Author : Suyash Desai

Published on Oct 31, 2023 Updated 0 Hours ago

अलीकडच्या काळामध्ये उपलब्ध झालेल्या काही पुराव्यांवरून असे दिसून येते की आण्विक धोरणाकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोन विकसित होत आहे. या झालेल्या बदलाचे महत्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

चीनचे बदलते आण्विक धोरण

गेल्या काही दशकांच्या तुलनेचा अभ्यास केला तर चीनची आण्विकरणनीती स्थिर राहिली आहे परंतु काही वर्षांमध्ये चीनचे अण्वस्त्र वेगाने विस्तारत असल्याचे दिसून येते. बीजिंग त्याच्या आण्विक वितरण प्रणालीचे सतत आधुनिकीकरण आणि विविधता आणत आहे. 2006 मध्ये संरक्षण विषयक प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत बीजिंगच्या आण्विक धोरणाचे सर्वात अधिकृत वर्णन करण्यात आलेले आहे. या दस्तऐवजात असे म्हटले आहे की चीन “स्व-संरक्षणात्मक आण्विक धोरण” अवलंबत आहे. चीनची पारंपारिक आण्विक रणनीती निश्चित प्रतिशोधासाठी मर्यादित आण्विक शस्त्रागार तसेच प्रथम वापर न करण्याच्या धोरणावर आधारित आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये चीनच्या आण्विक धोरणात झालेले बदल प्रामुख्याने प्रमाण, गुणवत्ता, विविधता आणि ऑपरेशन या चार गोष्टींवर आधारित असल्याने काही प्रश्न निर्माण करतात.

चीन आपल्या रॉकेट फोर्स ब्रिगेडचाही विस्तार करत आहे. 2017 आणि 2019 दरम्यान, चीनने 10 हून अधिक नवीन क्षेपणास्त्र ब्रिगेड जोडल्या आहेत— केवळ तीन वर्षांत 29 ते 39 ब्रिगेडचा अभूतपूर्व विस्तार करण्यात आला आहे.

प्रथम, चीनच्या आण्विक क्षमतांमध्ये परिमाणात्मक बदल होत आहे. 2020 मध्ये, युनायटेड स्टेट्स (यूएस) डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स चायना मिलिटरी पॉवर अहवालाने असा अंदाज लावला आहे की पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) च्या शस्त्रागारात सुमारे 200 आण्विक शस्त्रे आहेत. दुसरीकडे नवीनतम 2022 चायना मिलिटरी पॉवर हा अहवाल असे हायलाइट करतो की, PRC च्या आण्विक शस्त्रागारात 400 ऑपरेशनल आण्विक शस्त्रास्त्रे ओलांडली जाण्याची शक्यता आहे – पेंटागॉनच्या मागील अंदाजानुसार एका दशकात अशी पातळी गाठली गेली नसती. याबरोबरच पेंटागॉन ने असा अंदाज वर्तवलेला आहे की, या गतीने 2031 पर्यंत चीनकडे सुमारे 1,000 आणि 2035 पर्यंत 1,500 वॉरहेड्स असतील- 2010 च्या न्यू स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी (नवीन स्टार्ट ट्रीटी) अंतर्गत यूएस आणि रशियाला परवानगी दिलेल्या 1,550 वॉरहेड्सच्या बरोबरीने ही संख्या असणार आहे. शिवाय, चीन आपल्या रॉकेट फोर्स ब्रिगेडचाही विस्तार करत आहे. 2017 आणि 2019 दरम्यान, चीनने 10 हून अधिक नवीन क्षेपणास्त्र ब्रिगेड जोडल्या आहेत— केवळ तीन वर्षांत 29 ते 39 ब्रिगेडचा अभूतपूर्व विस्तार करण्यात आला आहे. सध्या, चीनकडे 40 हून अधिक कार्यरत PLA RF ब्रिगेड आहेत. अलीकडे युमेन, हमी, हँगगिन बॅनर आणि जिलानताई येथे सुमारे 350 ते 400 घन-इंधन क्षेपणास्त्र सायलो बांधले आहेत. पूर्वी, चीनने त्याच्या DF-5 द्रव-इंधन असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) साठी अनेक दशके फक्त 20 क्षेपणास्त्र सायलो चालवले होते. सायलोचे वाढणारे बांधकाम हे चीनच्या ऑपरेशनल पवित्र यामध्ये तसेच पद्धतीमध्ये बदल झाला असल्याचे दर्शविते. उदाहरणार्थ जिलानंताई येथील 14 सायलो हे स्पष्टपणे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच ऑपरेशनच्या नवीन संकल्पना विकसित करण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Table 1: Estimated global nuclear warheads inventories

