Author : Suchet Vir Singh

Expert Speak Raisina Debates
Published on May 22, 2025 Updated 0 Hours ago

गेल्या आठवड्यात 6 ते 10 मे 2025 दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांनंतर उफाळून आलेला भारत-पाकिस्तान संघर्ष दक्षिण आशियात ड्रोन युद्धाच्या नव्या युगाची नांदी ठरला. या संघर्षात रात्रीच्या आकाशात भरघोस प्रमाणात अटॅक ड्रोन वापरले गेले, आणि भविष्यातील भारत-पाक संघर्षांमध्ये हवाई शक्ती किती महत्त्वाची ठरणार आहे, याचा संकेत मिळाला.

ड्रोन युद्धाची नवी लढाई: 'ऑपरेशन सिंदूर'ने बदलले भारत-पाक समीकरण

Image Source: Getty

गेल्या आठवड्यात 6 ते 10 मे 2025 दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांनंतर उफाळून आलेला भारत-पाकिस्तान संघर्ष दक्षिण आशियात ड्रोन युद्धाच्या नव्या युगाची नांदी ठरला. या संघर्षात रात्रीच्या आकाशात भरघोस प्रमाणात अटॅक ड्रोन वापरले गेले, आणि भविष्यातील भारत-पाक संघर्षांमध्ये हवाई शक्ती किती महत्त्वाची ठरणार आहे, याचा संकेत मिळाला. या काळात भारताने राबवलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई वेळेवर, अचूक आणि पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून होती. पहिल्यांदाच भारत-पाक संघर्षात अनमॅन अरियल व्हेईकल (Unmanned Aerial Vehicles (UAVs)) आणि त्याविरोधात वापरण्यात येणाऱ्या प्रणाली केंद्रस्थानी आल्या. दोन्ही देशांनी ड्रोनचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. पाकिस्तानने भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर भारताने आपले UAVs अधिक अचूकतेने वापरले. भारताच्या ड्रोननी पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले आणि त्यांच्या एयर डिफेन्स Air Defence प्रणालींना निष्क्रिय करण्यासाठीही त्यांचा वापर केला.

या संघर्षादरम्यान भारताने राबवलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई वेळेवर, अचूक आणि पाकिस्तानच्या आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर देणारी होती.

अलीकडील भौगोलिक संघर्षांकडून घेतलेला महत्त्वाचा धडा म्हणजे यूक्रेन-रशिया युद्ध, जिथे ड्रोन हे आधुनिक युद्धशैलीचा केंद्रबिंदू ठरले. हाच पॅटर्न आता भारत-पाकिस्तान संघर्षातही दिसून आला. या संघर्षात हवाई शक्तीचे महत्त्व इतके वाढले होते की त्याचा भौगोलिक व्याप 1999 च्या कारगिल युद्धापेक्षा कितीतरी अधिक होता.

भारताची एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली 

या संघर्षादरम्यान पाकिस्तानने भारताच्या लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यासाठी शेकडो ड्रोन पाठवले. अहवालांनुसार, पाकिस्तानने या काळात सुमारे 600 पेक्षा जास्त ड्रोनचा वापर करत भारतावर हल्ला केला. 7 आणि 8 मे 2025 च्या दरम्यानच्या रात्री, पाकिस्तानकडून 350 ते 400 ड्रोन भारतात पाठवण्यात आले. या हल्ल्यांसाठी इस्लामाबादने तुर्कस्तानकडून मिळालेले Byker Yiha Kamikaze आणि Asisguard Songar हे ड्रोन वापरले.

या प्रयत्नांनंतरही, भारताने आपली बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली वापरून हे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. यामध्ये भारतीय हवाई दलाची Integrated Air Command and Control System (IACCS) आणि भारतीय लष्कराची अक्षतीर (Akashteer) प्रणाली समन्वयाने वापरण्यात आली.

पाकिस्तानच्या UAVs आणि क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यासाठी भारताने S-400 Triumf Missile System, Barak-8 system, L-70 आणि ZU-23mm twin-barrel guns, Akash system, आणि Pechora surface-to-air missile systems यांचा प्रभावी वापर केला. ही गुंतागुंतीची हवाई संरक्षण व्यवस्था भारताच्या लष्करी आणि नागरी मालमत्तेचे संरक्षण करण्यात यशस्वी ठरली आणि प्रतिहल्ल्यासाठी आवश्यक ताकदही या व्यवस्थने पुरवली.

