Author : Karan Babbar

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 15, 2024 Updated 0 Hours ago

भारताची लोकसंख्या वाढत असताना, स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या  मेनोपॉजच्या अनुभवांची माहिती गोळा करणारी मजबूत डेटा सिस्टम तयार करणे खूप गरजेचे आहे. यामुळे सर्व स्त्रियांना समान आरोग्य सेवा मिळतील आणि आरोग्य सेवांसाठी निधी योग्य प्रकारे वाटप करता येईल.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मेनोपॉजचा डेटा महत्त्वाचा का आहे?

हा लेख जागतिक लोकसंख्या दिन 2024 या मालिकेचा भाग आहे. 


समजा, गजबजलेल्या ऑफिसमध्ये तुमच्या मैत्रिणीने अचानक कपाळावर आठी घालून पंखा चालू केला, तर त्यामागे उन्हाळ्याची तीव्र ऊष्णता हे कारण असू शकते, पण तिला 'हॉट फ्लॅश' (शरीरावर येणारी अचानक येणारी तीव्र ऊब) येत असण्याचीही शक्यता आहे. जे, मेनोपॉजचे सामान्य लक्षण आहे. हा दैनंदिन अनुभव आपल्याला एका महत्त्वाच्या सामाजिक बदलाची आठवण करून देतो - मेनोपॉजच्या टप्प्यात पदार्पण करणाऱ्या महिलांची वाढती संख्या. भारतासारख्या वेगानं विकसित होणाऱ्या देशात तर हा मुद्दा अधिकच महत्वाचा आहे. 2011 मध्ये 96 दशलक्ष इतक्या असलेल्या या महिलांची संख्या 2026 पर्यंत 401 दशलक्ष इतकी वाढेल, असा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हा लेख असा युक्तिवाद करतोय की, भारताची लोकसंख्या वाढत असताना, मेनोपॉजच्या अनुभवांची माहिती गोळा करणारी मजबूत डेटा सिस्टम तयार करणे खूप गरजेचे आहे. यामुळे सर्व महिलांना समान आरोग्य सेवा मिळतील आणि आरोग्य सेवांसाठी निधी योग्य प्रकारे वाटप करता येईल.

भारतीय महिलांच्या आयुष्याचा तब्बल तीस वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो. या काळात त्यांना अनेक वेगवेगळ्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरीकरण, आधुनिक जीवनशैली आणि वातावरणातील बदल (हवामान बदल) यामुळे या वयोवृद्ध महिलांच्या आरोग्याच्या समस्या आणखी वाढतात. पण तरीही, दरवर्षी येणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या चर्चा आणि त्यानुसार धोरणात्मक निर्णयांमध्ये मेनोपॉज या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. हे मौन खासकरून चिंताजनक आहे कारण यामुळे या टप्प्यात महिलांना येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अडचणींकडे दुर्लक्ष होते. 'हॉट फ्लॅशेस', रात्री घाम येणे, मूड स्विंग्स आणि झोपेच्या अडचणी यासारखी लक्षणं त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतात. मात्र, याबाबत पुरेशी माहिती नसणे आणि सोयीस्कर आरोग्य सेवा नसणे यामुळे अनेकदा यांचे चुकीचे निदान केले जाते किंवा त्यांचे उपचारच केले जात नाहीत.

मेनोपॉजच्या वयात असलेल्या महिलांच्या आरोग्य आणि सामाजिक गरजा समजून घेण्यासाठी मजबूत डेटा सिस्टम तयार करणं खूप गरजेचे आहे. सध्या, मेनोपॉज आणि त्यांच्या राहणीमानासारख्या गोष्टींचा सामाजिक-आर्थिक परिस्थिती कसा संबंध आहे याबाबत पुरेशी माहिती नाही. या माहितीच्या अभावामुळे त्यांच्यासाठी योग्य उपचार, निधींचं योग्य नियोजन आणि धोरणात्मक निर्णय घेणं कठीण होतं. भारतात मेनोपॉजशी निगडित अडचणी, फरक आणि संधी यांची माहिती मिळवण्यासाठी अशी माहिती खूप महत्वाची आहे. त्यामुळे सर्व महिलांना समान आरोग्य सेवा मिळतील आणि त्यांच्या गरजेनुसार आरोग्य धोरण आणि कार्यक्रम राबविता येतील.

