Published on Oct 25, 2023 Updated 0 Hours ago

हैनान एसईझेडच्या विकासामुळे दक्षिण चीन समुद्राची भू-राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे.

चीनचे SEZ आणि दक्षिण चीन समुद्राचे भौगोलिक राजकारण

चीनच्या आग्नेय किनार्‍याजवळील विशेष आर्थिक क्षेत्रे ज्याला आपण सेझ (SEZ) असंही म्हणतो त्याचा आणि दक्षिण चीन समुद्राचा अगदी जवळचा संबंध आहे. हे संबंध भौगोलिक राजकारण, रणनीती आणि तांत्रिक नवकल्पना या क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहेत. चीनच्या व्यापक आर्थिक आणि सागरी धोरणांमध्ये या क्षेत्रांचं खूप महत्व आहे.

या SEZ क्षेत्रांनी गेल्या काही दशकांमध्ये चीनच्या आर्थिक परिवर्तनाला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सोबतच दक्षिण चीन समुद्रावरील दाव्यामागे त्यांची महत्वाची भूमिका आहे.

सेझ हे चीनच्या आर्थिक सुधारणा आणि खुल्या धोरणांचा एक महत्वाचा पैलू आहे. आर्थिक सुधारणांसाठी चीनने याचा मोठा वापर करून घेतला. या सेझचे काही उद्देश होते, ज्यात परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक वाढीस चालना देणे. चीनने 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात सेझची स्थापना करायला सुरुवात केली. हे सेझ चीनच्या कठोर केंद्रीय-नियोजित अर्थव्यवस्थेचं फलित म्हणता येईल. हा एक प्रयोग होता ज्यात आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्थांबद्दल समजून घेण्यासाठी या क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे चीनचे चारही सेझ प्रकल्प दक्षिण चीनच्या किनार्‍याजवळ स्थित होते. यामागचं प्रमुख कारण म्हणजे दक्षिण चीन समुद्रात सहज प्रवेश करून व्यापार सुखकर करता येईल आणि ते शक्यही झालं. चीनच्या आर्थिक परिवर्तनाला चालना देण्यात सेझने महत्वपूर्ण भूमिका बजावली. चीनने सागरी प्रदेशांवर दावे करायला सुरुवात केली ते याच दरम्यान. दक्षिण चिनी समुद्र आणि मलाक्का चेकपॉईंटच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या सागरी मार्गांवर नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी चीनला या सेझचा चांगला उपयोग झाला.

दक्षिण चिनी समुद्र सीमेला लागून असलेले प्रमुख SEZ

चीनच्या आग्नेय किनार्‍यावरील सेझ व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. हे झोन चीनच्या आर्थिक इंजिनांना चालना देणाऱ्या वस्तू, संसाधने आणि कच्च्या मालाच्या व्यापारासाठी खूप महत्वाचे आहेत. किनारपट्टीवर धोरणात्मकदृष्ट्या स्थित शेन्झेन, ग्वांगझू, झियामेन सारखे सेझ आणि हेनान बेटावरील सेझ हे जगातील सर्वात व्यस्त आणि सागरी व्यापार मार्गांपैकी एक आहेत. हा भौगोलिक फायदा वस्तू आणि सामग्रीच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि या झोनमध्ये आधारित उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवतो. या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गावर वसलेले सेझ जागतिक पुरवठा साखळीतील प्रमुख नोड्स म्हणून काम करतात. ते आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तृत महाजालात उत्पादन, असेंब्ल आणि वितरण याचं केंद्र म्हणून कार्य करतात. इथल्या सुस्थापित बंदरांमुळे आणि शिपिंग सुविधेमुळे या झोनची जागतिक अर्थव्यवस्थेशी नाळ घट्ट होते.

किनारपट्टीवर धोरणात्मकदृष्ट्या स्थित शेन्झेन, ग्वांगझू, झियामेन सारखे सेझ आणि हेनान बेटावरील सेझ हे जगातील सर्वात व्यस्त आणि सागरी व्यापार मार्गांपैकी एक आहेत. हा भौगोलिक फायदा वस्तू आणि सामग्रीच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.

या प्रदेशातील शेन्झेन हे प्रमुख सेझ आहे. चीनच्या आर्थिक सुधारणांचा प्रणेता अशी या सेझची ओळख आहे. हाँगकाँगला लागून असलेल्या, शेन्झेनच्या धोरणात्मक स्थानामुळे जागतिक आर्थिक केंद्राशी सहजीवन संबंध सुलभ झाले आहेत. हे सेझ जागतिक आर्थिक केंद्राना जवळ असल्यामुळे चीनला ज्ञान, भांडवल आणि तंत्रज्ञानाची अखंड देवाणघेवाण करणं सुलभ झालं. यामुळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि नवकल्पनांचे केंद्र म्हणून याची वाढ झाली. शेन्झेनला लागून असलेल्या ग्वांगझू शहरात असलेलं सेझ देखील महत्वाचं आहे. चीनच्या निर्यात-केंद्रित आर्थिक धोरणात ग्वांगझू या सेझमुळे औद्योगिक पाया रचला गेला. पर्ल नदीचा त्रिभुज प्रदेश आणि दक्षिण चीनचा समुद्र या स्थानामुळे ग्वांगझू व्यापार आणि वाणिज्यसाठी एक महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार बनले आहे, ज्यामुळे चीनच्या आर्थिक परिदृश्यात त्याचे महत्त्व आणखी दृढ झाले आहे.

