Published on Jan 18, 2024 Updated 0 Hours ago

चीनी-रशियन बायोटेक्नॉलॉजीच्या सहकार्यामुळे फार्मास्युटिकल्स आणि आर्थिक विकासावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मात्र यातून जागतिकीकरणाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चीन-रशियन जैवतंत्रज्ञान सहकार्याचे जागतिक परिणाम

2019 मध्ये चीन आणि रशियाने वैज्ञानिक नवकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये त्यांचे सहकार्य आणखीन मजबूत केले आहे. हे सहकार्य 1990 च्या दशकातील असून मार्च 2023 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाला भेट देण्यापूर्वी स्वाक्षरी केलेली ही पत्र पुन्हा एकदा प्रसिद्ध केली. 2021 मध्ये, रशिया आणि चीनने त्यांचे चंद्रासंबंधी असलेलं संशोधन आणि पुढील रोडमॅप लाँच केला होता. या दोन देशांमधील सहकार्यामध्ये रिमोट सेन्सिंग, स्पेस फ्लाइट ऍप्लिकेशन्ससाठी इलेक्ट्रॉनिक पार्ट आणि स्पेस डेब्रिज मॉनिटरिंगचा समावेश आहे. आण्विक तंत्रज्ञान आणि ऊर्जा सहकार्यामध्ये दोन्ही देशांनी सातव्या आणि आठव्या पॉवर युनिटचे बांधकाम हाती घेतले आहे. चीनमधील झुदाबाओ अणुऊर्जा प्रकल्पातील तियानवान अणुऊर्जा प्रकल्पाचे तिसरे आणि चौथे पॉवर युनिट मे 2021 मध्ये लाँच करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या देशांनी बीजिंग, शांघाय आणि टियांजिन मार्गांवर नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी क्रॉस-बॉर्डर पाइपलाइन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 

या दोन देशांमधील सहकार्यामध्ये रिमोट सेन्सिंग, स्पेस फ्लाइट ऍप्लिकेशन्ससाठी इलेक्ट्रॉनिक पार्ट आणि स्पेस डेब्रिज मॉनिटरिंगचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि चायना इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांनी रशिया-चीन गुंतवणूक निधीची स्थापना केली. चीन आणि रशिया यांच्यातील सहकार्याच्या या क्षेत्रात येणारा बराचसा निधी आणि गुंतवणुकीचे श्रेय बेल्ट रोड इनिशिएटिव्हला दिले जाते. हे जीवशास्त्र, भौतिक विज्ञान आणि अवकाश संशोधनातील विद्यापीठ संशोधन केंद्रांमध्ये संशोधनाचा विस्तार करत आहे. सहकार्याचा हा इतिहास बायोटेक्नॉलॉजी क्षेत्राकडे धोरणात्मक अभिसरण अधोरेखित करतो. कारण दोन्ही राष्ट्रांनी या क्षेत्राची क्षमता ओळखून केवळ त्यांची वैज्ञानिक प्रगतीच नाही तर जागतिक वैज्ञानिक लँडस्केपला आकारही दिला आहे.

चीन-रशियन बायोटेक्नॉलॉजी सहकार्याचे बहुआयामी आयाम आहेत. जैविक युद्ध आणि जैवसुरक्षा यांच्यावरील परिणामासह, त्यांची ऐतिहासिक मुळे, दूरगामी परिणाम, अडथळे आणि संभाव्य परिणामांचा शोध घेणं हे त्यांचं काम आहे.

चीनने आपल्या मेड इन चायना 2025 च्या धोरणामध्ये नाविन्यपूर्ण औषधांसह बायोटेक उद्दिष्टे आखली आहेत. त्याचप्रमाणे, रशियाने डिसेंबर 2021 मध्ये त्यांची फार्मा 2030 रणनीती प्रसिद्ध केली आहे. या धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे औषध आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन आणि नवकल्पना वाढवणे हे आहे.

या सहकार्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र जेनेटिक्स आणि जीनोमिक्स आहे. दोन्ही राष्ट्रांमधील प्रचंड आनुवंशिक विविधता विविध रोगांचे गुंतागुंतीचे अनुवांशिक आधार उलगडण्यासाठी संयुक्त संशोधनासाठी एक अभूतपूर्व व्यासपीठ तयार केलं जाणार आहे. त्यांची अफाट संसाधने, विस्तृत डेटासेट आणि वैज्ञानिक कौशल्ये एकत्रित करून, चीन आणि रशिया जीनोमिक संशोधनाची गती वाढवू शकतात आणि वैयक्तिकृत औषध आणि रोग प्रतिबंधासाठी नाविन्यपूर्ण पध्दतींचा अभ्यासक्रम तयार करू शकतात. याचा परिणाम त्यांच्या लोकसंख्येवर आणि व्यापक जागतिक आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान नावीन्यपूर्ण लँडस्केपवर होऊ शकतो.

