Image Source: Getty
जागतिक दक्षिण (ग्लोबल साऊथ) म्हणजेच विकसनशील देशांतील जबरदस्त हवामान बदलाच्या धोक्यांना सामोरे जाणारी शीर्ष शहरं म्हणजे नवी दिल्ली, मनीला, जकार्ता, लागोस, मेक्सिको सिटी, बीजिंग, आणि शांघाय. जरी हवापाणी न्यायाच्या दृष्टिकोनाचा विचार सोडून दिला तरी, जागतिक उत्तरेतील (ग्लोबल नॉर्थ) म्हणजेच विकसित देशांना या बातम्यांचं महत्त्व तितकं तातडीचं न वाटणं हे समजण्यासारखं आहे. परंतु, जेव्हा हवामान बदलांमुळे आपल्याच जवळच्या ठिकाणी आपत्ती येतात, तेव्हा त्याचे गांभीर्य लक्षात येते. युरोपात याचा आर्थिक परिणाम १० बिलियन युरोंपेक्षा जास्त आहे, तर टोरंटोमध्ये आर्थिक परिणाम १ बिलियन यूएस डॉलरपेक्षा जास्त आहे आणि फ्लोरिडामध्ये तो आश्चर्यकारकपणे ८५ बिलियन यूएस डॉलर असण्याची अपेक्षा आहे.
तथापि, ग्लोबल साऊथ देशांना हवामान अनुकूलनाच्या क्रियेतील अभावासंदर्भात समान चिंता असावी का? इथे हवामान अनुकूलनाचा अर्थ वास्तविक किंवा भविष्यातील अपेक्षित हवामान परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता असा आहे.
वेरिस्क मेपलक्रॉफ्टने प्रकाशित केलेल्या हवामानासंदर्भात धोकादायक असलेल्या शहरांच्या अहवालानुसार, १०० पैकी ९९ शहरं जी सर्वाधिक हवामान धोक्यांचा सामना करत आहेत, ती आशियामध्ये आहेत. आशिया आणि आफ्रिका या प्रदेशांनी त्या यादीत शीर्ष स्थान घेतले आहे जिथे हवामान बदल उच्च तापमानास मदत करत आहे, त्याच्यामुळे वादळं, दुष्काळ आणि पूर येण्याची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे या प्रदेशातील देशांचा आर्थिक विकास आणि इथल्या नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता यावर परिणाम होतो.
२०२१ मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमच्या हवामान बदल अहवालात असे सांगितले की, ग्लोबल साऊथमधील हवामान संबंधित आपत्तींमध्ये मागील दशकाच्या तुलनेत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालानुसार, १९५० च्या दशकापासून ग्लोबल साऊथमधील अनेक भागांमध्ये अत्यधिक उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रतेत २.५ पटीने वाढ झाली आहे. २०२१ मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमच्या हवामान बदल अहवालात असे सांगितले की, ग्लोबल साऊथमधील हवामान संबंधित आपत्तींमध्ये मागील दशकाच्या तुलनेत २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
विकसनशील देशांतील हवामान बदलांमुळे विकसित देशांवर परिणाम होईल का?
ग्लोबल नॉर्थ देश, जे अभिमानाने "ग्लोबल नॉर्थ - फर्स्ट" धोरणाकडे संक्रमण करत आहेत, त्यांच्यासाठी ग्लोबल साऊथमधील हवामान बदल हे चिंतेचे किंवा महत्त्वाचे असावे का? कारण त्यांची स्वतःची अनेक आव्हाने आहेत, जसे की परवडणारे गृहनिर्माण आणि आरोग्यसेवा, सार्वजनिक सुरक्षा, रोजगार आणि बेकायदेशीर स्थलांतरे. मग, ग्लोबल साऊथमधील शहरांचे भविष्य चर्चा करण्याचा विषय का असावा? याला बोर्ड रूमच्या अजेंड्यात किंवा विधीमंडळासारख्या एका मजबूत मंचावर का जागा मिळावी?
