Author : Shairee Malhotra

Published on Dec 11, 2023 Updated 0 Hours ago

इस्रायल-हमास युद्धाबाबतच्या स्टरमर यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या नेतृत्वाला आणि आगामी निवडणुकीत यश संपादन करण्याच्या संभाव्यतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

इस्रायल-हमास युद्धप्रश्नावर मजूर पक्षाची कसरत

काही आठवड्यांपूर्वीच२०२५ च्या सुरुवातीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांत मजूर पक्षाचे नेते केयर स्टरमर यश संपादन करून इंग्लंडचे आगामी पंतप्रधान होतील, हे जवळपास निश्चित दिसत होते. या निवडणुकीत मजूर पक्षाने सत्ताधारी टोरीजवर १८ गुणांच्या आरामशीर आघाडीसह, १३ वर्षांच्या हुजूर पक्षाच्या शासनानंतर स्टरमर पदभार स्वीकारण्यास तयार असल्याचे दिसत होते. परंतु या बेटापासून हजारो मैल दूर असलेल्या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षामुळे स्टरमर यांच्या नेतृत्वाला आणि निवडणुकीत अनुकूल कौल प्राप्त होण्याच्या संभाव्यतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने प्राणघातक दहशतवादी हल्ले केले, ज्यात १४०० इस्रायली नागरिक ठार झाले. त्यानंतर इस्रायलने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याकरता गाझामध्ये केलेल्या कारवाईत किमान १२ हजार नागरिक मारले गेले. या मुद्द्यावर ब्रिटनच्या मजूर पक्षासह जागतिक स्तरावर मोठी फूट पडली आहे.

अल्पविराम की युद्धविराम?

इस्रायलच्या स्व-संरक्षणाच्या अधिकाराला स्टरमर यांनी दिलेला निःसंदिग्ध पाठिंबा आणि युद्धविराम करण्याबाबत त्यांनी नकार दर्शवल्याने मजूर पक्षात व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याप्रमाणेचस्टरमर यांनी लढाईत मानवतावादी विराम मागितला आहे, ज्यामुळे गाझात अत्यंत आवश्यक मदत पोहोचू शकेल आणि नागरिकांची व्यथा कमी होईल.

मात्रयुद्धविराम मूळ संघर्ष गोठवेल आणि हमासला इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची क्षमता टिकवून ठेवू शकेलया स्टरमर यांच्या प्रतिपादनाला पक्षातील कमीजणांचा लोकांचा पाठिंबा होता. बीबीसीच्या अहवालानुसारलंडनचे महापौर सादिक खान आणि ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बुरहॅम यांसारख्या प्रमुख मजूर पक्षाच्या सदस्यांसह मजूर पक्षाचे किमान ५० खासदार आणि २५० नगरसेवकांनी युद्धबंदीला तात्काळ पाठिंबा दिला. सरकारच्या कामाचे बारकाईने परीक्षण करणारे विरोधी पक्षाचे सदस्य इम्रान हुसेन यांसारखे नेते पक्षाने घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्या पदावरून पायउतार झाले आहेत.

स्कॉटिश नॅशनल पार्टीने युद्धबंदीला पाठिंबा देण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावादरम्यान स्थिती समोर आलीजिथे या प्रस्तावाला मत देणाऱ्या १० प्रवक्त्यांना मजूर पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले. जरी हा ठराव २९३ विरूद्ध १२५ मतांनी फेटाळला गेला असला तरीमजूर पक्षाच्या सदस्यांनी याला जोरदार पाठिंबा दिलाजिथे १९८ पैकी ५६ लोकांनी या प्रस्तावाच्या बाजूने आणि पक्षाच्या व स्टरमर यांच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात मतदान केले आणि नेतृत्वाने योग्य-अयोग्य ठरविण्याची नैतिक क्षमता गमावली, असे दु:ख व्यक्त केले.

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने प्राणघातक दहशतवादी हल्ले केले, ज्यात १४०० इस्रायली नागरिक ठार झाले. त्यानंतर इस्रायलने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याकरता गाझामध्ये केलेल्या कारवाईत किमान १२ हजार नागरिक मारले गेले. या मुद्द्यावर ब्रिटनच्या मजूर पक्षासह जागतिक स्तरावर मोठी फूट पडली आहे.