दोन्ही राष्ट्रांमधील प्रचंड आनुवंशिक विविधता विविध रोगांचे गुंतागुंतीचे अनुवांशिक आधार उलगडण्यासाठी संयुक्त संशोधनासाठी एक अभूतपूर्व व्यासपीठ निर्माण झाले आहे.

दोन्ही देशांनी गेल्या दशकात जैवतंत्रज्ञान क्षमतेत वाढ केली आहे. उदाहरणार्थ, चीनचे जैवतंत्रज्ञानाचे बाजार मूल्य 2021 पर्यंत जवळजवळ 4 अब्ज डॉलर इतके आहे. त्याचप्रमाणे, रशियाने देखील बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन आणि बाजारातील गुंतवणुकीचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: त्यांच्या SARS-Cov लस, Sputnik V च्या आगमनापासून यात वाढ झाली आहे. इतर मोठ्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्यासाठी रशियाच्या बाजारपेठेचा विस्तार झालेला नसला तरी चीनसोबतचे सहकार्य या क्षेत्रातील भविष्यातील वाढ दर्शवू शकते.

त्यांच्या राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान उद्योगांमध्ये मर्यादा असूनही, रशिया आणि चीनने जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवले आहे. याचं एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे रशियन कंपनी बायोकॅड आणि चिनी उत्पादक शांघाय फार्मास्युटिकल्स होल्डिंगने (SPH) चिनी बाजारपेठेत औषधांचे व्यापारीकरण करण्यासाठी सहयोग करायला सुरुवात केली आहे. शांघाय फार्मास्युटिकल्स होल्डिंगचे 50.1% आणि बायोकॅडचा 49.9% निधी घेऊन उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

जागतिक परिणाम

मात्र, चिनी आणि रशियन बायोटेक कार्यक्रमांच्या वाढीमुळे आणि त्यांच्या सहकार्याने इतर देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. युनायटेड स्टेट्स (यूएस) सह अनेक देशांनी बायोडेफेन्स पोश्चर रिव्ह्यू 2023 मध्ये म्हटल्याप्रमाणे या "अविश्वसनीय माहिती" मुळे त्यांच्यावर देखरेख वाढवावी लागणार आहे.

2022 मध्ये, यूएसने नूतनीकृत नॅशनल बायोडिफेन्स स्ट्रॅटेजी आणि अंमलबजावणी योजना आणि त्याचे बायोडिफेन्स पोश्चर रिव्ह्यू 2023 प्रसिद्ध केले. बायोडिफेन्स पोस्चर रिव्ह्यू 2023 हे बायोडिफेन्सची आवश्यकता हायलाइट करते. त्याचप्रमाणे, युनायटेड किंगडम (यूके) ने जैविक सुरक्षा धोरण प्रसिद्ध केलं आहे. इथे एव्हियन फ्लूच्या वाढीशी संबंधित केस स्टडीमध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमण हायलाइट करण्यात आले आहे. रशिया आणि चीनशी थेट संबंधित असलेल्या सार्वजनिक सुरक्षा प्रयोगशाळांसाठी भारताने देखील जैव सुरक्षा नियमावली आणि धोरणं आखली पाहिजेत. सोबतच जैव युद्ध सज्जतेची एक महत्त्वाची गरज अधोरेखित करताना जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले पाहिजे.

युनायटेड किंगडम (यूके) ने जैविक सुरक्षा धोरण प्रसिद्ध केलं आहे. इथे एव्हियन फ्लूच्या वाढीशी संबंधित केस स्टडीमध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमण हायलाइट करण्यात आले आहे.

जैवतंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि नावीन्यपूर्ण जागतिक बदलाला प्रतिसाद म्हणून युरोपियन युनियन आणि आफ्रिका यासह इतर प्रदेश देखील जैवसुरक्षा धोरणांना प्राधान्य देत आहेत.

येत्या दशकात जैवसुरक्षा ही राष्ट्र-राज्यांसाठी चिंतेची गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या धोरणांमध्ये ही क्षेत्रे हायलाइट केली आहेत. मात्र विश्वासार्ह नसलेल्या देशांमधील सहकार्य धोरणामुळे चुकीची माहिती आणि अपप्रवृत्तींना प्रतिसाद देण्याचा देखील विचार केला पाहिजे.

