-
CENTRES
Progammes & Centres
Location
अमीर खान मुत्ताकींची दारुल उलूम देवबंद भेट हे दर्शवते की भारत आपला ऐतिहासिक आणि धार्मिक प्रभाव वापरून तालिबानशी संवाद साधू शकतो, पारंपरिक देवबंदी वारसा पुनर्प्राप्त करू शकतो आणि सामायिक आध्यात्मिक परंपरेला प्रादेशिक स्थैर्यासाठी एक रणनीतिक साधनात रूपांतरित करू शकतो.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी 9 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात आले, जिथे त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत सुरक्षा, व्यापार आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे असलेल्या दारुल उलूम देवबंद या प्रसिद्ध इस्लामी शिक्षणसंस्थेला भेट देण्याचाही कार्यक्रम आखला होता. दारुल उलूम देवबंद ही दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली इस्लामी संस्था मानली जाते आणि तिचे स्थान इजिप्तच्या काहिरो येथील अल-अझहर विद्यापीठानंतर दुसऱ्या क्रमांकावर मानले जाते.
मुत्ताकी यांची देवबंद भेट ही अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सामरिक संबंधांना नवसंजीवनी देणारी ठरते. तालिबानकडून देवबंदशी आपली वैचारिक आणि आध्यात्मिक नाळ जोडण्याचा हा प्रयत्न त्यांच्या वैधतेचा शोध तसेच अफगाणिस्तानच्या धार्मिक ओळखीच्या घडणीत भारताच्या ऐतिहासिक भूमिकेचे प्रतीक मानला जातो.
देवबंद आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक संबंध अतिशय जुने आणि प्राचीन आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद या नगरात 1866 साली स्थापन झालेली दारुल उलूम देवबंद ही संस्था, नैतिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणताना वसाहतवादी आधुनिकतेविरुद्धच्या बौद्धिक प्रतिकाराचं केंद्र म्हणून उभी राहिली. संस्थापक मौलाना मोहम्मद कासिम नानौतवी आणि राशिद अहमद गंगोही यांनी हनाफी न्यायशास्त्रावर आधारित एक सशक्त धार्मिक पुनरुज्जीवन चळवळ उभी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांचा उद्देश इस्लामी शिक्षणाचं राजकीय साधन बनविण्यापेक्षा, झपाट्याने बदलणाऱ्या समाजात धर्मीय आणि सांस्कृतिक ओळख जपणं हा होता.
1913 ते 1920 दरम्यान चाललेल्या प्रसिद्ध ‘सिल्क लेटर चळवळीत’ देवबंदी विद्वानांनी भारतातील ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ऑटोमन साम्राज्य, अफगाणिस्तान आणि जर्मन साम्राज्याशी गुप्त संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक चळवळीमुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात धार्मिक तसेच राजकीय जाणिवांचे नवे धागे निर्माण झाले. परिणामी, या दोन समाजांमध्ये वैचारिक देवाणघेवाण आणि बौद्धिक परंपरेवर आधारित एक दृढ सांस्कृतिक बंध निर्माण झाला, जो आजही टिकून आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दारुल उलूम देवबंदने केवळ भारतभरातीलच नव्हे तर अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि आजच्या पाकिस्तानातील सीमावर्ती भागांमधील विद्यार्थ्यांनाही आकर्षित केले. अफगाण विद्वान हे या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काबूल, कंदहार आणि खोस्त येथे परत जाऊन देवबंदच्या अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतीवर आधारित मदरसे स्थापन केले. या संस्थांनी अफगाण समाजात शास्त्राधिष्ठित विद्वत्ता, साधेपणा आणि पारंपरिक ग्रंथांप्रती निष्ठा घट्टपणे रुजवली.
फाळणीपूर्व काळातही देवबंदी धर्मगुरूंनी अफगाणिस्तानशी राजकीय आणि धार्मिक संबंध प्रस्थापित ठेवले होते. 1913 ते 1920 या काळात झालेल्या ‘सिल्क लेटर चळवळीत’ देवबंदी विद्वानांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासाठी ऑटोमन साम्राज्य, अफगाणिस्तान आणि जर्मन साम्राज्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक उपक्रमामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्या धार्मिक व राजकीय जाणिवांवर दीर्घकालीन परिणाम झाला आणि दोन्ही समाजांमध्ये वैचारिक देवाणघेवाणीवर आधारित एक मजबूत बौद्धिक दुवा निर्माण झाला.
