Author : Ankit K

Published on Feb 15, 2024 Updated 0 Hours ago

नव्याने समोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांना सक्रिय प्रतिसाद देत भारतीय लष्कराने प्रगत साधने एकत्रित करण्यावर भर दिला आहे, यांतून व्यापक परिवर्तन तपासणीची हमी मिळते.

२०२४ हे भारतीय लष्कराच्या तांत्रिक प्रगतीचे वर्ष

युद्धाचे बदलते स्वरूप आणि प्रदेशातील भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांत जे बदल होत आहेत, त्याला प्रतिसाद म्हणून, भारतीय लष्कर आधुनिकीकरणाच्या भरीव प्रयत्नांची तयारी करत आहे. सद्य १.४ दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या सामर्थ्याने, युद्धाच्या स्वरूपाचा अंदाज लावता न आल्याने आणि पारंपरिक व अपारंपरिक सुरक्षा आव्हानांचे रक्षण करण्याच्या व्यापक भूमिकेमुळे सैन्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अलीकडेच झालेल्या वार्षिक लष्करी पत्रकार परिषदेत लष्करप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, २०२४ हे वर्ष भारतीय सैन्याकरता तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष असेल. २०२३ हे वर्ष 'परिवर्तनाचे वर्ष' म्हणून साजरे करण्याच्या आधीच्या घोषणेच्या तुलनेत, तंत्रज्ञानाला समाविष्ट करण्यावर नव्याने भर देणे ही योग्य दिशेने, अचानक घेतलेली संक्रमणात्मक झेप आहे. हे विधान परिवर्तनासाठी गेल्या वर्षीच्या वचनबद्धतेला पूरक म्हणून पाहिले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, २०२४ची प्रतिज्ञा ही ‘परिवर्तन’ वचनबद्धतेची निरंतरता आणि सुधारणा आहे.

२०२३ हे वर्ष 'परिवर्तनाचे वर्ष' म्हणून साजरे करण्याच्या आधीच्या घोषणेच्या तुलनेत, तंत्रज्ञानाला समाविष्ट करण्यावर नव्याने भर देणे, ही योग्य दिशेने अचानक घेतलेली संक्रमणात्मक झेप आहे.

सैन्याच्या पायदळ, तोफखाना आणि चिलखती तुकडीमध्ये ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली एकात्मिक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सज्ज झाली आहे, यांतून एक दूरगामी भूमिका दिसून येते. या व्यतिरिक्त, संरचनात्मक स्तरावर ‘कमांड सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स’ची स्थापना ही सायबर क्षमता वाढविण्याच्या वचनबद्धतेवर भर देते. ‘अग्निवीर’ भरतीद्वारे ताज्या दमाचे मनुष्यबळ समाविष्ट करण्यासह तोफखान्यासारख्या महत्त्वपूर्ण शस्त्रांचे उद्दिष्ट बदलण्याची कृती, उदयोन्मुख धोके लक्षात घेत, लष्करात संबंधित बदल घडवत सैन्याला सक्षम करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकते. पुढे, नागरी समाज-लष्कर एकत्र आणण्याद्वारे सायबर तज्ज्ञांसह प्रादेशिक सैन्याद्वारे विशेषज्ञ अधिकारी तयार करून, आपली कार्यक्षमता सुधारण्याकरता लष्कर आपले मनुष्यबळ विस्तारत आहे. परिवर्तनशील बदल घडून आणण्याकरता उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे हे विद्यमान संरचनांमध्ये ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली अखंडपणे हाताळण्याच्या योजनांबाबत सुस्पष्ट आहे.

