Published on Jan 15, 2024 Updated 0 Hours ago

नेपाळ-भारत-बांगलादेश (NIB) याच्यातील उर्जा संदर्भातील व्यापार हे हिमनगाचे फक्त टोक बनले आहे. एनआयबी इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या निर्मितीद्वारे एनआयबी क्षेत्राची खरी क्षमता मात्र या निमित्ताने लक्षात येऊ शकते.

नेपाळ-भारत-बांगलादेश (NIB) प्रादेशिक आर्थिक कॉरिडॉरसाठी नवीन फ्रेमवर्क देऊ शकेल का?

परराष्ट्र मंत्र्यांच्या उच्चस्तरीय संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या 2024 मधील दोन दिवसीय नेपाळच्या दोऱ्याची सुरुवात झाली आहे. नेपाळकडून भारताला 10,000 मेगावॅट वीज विकणे आणि त्यानंतर भारतामार्फत नेपाळी जलविद्युत बांगलादेशला विकण्याबाबत चर्चा करणे हे या भेटीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. यामुळे नेपाळ-भारत-बांगलादेश (NIB) ऊर्जा व्यापाराला निश्चित सुरुवात होणार आहे. तथापि एनआयबी क्षेत्रामध्ये सुप्त असलेल्या प्रचंड क्षमतेच्या दृष्टीने ऊर्जा व्यापार हे हिमनगाचे फक्त टोक आहे—अशी क्षमता जी केवळ आर्थिक सहकार्याद्वारे  अधिक लक्षणीयरीत्या NIB आर्थिक कॉरिडॉरच्या निर्मितीद्वारे साकार केली जाऊ शकते. दक्षिण आशियाची लोकसंख्या १.८ अब्जच्या जवळपास असताना औपचारिक आंतर-प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक अत्यंत कमी झालेली आहे. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) 2014 पासून कोणत्याही बैठका न घेतल्याने सुप्तावस्थेत गेलेले दिसत आहे. 2004 मध्ये मोठ्या थाटामाटात स्वाक्षरी केलेला दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (SAFTA) देखील कागदावरच राहिलेला दिसत आहे. सार्कमधील समस्यांमुळे अनेकांना असे वाटू लागले की पर्यायी बिमस्टेक फ्रेमवर्क हा एक व्यवहार्य उपाय असू शकतो, परंतु ते व्यापार आघाडीवर फारसे आश्वासक दिसत नाही. BIMSTEC आंतर-प्रादेशिक व्यापार 2021 मध्ये ASEAN सारख्या तुलनात्मक प्रादेशिक फ्रेमवर्कच्या तुलनेत 10 टक्के इतका कमी होता. दुसरीकडे  बांगलादेश, भूतान, भारत आणि नेपाळ (BBIN) प्रादेशिक पुढाकार मोटरीच्या व्यापारी वाहन करार (MVA) जून 2015 मध्ये स्वाक्षरीने सुरू झाला आहे.  तथापि, BBIN MVA अंतर्गत, भूतानने संभाव्य पर्यावरणीय परिणामांमुळे वाहनांसाठी त्याच्या रस्त्यांवर अमर्यादित प्रवेश देण्याबाबत अटकाव घातला आहे. मार्च 2022 मध्ये प्रोटोकॉलवरील शेवटच्या बैठकीपासून फारशी हालचाल झालेली नाही. BBIN आर्थिक कॉरिडॉरच्या निर्मितीसह BBIN MVA व्यापक प्रादेशिक आर्थिक सहकार्याचा मार्ग मोकळा करू शकेल असे अनेकांना वाटत असले तरी, MVA सोबतच्या संकोचामुळे अशा विचारांच्या विरोधात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी पर्यायी एनआयबी (नेपाळ, भारत आणि बांगलादेश) आर्थिक कॉरिडॉरचा प्रस्ताव का नाही?

BIMSTEC आंतर-प्रादेशिक व्यापार 2021 मध्ये ASEAN सारख्या तुलनात्मक प्रादेशिक फ्रेमवर्कच्या 10 टक्के इतका कमी होता.