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अफगाण विद्यार्थी नियमितपणे दारुल उलूम देवबंदमध्ये शिक्षणासाठी येत असत. भारताचं स्वातंत्र्य आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, पण पूर्णपणे थांबली नाही. 1950 ते 1970 या काळात अनेक अफगाण तरुण देवबंदमध्ये शिक्षण घेत राहिले. या विद्यार्थ्यांना भारताशी सांस्कृतिक नातं जपणाऱ्या धार्मिक संस्था आणि व्यापारी कुटुंबांकडून आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळत असे.
भारतामधून पश्चिमेकडे गेलेली देवबंदी धार्मिक विचारसरणी अशा प्रकारे रूपांतरित झाली. तिच्या विद्वत्तापूर्ण आणि सुधारक आत्म्यापासून वंचित होत, ती पाकिस्तानच्या सामरिक गरजा, अमेरिका-सौदी शीतयुद्धातील आर्थिक मदत आणि अफगाण जिहादमधून जन्मलेल्या लढाऊ प्रवृत्तीशी एकरूप झाली.
मात्र, 1979 मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत आक्रमण झाल्यानंतर ही शैक्षणिक देवाणघेवाण अचानक थांबली. युद्धामुळे लाखो अफगाण नागरिक पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले, आणि तिथे देवबंदी परंपरेवर आधारित मदरसे विशेषतः अकोरा खट्टक येथील दारुल उलूम हक्कानिया देवबंदच्या पर्याय म्हणून पुढे आली. याच संस्थांमधून तालिबानचा विचार आणि पाया तयार झाला. अशा प्रकारे भारतातून सुरू झालेली देवबंदी विचारधारा तिच्या मूळ विद्वत्तापूर्ण आणि सुधारक रूपातून बदलत जाऊन पाकिस्तानच्या सामरिक गरजा, अमेरिका-सौदी शीतयुद्ध निधी आणि अफगाण जिहादशी एकरूप झाली.
1990 च्या दशकात मूळ देवबंदी परंपरा जी अभ्यासकेंद्रित, संयमी आणि विचारशील होती, ती पाकिस्तानच्या प्रादेशिक राजकारणाचं साधन बनली. 1994 मध्ये तालिबान चळवळ उदयास आली, ज्यांनी देवबंदी परंपरेचं नाव आणि प्रतीकं वापरली, पण तिची बौद्धिक खोली आणि सहिष्णुता मात्र नाहीशी झाली. 2001 मध्ये तालिबान सत्तेवरून हटवल्यानंतर काही अफगाण विद्यार्थ्यांनी पुन्हा भारतात शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न मर्यादित आणि अनौपचारिक स्वरूपात राहिले. 2021 मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर देवबंदमध्ये कोणतीही अधिकृत अफगाण नोंदणी झालेली नाही. तरीही, तालिबान आणि देवबंद यांच्यातील प्रतीकात्मक आणि वैचारिक नातं आधीपेक्षा अधिक घट्ट झालं आहे. ते संपलेलं नाही, फक्त नव्या स्वरूपात बदललेलं आहे.
अमीर खान मुत्ताकी यांची दारुल उलूम देवबंद भेट ही केवळ औपचारिक नव्हे, तर खूप मोठं प्रतीकात्मक महत्त्व घेऊन येते. तालिबानचा वरिष्ठ नेता भारतातील त्यांच्या वैचारिक परंपरेच्या मूळ केंद्राशी थेट नसला तरी अप्रत्यक्षरीत्या संपर्क साधणार आहे, ही पहिलीच वेळ ठरणार आहे. अनेक उलथापालथींनंतरही अफगाण तालिबान आपली मुळे देवबंदी परंपरेतच शोधतो. मात्र, आज ती परंपरा देवबंदी विचार, पश्तूनवली परंपरा आणि वहाबी विचार यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे, जी पाकिस्तानातील हक्कानिया नेटवर्कच्या माध्यमातून विकसित झाली आहे. त्यामुळे मुत्ताकी यांची ही भेट ही धार्मिक कुतूहलातून नव्हे, तर जाणीवपूर्वक आखलेली ‘धार्मिक राजनय’ (religious diplomacy) मानली जाते.
