Author : Basu Chandola

Expert Speak Health Express
Published on Apr 10, 2024 Updated 0 Hours ago

G-20 गटाने जागतिक स्तरावरील विविध सहभागी राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य सुनिश्चित करून गेल्या काही वर्षांत जगभरातील आरोग्य सेवांकरता संगणकीय व्यासपीठे, कनेक्टिव्हिटी, सॉफ्टवेअर आणि सेन्सरसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराच्या विकासाला गती दिली आहे.

G-20 कडून डिजिटल आरोग्य सेवांना प्रोत्साहन

हा लेख ‘जागतिक आरोग्य दिन २०२४: माझे आरोग्य, माझा हक्क’ या लेखमालिकेचा भाग आहे.


जग जसजसे वाढत्या डिजिटलायझेशनकडे वाटचाल करत आहे, तसा आरोग्यसेवा आणि सुख-समाधान प्राप्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही झपाट्याने वाढत आहे. ‘टेलिमेडिसिन’च्या वापराद्वारे थेट रूग्णसंवादापासून- ‘हेल्थ इन्फॉरमेटिक्स’साठी डेटा व अत्याधुनिक माहितीच्या वापरापर्यंत आणि दूरस्थ पद्धतीने देखरेख करण्यापासून- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आरोग्य नोंदी राखण्यापर्यंत, संगणकीय आरोग्य विषयक उपाय ‘उत्तम आरोग्य आणि सुख-समाधान’ हे शाश्वत विकास उद्दिष्ट-३ साध्य करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

संगणकीय मदतीद्वारे आरोग्य सेवांच्या उपलब्धतेची खरी क्षमता ओळखण्याकरता, जगभरातील विविध भागधारकांमध्ये आंतरराष्ट्रीय समन्वय, सहकार्य आणि सहयोग असणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे प्रमुख जागतिक व्यासपीठ म्हणून जे जागतिक प्रशासन संरचनेवर लक्षणीय परिणाम करते, त्या जी-२० गटाने गेल्या काही वर्षांपासून जागतिक आरोग्य सेवा डिजिटलरीत्या उपलब्ध करून देण्याच्या विकासाला गती मिळवून दिली आहे.

या लेखाचे उद्दिष्ट आरोग्य सेवा डिजिटलरीत्या उपलब्ध करून देण्याविषयी जी-२० गटाच्या विविध माजी अध्यक्षांनी जे विवेचन केले होते, ते सारांश रूपात सांगणे आणि ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या विवेचनाच्या संभाव्य मार्गक्रमणाची चर्चा करणे हा आहे. चर्चिल्या गेलेल्या इतर परिणामांसोबतच आरोग्य क्षेत्रातील कृती गटांत आणि नेतृत्व स्तरावर करण्यात आलेल्या चर्चेचे विश्लेषण केले जाईल.

आरोग्य कार्य गटातील चर्चा

जी-२० च्या अजेंड्यावर जागतिक आरोग्याचा विषय ठेवण्याकरता २०१७ मध्ये जर्मनीच्या अध्यक्षतेखाली आरोग्यविषयक कार्य गटाची स्थापना करण्यात आली. जागतिक आरोग्यासंबंधीचे संकट व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि प्रतिजैविक प्रतिकार (एएमआर) नियंत्रित करणे असा आरोग्यविषयक कार्य गटाचा प्राधान्यक्रम होता आणि त्यात डिजिटल आरोग्य सेवांचा उल्लेखही नव्हता. मात्र, त्यानंतर, २०१८ पासून, डिजिटल आरोग्य सेवा हा सर्व जी-२० गटातील आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा एक महत्त्वाचा घटक आहे.

अर्जेंटिनाच्या अध्यक्षतेखाली, जी-२० गटाच्या आरोग्य मंत्र्यांनी ‘ई-हेल्थ’ साधने आणि टेलिमेडिसिन वापरण्याचे महत्त्व ओळखले आणि देशांना डिजिटल आरोग्य प्रणाली विकसित करण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी ई-आरोग्य क्षेत्रातील सहकार्यात सुधारणा करण्याची आणि ई-आरोग्य अंमलबजावणीत सर्वोत्तम पद्धती शेअर करण्याची गरजही अधोरेखित केली.