भारताचे ड्रोन इन्फ्रास्ट्रकचर

भारताचे लष्करी ड्रोन इन्फ्रास्ट्रकचर हे स्वदेशी बनावटीच्या प्रणालींना, इस्रायलकडून घेतलेल्या ड्रोनला, भारतीय आणि इस्रायली कंपन्यांच्या संयुक्त उत्पादनांना, तसेच काही वर्षांत अमेरिका (US) कडून येणाऱ्या क्षमता-वर्धन पुरवठ्याला एकत्रितपणे समाविष्ट करते.

अधिकृत आकडे उपलब्ध नसले तरी, विविध अहवालांनुसार भारताच्या लष्कराकडे सध्या 2,000 ते 2,500 ड्रोन आहेत. भविष्यात नवीन खरेदी ऑर्डर पूर्ण झाल्यावर आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढल्यावर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारताचे स्वदेशी विकसित केलेले ड्रोन यामध्ये नागस्त्र (Nagastra) (Solar Industries आणि ZMotion यांनी विकसित केलेले loitering munition)), आणि DRDO ने विकसित केलेले रुस्तम (Rustom),निशांत (Nishant), आणि लक्ष्य-1 (Lakshya-1) टेहळणीसाठी वापरले जाणारे ड्रोन म्हणून यांचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानच्या लष्करी इन्फ्रास्ट्रकचर वर हल्ला करण्यासाठी Harop ड्रोनचा वापर तीन ठिकाणी केला.

भारताच्या ड्रोन शस्त्रसाठ्याचा मुख्य भाग म्हणजे इस्रायली बनावटीचे IAI Searcher आणि Heron हे टेहळणीसाठी वापरले जाणारे ड्रोन. याशिवाय, इस्रायलकडून मिळवलेली loitering munitions – हर्पी(Harpy) आणि हारोप (Harop) हीही भारताने वापरली आहेत. स्काय स्ट्रायकर (Sky-Striker), जो हर्पी (Harpy) चाच एक सुधारित प्रकार आहे, आता भारतात ईलबीट सिस्टिम्स (Elbit Systems (Israel)) आणि अल्फा डिझाईन (Alpha Design (Bengaluru)) यांच्या संयुक्त उपक्रमात तयार केला जातो.

ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभी स्काय स्ट्रायकर (Sky-Striker) चा वापर पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ल्यासाठी करण्यात आला. तसेच, हर्पी ड्रोन्स (Harpy drones) हे ‘Suppression of Enemy Air Defence’ (SEAD) तंत्राचा भाग म्हणून वापरले गेले. भारताने 2024 मध्ये General Atomics (USA) कडून 31 MQ-9B Predator drones खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हे ड्रोन भारताला पुढील चार वर्षांत मिळणार असून त्याद्वारे भारताची हवाई क्षमता आणखी मजबूत होणार आहे.

पाकिस्तानचे ड्रोन इन्फ्रास्ट्रकचर

पाकिस्तानचा ड्रोन कार्यक्रम हा देशांतर्गत उत्पादित प्रणालींचा आणि चीन व तुर्कस्तानकडून मिळालेल्या पुरवठ्यांचा एक मिश्रित संच आहे. अधिकृत पुष्टी नसली तरी, अहवालांनुसार पाकिस्तानकडे एक हजाराहून अधिक ड्रोन आहेत. पाकिस्तानने देशांतर्गत विकसित केलेल्या ड्रोनमध्ये Burraq आणि Shahpar यांचा समावेश आहे. Burraq हा पाकिस्तानचा पहिला स्वदेशी ड्रोन असून, 2009 मध्ये चीनच्या सहकार्याने तयार करण्यात आला. सुरुवातीला फक्त गुप्तचर, टेहळणी आणि देखरेख यासाठी विकसित केलेला Burraq आता हल्ला क्षमतांनीही सुसज्ज आहे. Shahpar हा मध्यम उंचीवर उड्डाण करणारा आणि दीर्घकालीन क्षमतेचा कॉम्बॅट ड्रोन आहे, ज्यामध्ये आतापर्यंत तीन अपग्रेड झाले आहेत. हा ड्रोन 30 तासांचा endurance आणि 500 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र हे दावे अद्याप अधिकृतपणे पडताळले गेलेले नाहीत.

