पंतप्रधान शरीफ यांचे आक्रमक मतही देण्यात आले आहे.

    युएईच्या द नॅशनलने पाकिस्तानच्या गोळीबारामुळे भारतीय बाजूच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल वृत्त दिले आहे. या सोबतच युएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांचा उल्लेख करत, भारत आणि पाकिस्तानला "संयम बाळगण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय शांततेला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितींना टाळण्याचे" आवाहन करण्यात आले आहे.

    रशियन टास वृत्तसंस्थेने भारताच्या अधिकृत टिप्पण्यांवर आपले वृत्तांकन केंद्रित करत "सीमापार दहशतवादाच्या नियोजनाच्या मुळांना लक्ष्य करणे" हे स्ट्राइकचे उद्दिष्ट असल्याचे अधोरेखित केले आहे.

    सध्याच्या परिस्थितीत, ऑपरेशन सिंदूर ही एक सातत्याने चालणारी लष्करी मोहीम आहे. यातून भारताची दहशतवाद विरोधी भुमिका अधिक स्पष्ट झाली आहे. दहशतवादी संघटनांचे तळ कुठेही असले तरी त्यांच्यावर हल्ले करण्याचा अधिकार भारताला आता आहे हे यावरून अधोरेखित झाले आहे.


    समीर पाटील हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे डिरेक्टर आहेत.

    राहुल रावत हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे रिसर्च असिस्टंट आहेत. 

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Authors

    Sameer Patil

    Sameer Patil

    Dr Sameer Patil is Director, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation.  His work focuses on the intersection of technology and national ...

    Read More +
    Rahul Rawat

    Rahul Rawat

    Rahul Rawat is a Research Assistant with ORF’s Strategic Studies Programme (SSP). He also coordinates the SSP activities. His work focuses on strategic issues in the ...

    Read More +