अर्जेंटिनाच्या अध्यक्षतेखाली, जी-२० गटाच्या आरोग्य मंत्र्यांनी ‘ई-हेल्थ’ साधने आणि ‘टेलिमेडिसिन’ वापरण्याचे महत्त्व ओळखले आणि देशांना डिजिटल आरोग्य प्रणाली विकसित करण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

जपानच्या अध्यक्षतेखाली, मंत्र्यांनी सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्दिष्टाला गती देण्यासाठी नैतिक डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. डिजिटल आरोग्य माहिती प्रणालीचे बळकटीकरण व आंतरकार्यक्षमता आणि डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानात सर्वांना समान प्रवेश यांसह डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या प्रसार करण्याकरता त्यांचा शोध सुरू होता. त्यांनी डिजिटल आरोग्यावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही स्वागत केले आणि डिजिटल आरोग्यासंदर्भात जागतिक धोरण आखले जाण्याची ते वाट पाहत होते.

कोविड-१९ साथीच्या रोगामुळे, सौदी अरेबियाच्या अध्यक्षपदाच्या काळात डिजिटल आरोग्य सेवा अधिक महत्त्वाच्या बनल्या. आरोग्य मंत्र्यांनी सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत आरोग्य उद्दिष्ट-३ च्या प्रगतीला गती देण्यासाठी डिजिटल आरोग्य विषयक उपायांची क्षमता ओळखली. आरोग्य आणीबाणीच्या काळात डिजिटल आरोग्य सेवा हे एक मूलभूत साधन आहे आणि डिजिटल आरोग्य सेवांना पायाभूत सुविधांचा एक प्रमुख घटक बनवल्याने उच्च कार्यक्षमता, सुरक्षित परस्परसंवाद आणि उत्तम आरोग्य विषयक परिणाम मिळू शकतात असे त्यांनी नमूद केले. त्यांनी डिजिटल आरोग्य विषयक कृती दलाच्या निर्मितीला मान्यता दिली. या कृती दलाने डिजिटल आरोग्य उपायांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि धोरणे शेअर करण्याकरता एक अहवाल सादर केला. त्यांनी नाविन्यपूर्णता आणि परिवर्तनासाठी डिजिटल आरोग्य सेवाविषयक मार्गदर्शक नियमांची चौकट विकसित करण्याची मागणी केली. मंत्र्यांनी आरोग्यातील मूल्य सुधारण्यासाठी ‘ग्लोबल इनोव्हेशन हब’च्या स्थापनेलाही पाठिंबा दिला.

इटलीच्या अध्यक्षपदाच्या काळात, आरोग्य मंत्र्यांनी नमूद केले की, डिजिटल आरोग्य एकात्मिक केल्याने आणि आरोग्य माहिती प्रणालीत सुधारणा झाल्याने महत्त्वपूर्ण लाभ होऊ शकतात. त्यांनी हेही अधोरेखित केले की, डिजिटल आरोग्य उपायांची अंमलबजावणी अशा प्रकारे व्हावी, जेणे करून वैयक्तिक आरोग्य विषयक माहिती सुरक्षित राहिली जायला हवी. इंडोनेशियाकडे जेव्हा अध्यक्षपद होते, त्या कालावधीत, सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरता आणि इतर शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्ती होण्यास मदत होण्याकरता डिजिटल आरोग्य विषयक उपायांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आणि मंत्र्यांनी जागतिक आरोग्य विषयक शिष्टाचार जपण्यावरही चर्चा केली.

सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणे अधिकाधिक शक्य व्हावे आणि शाश्वत विकास उद्दिष्ट- ३ संदर्भातील प्रगतीला गती मिळावी, यासाठी आरोग्य मंत्र्यांनी डिजिटल आरोग्य विषयक उपायांची क्षमता ओळखली.

सर्वात अलीकडे, भारताकडे जी-२० गटाचे अध्यक्षपद होते, त्या कालावधीत, आरोग्य सेवा व्यवस्था बळकट करण्यासाठी डिजिटल आरोग्य सेवांचे महत्त्व ओळखले गेले आणि सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरता संभाव्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले गेले. एकमेकांशी कनेक्टेड असलेल्या डिजिटल आरोग्य प्रणालीला समर्थन देण्यासाठी विद्यमान उपक्रमांमधील समन्वयाचे महत्त्वही मंत्र्यांनी अधोरेखित केले. ‘डिजिटल हेल्थ’वर जागतिक स्तरावर पुढाकार घेण्यासाठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची वचनबद्धता त्यांनी दर्शवली.