स्थानिक संसाधनांवर आधारित कृषी उत्पादनांचा व्यापार अनौपचारिकपणे होत असताना औपचारिक व्यापाराकडे प्रोत्साहनपर वाटचालीची हमी देत असताना मुख्य आर्थिक क्षमता पर्यटनामध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. नेपाळ, पूर्व आणि ईशान्य भारत, बांगलादेश यांचा समावेश असलेला NIB कॉरिडॉर 400 दशलक्ष लोकांची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा आहे. चार-भांडवल वर्गीकरणाच्या संदर्भात ज्यामध्ये भौतिक, मानवी, नैसर्गिक आणि सामाजिक भांडवल यांचा समावेश आहे. भौतिक भांडवल वगळता NIB प्रदेश उर्वरित तीनमध्ये मुबलकता दिसत आहे. प्रदेशातील अफाट खनिज संसाधने, जंगले आणि नदीचे खोरे हे महत्त्वपूर्ण नैसर्गिक भांडवल व्यापाराचा पाया भक्कम बनवतात. उदाहरणार्थ, पर्वत, जे NIB क्षेत्राचा बराचसा भाग व्यापतात ते इकोसिस्टम सेवांचे महत्त्वपूर्ण स्त्रोत बनलेले आहेत. या संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी संस्थात्मक सहकार्याची गरज हे अधोरेखित करते. याव्यतिरिक्त, नदीच्या खोऱ्यातील विस्तृत नैसर्गिक भांडवल, धातू आणि खनिजांचे महत्त्वपूर्ण साठे, जंगले निसर्गावर आधारित वस्तूंच्या जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक तुलनात्मक फायद्याची संधी देतात. जरी हे फायदे मोठ्या प्रमाणात अप्रयुक्त आहेत तरी देखील. इकोसिस्टम सेवांच्या मूल्यांचे काही पुराणमतवादी अंदाज असे सूचित करतात की दक्षिण आशियामध्ये, मानवी समुदायाला औपचारिक आणि अनौपचारिक आर्थिक गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त मूल्य (25 टक्के जास्त प्रमाणात) इकोसिस्टममधून मिळत आलेले आहे.

मानवी भांडवलाच्या संदर्भात नेपाळ, पूर्व आणि ईशान्य भारत आणि बांगलादेश मुबलक आणि किफायतशीर कर्मचारी पुरवत आलेले आहेत. दरम्यान, पश्चिम भारत आणि त्याच्या शेजारील अर्थव्यवस्था कमी कामगार खर्च, वाढता वापर दर, शहरीकरण आणि उत्पादन आणि शेतीवर लक्ष केंद्रित करत आलेले आहेत. कोविडच्या अगदी आधी  बांगलादेश आयटी फ्रीलान्सिंगचे केंद्र म्हणून उदयास आले होते, ज्यात 600,000 फ्रीलांसरचा समुदायाचा समावेश आहे. NIB प्रदेश हे प्रामुख्याने तरुण लोकसंख्येद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, महत्वाकांक्षी दूरगामी, वसाहतवादी भूतकाळाशी त्याचा फारसा संबंध नाही. ही लोकसंख्या भविष्यातील राजकीय परिदृश्यावर प्रभाव टाकणारी आहे. उदाहरणार्थ 2018 पासून भारतातील कार्यरत वयाची लोकसंख्या तिच्या अवलंबून असलेल्या लोकसंख्येपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश 2055-37 वर्षांच्या कालावधीपर्यंत टिकेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे नेपाळची 65 टक्के लोकसंख्या 15-64 वर्षे वयोगटातील आहे. सुमारे 59 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी आहे आणि 29 टक्के लोकसंख्या अजूनही 15 वर्षांपेक्षा कमी आहे. लोकसंख्येतील हा बदल दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या चांगल्या संधी यासारखे मजबूत सामाजिक संकेतक असल्यास संरचना जलद वाढीस कारणीभूत ठरणारी असू शकते.

NIB प्रदेश हे प्रामुख्याने तरुण लोकसंख्येद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, महत्वाकांक्षी दूरगामी, वसाहतवादी भूतकाळाशी त्याचा फारसा संबंध राहिलेला नाही.

