देशाच्या डोंगराळ पूर्व अझरबैजान प्रांतात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहिया यांच्या अकाली निधनाने संपूर्ण प्रदेशात हाहाकार माजला आहे. रईसी यांच्या मृत्यूची घोषणा शियांकरता इराणमधील वंदनीय अशी पवित्र वास्तू असलेल्या इमाम रझा यांच्या समाधीवरून, मशहाद या त्यांच्या जन्मगावी करण्यात आली.
इराणच्या राजकारणातील हे अनपेक्षित पण संरचनेशी संबंधित बदल एका अनिश्चित वेळी घडले आहेत, जेव्हा गाझात युद्ध सुरू आहे, इराण व इस्रायलमधील तणाव कायम आहे आणि इराण त्याच्या रशिया व चीन या भागीदारांसह 'समान स्वारस्य असलेल्या राष्ट्रांच्या गटाच्या' राजकारणातील नव्या पुनरावृत्तीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र, इराणच्या ‘प्रश्ना’भोवती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय तणाव असूनही, रईसी यांच्या जाण्याने शिया सत्तेच्या प्रादेशिक धोरणांपेक्षा इराणी राजकारणावर जास्त परिणाम होतो.
रईसी यांच्या मृत्यूची घोषणा शियांकरता इराणमधील वंदनीय अशी पवित्र वास्तू असलेल्या इमाम रझा यांच्या समाधीवरून, मशहाद या त्यांच्या जन्मगावी करण्यात आली.
५० दिवसांच्या आत पुन्हा निवडणुका होईपर्यंत सध्या, उपाध्यक्ष मोहम्मद मुखाबिर (जे इराणचे भारतासाठी विशेष दूतदेखील आहेत) अंतरिम अध्यक्षपद भूषवतील.
उत्तराधिकारी
दिवंगत राष्ट्राध्यक्ष सत्तेत पटकन यश मिळवून सत्तास्थानी बसलेले नव्हते, तर त्यांचा राजकारणातील वावर पारंपरिक पद्धतीने आणि स्थिर होता. इस्लामिक विद्वानांच्या वंशात जन्म घेतलेले, रईसी देशाच्या न्यायिक व्यवस्थेतून पुढे आले आणि त्यांनी १९७९ पासून इराणी विचारसरणी आणि राजनैतिकतेवर आधारित असलेल्या इस्लामिक क्रांतीची आचारसंहिता राबविण्यासाठी जीवापाड मेहनत केली. प्रख्यात अभ्यासक अराश अझिझी यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, अयातुल्ला खामेनी यांच्या नेतृत्वाखाली रईसी हे सर्वोच्च नेत्याप्रती अतीव निष्ठा असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. वर्षानुवर्षे आपली क्षमता सिद्ध करून, रईसी हे ऑगस्ट २०२१ मध्ये देशाचे आठवे राष्ट्राध्यक्ष बनले, जेव्हा अमेरिकेने अणुकरारातून कोणतेही स्पष्टीकरण न देता घाईघाईने काढता पाय घेतला होता आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांच्या नेतृत्वाखाली देशातील मध्यमवर्ग, संस्थात्मकदृष्ट्या बाजूला केला जात होता.
सार्वजनिक अवमानाच्या अत्यंत दुर्मिळ कृतीत, रूहानी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्र जारी केले, जिथे त्यांनी तज्ज्ञांच्या सभेतील जागेकरता ते अपात्र असल्याचे अधोरेखित करणाऱ्या शक्तिशाली गार्डियन कौन्सिलच्या नावे विलाप केला, आणि पुराणमतवाद्यांच्या नियंत्रणाखालचे वर्तुळ अधिक आकसले जात असल्याचा इशारा दिला. रईसी यांच्या निधनामुळे इराणी वर्तुळात सत्तासंघर्षाला तोंड फुटेल. २०२१ मध्ये रईसी यांच्या उमेदवारीच्या बाजूने निवडणुका ‘फसव्या किंवा अप्रामाणिक मार्गांनी हाताळल्या’चा आरोप करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत इराणमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. मार्चमध्ये, संसदीय आणि तज्ज्ञांच्या विधानसभा निवडणुकीत केवळ ४१ टक्के इराणी नागरिकांनी मतदान केले.