नेतृत्व स्तरावर चर्चा

जपानच्या अध्यक्षपदाच्या काळात डिजिटल आणि इतर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरासह सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील नवकल्पनांद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी नेते वचनबद्धता राहिले. त्याचप्रमाणे, सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखालील जी-२० नेत्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परिषदेदरम्यान, नेत्यांनी कोविड-१९ साथीच्या रोगाविरूद्ध डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याबाबत वचनबद्धता दर्शवली. जागतिक स्तरावर आरोग्य विषयक पुढाकार घेतला गेल्याचे स्वागत नेत्यांनीही केले. इटलीच्या अध्यक्षपदाच्या काळात, नेत्यांनी डिजिटल आणि इतर आरोग्य-संबंधित तंत्रज्ञानामध्ये नवकल्पना वाढविण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. इंडोनेशियाच्या अध्यक्षपदाच्या काळात, नेते विश्वासार्ह जागतिक डिजिटल आरोग्य नेटवर्कच्या निर्मितीसाठी सहयोग करण्यास वचनबद्ध राहिले. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात, नेत्यांनी ‘डिजिटल हेल्थ’ संदर्भात जागतिक पुढाकार घेतला गेल्याचे स्वागत केले.

इतर परिणाम

वर नमूद केल्याप्रमाणे, जी-२० गटाने अनेक अहवालांचे आणि उपक्रमांचे स्वागत केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील ‘आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी डिजिटल हस्तक्षेपांवरील शिफारशीं’चे जपानच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत आरोग्य मंत्र्यांनी स्वागत केले. ही मार्गदर्शक तत्त्वे डिजिटल आरोग्य सेवांसंदर्भातील पुराव्यांचे जे महत्त्वपूर्ण मूल्यांकन केले गेले, त्याचा परिणाम आहेत आणि डिजिटल आरोग्य विषयक उपाययोजना योजताना माहितीपूर्ण निर्णय घेण्याकरता त्या शिफारशी प्रदान करतात.

नेत्यांनी जपानच्या अध्यक्षपदाच्या काळात डिजिटल आरोग्य २०२०-२०२५ दरम्यानचे जागतिक धोरण योजले. डिजिटल हेल्थ विषयक उपाययोजनांचा अवलंब करून आरोग्यात व सुख-समाधानात सुधारणा करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे-३ च्या प्रगतीला गती देण्यासाठी आरोग्य विषयक डेटाचा वापर करून जगभरातील आरोग्य सुधारणे हे या दस्तावेजाचे उद्दिष्ट आहे. या दस्तावेजाचे उद्दिष्ट विविध भागधारकांकरता डिजिटल आरोग्य सेवांच्या उपयोगाला बळकटी आणणे हे सर्वांसाठी आरोग्याचे लक्ष्य साकारणे आहे.

सौदी अरेबियाच्या अध्यक्षपदाच्या काळात जी-२० डिजिटल आरोग्य विषयक कृती दलाद्वारे साथीच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल आरोग्य सेवांच्या अंमलबजावणी संदर्भातील दृष्टिकोनावरचा जी-२० अहवाल प्रकाशित करण्यात आला. डिजिटल आरोग्यावरील हा पहिला जी-२० अहवाल होता आणि आरोग्य विषयक आणीबाणीच्या काळात डिजिटल आरोग्य विषयक उपायांच्या वापरासाठी प्रस्तावित कृतींची आणि शिफारशींची रूपरेषा त्यात दर्शवली होती. हा अहवाल देशांसाठी त्यांच्या डिजिटल आरोग्य उपायांची रचना करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या अहवालाला प्रतिसाद देताना, सौदी जी-२० डिजिटल आरोग्य सचिवालयाने कोविड-१९ साथीच्या व्यवस्थापनात डिजिटल आरोग्य विषयक धोरणांच्या भूमिकेवर प्रकाशझोत टाकणारे परिशिष्ट जारी केले.

डिजिटल आरोग्य सेवांच्या उपाययोजनांचा अवलंब करून आरोग्यात व सुखासमाधानात सुधारणा करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्ट-३च्या प्रगतीला गती देण्यासाठी आरोग्य विषयक माहितीचा वापर करून जगभरातील आरोग्य सुधारणे हे या दस्तावेजाचे उद्दिष्ट आहे.