Country Number of Active Nuclear Warheads Explanation
Russia 5,889 1674 Deployed + 2815 Reserved +1400 Retired
United States 5,244 1670 Deployed + 100 Deployed Nonstrategic + 1938 Reserved + 1536 Retired
China 400-410 N/A
France 290 N/A
United Kingdom 225 N/A
Pakistan 170 N/A
India 164 N/A
Israel 90 N/A
North Korea 30 N/A
Total Inventory 12,512  

Source: Hans M. Kristensen, Matt Korda and Eliana Reynolds, Federation of American Scientists, 2023.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीन आणि वितरण प्रणालीची गुणवत्ता अधिक सुधारत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीनने आपल्या अण्वस्त्रांच्या अचूकतेवर तसेच टिकून राहण्याच्या क्षमतेवर काम केले आहे. उदाहरणार्थ, चीनचे नवीनतम लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM), घन-इंधन असलेल्या डोंगफेंग (DF)-41, 100 मीटरच्या गोलाकार त्रुटीची शक्यता आहे. शिवाय तिची दुहेरी-सक्षम “हॉट-स्वॅपेबल” थिएटर-रेंज डिलिव्हरी सिस्टम, DF-26 इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, DF-21 क्षेपणास्त्राच्या जुन्या आवृत्तीपेक्षा अधिक अचूक आहे. चीनचा सायलो-आधारित ICBM फोर्सचा वेगवान विस्तार, लाँच-ऑन-वॉर्निंग (LOW) आण्विक स्थितीकडे जाण्याचा त्याचा प्रयत्न हायलाइट करणारा आहे. LOW म्हणजे शत्रूच्या क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठण्यापूर्वी येणार्‍या क्षेपणास्त्राचा शोध घेण्यासाठी शत्रूवर प्रक्षेपण करणारी प्रणाली होय. चीनच्या आण्विक रणनीतीचे अभ्यासक, फिओना कनिंगहॅम यांनी स्पष्ट केले की जमिनीवर आधारित मोबाईल आण्विक शक्तीच्या तोट्यांबद्दल चीनमध्ये त्यांच्या जगण्याची क्षमता, गतिशीलता, संप्रेषण खर्च हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. PRC मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल्स (MIRV) वर देखील काम करत आहे. नवीनतम 2022 चायना मिलिटरी पॉवर रिपोर्ट हायलाइट करतो की चीनचे DF-5B ICBM पाच MIRV वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे.

Table 2: China’s Nuclear-Capable Missile Inventory

Name Class Range (in km)
DF-41 ICBM 13,000-15,000
DF-5 ICBM 13,000
JL-3 SLBM Unknown
JL-2 SLBM 8,000-9,000
DF-31 ICBM 7,000-11,700
DF-4 ICBM/IRBM 4,500-5,500
DF-26 IRBM 4,000
DF-21 MRBM 2,150
DF-17 HGV 1,800-2,500
DF-16 SRBM 800-1,000
DF-15 SRBM 600
DF-11 SRBM 280-300
DF-12 SRBM 280
CJ-10 Cruise 2,000

Sources: Missile Defence Project, “Missiles of China,” Missile Threat, Centre for Strategic and International Studies, April 12, 2021. China, Missile Defence Advocacy Alliance, January 2023.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण आणि गुणवत्ते बरोबरच चीन आपल्या आण्विक वितरण प्रणाली मध्ये विविधता आणत आहे. भूमी-आधारित, समुद्र-आधारित आणि वायु-आधारित आण्विक वितरण प्रणालींचा समावेश असलेल्या आण्विक ट्रायडमध्ये प्रगती करत आहे. चिनी अणुशक्तीचा सर्वात विश्वासार्ह घटक म्हणजे जमिनीवर आधारित रोड-मोबाईल, MIRV-सक्षम DF-41 15,000 किमीच्या ऑपरेशनल रेंजसह आहे. तथापि, चीनच्या टाईप 094 अणुऊर्जेवर चालणार्‍या बॅलिस्टिक मिसाइल पाणबुड्या (SSBNs), ज्यांना बूमर म्हणूनही ओळखले जाते.  त्यांना त्यांच्या सामरिक प्रतिकाराचे सर्वात आवश्यक साधन मानले जाते. या संदर्भामध्ये एक वृत्त असे देखील आहे की चीनकडे JL-2 आणि शक्यतो JL-3 पाणबुडी लाँच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (SLBM) ने सशस्त्र सुमारे पाच ते सहा ऑपरेशनल जिन-क्लास SSBNs आहेत. या क्षेपणास्त्रांची क्षमता अमेरिकेपर्यंत पोहोचण्या इतके ते सक्षम आहेत.  शिवाय, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, अण्वस्त्रे वितरीत करू शकणारे चिनी H-6 बॉम्बर आता पूर्णपणे कार्यरत मानले जातात. PRC नवीन आण्विक-सक्षम सबसॉनिक स्ट्रॅटेजिक स्टेल्थ बॉम्बर, Xian H-20 आणि हवेतून प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील विकसित करत आहे. येत्या दोन वर्षात ही सेवेत दाखल होऊ शकतात. या घडामोडींमुळे PRC ला प्रथमच विश्वासार्ह आण्विक ट्रायडच्या उंबरठ्यावर आणले गेले आहे.