ज्याप्रमाणे एक प्रसिद्ध म्हण आहे - "जेव्हा पैसा धोक्यात असतो, तेव्हा अगदी बेफिकीर असलेले लोकही अचानक यामध्ये अधिक रस घेऊ लागतात." इतर सर्व गोष्टी समान असल्या तरीही, २०५० पर्यंत ग्लोबल साऊथमधील देशांची शहरी लोकसंख्या दुप्पट होणार आहे, हे ग्लोबल नॉर्थसाठी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आणि परिणामकारक का आहे, याची तीन आर्थिक कारणे:
परकीय थेट गुंतवणूक धोक्यात
ग्लोबल साऊथमधील, हवामान बदलाच्या सर्वाधिक धोक्यांना सामोरे जाणाऱ्या शहरांमध्ये ग्लोबल नॉर्थमधुन परकीय थेट गुंतवणूक (फॉरेन डायरेक्ट इनवेस्टमेंट FDI) झाली आहे आणि याच शहरांत महत्त्वपूर्ण भांडवलाचा प्रवेश झाला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD) च्या २०२४ च्या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्टनुसार, आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील विकसनशील देशांना सुमारे ८६६ अब्ज यूएस डॉलरची महत्त्वपूर्ण परकीय थेट गुंतवणूक (FDI) मिळाली आहे, जी एकूण जागतिक परकीय थेट गुंतवणूकीच्या (FDI) ६० टक्के म्हणजेच १.३ ट्रिलियन यूएस डॉलर आहे. ही गुंतवणूक मुख्यत: उत्पादन, तंत्रज्ञान, आणि पायाभूत सुविधांच्या विकासाकडे वळवली जात आहे.
अशा गुंतवणुकीचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, काही अंदाजानुसार, ॲपल आणि त्याचे पुरवठादार जसे की फॉक्सकॉन यांनी भारतात १.५ बिलियन यूएस डॉलर ते २ बिलियन यूएस डॉलर दरम्यान गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक भारतात उत्पादित केलेल्या सर्व आयफोनच्या सुमारे १४ टक्क्यांच्या पुरवठ्याचे प्रतिनिधित्व करते, ज्याची किमत १४ बिलियन यूएस डॉलर आहे. प्रत्यक्षात, २०२४ च्या वर्षअखेरीस, ॲपल आपली पुरवठा साखळी विविधीकृत करेल आणि भारतात एअरपॉड्स सुद्धा तयार करेल. एक दृश्य रूपक वापरून सांगायचं तर, जर ग्लोबल नॉर्थ एक व्यक्ती किंवा कंपनी असेल ज्याने १.३ ट्रिलियन यूएस डॉलर गुंतवले आहेत, तर त्याच्या पोर्टफोलिओच्या ६० टक्क्यांहून अधिक भाग ग्लोबल साऊथमधील शहरांमध्ये नियुक्त करण्यात आला असेल. यामुळे, ग्लोबल साऊथमधील हवामान संबंधित कृतीमुळे होणाऱ्या कोणत्याही भौतिक धोक्यांमुळे ग्लोबल नॉर्थसाठी मोठी जोखीम निर्माण होईल.
ग्लोबल नॉर्थ त्याच्या या जोखमीतून वाचण्यासाठी ग्लोबल साउथकडे होणारी परकीय थेट गुंतवणूक (FDI) आणि भांडवली निर्यात हळूहळू कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तथापि, अशी प्रक्रिया उलटही होऊ शकते म्हणजे ग्लोबल साउथ कडून ग्लोबल नॉर्थमध्ये होणाऱ्या FDI मध्ये घट होऊ शकते, जी 2023 च्या UNCTAD हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार US$459 अब्ज होती, जी एकूण FDI च्या 25 टक्के आहे. याव्यतिरिक्त, ग्लोबल नॉर्थला ग्लोबल साउथशिवाय अशा कमी किमतींच्या पर्यायास शोधणे कठीण होईल, ज्यामुळे त्यांच्या नफ्यावर किंवा किंमतीत वाढ करण्यावर परिणाम होईल.