तालिबानसाठी ही भेट पाकिस्तानमधील देवबंदी नेटवर्कपासून स्वतःला वेगळं दाखवण्याचा आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. देवबंदला भेट देऊन ते स्वतःला एक विद्वत्तापूर्ण, सुधारक इस्लामी परंपरेचे वारस म्हणून मांडू इच्छितात, लढाऊ किंवा कठोर शासन म्हणून नव्हे. या पावलामागे राजकीय अर्थही दडलेला आहे. हा पाकिस्तानच्या वैचारिक छायेतून बाहेर पडण्याचा आणि स्वतःच्या भूमिकेला स्वतंत्र मान्यता मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काबूलला, किमान प्रतीकात्मकरीत्या का होईना, पाकिस्तानमधील धर्मगुरू आणि हक्कानिया नेटवर्कच्या प्रभावापासून थोडं अंतर ठेवण्याची संधी मिळते. जे दीर्घकाळ इस्लामाबादच्या राजकीय हितसंबंधांचे वाहक मानले गेले आहेत.
अनेक परिवर्तनं आणि टप्प्यांमधून गेल्यानंतरही अफगाण तालिबान आपली वैचारिक मुळे भारतीय देवबंदी परंपरेतच शोधतो. मात्र, आता ही विचारधारा शुद्ध स्वरूपात न राहता देवबंदी तत्त्वज्ञान, पश्तूनवली परंपरा आणि वहाबी विचारधारा यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. हे संमिश्र वैचारिक रूप प्रामुख्याने पाकिस्तानातील हक्कानिया नेटवर्कच्या प्रभावातून विकसित झालं आहे. त्यामुळे मुत्तकी यांची ही देवबंद भेट ही केवळ धार्मिक औत्सुक्यामुळे नव्हे, तर काळजीपूर्वक आखलेली ‘धार्मिक राजनयाची’ (religious diplomacy) पायरी आहे.
त्याच वेळी, ही भेट तालिबानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मवाळ आणि सकारात्मक प्रतिमा सादर करण्यास मदत करते. भारतातील देवबंद संस्था ही जरी नैतिक रुढीवादासाठी ओळखली जाते, तरी तिची ओळख अपराजकीय आणि सौम्य विचारसरणीमुळेही आहे. या संस्थेशी स्वतःला जोडल्याने तालिबानला आपली प्रतिमा सुधारण्याची एक संधी मिळते, म्हणजेच ते स्वतःला सुधारणा आणि पुनर्विचारासाठी खुले आहेत, असा संदेश दिला जातो. हे त्यांच्या पाकिस्तानपूर्व दक्षिण आशियाई इस्लामी वारशाशी असलेल्या सातत्याचं प्रतीक आहे, जो भौगोलिक सीमा ओलांडणारा आहे, आणि त्याचवेळी त्यांच्या स्वायत्ततेचा आणि धार्मिक प्रामाणिकतेचाही दाखला देतो.
भारतासाठी, तालिबानचं हे पाऊल ही एक संधी आहे. त्या श्रद्धेच्या आणि संस्कृतीच्या भाषेत संवाद साधण्याची, जी कधीकाळी दोघांमधील अंतराचं कारण बनली होती. नवी दिल्लीला बऱ्याच काळापासून हे जाणवतं की अफगाणिस्तानातील स्थैर्य हे तिच्या प्रादेशिक हिताचं केंद्रबिंदू आहे. आतापर्यंत भारताचं अफगाणिस्तानाशी नातं प्रामुख्याने पायाभूत सुविधा, विकास सहाय्य आणि मानवतावादी मदतीपुरतं मर्यादित होतं; पण आता या सगळ्याबरोबरच एक चौथा, अधिक संवेदनशील आणि प्रभावी पैलू जोडण्याची वेळ आली आहे, तो म्हणजे धार्मिक राजनयाचा.