चिनी अणुशक्तीचा सर्वात विश्वासार्ह घटक म्हणजे जमिनीवर आधारित रोड-मोबाईल, MIRV-सक्षम DF-41 15,000 किमीच्या ऑपरेशनल रेंजसह आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे अलीकडील पायाभूत सुविधांतील बदलांसह PRC नवीन ऑपरेशनल पॅटर्न आणि संकल्पना विकसित करत आहे. PLARF कदाचित त्याच्या प्रक्षेपण ब्रिगेड्स किंवा सायलोच्या जवळ आण्विक वॉरहेड्स साठवण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे. ऐतिहासिकदृष्ट्या बेस 67 (पूर्वीचा बेस 22), किनलिंग [秦岭] पर्वतराजीत खोलवर वसलेला आहे. चीनच्या आण्विक शस्त्रास्त्रांच्या देखरेखीसाठी जबाबदार देखील आहे. चीनमधील सुरक्षा विषयातील तज्ञ डेव्हिड लोगन आणि फिलिप सॉंडर्स यांनी त्यांच्या अलीकडे केलेल्या संशोधनामध्ये असा मुद्दा मांडला आहे की, रॉकेट फोर्सच्या आण्विक-वॉरहेड हँडलिंग रेजिमेंट, ज्या पूर्वी क्षेपणास्त्र तळांच्या अधिकारक्षेत्रात होत्या, त्या आता केंद्रीय वॉरहेड डेपोच्या आदेशाखाली आहेत. याचा अर्थ वितरीत वॉरहेड हाताळणी पद्धतींद्वारे केंद्रीकृत नियंत्रण प्रणालीकडे जाण्याचा हेतू आहे. या पार्श्वभूमीवर क्षमता सक्षम करण्यासाठी चीन त्यांच्या सायलो फोर्सेस उच्च सतर्कतेवर सक्षम करू शकतो त्याच बरोबर क्षेपणास्त्रे थेट वार हेड्ससह फिरवण्याच्या आधारावर प्रक्षेपित करण्यासाठी देखील तयार ठेवण्यात आले आहेत

Table 3: PLA RF Bases

Base Number Nature of Work City
Base 61 Operations Huangshan
Base 62 Operations Kunming
Base 63 Operations Huaihua
Base 64 Operations Lanzhou
Base 65 Operations Shenyang
Base 66 Operations Luoyang
Base 67 Warhead Stockpile Baoji
Base 68 Engineering Luoyang
Base 69 Test and Training Yinchuan

Source: Ma Xiu, PLA Rocket Force Organization, China Aerospace Studies Institute.

या सर्व घडामोडीं व्यतिरिक्त चीन पूर्व चेतावणी रिमोट सेन्सिंग उपग्रह तसेच प्रगत ग्राउंड आधारित रडार यासारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकसित करण्यावर देखील काम करत आहे. अलीकडच्या काळामध्ये चीनने त्याच्या नवीन हायपर सोनिक ग्लाइड वाहनाची फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बर्डमेंट सिस्टमसह चाचणी केली आहे. यासंदर्भातील काही पुरावे ही गोष्ट अधोरेखित करतात की, चीनचा आण्विक धोरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक विकसित होत आहे या बदलाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. डेव्हिड लोगन आणि फिलिप सी. सॉन्डर्सचे अलीकडील प्रकाशन या घटकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणारे आहेत. जगातील विविध क्षेत्रातील विद्वानांचे याच स्वरूपाचे योगदान PRC च्या घोषणात्मक आण्विक धोरण तसेच आण्विक क्षमता वाढविण्याच्या विसंगतीची सूक्ष्म समज प्रदान करण्यास मदत करणारी ठरू शकेल.

सुयश देसाई हे चीनच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांचा अभ्यास करणारे रिसर्च स्कॉलर आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.