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षांच्या अनिवार्यतेसह आरोग्यासाठीच्या जागतिक पुढाकाराची स्थापना स्वयंसेवी उपक्रम म्हणून करण्यात आली. आरोग्य व्यवस्था अधिक लवचिक व प्रतिसाद देणारी ठरावी आणि सर्वांकरता आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्दिष्टाला समर्थन देणारे दृष्टिकोन अधोरेखित करण्याच्या मोहिमेसह या उपक्रमाची रचना ज्ञान संस्था म्हणून झाली आहे. जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जो पुढाकार घेतला गेला आहे, त्याद्वारे ज्ञाननिर्मिती होते आणि ते ज्ञान शेअर केले जाते. हा उपक्रम पदावर कार्यरत असलेल्या विद्यमान अध्यक्षांशी संलग्न होतो, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थांना सहाय्यकारी ठरतो आणि धोरणाची माहिती देण्याचे उद्दिष्ट बाळगतो.

जागतिक स्तरावर घेण्यात आलेला आरोग्य विषयक पुढाकार म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे व्यवस्थापित केलेले अनौपचारिक नेटवर्क होते, ज्याचे उद्दिष्ट डिजिटल आरोग्य २०२०-२०२५ संदर्भातील जागतिक धोरणाची अंमलबजावणी सुलभ करणे आणि सदस्य राष्ट्रांद्वारे डिजिटल आरोग्य उपायांच्या वापरास सहाय्य करून सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. जागतिक स्तरावर डिजिटल स्वरूपात आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासंबंधात जी-२० सदस्य देशांनी जो पुढाकार घेतला होता, त्याद्वारे राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल, अशी कल्पना होती. मात्र, या अंतर्गत जी-२० देशांना असे कोणतेही विशेषाधिकार प्रदान केले गेले नाहीत.

जी-२० गटामधील डिजिटल आरोग्य सेवांचे भविष्य

सार्वजनिक क्षेत्रातील उपलब्ध माहितीनुसार, ब्राझीलच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत आरोग्य विषयक कृती दल ‘टेलिहेल्थ, एकात्मता आणि राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेतील डेटाचे विश्लेषण आणि डिजिटल स्वरूपात आरोग्य सेवा’ अशा जागतिक स्तरावर घेतल्या गेलेल्या डिजिटल आरोग्य सेवा विषयक पुढाकारावर लक्ष केंद्रित केले जाईल. आरोग्य विषयक कृती दलाच्या अजेंड्यातील सातत्य प्रशंसनीय आहे आणि पुढील वर्षभरात डिजिटल आरोग्यावरील विवेचन कसे विस्तारते हे पाहणे रंजक ठरेल.

जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जो पुढाकार घेतला गेला आहे, त्याद्वारे ज्ञानाची निर्मिती होते आणि ते ज्ञान शेअर केले जाते. हा उपक्रम पदावर कार्यरत असलेल्या विद्यमान अध्यक्षांशी संलग्न होतो, राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थांना सहाय्यकारी ठरतो आणि धोरणाची माहिती देण्याचे उद्दिष्ट बाळगतो.

टेलिहेल्थ, आणि राष्ट्रीय आरोग्य प्रणालीतील माहितीचे एकत्रीकरण आणि विश्लेषण यांवर अधिक विशेष लक्ष केंद्रित करून, ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रूप’ आणि आरोग्य विषयक कृती दल यांच्यात सामायिक ठरलेल्या कामाविषयी काय मार्ग काढला जाईल, हे पाहणे रंजक ठरेल. विविध देशांतील माहितीचा प्रवाह, गोपनीयतेची चिंता आणि डेटा संरक्षण यांसारख्या समस्या ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रूप’च्या कक्षेत येतील आणि आरोग्य विषयक कृती गटाकडे अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठी कुशलता नसेल. डिजिटल आरोग्य सेवांकरता घेतल्या गेलेल्या पुढाकाराला जी-२० गट कसे सहाय्य प्रदान करतो हे पाहणेही स्वारस्यपूर्ण ठरेल.


बासू चंडोला हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Basu Chandola

Basu Chandola

Basu Chandola is an Associate Fellow. His areas of research include competition law, interface of intellectual property rights and competition law, and tech policy. Basu has ...

Read More +