ग्लोबल नॉर्थच्या पुरवठा साखळ्या धोक्यात
ग्लोबल साउथमधील देश विविध प्रकारच्या वस्तू, कच्च्या मालापासून ते तयार उत्पादने, ग्लोबल नॉर्थकडे निर्यात करतात. उदाहरणार्थ, कॉफी मुख्यतः ग्लोबल साउथमध्ये उत्पादित केली जाते, जसे की ब्राझील, कोलंबिया, होंडुरास, ग्वाटेमाला, इथिओपिया, युगांडा, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया. हवामान बदल कॉफीच्या गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम करत आहे, आणि जर हवामानाशी संबंधित उपाययोजना नाही केल्या तर कॉफी पुरवठ्याला धोका निर्माण होईल. याचा अर्थ, ग्लोबल साउथमधील हवामान बदलामुळे US$40 अब्जांचा उद्योग आणि प्रत्येकाच्या दैनंदिन कॉफीच्या कपाला धोका आहे.
2021 मध्ये, ग्लोबल साउथची US$5.6 ट्रिलियनहून अधिक रक्कमेची निर्यात झाली होती. जिथे आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका मुख्यत: खनिजे आणि कृषी उत्पादने यांसारख्या प्राथमिक वस्तू निर्यात करत होते, तिथे चीन आणि भारत यासारख्या आशियाई देशांमध्ये तयार उत्पादने प्रामुख्याने निर्यात होत होते. या गतिशीलतेमुळे ग्लोबल साउथ जागतिक व्यापार नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ग्लोबल साउथमधील हवामान बदल उत्पादनात विघटन, पुरवठा साखळीवरील धोका, तसेच उत्पादकांच्या गुणवत्ता आणि उपलब्धतेतील बदलांना कारणीभूत ठरेल, ज्यामुळे व्यवसाय करण्याचा खर्च वाढेल. हा खर्च अखेरीस अंतिम ग्राहकावर पडला जाईल, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा खर्च वाढेल.
उत्पादनक्षमता आणि उपजीविकेचा हळूहळू होणारा ऱ्हास
हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंचे वयोमानानुसार वितरण अंदाजित करणे कठीण असले तरी, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनुसार (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO), वाढते तापमान, हवेची गुणवत्ता कमी होणे आणि पूर परिस्थितीत वाढ, यामुळे जागतिक कामकाजाच्या तासांमध्ये 2.2 टक्के घट होईल विशेषतः बाह्य आणि श्रम आधारित उद्योगांमध्ये. याचा परिणाम म्हणून, जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP) मध्ये 2.4 ट्रिलियन डॉलरचा तोटा होईल, जो 80 मिलियन पूर्णवेळ नोकऱ्यांएवढा आहे. सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेतील देश येतात, जिथे कृषी आणि श्रम अधारित कामे प्रचलित आहेत. पुन्हा, एकदा 2.4 ट्रिलियन डॉलरचा तोटा केवढा मोठा असतो सांगायचा झाला तर, हा तोटा कॅनडा, इटली किंवा ब्राझीलच्या वार्षिक GDP च्या समान आहे.
हवामान बदलामुळे उत्पादनक्षमता घटणे आणि पायाभूत सुविधांतील नुकसानाचे संयुक्त परिणाम ग्लोबल साउथमधील GDP वृद्धीला मंदावणार आहेत. मॅकिन्सीच्या हवामान धोका आणि त्याच्या प्रतिसादावरील अहवालानुसार, हवामान बदलाच्या प्रभावामुळे काही प्रदेशांमध्ये 2050 पर्यंत GDP मध्ये 15-20 टक्क्यांची घट होऊ शकते, विशेषतः आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये, जिथे अर्थव्यवस्था कृषी आणि नैसर्गिक संसाधनांवर अत्यंत अवलंबून आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने तर यापेक्षा जास्त अंदाज लावला आहे, की फक्त पुराचा धोका 2040 पर्यंत दरवर्षी 4.3 ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान करू शकतो, जर त्यावर उपाय योजना केल्या नाहीत तर या नुकसानींचा सर्वात मोठा परिणाम ग्लोबल साउथवर होईल.