२५०० ‘सिक्युअर आर्मी मोबाइल भारत व्हर्जन’ अर्थात ‘संभव’ हँडसेटच्या समावेशासह दळणवळणाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते, ज्यातून तंत्रज्ञानामध्ये सैन्याची आत्मनिर्भरता दिसून येते. माहिती गोपनीय राहावी, असे संवेदनशील प्रकल्प हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना ३५,००० ‘संभव’ हँडसेट वितरित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सुरक्षित आणि कार्यक्षम संवादांच्या माध्यमांची वचनबद्धता अधोरेखित करते. ही सर्वसमावेशक रणनीती मानवी भांडवलाला आधुनिक युद्धाच्या मागण्यांनुरूप जोडते, २०२४ मध्ये भारतीय सैन्याला तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची स्थिती प्रदान करते.

‘अग्निवीर’ भरतीद्वारे ताज्या दमाचे मनुष्यबळ समाविष्ट करण्यासह तोफखान्यासारख्या महत्त्वपूर्ण शस्त्रांचे उद्दिष्ट बदलण्याची कृती, उदयोन्मुख धोके लक्षात घेत, लष्करात संबंधित बदल घडवत सैन्याला सक्षम करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकते.

भारतीय लष्करासाठी २०२४ साल का महत्त्वाचे आहे?

कृत्रिम बुद्धिमत्तेकरता २०२४ या वर्षाचे महत्त्व, जागतिक स्तरावर होत असलेल्या महत्त्वाच्या बदलांमध्ये आहे, जे युद्धाच्या स्वरूपाला आकार देत आहे. भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांतील मोठ्या बदलांमुळे राष्ट्रांचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना, मानवी हस्तक्षेपाशिवाय मानवी लक्ष्य ओळखणे, निवडणे आणि मारणे यांकरता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी शस्त्र प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, वेगाने डागली जाणारी शस्त्रे, विद्युत चुंबकीय प्रणाली रासायनिक किंवा विद्युत ऊर्जेचे विकिरणित ऊर्जेत रूपांतरित करण्यास आणि लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असलेली शस्त्रे, जैवतंत्रज्ञान आणि क्वान्टम तंत्रज्ञान यांसारखे प्रगत तंत्रज्ञान युद्धात निर्णायक ठरत आहेत. गलवान चकमकीनंतर- विशेषत: भारतीय सीमेजवळील चीनची वाढती क्षमता पाहता, ‘शत्रूराष्ट्राला हानिकारक ठरणारी’ सूक्ष्म रणनीती वापरणे, हे एक भारताकरता महत्त्वाचे आव्हान आहे. त्यांच्या अलीकडील संबोधनात लष्करप्रमुख म्हणाले की, “शत्रूराष्ट्राला हानिकारक ठरणाऱ्या’ सूक्ष्म रणनीतींची आक्रमकता ही वाढत्या प्रमाणात संघर्षात आरोप सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत एक पसंतीची रणनीती बनत आहे, त्याची व्याप्ती तांत्रिक प्रगतीमुळे वाढली आहे.” लष्करप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शत्रूराष्ट्राला हानिकारक ठरणाऱ्या’ ज्या सूक्ष्म रणनीतींचा वापर करण्यात आला, त्याकडे लक्ष वेधले. अधिक माहिती देताना लष्करप्रमुखांनी यांवर जोर दिला की, अशा आक्रमकतेसाठी महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधन व विकासातील गुंतवणुकीत स्वयंपूर्णता आवश्यक आहे.

चीनच्या धोक्याव्यतिरिक्त, भारत सध्या पाकिस्तानमधील आणि सीमेवर अस्तित्वात असलेल्या दहशतवादाच्या नव्या संकरित स्वरूपाचा सामना करत आहे. काश्मीर खोऱ्यात ‘संकरित’ दहशतवादाचा उदय, पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतीच्या धोक्यांचे मिश्रण, सीमेवर आणि सीमांच्या आत विघटनकारी घटकांचा परिचय करून देतो.

लष्करप्रमुख म्हणाले की, “शत्रूराष्ट्राला हानिकारक ठरणाऱ्या’ सूक्ष्म रणनीतींची आक्रमकता ही वाढत्या प्रमाणात संघर्षात आरोप सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत एक पसंतीची रणनीती बनत आहे, त्याची व्याप्ती तांत्रिक प्रगतीमुळे वाढली आहे.”