चीन-रशियन सहकार्याला प्रतिसाद

जैवयुद्धाचा संभाव्य धोका असल्याने, रणनीती पुरेशा नाहीत आणि मोठ्या अर्थव्यवस्थांचे सहयोगी प्रयत्न जैव दहशतवादी धोके थांबविण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. आनुवंशिकी आणि जैवतंत्रज्ञानातील त्यांचे एकत्रित कौशल्य जलद प्रतिसाद प्रणाली, प्रगत निदान आणि संभाव्य बायोवारफेअर एजंट्सच्या विरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता देते. या धोरणांमुळे चिंता दूर होऊ शकते.

बायोटेक्नॉलॉजी मधील वाढ आणि नवकल्पना या क्षेत्रात भारत आणि यूएसए दरम्यान सहयोगात्मक द्विपक्षीय युती केल्यास चीन-रशियन सहकार्याच्या संभाव्यतेचा सामना करता येऊ शकतो. यामुळे जागतिक विकास रोखला जाणार नाही परंतु तरीही इतर अर्थव्यवस्थांच्या गरजांना प्राधान्य मिळेल. अशी युती क्वाड (भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, यूएस)) किंवा I2U2 (भारत, इस्रायल, यूके, यूएस) सारख्या देशांतर्गत विकसित केली जाऊ शकते. लस विकासातील भारताची प्रगती आपण आधीच पाहिली आहे. यामुळे भारताला रशिया आणि चीनसारख्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळेल.

बायोटेक्नॉलॉजी मधील वाढ आणि नवकल्पना या क्षेत्रात भारत आणि यूएसए दरम्यान सहयोगात्मक द्विपक्षीय युती केल्यास चीन-रशियन सहकार्याचा सामना करता येऊ शकतो. यामुळे जागतिक विकास रोखला जाणार नाही परंतु तरीही इतर अर्थव्यवस्थांच्या गरजांना प्राधान्य मिळेल.

चीन-रशियन जैवतंत्रज्ञान सहकार्याचा प्रवास, विशेषत: बायोवारफेअर सज्जतेवर भर देणारा, आव्हानात्मक आहे. भू-राजकीय विचार, वैद्यकीय नवकल्पना, व्यापार आणि गुंतवणूक आणि नियामक सुसंवादाच्या गुंतागुंतीमुळे नेव्हिगेशन आवश्यक आहे. या सहकार्याचे यश टिकवून ठेवण्यासाठी द्विपक्षीय/त्रिपक्षीय स्तरावर इतर देशांदरम्यान आणखी जागतिक भागीदारी वाढवणे, परस्पर विश्वास, संसाधनांचे समान वाटप आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ज्ञानाची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान झालेली प्रगती, उदयोन्मुख संसर्गजन्य रोग आणि जैव दहशतवादी धोक्यांना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्याची निकड आणि परिणामकारकता अधोरेखित करतात. आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्यात्मक सीमापार प्रयत्नांद्वारे लस विकास आणि वितरण किती वेगाने साध्य केले जाऊ शकते हे पाहिले. बायोफार्मास्युटिकल्स, रीजनरेटिव्ह मेडिसिन, बायोइन्फॉरमॅटिक्स आणि बायोवारफेअर सज्जता यांमध्ये यश मिळवण्यासाठी संयुक्त उपक्रम तयार आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्यात्मक सीमापार प्रयत्नांद्वारे लस विकास आणि वितरण किती वेगाने साध्य केले जाऊ शकते हे पाहिले.

चीनी-रशियन बायोटेक्नॉलॉजीच्या सहकार्यामुळे फार्मास्युटिकल्स आणि आर्थिक विकासावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मात्र यातून जागतिकीकरणाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बायोवारफेअर सज्जतेच्या अतिरिक्त चिंतेमुळे वैज्ञानिक भागीदारी विकसित होत आहे आणि भू-राजकीय आघाड्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातोय. आनुवंशिकता, जीनोमिक्स, आरोग्यसेवा आणि जैवयुद्ध सज्जता यांमधील त्यांच्या पूरक कौशल्याचा उपयोग करून चीन आणि रशिया जैवतंत्रज्ञान उद्योगाची रूपरेषा पुन्हा परिभाषित करण्यासाठी, जागतिक आरोग्य परिणामांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आणि जागतिक सुरक्षा वाढविण्यासाठी सज्ज आहेत. ही युती आताकुशलतेने मार्गक्रमण करत असताना आणि पुढे असलेल्या संधींचा फायदा घेत असताना, भारतासह इतर आघाडीच्या अर्थव्यवस्थांनी देखील जैवतंत्रज्ञानात वाढ केली पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे.

श्रविष्ठ अजयकुमार ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.