भारताच्या देवबंदी परंपरेतील ऐतिहासिक नेतृत्वामुळे त्यांच्याकडे वैचारिक प्रभावाचं एक महत्त्वाचं साधन आहे. ज्ञान, नैतिक प्रामाणिकता आणि शांत सह अस्तित्व यांवर आधारित देवबंदी विचार पुन्हा अधोरेखित करून भारत अप्रत्यक्षपणे अफगाण धार्मिक नेतृत्वावर प्रभाव टाकू शकतो. हा संवाद औपचारिक मान्यतेशिवायही शक्य आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक देवाणघेवाणीच्या स्वरूपात. उदाहरणार्थ, ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रम, तुलनात्मक न्यायशास्त्र किंवा धार्मिक शिक्षणातील मध्यममार्गी विचारांना प्रोत्साहन देणारे प्रकल्प हे या नव्या संवादाचे माध्यम होऊ शकतात.
“चार डी” ज्यामध्ये डिप्लोमसी (राजनय), डेव्हलपमेंट (विकास), डायालॉग (संवाद) आणि देवबंद या चौकटीतून भारत अशा प्रकारच्या संवादासाठी एक आराखडा तयार करू शकतो. भारत आपली मूल्ये इस्लामी सरकारला शिकवण देणाऱ्या पाश्चात्य लोकशाहीसारखी नव्हे, तर संतुलन आणि नैतिक संयमाला महत्त्व देणाऱ्या इस्लामी विद्वत्तेच्या वारशाचे सहवारसदार म्हणून मांडू शकतो.
“चार डी” ज्यामध्ये डिप्लोमसी (राजनय), डेव्हलपमेंट (विकास), डायालॉग (संवाद) आणि देवबंद या चौकटीतून भारत अशा प्रकारच्या संवादासाठी एक आराखडा तयार करू शकतो. भारत आपली मूल्ये इस्लामी सरकारला शिकवण देणाऱ्या पाश्चात्य लोकशाहीसारखी नव्हे, तर संतुलन आणि नैतिक संयमाला महत्त्व देणाऱ्या इस्लामी विद्वत्तेच्या वारशाचे सहवारसदार म्हणून मांडू शकतो. भारतातील देवबंदी विद्वानांनी हिंसा आणि इस्लामी शिकवण यांची विसंगती सार्वजनिकरित्या मांडावी, यासाठी प्रोत्साहन देऊन भारत पाकिस्तानने विकृत केलेली कथा (narrative) पुन्हा आपल्या हातात घेऊ शकतो. मूळ देवबंद चळवळ ही आत्मिक सुधारणा, शिक्षण आणि राष्ट्रीय सहअस्तित्वाची होती, आणि हेच मूल्य पाकिस्तानमधून पसरलेल्या लढाऊ देवबंदवादात पूर्णपणे हरवलेले दिसते.
तालिबानकडून दारुल उलूम देवबंदचा सातत्याने उल्लेख केला जाणे हा त्यांच्या आत्मवैधतेसाठी (self-legitimation) केलेला एक विचारपूर्वक प्रयत्न आहे, जरी त्यांचा संस्थात्मक संबंध पाकिस्तानातील हक्कानिया नेटवर्कशी कायम असला तरी. हक्कानियाने त्यांच्या राजकीय विचारसरणीला आकार दिला, पण देवबंदने त्यांना अशी वैचारिक परंपरा दिली जी पाकिस्तानकडे नाही. हक्कानिया आंतरराष्ट्रीय स्तरावर एक राज्यसंरक्षित आणि जिहादी प्रशिक्षण देणारी ‘लढाऊ संस्था’ म्हणून ओळखली जाते, तर देवबंद ही प्रामाणिकता, पारंपरिकता आणि शास्त्रीय शिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था आहे, ज्याची परंपरा हनाफी इस्लामी शिक्षणाच्या मूळ केंद्रांपर्यंत पोहोचते.