शेवटी, डिजिटलायझेशन आणि जागतिकीकरण या मुळे जग संकुचित झाले आहे. एका देशाची प्रत्येक गोष्ट दुसर्‍या देशात अनौपचारिकपणे उपलब्ध असताना, अशा व्यापाराला औपचारिकता देण्याचे आव्हान समोर उभे आहे. ई-कॉमर्स पोर्टल्स बांगलादेशातील सीफूडसाठी पूर्व भारत आणि नेपाळमध्ये मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहन देतात. ज्याप्रमाणे काठमांडूमध्ये उत्पादित उच्च-किंमतीचे चीज ढाकामधील उच्च-उत्पन्न गटांसाठी उत्पन्नाचा  मार्ग शोधू शकले आहे.. डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट आणि कर संकलन सुलभ करत आहेत, ज्यामुळे सुलभता आणि पारदर्शकता सुधारत आहे. लॉजिस्टिक कंपन्या सीमेवर लाच गोळा करण्यासाठी आणि देण्यासाठी एजंट बनण्याऐवजी सेवा पुरवण्याच्या व्यवसायात विकसित झाल्या आहेत.

त्याच वेळी मध्य पूर्व, युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स (यूएस) आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी भारताच्या वाढत्या आर्थिक संबंधांचा वापर करण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. जे NIB च्या वायब्रंट फॅक्टर मार्केटसाठी एक शक्तिशाली उत्पादन बाजारपेठ, नैसर्गिक भांडवल उपलब्ध करून देतात. NIB ला फक्त त्याचे भौतिक भांडवल विकसित करणे आवश्यक आहे - येथेच भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला नेतृत्व प्रदान करणे आवश्यक झालेले दिसत आहे.

सीमा व्यापार आणि वाहतूक अधिक सुलभ झालेली आहे कारण एका देशातून माल, दुसऱ्या देशातून वाहतूक करताना दुसऱ्या देशात बाजारपेठ शोधू शकतो.

विकसनशील देशांमधील आर्थिक सहकार्याचे एक यशस्वी मॉडेल म्हणजे पूर्व आफ्रिका समुदाय (EAC). EAC व्हिसा केनिया, रवांडा आणि युगांडामध्ये सिंगल व्हिसावर प्रवेश देत आहे. जो वाढलेल्या प्रादेशिक व्यापार आणि लोकांच्या हालचालींमध्ये दिसून येतो. सीमा व्यापार आणि वाहतूक सुलभ झाली आहे. कारण एका देशातून माल, दुसऱ्या देशातून वाहतूक करताना दुसऱ्या देशात बाजारपेठ शोधू शकतो. या क्रॉस-बॉर्डर संधी पाहता दुबईस्थित डीपी वर्ल्डसारख्या कंपन्या लॉजिस्टिक हब उभारत आहेत. रुसुमो जलविद्युत प्रकल्प रवांडा, बुरुंडी आणि टांझानिया यांनी तिन्ही देशांच्या वापरासाठी संयुक्तपणे विकसित केला आहे. EAC दक्षिण आशियासाठी आणि विशेषत: NIB साठी शिकण्यासाठी अतिशय उपयुक्त मॉडेल ऑफर करते आहे. एनआयबी इकॉनॉमिक कॉरिडॉरचे उद्दिष्ट व्यापारातील अडथळे दूर करणे, व्यवसायासाठी सक्षम परिस्थिती निर्माण करणे, अंतर्गत व्यवसाय करण्याच्या व्यवहारावरील खर्च कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वाढत्या उत्पादन बाजारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्वपूर्ण घटक असलेली बाजारपेठ निर्माण करणे हे असेल. आधी चर्चा केल्याप्रमाणे उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसित जग यांच्यातील महत्वाचा दुवा असेल. 

WTO द्वारे 2023 च्या जागतिक व्यापार अहवालात पुनर्जागतिकीकरणाच्या युगाची कल्पना स्पष्ट करण्यात आली आहे जिथे जागतिकीकरण प्रादेशिक सहकार्याद्वारे नवीन अवतारात उदयास येणार आहे. NIB आर्थिक कॉरिडॉरमध्ये त्या प्रस्तावित मॉडेलचे प्रतीक बनण्याची क्षमता देखील आहे.

निलांजन घोष हे CNED आणि ORF कोलकाता (ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे) संचालक आहेत.

सुजीव शाक्य हे नेपाळ इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Nilanjan Ghosh

Nilanjan Ghosh

Dr. Nilanjan Ghosh is a Director at the Observer Research Foundation (ORF), India. In that capacity, he heads two centres at the Foundation, namely, the ...

Read More +
Sujeev Shakya

Sujeev Shakya

Sujeev Shakya is the Chair of the Nepal Economic Forum and a Senior Fellow at the National University of Singapore Institute of South Asian Studies ...

Read More +