-
CENTRES
Progammes & Centres
Location
झपाट्याने बदलणाऱ्या काळातही चीनची कृषिजैवविविधता — हवामान लवचिकता, अन्नप्रणाली ही पर्यावरणीय शाश्वततेसाठी अनमोल ठरत आहे.
Image Source: Getty
विविध आणि विस्तृत कृषी-परिस्थितिक क्षेत्रांमुळे चीन हा जागतिक कृषिजैवविविधतेच्या 12 महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक मानला जातो. विविध भूप्रदेशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये खोलवर रुजलेली ही संपन्नता दीर्घकाळ 1.4 अब्जांहून अधिक लोकसंख्येसाठी अन्न आणि पोषण सुरक्षेला आधार देत आली आहे. मात्र, झपाट्याने होणारी आधुनिकता, औद्योगिक कृषीपद्धती आणि हवामान बदल या घटकांमुळे सध्या चीनच्या कृषिजैवविविधतेवर मोठा ताण येतो आहे, आणि शाश्वत कृषी व पोषण सुरक्षा साध्य करणे अधिक आव्हानात्मक होत आहे.
चीनमधील कम्युनिटी सीड बँक (Community Seed Banks) ग्रामीण समुदायांना स्थानिक हवामान आणि सांस्कृतिक गरजांनुसार जुळवून घेतलेल्या पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करून ‘बियाणे आणि अन्न सार्वभौमत्व’ (seed and food sovereignty) टिकवण्यास सक्षम करतात.
चीनच्या कृषिजैवविविधतेचं सर्वात प्रतीकात्मक उदाहरण म्हणजे युनान प्रांतातील होंघे हानी भातशेती टेरेसेस, गेल्या 1300 वर्षांत विकसित झालेलं आणि 16,603 हेक्टरमध्ये पसरलेलं कृषिसंस्कृतीचं अद्वितीय रूप. हे शेतीपद्धतीचे प्रकार म्हणजे पर्यावरणाशी सुसंवाद साधत हानी जमातीने पिढ्यानुपिढ्या विकसित केलेली एक अत्याधुनिक ‘इकोलॉजिकल इंजिनिअरिंग’ प्रणाली आहे. यामध्ये भात-मत्स्य-बदकांचे सहजीवन हे एक चक्रीय आणि समाकलित पारंपरिक कृषी मॉडेल दिसून येतं, जिथे भातशेतीतून धान्य उत्पादनासोबतच मत्स्य आणि बदकांनाही आधार मिळतो. परिणामी, नैसर्गिक कीटकनियंत्रण आणि सेंद्रिय खतांचे चक्र चालते, रासायनिक इनपुट्सवरचा अवलंब कमी होतो, जैवविविधता वृद्धिंगत होते आणि अन्न व उत्पन्नाचे विविध स्रोत मिळतात. या व्यवस्थांचा उपयोग केवळ उत्पादनापुरताच मर्यादित नसतो, तर स्थानिक संस्कृतीचं संवर्धन, सामूहिक श्रमाचं पोषण आणि पारंपरिक पारिस्थितिक ज्ञानाचं जतनही या माध्यमातून होतं.