A graph of blue bars

आकृती 1. 45-49 वयोगटातील मेनोपॉजमधील महिलांची टक्केवारी, NFHS-5 (2019-21).

मेनोपॉज आणि आपल्या राहणीमानाचा सामाजिक-आर्थिक संबंध समजून घेण्यासाठी हा लेख आहे. भारतात 45 ते 49 वयोगटातील 83,970 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातील माहितीनुसार या वयातील जवळपास 38 टक्के महिला मेनोपॉजच्या टप्प्यात आहेत. भारताच्या विविध परिस्थितींमुळे हा आकडा महत्वाचा आहे.

वय वाढत जाईल तसं मेनोपॉज येण्याची शक्यता वाढते. जवळपास 49 वर्षांच्या निम्म्या महिलांना मेनोपॉजचा अनुभव येतो (आकृती 1). पण शिक्षणाचा विचार केला तर फरक दिसतो. 45 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये उच्च शिक्षण असलेल्या फक्त 25 टक्के महिलांना मेनोपॉज आली आहे, तर कमी शिक्षण असलेल्या 42 टक्के महिलांना मेनोपॉज आली आहे (आकृती 2). भारतात शिक्षणामुळे मेनोपॉज येण्याचे वय कदाचित वेगळे असू शकते.

Why Menopause Data Matters On World Population Day0

आकृती 2. शैक्षणिक स्तरांवर मेनोपॉजमध्ये महिलांचे प्रमाण, NFHS-5 (2019-21).

शिक्षणानुसार माहिती पाहिल्यावर मेनोपॉज आणि राहणीमानाच्या गोष्टींमध्ये काही फरक दिसून आले आहेत.

वय

वय जसं वाढतं तसं सगळ्या भारतीय महिलांमध्ये मेनोपॉजचं प्रमाण वाढतंच. पण शिक्षणाचा विचार केला तर एक वेगळीच गोष्ट दिसून येते. शिक्षण चांगलं असलेल्या महिलांना मेनोपॉज थोडी उशीर येते. उलट, शिक्षण नसलेल्या महिलांना लवकर येते. म्हणजे शिक्षण हे मेनोपॉज येण्याच्या वयावर परिणाम करतं असं दिसतंय.

Why Menopause Data Matters On World Population Day0

आकृती 3. वयानुसार शैक्षणिक स्तरांवर मेनोपॉजमध्ये महिलांची टक्केवारी, NFHS-5 (2019-21).

संपत्ती 

आकृती 4 मध्ये दाखवलंय तसं, श्रीमंत महिलांना (शिक्षणाच्या कोणत्याही स्तरावर) मेनोपॉज थोडी उशीरा येते. पण इथे एक धक्कादायक गोष्ट दिसून येते - श्रीमंत महिलांपैकी शिक्षण नसलेल्यांच्या तुलनेत, थोडे शिक्षण असलेल्या श्रीमंत महिलांमध्ये मेनोपॉजचे प्रमाण जास्त आहे. हा निष्कर्ष असा सूचित करतो की, केवळ श्रीमंतीपेक्षा शिक्षणाचा जीवनशैली आणि आरोग्य वर्तनावर अधिक बारीक-सारीक प्रभाव पडतो. शिक्षणामुळे महिलांना आहार, व्यायाम आणि इतर घटकांबद्दल जाणीव होते आणि निर्णय घेण्याचे बळ मिळते जे मेनोपॉज येण्याच्या वयावर परिणाम करू शकतात.

Why Menopause Data Matters On World Population Day0

आकृती 4. संपत्ती निर्देशांक, NFHS-5 (2019-21) द्वारे शैक्षणिक स्तरांवर मेनोपॉजमध्ये महिलांची टक्केवारी.

निवासी क्षेत्र

अभ्यासाच्या स्तराचा विचार केला नाही तरी ग्रामीण महिलांना शहरी महिलांच्या तुलनेने जास्त प्रमाणात मेनोपॉजचा अनुभव येतो. पण या वेगवेगळ्या प्रदेशातही शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. उच्च शिक्षण असलेल्या महिलांना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात मेनोपॉजचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ असा की, शिक्षणामुळे महिलांना राहण्याच्या ठिकाणाशी किंवा शहरी भागात असणाऱ्या सोयीस्कर गोष्टींपेक्षा स्वतंत्र राहणीमानाचा आणि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या जीवनशैलीच्या निवड करण्याची ताकद मिळते.