मात्र, निवडणुकीच्या राजकारणापलीकडे, इस्लामिक प्रजासत्ताकात एकापाठोपाठ एक मोठे खेळ खेळले जात आहेत. देशाची धोरणे, राजकारण आणि भविष्य यांच्या बाबतीत इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांचा शब्द अंतिम मानला जातो, ते आता वयाच्या ऐशीच्या उत्तरार्धात आहेत. रईसी यांच्यासह, अयातुल्लाचा मुलगा मोजतबा खामेनी आणि खामेनी यांचे आणखी एक विश्वासू सहकारी अलिरेझा अराफी हे इराणचे सर्वोच्च नेते बनण्याच्या शर्यतीत होते. रईसी यांचा निर्दोष वैचारिक इतिहास आणि क्रांती व अयातुल्ला खामेनी यांच्याप्रती निष्ठा, प्रामुख्याने विशेषत: १९८० च्या दशकाच्या मध्यात- जेव्हा ते खामेनी यांचे आवडते ‘डेप्युटी प्रॉसिक्युटर जनरल’ म्हणून चर्चेत आले. परंतु खामेनी यांना स्वतःचा उत्तराधिकारी त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार नेमता येत नाही. अभ्यासक अफशोन ओस्टोव्हर अधोरेखित करतात की, जी अंतिम निवड असेल ती व्यक्ती सापेक्ष सहजतेने सत्ता चालविण्यास सक्षम आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी खामेनी यांना ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’सह विविध सत्ता केंद्रांकडून ‘समर्थन’ मिळवणे आवश्यक आहे.
देशाची धोरणे, राजकारण आणि भविष्य यांच्या बाबतीत इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांचा शब्द अंतिम मानला जातो, ते आता वयाच्या ऐशीच्या उत्तरार्धात आहेत.
मात्र, पुढे वाटचाल करताना, इराणच्या राजकारणातील अनेक सत्ता केंद्रे देशाच्या राजकारणात प्रभावी ठरण्याकरता बळाचा वापर करतील. यामध्ये ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ची मोठी भूमिका असू शकते, ज्यांनी खामेनी यांच्या राजवटीअंतर्गत प्रचंड ताकद आणि गती प्राप्त केली आहे.
आव्हाने
रईसी हे इराणचे अध्यक्ष असताना, देशाची परराष्ट्र आणि प्रादेशिक धोरणे मुख्यत्वे अयातुल्ला यांनी निश्चित केली, तर ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ महत्त्वपूर्ण अशा सहाय्यक भूमिकेत होते. इराणी लोक आता ‘प्रतिरोधाचा अक्ष’ म्हणून संबोधतात, ते विकसित होण्यास रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्याचे कुड्स फोर्ससारखे विभाग जबाबदार आहेत, तरीही, इराणशी थेट आपला संबंध नसल्याचे हे दहशतवादी गट सांगतात. यांत येमेनमधील हुथी, लेबनॉनमधील हिजबुल्लाह, पॅलेस्टाइनमधील हमास, इराक, सीरियामधील त्या प्रकारच्या इतर लहान संघटनांचा समावेश आहे.
इराणमधील सत्ताबदलामुळे इराणच्या भौगोलिक रचनेवर व्यापक किंवा थेट परिणाम दिसणार नाही. ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ सोबत असलेले अयातुल्ला सर्वच नसले, तरी बहुतांश निर्णय घेतात. मे १९७९ मध्ये स्थापन झाल्यापासून ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने केवळ एक लष्करी घटक म्हणून स्वत:ला प्रचंड बळकट केले असे नाही, तर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही भूमिका परिभाषित केली आहे. येथे लष्करी कर्तव्यांचे विभाजन अधोरेखित करणेही महत्त्वाचे आहे, जेथे इराणी सैन्याचे काम इराणी सार्वभौमत्वाचे रक्षण करणे आहे व ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चे आदेश इस्लामिक प्रजासत्ताक आणि अयातुल्ला यांच्या एकात्मिकतेचे व सामर्थ्याचे रक्षण करणे आहे. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात अमेरिकेने निर्बंध घातलेल्या काही भारतीय कंपन्यांना या वास्तवाचा सामना करावा लागला की, त्यांनी पुरवठा केलेले सुटे भाग ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’च्या विस्तारित ड्रोन प्रोग्रामद्वारे वापरले गेले तर, केवळ मध्य पूर्वेतच नव्हे तर युक्रेनमध्येही हाहाकार माजेल.
मे १९७९ मध्ये स्थापन झाल्यापासून ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने केवळ एक लष्करी घटक म्हणून स्वत:ला प्रचंड बळकट केले असे नाही, तर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही भूमिका परिभाषित केली आहे.
गाझा आणि हमासमधील युद्धाकरता इराणी समर्थन, हिजबुल्लाची जोपासना, यांसारख्या इतर धोरणांसह, कोणत्याही मोठ्या समस्यांशिवाय इराणच्या आगामी वाटचालीची अपेक्षा करायला हवी, कारण इराणने रईसी यांना गमावल्याने झालेल्या हानीतून मुक्त होत पुढील 'प्रजासत्ताक' नेतृत्व निवडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, असे नेतृत्व इराणमध्ये अस्तित्वात आहे आणि अयातुल्ला व ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’च्या वर्चस्वाखाली काम करते, जे राष्ट्राच्या संरचनेतील कोणत्याही मूलभूत आव्हानांपासून देशाचे संरक्षण करते.
काहीही असो, आगामी ५० दिवस, इराणच्या राजकारणासाठी महत्त्वाचे असतील.
कबीर तनेजा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.