या आव्हानांना प्रतिसाद देताना, कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ आधी विकसित केलेल्या  क्षमता आणि शस्त्रास्त्रे तांत्रिकदृष्ट्या प्रगत पर्यायांसह बदलायला हव्या, असे नाही तर मानवरहित हवाई वाहने, अँटी-ड्रोन प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्धात विशेषज्ञ असलेल्या समर्पित विभागांसारख्या विशिष्ट तंत्रज्ञानावर भर देऊन सामरिक क्षमताही वाढवणेही आवश्यक आहे. उपग्रह प्रतिमा, ड्रोन आणि प्रगत सेन्सरसह अत्याधुनिक पाळत ठेवण्यात तंत्रज्ञानाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. शत्रूराष्ट्राला हानिकारक ठरणाऱ्या’ सूक्ष्म रणनीतीशी संबंधित डिजिटल धोक्यांपासून सैन्याच्या स्वतःच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यात सायबरसुरक्षा उपाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

स्प्रिंटपेक्षा मॅरेथॉन

युद्ध तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगती आत्मसात करणे ही भारतीय लष्कराकरता वेगाने धावण्यापेक्षा दूरचे अंतर धावण्याची शर्यत असायला हवी, ज्यात ऊर्जा, संयम आणि उत्कटता महत्त्वाची ठरते. अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाविषयीची बोलले जाणे अनिवार्य असताना, अंमलबजावणी आणि अंगिकारण्याची प्रक्रिया हळूहळू आहे, जी कालांतराने उलगडत जाते. लष्करी तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होणाऱ्या चित्रासह वेग राखणे हे एक सद्य आव्हान आहे, ज्यात दीर्घकालीन वचनबद्धता आवश्यक ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात समाविष्ट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे, ज्याला लष्करी परिसंस्थेद्वारे पूरक साह्य मिळेल, ज्यामुळे लष्कराच्या कार्यकारी चौकटीत तंत्रज्ञानाच्या अखंड एकात्मिकीकरणास सक्रिय प्रोत्साहन मिळते.

‘इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स’सारखे- उपक्रम सुरू करण्यासह त्यांच्या कार्यकारी आणि रणनैतिक आव्हानांच्या नाविन्यपूर्ण निराकरणासाठी- विशेषत: शैक्षणिक आणि उद्योगांतील नागरी अवकाशाशी असलेली लष्कराची संलग्नता प्रशंसनीय आहे, तरीही चौकटीतील पद्धतशीर आणि दीर्घकालीन उपक्रमांची गरज आहे, ज्यान्वये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गरजांनुसार मजबूत आणि स्वतंत्र संरक्षण औद्योगिक तळाला प्रोत्साहन मिळेल. तंत्रज्ञानातील प्रावीण्य संपादन करण्याकरता विशिष्ट प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे हे लक्षात घेऊन, मानव संसाधनांची विशेष आणि स्वतंत्र केडरची स्थापना ही एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणून उदयास आली आहे, ज्याचे दीर्घकाळात फलदायी परिणाम लाभतील. अलीकडे, भारतीय सैन्याने एक नवे धोरण आणले आहे ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ड्रोन यांसारख्या तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या लेफ्टनंट कर्नलना कर्नल पदावर पदोन्नती देताना- कमांड भूमिकेकडे जाण्याच्या मानक पद्धतीपासून वेगळी भूमिका घेत- त्यांच्या क्षेत्रात वावरण्याची मुभा देण्यात आली आहे. हे इतर विशिष्ट विभागांनाही लागू होते. मात्र, हे अधिकारी कमांडची नेमून दिलेली कामे आणि काही करिअर अभ्यासक्रम सोडून देतील. या धोरणाचे उद्दिष्ट लष्करातील विशेष प्रावीण्य मिळवण्याला चालना देणे हे आहे, परंतु हा मार्ग निवडणारे अधिकारी भविष्यातील पदोन्नतीसाठी पात्र असणार नाहीत. तीन वर्षांनी धोरणाचे आणि त्याच्या परिणामांचे पुनरावलोकन केले जाईल.