देवबंदला आपल्या आध्यात्मिक उत्पत्तीचे केंद्र म्हणून सादर करून तालिबान स्वतःच्या सत्तेला धार्मिक वैधतेचं आवरण देऊ पाहतात आणि स्वतःला ISIS-K सारख्या सलाफी किंवा वहाबी चळवळींपासून वेगळं ठरवू इच्छितात. त्यामुळे ते क्रांतिकारी नव्हे, तर पारंपरिक भासतात. आंतरराष्ट्रीय जिहादचे प्रतिनिधी नव्हे, तर दक्षिण आशियाई इस्लामी वारशाचे रक्षणकर्ते म्हणून स्वतःला सादर करतात. ही ओळख त्यांच्या राजनयिक प्रयत्नांनाही पूरक ठरते, कारण ती भारतासह व्यापक मुस्लिम जगाला असा संदेश देते की तालिबान भारतीय देवबंद संस्थेच्या नैतिक अधिकाराचा स्वीकार करतात आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक संवादासाठी तयार आहेत.
आपल्या स्वतःच्या विद्वत्तापूर्ण आणि मध्यममार्गी देवबंदी परंपरेच्या प्राधान्याची घोषणा करून भारत केवळ पाकिस्तानच्या कथानकाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही, तर अफगाणिस्तानातील धार्मिक चर्चेला सामंजस्य आणि आत्मपरीक्षणाच्या दिशेने वळवू शकतो.
तालिबान आणि दारुल उलूम देवबंद यांच्यात वाढत जाणारे संबंध हे दक्षिण आशियातील इस्लामी वारशावर सुरू असलेल्या व्यापक वैचारिक संघर्षाचे प्रतीक आहेत. पाकिस्तानमधील मदरशांनी देवबंदी विचारसरणीचा वापर भूराजकीय प्रभावासाठी केला, तर भारताने त्याच्या धार्मिक शुद्धता, विद्वत्तापूर्ण सखोलता आणि विविध मतांना स्थान देणाऱ्या परंपरेचे संरक्षण केले. या दोन दृष्टिकोनांतील फरक भारताला आता अधिक प्रभावी भूमिका निभावण्याची संधी निर्माण करून देतो.
देवबंदच्या माध्यमातून संवाद प्रस्थापित करणे भारताला औपचारिक राजनैतिक मर्यादांशिवाय तालिबानच्या वैचारिक दिशेला नव्याने आकार देण्याची संधी देते. या मार्गाने भारत इतिहास, संस्कृती आणि श्रद्धेवर आधारित ‘सॉफ्ट पॉवर’ अधिक दृढपणे दाखवू शकतो. आपल्या विद्वत्तापूर्ण आणि मध्यममार्गी देवबंदी परंपरेच्या महत्त्वावर भर देऊन भारत पाकिस्तानने विकृत केलेल्या कथानकाला प्रतिसाद देऊ शकतो आणि अफगाणिस्तानातील धार्मिक चर्चेला सामंजस्य आणि आत्मपरीक्षणाच्या दिशेने नेऊ शकतो.
अमीर खान मुत्तकी यांची देवबंद भेट ही केवळ प्रतीकात्मक कृती नाही, तर ती धार्मिक संगमाचा एक निर्णायक क्षण दर्शवते. जो जुने मतभेद अधिक तीव्र करू शकतो किंवा नवे मार्ग खुल्या संवादासाठी उघडू शकतो. भारताने ही संधी दूरदृष्टी आणि धोरणात्मक स्थैर्याने हाताळली, तर हा सामायिक आध्यात्मिक वारसा प्रादेशिक स्थैर्य आणि सहकार्यासाठी एक मजबूत पाया ठरू शकतो. अखेरीस, दक्षिण आशियाई इतिहासाच्या प्रवाहात देवबंदच्या अर्थावर सुरू असलेली ही स्पर्धा अफगाणिस्तानच्या भू-राजकीय स्पर्धेपेक्षाही अधिक निर्णायक ठरू शकते.
सौम्या अवस्थी ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी आणि टेक्नॉलॉजीच्या फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Soumya Awasthi is Fellow, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. Her work focuses on the intersection of technology and national ...
Read More +