Source: Rice-Fish-Duck Symbiosis
चीनसाठी कृषिजैवविविधतेचा पोषणमूल्यांशी असलेला संबंध तितकाच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये वेगवेगळे पीकप्रकार, पशुधन आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. अनेक बाबतीत, चीनची हरित क्रांती ही शाश्वत कृषिपद्धतींना पुढे नेणाऱ्या तंत्रज्ञानात्मक नवकल्पनांच्या आघाडीवर आहे. पारंपरिक आणि पोषणयुक्त अशी जव, तांदूळ गहू (बकव्हीट), नाचणी, ओट्स, बाजरी, ज्वारी यांसारखी ‘अल्पवापरली जाणारी धान्य’ पिकं चीनच्या अन्न आणि पोषण सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कृषिजैवविविधता ही कृषि-स्थित्यंतराला बळकटी देणाऱ्या बियाणे व्यवस्थेचं मुख्य आधारस्तंभ आहे. चीनमध्ये नवीन पीकवाणांची निर्मिती आणि अन्नसुरक्षेसाठी जागतिक पातळीवर सर्वात प्रगत आणि मोठ्या बियाणे/जर्मप्लाझ्म संग्रहांपैकी एक आहे. यासोबतच, स्थानिक हवामान व संस्कृतीनुसार अनुकूल झालेल्या पारंपरिक वाणांचं जतन व पुनरप्रसारण करणाऱ्या कम्युनिटी सीड बँक्स देशभर कार्यरत आहेत. या माध्यमातून ग्रामीण समुदायांना बियाणे आणि अन्न सार्वभौमत्व मिळतं, म्हणजेच त्यांच्या गरजांनुसार आणि त्यांच्या ताब्यात टिकून राहणारी कृषी स्वायत्तता वाढीस लागते.
तांदूळ–मासे–बदक (rice-fish-duck) यांचं परस्परसंलग्न सहजीवन हे चक्राकार, समाकलित आणि पारंपरिक कृषिपद्धतीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या पद्धतीमुळे रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी होतं, जैवविविधतेला चालना मिळते आणि शेतीचं नैसर्गिक संतुलन टिकून राहतं.
अपेक्षेनुसार भरपूर संधी असताना, चीनची agrobiodiversity सध्या मोठ्या धोक्याखाली आहे, कारण तीव्र कृषी विस्तार, पारंपरिक जातींच्या आनुवंशिक क्षयामुळे आणि नवनवीन तंत्रांच्या अतिरेकी वापरामुळे तिचा ऱ्हास होत आहे. शहरीकरण आणि जमिनीच्या वापरातील बदलांमुळे जैवविविधतेने समृद्ध असलेली शेतीची क्षेत्रं झपाट्यानं कमी होत आहेत. याचबरोबर, पिढ्यानपिढ्यांचं पारंपरिक ज्ञान, स्थलांतराच्या लाटांमुळे आणि ग्रामीण ते शहरी स्थलांतरामुळे झपाट्यानं लोपण्याच्या धोक्यात आहे. परिणामी मौल्यवान पारिस्थितिक व कृषी वारसा हरवण्याचा गंभीर धोका उभा राहिला आहे.
धोरणात्मक पातळीवर संरक्षण व agrobiodiversity च्या संवर्धनासाठी संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. चीनच्या ‘Ecological Civilisation’ या राष्ट्रीय विकास धोरणाच्या चौकटीत जैवविविधतेचं महत्त्व मान्य करण्यात आलं आहे. ‘Grain for Green’ यांसारख्या उपक्रमांतर्गत शेत जमीन परत जंगल किंवा कुरणामध्ये रूपांतरित करणे आणि काही भागांत agroecological पद्धतींचा प्रचार करणे हे सकारात्मक पावलं आहेत. मात्र हे प्रयत्न अद्यापही अपुरे ठरत आहेत. कारण औद्योगिक शेतीच्या वाढत्या आर्थिक प्रोत्साहनांना टक्कर देणं अजूनही मोठं आव्हानच आहे.
उत्साहवर्धक बाब म्हणजे, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा धोरणांमध्ये agrobiodiversity चा अधिक स्पष्ट आणि ठळक समावेश करता येऊ शकतो. उदाहरणार्थ, शासकीय खरेदी योजना, शाळांतील पोषण आहार कार्यक्रम आणि बाजारपेठा या साऱ्यांचा उपयोग करून पारंपरिक व सध्या कमी प्रमाणात लागवड होणाऱ्या पिकांना चालना देता येईल आणि त्यांच्या वापरालाही प्रोत्साहन मिळवून देता येईल. तसंच, आहार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणि सार्वजनिक आरोग्यविषयक संदेशांमध्ये स्थानिक संस्कृतीशी जोडलेल्या अन्नविविधतेचा प्रचार करता येईल. यामुळे केवळ पोषण सुधारणा साधली जाईल असं नाही, तर जैवविविधतेला पूरक असलेल्या शेतीला बाजारातूनही आवश्यक पाठबळ मिळेल आणि शाश्वत शेतीच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल टाकता येईल.