तंत्रज्ञानातील प्रावीण्याकरता विशिष्ट प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे हे लक्षात घेऊन, मानव संसाधनांची विशेष आणि स्वतंत्र केडरची स्थापना ही एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणून उदयास आली आहे, ज्याचे दीर्घकाळात फलदायी परिणाम लाभतील.

तांत्रिक बदलांना अंगिकारणे आणि बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे असताना, असे परिवर्तन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सैद्धांतिक विचारात प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला आणि भारतीय सशस्त्र दलाच्या संयुक्त सिद्धांत २०१७ च्या संयोगाने वाचलेला शेवटचा जमिनीवरील युद्धाचा सिद्धांत भारतासमोरील आव्हानांचे गैर-संपर्काचे आणि संकरित स्वरूप अधोरेखित करतो. मात्र, अखेरच्या सैद्धांतिक मूल्यमापनानंतर युद्धाच्या रूपरेषेत उल्लेखनीय बदल झाले आहेत, ज्यात विशेषतः भारतीय संदर्भात जमिनीवरील युद्धाचे स्वरूप बदलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गलवान संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाने, कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करीत युद्धाचे आणि तंत्रज्ञानाचे प्रादेशिक व जागतिक संदर्भात शिकलेले धडे अंगिकारण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे. सिद्धांताचे असे नियतकालिक मूल्यांकन समर्पक असले तरी त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऐवजी सिद्धांताचे अवलोकन करणे, जो तंत्रज्ञानाची प्रगती आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवतो.

निष्कर्ष

२०२४ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा तंत्रज्ञानात समावेश केल्याने सुनिश्चितता आणि छाननी दोन्ही वाढली आहे. ड्रोन आणि सायबरसुरक्षा यांसारखी प्रगत साधने एकत्रित करण्यावर भर दिल्याने नवनव्या आव्हानांना भारतीय लष्कराने दिलेला सक्रिय प्रतिसाद दिसून येतो, तर व्यापक परिवर्तनाच्या अजेंडातून होणाऱ्या संक्रमणाचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. जागतिक लष्करी प्रवृत्तींमुळे व्यक्त झालेली निकड आणि चिनी क्षमतांचा विस्तार करण्याच्या निकटतेत वेगवान तांत्रिक जुळवून घेण्याची गरज अधोरेखित होते. मात्र, संभाव्य कमतरता, जसे की तंत्रज्ञानाच्या एकात्मतेची अंतर्निहित गुंतागुंत आणि आवश्यक दीर्घकालीन वचनबद्धता कमी लेखता कामा नये. परंपरा आणि नावीन्य यांचा समतोल साधत लष्कराने या मार्गावर चालत असताना, परिणामांचे मूल्यांकन करून आणि तांत्रिक कौशल्याचा पाठपुरावा राष्ट्रीय सुरक्षाविषयक अनिवार्यतेशी अखंडपणे जोडला गेल्याची खात्री करून, काळजीपूर्वक निर्णय घेण्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. या धोरणात्मक बदलाचे यश केवळ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर अवलंबून नाही, तर अशा परिवर्तनीय प्रवासात येणारी गुंतागुंत आणि आव्हानांवर मात करत, पुढे मार्गक्रमण करण्याच्या लष्कराच्या क्षमतेवर अवलंबून राहील.

अंकित के हे नवी दिल्लीस्थित विश्लेषक आहेत, युद्ध आणि रणनीती या संदर्भातील ते विशेषज्ञ आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ankit K

Ankit K

Ankit K is New Delhi-based analyst who specialises in the intersection of Warfare and Strategy. He has formerly worked with a Ministry of Home Affairs ...

Read More +