Why Menopause Data Matters On World Population Day0

आकृती 5. मेनोपॉजमधील महिलांची टक्केवारी शैक्षणिक स्तरावरील निवासस्थानानुसार, NFHS-5 (2019-21)

संशोधनातून भारतात शिक्षणाचं प्रमाण कमी आणि मेनोपॉज लवकर येणं यांच्यात स्पष्ट संबंध दिसून आला आहे. कमी शिकलेल्या महिलांच्या तुलनेत जास्त शिकलेल्या महिलांना थोडी उशीर मेनोपॉज येते. म्हणजे शिक्षण हे मेनोपॉज टाळण्यासाठी चांगली जीवनशैली निवडण्यास मदत करते. अजून एक गोष्ट म्हणजे, गरिबी आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांच्याशीही मेनोपॉजचा संबंध असू शकतो. गावांमध्ये राहणाऱ्या, कमी शिकलेल्या आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांना याचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. मेनोपॉजबद्दल माहिती नसणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं कठीण असणं आणि कदाचित आहारात आवश्यक पोषणाची कमतरता यामुळे या महिलांमध्ये लवकर मेनोपॉज येऊ शकते.

संशोधनातून भारतात शिक्षणाचं प्रमाण कमी आणि मेनोपॉज लवकर येणं यांच्यात स्पष्ट संबंध दिसून आला आहे. कमी शिकलेल्या महिलांच्या तुलनेत जास्त शिकलेल्या महिलांना थोडी उशीर मेनोपॉज येते. म्हणजे शिक्षण हे मेनोपॉज टाळण्यासाठी चांगली जीवनशैली निवडण्यास मदत करते.

ही माहिती सरकार आणि धोरणकर्त्यांना अनेक गोष्टींमध्ये मदत करू शकते. पहिली गोष्ट म्हणजे, यावरून कोणत्या महिलांवर आरोग्यविषयक उपक्रम राबवायचे ते ठरवता येईल. म्हणजे मुलींचं शिक्षण वाढवून आणि विशेषत: गावांमध्ये मेनोपॉजबद्दल जाणून घेण्यासाठी कार्यक्रम करून कमी शिक्षित महिलांवर लक्ष द्यावे. यात जनजागृती मोहिमा, सोप्या पद्धतीने मिळणारी आरोग्यसेवा आणि समाजातील लोकांच्या मदतीची योजना समाविष्ट असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे, वेगवेगळ्या भागात मेनोपॉज कधी येते यामध्ये फरक आणि त्यामुळे लागणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती असल्यामुळे कमी साधन असलेल्या समाजांना पुरेसं पाठबळ मिळवून देण्यासाठी मदत होते. शेवटी, आयुष्यभर महिलांच्या आरोग्याचा मागोवा घेणारे संशोधन करणे, विशेषत: मेनोपॉजच्या वेळी येणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे दीर्घकालीन आरोग्याच्या परिणामांना समजून घेण्यासाठी आणि चांगल्या उपचारांची पद्धत तयार करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

भारतात लोकांचं वय वाढतंय त्यामुळे या वयोवृद्ध महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जागतिक लोकसंख्या दिनाबद्दल बोलतो तेव्हा मेनोपॉजचा विचार करणं फक्त शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल नाही तर सर्व महिलांना समान माहिती मिळावी आणि आरोग्य सेवा मिळण्याचा समान अधिकार मिळवून देण्यासाठी आहे. राहणीमान, शिक्षण, आर्थिक स्थिती यासारख्या गोष्टी आरोग्यावर कशा परिणाम करतात याचा विचार करून मेनोपॉजचं सखोल संशोधन केलं तर भारतात असं भविष्य घडवून आणता येईल जिथे प्रत्येक महिलेला या वयानंतरच्या बदलांना सामोरं जाताना सन्मान, मदत आणि चांगली आरोग्यसेवा मिळेल.


करण बब्बर हे सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, जिंदाल ग्लोबल बिझनेस स्कूल, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि मासिक पाळी हक्क ग्लोबलचे बोर्ड सदस्य आणि संशोधन सल्लागार आहेत.
    

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.