त्याचबरोबर, शेतकऱ्यांचा जैवविविधता संवर्धनातील सहभाग वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. शेतकरी हे केवळ तंत्रज्ञान किंवा धोरणांचे लाभार्थी नसून agrobiodiversity चे सक्रिय संरक्षक आहेत. पूर्व चीनमधील ‘सीड टू टेबल’ (Seed to Table) उपक्रमाचा उद्देश म्हणजे शाश्वत कृषि-अन्न प्रणालींना प्रोत्साहन देणं आणि स्थानिक समुदाय व बाजारपेठांमधील संबंध बळकट करणं. पारंपरिक वाणांच्या सुधारणा (Participatory Plant Breeding), समुदाय स्तरावरील बीज महोत्सव (Community Seed Fairs), आणि शेतकरी प्रशिक्षण शाळा (Farmer Field Schools) या सर्व माध्यमातून ज्ञाननिर्मितीला चालना दिली जाते, बीज नेटवर्क मजबूत केले जातात आणि पीक जैवविविधतेचे लवचिक व्यवस्थापन शक्य होते. असे उपक्रम चीनच्या अल्पसंख्याक समाज असलेल्या प्रदेशांमध्ये विशेषतः महत्त्वाचे ठरतात, जिथं जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा हे परस्पर गुंफलेले आहेत.
पारंपरिक व पोषणमूल्याने समृद्ध अशा बार्ली, बुगरविट (buckwheat), मिलेट्स, ओट्स आणि ज्वारी (sorghum) सारख्या पिकांनी चीनच्या अन्न व पोषण सुरक्षेमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे.
तंत्रज्ञानातील नवकल्पना कृषिजैवविविधतेला बळ देण्यासाठी नवे मार्ग उघडू शकतात. मोबाईल-आधारित प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून बियाण्यांची देवाणघेवाण, जल व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज व जैवविविधतेचे निरीक्षण शक्य होऊ शकते. परंपरागत ज्ञानाचे डिजिटल दस्तऐवजीकरण आणि ओपन-सोर्स बियाणे डेटाबेसची उभारणी केल्यामुळे पिढ्यानपिढ्यांमधील दरी भरून काढता येईल आणि कृषी ज्ञानाची सातत्य राखता येईल. मात्र, अशा साधनांचा अवलंब करताना लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून व सर्वसमावेशक प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
एकंदरीत पाहता, कृषिजैवविविधता ही केवळ चीनच्या कृषी परंपरेतील वारसा नसून भविष्यासाठीची एक महत्त्वपूर्ण भांडवली संपत्ती आहे. हवामान बदल, पर्यावरणीय ऱ्हास व पोषणातील बदलांच्या संकटांना सामोरे जात असताना, चीनची ही समृद्ध जैवविविधता अधिक शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक अन्नप्रणाली घडविण्यात मोलाची भूमिका बजावू शकते. युनानमधील टेरेस शेतीपासून हरबिनच्या थंड हवामानाला सहन करणाऱ्या सीड बँकांपर्यंत चीनच्या कृषिजैवविविधतेत साठवलेली लँडस्केप्स, बियाणे आणि ज्ञान स्थानिक स्वरूपाचं असलं तरी जागतिक महत्त्वाचं आहे. कृषिजैवविविधतेला शाश्वत अन्नप्रणालीचा केंद्रस्थानी आणण्यासाठी एकात्मिक धोरणात्मक पावले आणि व्यापक सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे. ही केवळ भविष्यातील संकटांपासून संरक्षण देणारी इंश्युरन्स नसून, रोजच्या अन्न उत्पादन आणि शेतकरी उपजीविकेचा सजीव पाया आहे.
शोबा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या (ORF) हेल्थ इनिशिएटिव्हमध्ये वरिष्ठ फेलो (Senior Fellow) आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...
Read More +