-
CENTRES
Progammes & Centres
Location
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला कर्ज देणे म्हणजे दहशतवादाचे पोषण करणे आहे, हा मुद्दा भारत राजनैतिक दबावाच्या माध्यमातून पटवून देऊ शकतो.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर हल्ला केला. हा भारत व पाकिस्तान संबंधांमध्ये होत असलेल्या मूलभूत बदलांचा एक भाग आहे. ही घटना सिंधू जलवाटप कराराला दिलेल्या स्थगितीच्या संदर्भाने पाहिली, तर दक्षिण आशियातील या दोन शेजाऱ्यांमधील परस्परसंबंध आज कोणत्या स्थितीत पोहोचले आहेत, याची कल्पना आपल्याला येईल.
सिंधू जलवाटप करार १९६० मध्ये झाला होता आणि त्यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यान अनेकदा युद्धाची ठिणगी पडूनही हा करार कायम राहिला होता; परंतु या वेळी अनेक गोष्टीत बदल झाले आहेत. भारताने या प्रहाराला “विचारपूर्वक केलेला, जबाबदार आणि कमी व्याप्तीचा (नॉन-एस्कलेटरी)” असे संबोधले आहे. हा हल्ला जोरदार होता, असे भारताने मान्य केले असले, तरी “लक्ष्य निवडण्याच्या आणि त्यावर प्रहार करण्याच्या पद्धतींमध्ये संयम बाळगला,” असे स्पष्ट करण्यात आले.
भारताने या प्रहाराला “विचारपूर्वक केलेला, जबाबदार आणि कमी व्याप्तीचा (नॉन-एस्कलेटरी)” असे संबोधले आहे. हा हल्ला जोरदार होता, असे भारताने मान्य केले असले, तरी “लक्ष्य निवडण्याच्या आणि त्यावर प्रहार करण्याच्या पद्धतींमध्ये संयम बाळगला,” असे स्पष्ट करण्यात आले.
भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ निशाण्यावर होतेच, शिवाय सियालकोटसारख्या पाकिस्तानच्या प्रदेशांवरही प्रहार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुरीदकेमधील लष्कर ए तोयबाचे मुख्यालय आणि भवालपूरमधील जैश ए महंमदच्या मुख्यालयालाही लक्ष्य केले आहे. हल्ल्याच्या काही तासांनंतर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी सर्व हल्ल्यांची सविस्तर माहिती दिली; तसेच हल्ल्यांचे ड्रोनने केलेले विस्तृत छायाचित्रणही राष्ट्रीय माध्यमांकडे सुपूर्द करण्यात आले.
भारताचे विमान प्रत्यक्षात पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले नव्हते, हे स्पष्ट असतानाही पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमाने पाडली असल्याचे निराधार दावे करणे सुरूच ठेवले. भारतीय विमानांनी पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी स्काल्प (SCALP)सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र डागली असण्याची आणि हॅमर (HAMMER) सारखे बॉम्ब वापरले असण्याची शक्यता अधिक आहे. स्काल्पचा पल्ला २५० के ५०० किलोमीटरचा असून ती जैसलमेरपासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूरसारख्या लक्ष्यांवर सहजगत्या मारा करू शकतात. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याचा कांगावा केला आहे आणि पाश्चात्य माध्यमांकडून ती वक्तव्ये पुन्हा दाखविली जात आहेत. खरे तर पाकिस्तानी लष्कराचे किमान दोन प्रमुख जिहादी साथीदार मारले गेले आहेत, असे अहवालांतून समोर येते.
पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याचा कांगावा केला आहे आणि पाश्चात्य माध्यमांकडून ती वक्तव्ये पुन्हा दाखविली जात आहेत. खरे तर पाकिस्तानी लष्कराचे किमान दोन प्रमुख जिहादी साथीदार मारले गेले आहेत, असे अहवालांतून समोर येते.
या आधीही २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ च्या बालाकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवादासंदर्भाने एक स्पष्ट लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. यामुळे भारत पहलगाम हल्ल्याला उत्तर देणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं. २०१६ आणि २०१९ प्रमाणे यावेळच्या संघर्षाचे उद्दिष्टही दहशतवादी तळांना लक्ष्य करणे होते; तसेच पाकिस्तानी लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य न करणे हे होते.
पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी भूतकाळात भारताकडे सैन्यबळ आणि आर्थिक ताकद कमी होती. त्यामुळे त्यांनी आक्रमकतेच्या सर्वांत खालच्या पातळीवर संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आता पाकिस्तानकडून कोणतीही आशा उरलेली नाही. त्यामुळे भारताला कठोर पर्याय शोधावे लागत आहेत.
चर्चेमुळे पाकिस्तानात मित्रत्वाची भावना निर्माण होईल, या चुकीच्या समजुतीवर आतापर्यंत आमचे धोरण आधारित होते; परंतु सध्या घडलेल्या घटनांमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये गुणात्मक बदल घडून येणार आहेत.
चर्चेमुळे पाकिस्तानात मित्रत्वाची भावना निर्माण होईल, या चुकीच्या समजुतीवर आतापर्यंत आमचे धोरण आधारित होते; परंतु सध्या घडलेल्या घटनांमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये गुणात्मक बदल घडून येणार आहेत. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश देण्यासाठी भारत विविध रणनीती अवलंबिण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान आणि लष्करातील सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत बहुचर्चित बैठका, लष्करी सराव आणि १९७१ नंतर देशभरात प्रथमच करण्यात आलेल्या नागरी नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल या गोष्टींचा समावेश आहे.
पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यासाठी भारत एफएटीएफ प्रक्रियांचा पुरस्कार करू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला कर्ज देणे म्हणजे दहशतवादाचे पोषण करणे आहे, हा मुद्दा भारत राजनैतिक दबावाच्या माध्यमातून पटवून देऊ शकतो.
स्काल्पसारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला २५० ते ५०० किलोमीटरच्या दरम्यान असतो. हे क्षेपणास्त्र जैसलमेरपासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूरसारख्या लक्ष्यांवर सहज मारा करू शकते. भारताने ही रणनीती आखली आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Manoj Joshi is a Distinguished Fellow at the ORF. He has been a journalist specialising on national and international politics and is a commentator and ...
Read More +