हवामान बदलामुळे उत्पादन क्षमता घटणे आणि पायाभूत सुविधांतील नुकसानाचे संयुक्त परिणाम ग्लोबल साउथमधील GDP वृद्धीला मंदावणार आहेत.
ग्लोबल नॉर्थसाठी वस्तू आणि सेवा उत्पादन करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्य आणि जीवनावर, तसेच ग्लोबल नॉर्थमधून वस्तू आणि सेवा खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर हवामान बदलाचा गंभीर परिणाम होईल. या सर्वाचा शेवटी एकत्रित परिणाम होईल, ज्यामुळे ग्लोबल नॉर्थमधील FDI वर देखील धोका निर्माण होईल, तसेच ग्लोबल नॉर्थमधील कंपन्यांसाठी व्यवसाय करण्याचा खर्च आणखी वाढेल.
ग्लोबल नॉर्थ म्हणजेच विकसित देश काय करू शकतात?
ग्लोबल साउथमध्ये हवामान अनुकूलन क्रियाकृतींसाठी ग्लोबल नॉर्थने निधी देण्यासाठी अनेक मजबूत सामाजिक आणि शाश्वत कारणे आहेत. तसेच, एक अत्यंत महत्त्वाचे आर्थिक कारण म्हणजे हवामान अनुकूलनासाठीच्या क्रियाकृती जर केल्या गेल्या नाहीत तर त्याचा परिणाम ग्लोबल नॉर्थवर देखील होईल. विकसित देशांत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाच्या खर्चावर थेट आणि नकारात्मक परिणाम होईल. अशा ठोस कारणांसह, 2030 पर्यंत विकसनशील देशांसाठी प्रति वर्षी आवश्यक असलेल्या 212 बिलियन डॉलरपैकी 2021-22 मध्ये हवामान अनुकूलन वित्तिय योगदान केवळ 63 डॉलर बिलियन का होते?
सार्वजनिक भांडवली संसाधनांच्या मर्यादांमुळे आणि खासगी भांडवलाने आणलेल्या तांत्रिक तज्ञतेच्या कार्यक्षमतेमुळे खासगी भांडवलाची सक्रिय भागीदारी आवश्यक आहे. फक्त अमेरिकन कंपन्या एकट्या 4.6 ट्रिलियन डॉलरच्या रोख निधीच्या भांडार आहेत, आणि सध्या खासगी इक्विटी 2.4 ट्रिलियन डॉलरचे रोख निधी जमा करत आहे.
ग्लोबल नॉर्थमधील खासगी भांडवल पैश्यांची कमतरता का पूर्ण करत नाही?
याचे उत्तर हे त्या नैतिक मूल्यांत लपले आहे, जिथे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या फायद्यांना योग्य ठरवून दाखवण्याची क्षमता आहे. पारंपरिकपणे, हवामान अनुकूलन क्रियाकृतींना सार्वजनिक हिताचे मानले जाते आणि त्यास सरकारची जबाबदारी म्हणून पाहिले जाते. सरकार सार्वजनिक पायाभूत सुविधांवर खर्च करून, त्यांचे जतन आणि संरक्षण करून व्यक्तींसाठी मूल्य निर्माण करत आहे, ज्यामध्ये भविष्यातील स्थिती सध्याच्या स्थितीपेक्षा चांगली होईल अशी त्यांची आशा आहे. सरकार करांद्वारे निधी जमा करत आहे, भूतकाळातील कामगिरीवर आधारित सिक्युरिटी उपकरणांद्वारे भांडवल उभे करत आहे, आणि नागरिकांना चांगले जीवनमान प्रदान करत आहे, ज्यांनी सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाला निवडून देण्यासाठी मतदान केले आहे.