समस्या ही आहे की, स्टरमर यांचे स्थान त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांपेक्षा वेगळे आहेपरंतु त्यांची भूमिका युद्धे आणि साम्राज्यवादाच्या विरोधात उभ्या असलेल्या मजूर पक्षाच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड मानली जाते आणि ही तत्त्वे पॅलेस्टिनींसाठी एक स्वतंत्र देशासह न्याय व मानवी हक्कांच्या प्रगतीशील कारणांना प्रोत्साहन देण्याबाबत खोलवर रुजलेली आहेत. स्वत: मानवाधिकार वकील असलेल्या स्टरमर यांचा दृष्टिकोन डाव्या विचारसरणीच्या जेरेमी कॉर्बिनपासून पूर्णपणे वेगळा आहेज्यांच्यावर अनेकदा ज्यूविरोधवादाचे आरोप करण्यात आले होते२०१९ च्या निवडणुकीत मजूर पक्षाची अत्यंत वाईट कामगिरी होईपर्यंत त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले.

आगामी निवडणुकीत हुजूर पक्षापेक्षा मजूर पक्षाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. हुजूर पक्षाच्या विपरीतमजूर पक्षाच्या निवडणूक समर्थकांमध्ये मुस्लिम लोकसंख्या आणि उदारमतवादी डाव्या मध्यमवर्गाचा समावेश आहेजे मजूर पक्षाला यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.  लंडनमध्ये २ लाख आंदोलकांचा समावेश असलेल्या काढण्यात आलेल्या मोर्च्यातयुद्धबंदीची मागणी करण्यात आली. समर्थन आधीच कमी होत असल्याचा हा पुरावा आहे. अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ६४ टक्के मुस्लिम नागरिक मजूर पक्षाला मतदान करतीलजे २०१९ मधील ७१ टक्के लोकांपेक्षा कमी आहेत. मृतांचा आकडा वाढत असतानास्टरमर स्वत: अशा कोंडीत सापडले आहेत, जिथे पदावर असलेल्यांपेक्षा विरोधी पक्ष स्पष्टीकरण देण्यास अधिक बांधील असलेला ठरत आहेकारण इंग्लंडचे शासक असलेला उजव्या विचारसरणीच्या हुजूर पक्षाचीएका मुद्द्यावर एकजूट अपेक्षित आहे.

गाझामधील संघर्ष आणि इस्रायली लष्करी कारवाईची वाढलेली मानवी किंमत लक्षात घेतायुद्धविरामाला विरोध करणे ही कदाचित प्रथमत: असमंजस स्थिती होती आणि या मार्गाचा अवलंब करणार्‍या सरकारांवर धोरण बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता होती.

उपरोध असा आहे की, युद्धविरामाच्या आवाहनावर मजूर पक्षातील भांडणे सुरू असतानाअत्यावश्यक सामग्री गाझापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच ओलीस व कैद्यांची दोन्ही बाजूने सुटका करण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाकरता कतारने मध्यस्थी केली होती.

कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सचे रिचर्ड हाससारखे तज्ज्ञ हमासला संपवण्याचे इस्रायलचे उद्दिष्ट हा एक अशक्य पराक्रम मानतातज्या युद्धामुळे सैन्यात नसलेल्या लोकांचे होणारे मृत्यू आणि दुखापतींसह अपरिमित हानी होते, त्यासह कथित अशक्य उद्दिष्टांचे समर्थन करणे सरकारकरता कठीण होऊन बसते. गाझामधील संघर्ष आणि इस्रायली लष्करी कारवाईची वाढलेली मानवी किंमत लक्षात घेतायुद्धविरामाला विरोध करणे ही कदाचित प्रथमत: असमंजस स्थिती होती आणि या मार्गाचा अवलंब करणार्‍या सरकारांवर धोरण बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता होती.

आगामी ब्रिटिश सार्वत्रिक निवडणुकीला किमान एक वर्षाचा कालावधी असूनहीइस्रायल-पॅलेस्टाइन समस्येबाबतची भावना अशी आहे की, स्टरमर यांची आजची भूमिका २०२५ सालच्या मजूर पक्षाच्या निवडणूक निकालांवर परिणाम करू शकते. स्टरमर यांना मजूर पक्षाच्या नेतेपदावरून पायउतार होण्याच्या आवाहनादरम्यान राजीनाम्यांचे सत्र सुरू असताना आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरता ब्रिटिश राजकारणात पसरत असतानास्टरमर यांना त्यांचे नशीब पूर्वीच्या मजूर पक्षाच्या सरकारांसारखे होऊ नये, म्हणून याचे परिणाम अधिक प्रभावीपणे हाताळावे लागतील. पूर्वीच्या मजूर पक्षाच्या सरकारच्या कामगिरीवर इराक युद्धात सहभागी होण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे सावट आले होते.

शायरी मल्होत्रा ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या सहयोगी फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.