पाकिस्तानचा ड्रोन कार्यक्रम हा देशांतर्गत उत्पादित प्रणालींचा आणि चीन व तुर्कस्तानकडून मिळालेल्या पुरवठ्यांचा एक संमिश्र संच आहे.

याशिवाय, पाकिस्तानच्या ताफ्यात चीन कडून आलेला CH-4, Byker Yiha Kamikaze, Asisguard Songar, आणि तुर्कस्तानकडून मिळालेल्या Bayraktar यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या ड्रोन ताफ्याचे मुख्य केंद्र मुरीद (Murid), चकवाल, पंजाब येथे आहे. भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे येथे पाकिस्तानच्या UAV इन्फ्रास्ट्रक्चरला मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. हे विशेष महत्त्वाचे आहे कारण Shahpar, Burraq, आणि Bayraktar या पाकिस्तानच्या मुख्य ड्रोन तुकड्या याच परिसरात आहेत.

दक्षिण आशियातील ड्रोन युद्धाचे भविष्य

ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावावरून पाहता, भारताचे ड्रोन हे पाकिस्तानच्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहेत. पाकिस्तानचा ताफा तुलनेने कमी खर्चिक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित असला, तरी भारताने इस्रायल सोबत केलेली स्वदेशी ड्रोन उत्पादनांची रचना, विकास आणि संयुक्त निर्मिती ही भारताची वाढती औद्योगिक क्षमता दर्शवते. तथापि, चीन आणि तुर्की सोबत असलेली पाकिस्तानची जवळची भागीदारी इस्लामाबादला प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊ शकते, जे त्यांच्या ड्रोन कार्यक्रमाला गती देऊ शकते.

सध्या परिस्थिती पाहता, भारत-पाकिस्तान यांच्यातील भविष्यातील संघर्षांमध्ये ड्रोन आणि हवाई युद्धक्षेत्र हे केंद्रस्थानी राहतील. पारंपरिक फायटर विमानांच्या तुलनेत ड्रोन हे कमी खर्चिक असल्यामुळे, भविष्यातील तणावाच्या काळात रणनीतिक आणि तात्त्विक दोन्ही पातळ्यांवर त्यांचा वापर निश्चित आहे. याशिवाय, टेहळणी आणि हल्ला, या दोन्ही उद्दिष्टांसाठी वापरता येणाऱ्या क्षमतांमुळे ते लष्करी धोरणकर्त्यांसाठी अधिक आकर्षक ठरत आहेत.

इस्रायल सोबत अनेक स्वदेशी ड्रोन उत्पादने विकसित करणे, त्यांचे संयुक्त उत्पादन करणे आणि ते तैनात करणे, या सगळ्यांतून भारताची वाढती औद्योगिक क्षमता अधोरेखित होते.

सध्याच्या संघर्षातून मिळालेला अनुभव आणि डेटा वापरून, पाकिस्तान भविष्यात अधिक प्रगत आणि मोठ्या संख्येने ड्रोन तैनात करू शकतो, जे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दडपण आणू शकतात आणि हवाई सामर्थ्याचे संतुलन बदलू शकतात. त्यामुळे भारताने आपली विद्यमान जटिल व प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणा अधिक बळकट करणे गरजेचे आहे आणि भारताने विविध क्षमतांचे ड्रोन मोठ्या प्रमाणावर तयार करण्यावर भर द्यायला हवा.

दक्षिण आशियासाठी, ड्रोन हे आण्विक युद्धाच्या उंबरठ्याखालील एक नवीन संघर्षात्मक साधन बनले आहे, जे टिकून राहणार आहे आणि ज्याचे सुज्ञ व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भविष्यातील भारत-पाकिस्तान संघर्षांमध्ये हवाई युद्धक्षेत्र हे केंद्रस्थानी राहील, हे स्पष्ट आहे.


सुचेत वीर सिंह हे संरक्षण विश्लेषक आहेत. ते ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो होते.
    

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.