किनार्‍यासह आणखी पूर्वेकडे सरकत असताना, झियामेन आणि हेनान हे सेझ आहेत. या सेझला देखील सामरिक महत्त्व आहे. तैवानच्या पलीकडे वसलेल्या झियामेनने मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या भौगोलिक समीपतेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, हेनान बेटाचे मुक्त व्यापारी बंदरात रूपांतर झाल्याने दक्षिण चिनी समुद्रात आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळाली आहे. हा चीनच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. चीनच्या आर्थिक विकासासाठी सेझची स्थापना आणि मिळालेलं यश हे त्यांच्या सागरी भूगोलाचा वापर करण्याच कौशल्य अधोरेखित करते. दक्षिण चिनी समुद्राच्या सीमेला लागून असलेल्या आग्नेय किनार्‍यावर धोरणात्मकरीत्या हे क्षेत्र शोधून, चीनने केवळ भरीव परकीय गुंतवणूकच आकर्षित केली नाही तर या क्षेत्रांना तंत्रज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देऊन आर्थिक इंजिन सुरू केलं.

चीनच्या आर्थिक विकासासाठी सेझची स्थापना आणि मिळालेलं यश हे त्यांच्या सागरी भूगोलाचा वापर करण्याच कौशल्य अधोरेखित करते.

हेनान सेझ साठी नवीन योजना

राजकीय आणि प्रशासकीय सुधारणा असूनही, हेनान सेझ चीनमधील इतर सेझ तुलनेने अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, 2018 मध्ये प्रस्तावित हेनान फ्री ट्रेड पोर्ट (HFTP) स्थापन करण्याची नवीन योजना, सर्वसमावेशक सुधारणांसह सेझच्या विकासाचे आश्वासन देते. 2025 पर्यंत हेनान सेझला जगातील सर्वात मोठ्या मुक्त व्यापार बंदरात रूपांतरित करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून हेनान फ्री ट्रेड पोर्टची स्थापना करण्यात आली. हेनान फ्री ट्रेड पोर्टला 11 शहरांच्या ग्रेटर बे एरियाशी जोडण्याची योजना आहे. यात हाँगकाँग, मकाऊ, ग्वांगझू , शेन्झेन, झुहाई, फोशान, झोंगशान, डोंगगुआन, हुइझोउ, जिआंगमेन आणि झाओकिंग हे प्रांत आहेत. एकात्मिक आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून, हेनानला एक प्रादेशिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना आहे कारण त्याला चीनचे हवाई असेही संबोधले जाते.

आर्थिक भूमिकेव्यतिरिक्त हेनान प्रांताची दूसरी एक महत्वपूर्ण भूमिका आहे. दक्षिण चिनी समुद्रातील विवादित वैशिष्ट्यांचे व्यवस्थापन करणारी संशा सिटी याच प्रांतात आहे. या शहराने चीनसाठी तीन महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी या शहराने चीनची बाजू घेतली आहे, विवादांमध्ये चीनच्या हितसंबंधांना सक्रिय आकार दिला आहे आणि रचनात्मक योगदान दिलं आहे. दक्षिण चिनी समुद्रावर पाळत ठेवण्यासाठी या शहरात चीनचं लष्कर मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. हे शहर अलीकडेच चिनी गुप्तहेरांचं मुख्य ठिकाण म्हणून चर्चेत आलं होतं. चीनने जे पाळत ठेवणारे फुगे सोडले होते त्यातला एक फुगा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने पाडला होता. खोल समुद्रातील संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी चीन सान्या येथे एक बंदरही बांधत आहे.

या शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे, आसियान सदस्य देश हेनानचे परदेशी भागीदार, गुंतवणूकदार, सहभागी आणि पर्यटक बनण्यास तयार आहेत. हे शहर आसियान उत्पादनांसाठी आणि ग्राहक वस्तू सेवांसाठी एक प्रमुख निर्यात बाजार असेल अशी अपेक्षा आहे.

pullquote]या शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे, आसियान सदस्य देश हेनानचे परदेशी भागीदार, गुंतवणूकदार, सहभागी आणि पर्यटक बनण्यास तयार आहेत.[/pullquote]

असं असलं तरीही हेनान फ्री ट्रेडसाठी दक्षिण चीनची भू-राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे. कारण अलिकडच्या वर्षांत व्हिएतनाम फिलीपिन्स, मलेशिया आणि अगदी इंडोनेशिया सारख्या देशांबरोबरच वाद वाढले आहेत. दक्षिण चिनी समुद्रात चीनचा हस्तक्षेप वाढत आहे या कारणावरून हे देश आणि आसियान संघटना चीनच्या दाव्यांविरुद्ध आवाज उठवत आहे. अलीकडील काही घटनांमध्ये चीनचा नकाशा नेहमीच्या नऊ-डॅश रेषेऐवजी 10 डॅश पर्यंत गेला आहे. यात चीनने दक्षिण चिनी समुद्रावर आपला हक्क दाखवला आहे हे दिसतं. फिलीपीन नौदलाशी असलेलं भांडण, त्यांचा अमेरिकेसोबत संयुक्त नौदल सराव यामुळे गोष्टी आणखीन बिघडल्या आहेत. त्यामुळे हेनान फ्री ट्रेडसाठी चीन आणि आसियान मधील घनिष्ठ आर्थिक संबंध हातभार लावतात की नाही हे येणारा काळच ठरवेल. वरवर पाहता, जरी हेनान फ्री ट्रेडच्या यशासाठी किंवा अपयशासाठी चीन-आसियान संबंध महत्त्वपूर्ण असले, तरीही दक्षिण चिनी समुद्रातील चीनची कृती हेनान सेझच्या आर्थिक योजनांशी विसंगत असल्याचे दिसून येते.

प्रत्‍नाश्री बसू ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.

ऐशिकी चौधरी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये इंटर्न आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.