समजा एका लहान गावात हवामान अनुकूलन क्रियाकृतींसाठी खासगी भांडवलदाराने गुंतवणूक केल्याने त्या गावातील रहिवाशांना फायदा होईल, पण त्याने नेहमीच खासगी भांडवलदारास फायदा होणार नाही.
खासगी भांडवलाचे मुख्य ध्येय आहे अस्तित्त्वातील म्हणजेच सध्याच्या ग्राहकांची सातत्यपूर्णता आणि नवीन ग्राहकांना जोडणे आणि पुरवठा साखळीचे संरक्षण जी वस्तू आणि सेवांचे निर्माण व स्थानांतर करते, यामधून हे सुनिश्चित होते की गुंतवणूक केलेल्या भांडवलावर योग्य तो परतावा मिळेल. समजा एका लहान गावात हवामान अनुकूलन क्रियाकृतींसाठी खासगी भांडवलदाराने गुंतवणूक केल्याने त्या गावातील रहिवाशांना फायदा होईल, पण त्याने नेहमीच खासगी भांडवलदारास फायदा होणार नाही. परंतु, त्यास फायदा तेंव्हाच होईल जेंव्हा रहिवासी पुरवठा साखळीत थेट योगदान देत असतील, वस्तू आणि सेवांचा महत्त्वपूर्ण हिस्सा वापरत असतील, किंवा जर खासगी भांडवलाने तिथे गुंतवणूक न करणं अस्तित्त्वातील किंवा भविष्यतील ग्राहकांचा पाठिंबा धोक्यात आणते. उदाहरणार्थ, OpenAI, Softbank आणि Oracle यांच्याकडून अलीकडे जाहीर झालेल्या 500 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा विचार करा, ज्यामध्ये टेक्सासमधील डेटा सेंटर्ससह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पायाभूत सुविधा तयार केली जात आहेत. या खासगी क्षेत्राला टेक्सासच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यात स्वारस्य आहे, जे 100,000 नोकऱ्या आणि कर योगदानांद्वारे मूल्य निर्माण करते, कारण या कंपन्यांना विश्वास आहे की त्यांच्याकडील AI च्या कॉम्पुटेशनल शक्तीचा उपयोग करण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी ग्राहक शुल्क देऊन सब्सक्रिप्शन घेतील ज्यातून त्यांना केलेल्या गुंतवणुकीवर परतावा व लाभ मिळेल.
खासगी भांडवलाच्या सहभागास सक्ती करण्यासाठी अनिवार्य धोरण पारित करण्याअगोदर, हवामान अनुकूलन क्रियकृतींच्या माध्यमातून निर्माण होणारे मूल्य व त्याचे मूल्यांकन करणे आणि होणारा फायदा सुनिश्चित करण्यासाठी खासगी भांडवलाला सोपे मार्ग प्रदान करण्याची आवश्यकता आहे.
पायाभूत सुविधा कार्बन मुक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या PACE (प्रॉपर्टी असेस्ड क्लीन एनर्जी) फंडिंग मॉडेल्ससारखे फंडिंग मॉडेल्स तयार करण्याची एक मोठी संधी आहे, जे ग्लोबल नॉर्थमधून भांडवल उभं करून व्यवस्थापन करेल आणि ते ग्लोबल साउथमधील पुनर्प्राप्त झालेल्या भांडवलाचा अहवाल तयार करेल ज्यामुळे हवामान अनुकूलन क्रियाकृतींसाठी गुंतवणूक सुनिश्चित होईल.
आदित्य टांगरी हे ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन मध्ये सेंटर फॉर न्यू इकोनॉमिक डिप्लोमेसी मध्ये नॉन रेसिडेंट कॉन्ट्रिब्यूटर (रिसर्च) आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.