Author : Soumya Bhowmick

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 01, 2024 Updated 0 Hours ago

आर्थिक लाभ आणि धोरणात्मक संबंधासाठी थायलंडचे ब्रिक्सकडे लक्ष आहे, परंतु सार्वभौमत्व आणि धोरणात्मक स्वायत्ततेसाठी जोखीम पत्करणे आवश्यक आहे.

ब्रिक्स सदस्यत्वासाठी थायलंडचा प्रयत्न

मे 2024 मध्ये, थायलंडने ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अधिकृतपणे आपला अर्ज सादर केला आणि असे करणारा तो पहिला आग्नेय आशियाई देश ठरला. जागतिक स्तरावर आर्थिक वाढ आणि स्पर्धात्मकतेला चालना देणे, आंतरराष्ट्रीय भागीदारीत विविधता आणणे आणि भू-राजकीय प्रभाव वाढवणे या थायलंडच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेला प्रतिबिंबित करणाऱ्या अधिकृत पत्राच्या मसुद्याला थाई मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

सध्या थायलंडच्या एकूण व्यापारात ब्रिक्स देशांचा वाटा 22.8 टक्के आहे. ब्रिक्स देशांमध्ये थायलंडचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून चीन उभा आहे, ज्याचा व्यापार 2023 मध्ये 175 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. ब्रिक्सचे सदस्यत्व नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून आणि वैविध्यपूर्ण गुंतवणुकीद्वारे आर्थिक जोखीम कमी करून हा आकडा वाढवू शकते. याव्यतिरिक्त, थायलंडमध्ये थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) वाढ होऊ शकते, विशेषतः चीन आणि रशियातून, जे आग्नेय आशियाई बाजारपेठेशी त्यांचे आर्थिक संबंध मजबूत करण्यास उत्सुक आहेत.

प्रादेशिक प्रभाव

ब्रिक्समध्ये सामील होण्याच्या थायलंडच्या प्रयत्नांना चीन आणि रशियाच्या आग्नेय आशियातील त्यांचा आर्थिक प्रभाव वाढवण्याच्या व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांना पाठिंबा आहे. चीनसाठी, थायलंडचे सदस्यत्व त्याच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला(BRI) पूरक, त्याच्या प्रादेशिक प्रभावाचा विस्तार दर्शवते. हे आग्नेय आशियातील घनिष्ठ आर्थिक संबंध आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याच्या चीनच्या धोरणात्मक हितसंबंधांशी सुसंगत आहे.

ब्रिक्स मध्ये सामील होण्याच्या थायलंडच्या प्रयत्नांना चीन आणि रशियाच्या आग्नेय आशियातील त्यांचा आर्थिक प्रभाव वाढवण्याच्या व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांना पाठिंबा आहे. चीनसाठी, थायलंडचे सदस्यत्व त्याच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पूरक, त्याच्या प्रादेशिक प्रभावाचा विस्तार दर्शवते.

रशिया देखील थायलंडच्या संभाव्य ब्रिक्स सदस्यत्वाकडे पाश्चात्य शक्तींबरोबरच्या धोरणात्मक स्पर्धेदरम्यान आपले प्रादेशिक संबंध मजबूत करण्याची संधी म्हणून पाहतो. ब्रिक्सशी जुळवून घेतल्याने थायलंडला त्याची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी या भू-राजकीय गतिशीलतेचा लाभ घेता येतो, ज्यामुळे जागतिक आर्थिक अनिश्चिततेविरुद्ध संरक्षण मिळते.

चीन आणि थायलंडमधील BRI प्रकल्प पायाभूत सुविधा सुधारण्यावर, आर्थिक विकासाला चालना देण्यावर आणि प्रादेशिक संपर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारे व्यापक सहकार्य दर्शवतात. या प्रकल्पांचे महत्त्वाकांक्षी स्वरूप असूनही, कोविड-19 महामारीमुळे गती कमी झाली आहे, ज्यामुळे लक्षणीय विलंब आणि अडथळे निर्माण झाले आहेत. बँकॉक-नाखोन रत्चासिमा हाय-स्पीड रेल्वे आणि ईस्टर्न इकॉनॉमिक कॉरिडॉर यासारख्या प्रकल्पांना आर्थिक, लॉजिस्टिक आणि नोकरशाही आव्हानांचा सामना करावा लागला आहे.

तक्ता 1: चीन आणि थायलंडमधील BRI प्रकल्प

प्रकल्प

सविस्तर माहिती

सध्याची स्थिती

एकत्रित अंदाजे खर्च

बँकॉक-नाखोन रत्चासिमा हाय-स्पीड रेल्वे

थायलंड आणि चीनमधील प्रादेशिक संपर्क वाढविण्याच्या उद्देशाने BRI अंतर्गत एक प्रमुख प्रकल्प. हा उच्च-गतीचा रेल्वे मार्ग अखेरीस बँकॉकला नाखोन रत्चासिमाला जोडेल, लाओसच्या सीमेवरील नोंग खाईपर्यंत विस्तार करण्याच्या योजनेसह, व्यापक कुनमिंग-सिंगापूर रेल्वेसह समाकलित होईल. या प्रकल्पाचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आणि त्याला अनेक विलंबांना सामोरे जावे लागले. थाई सरकारने हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. चीनच्या तांत्रिक पाठिंब्याने थायलंडने निधी पुरवला.

१५ टक्के पूर्ण

५ बिलियन अमेरिकन  डॉलर ते ९.९ अमेरिकन डॉलर

इस्टर्न इकॉनॉमिक कोरीडोर(EEC)

चोंबुरी, रायोंग आणि चाचोएंगसाओ यांना उच्च-तंत्रज्ञान उद्योग केंद्रामध्ये रूपांतरित करणारा एक प्रमुख आर्थिक विकास उपक्रम. या प्रकल्पाचा उद्देश बंदरे, विमानतळ आणि रेल्वे मार्गांसह वाहतूक पायाभूत सुविधा वाढवणे आणि प्रदेशाच्या उत्पादन आणि निर्यात क्षमतांना चालना देणे हा आहे. चीनने BRI चा भाग म्हणून EEC मध्ये गुंतवणूक करण्यात तीव्र स्वारस्य व्यक्त केले आहे. EEC मधील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये यू-तपाओ विमानतळ आणि उच्च-गती रेल्वे दुव्यांचा विस्तार समाविष्ट आहे, जे या प्रदेशाला जागतिक व्यापार नेटवर्क शी  अधिक जवळून समाकलित करेल.

काम चालू आहे

४४ बिलियन अमेरिकन डॉलर

बँकॉक-नोंग खाई हाय-स्पीड रेल्वे

बँकॉक-नाखोन रत्चासिमा मार्गाचा विस्तार, पुढे बँकॉकला नोंगखाई आणि चीन-लाओस रेल्वेशी जोडतो. हा रेल्वे मार्ग व्यापक BRI दृष्टिकोनातील एक महत्त्वाचा दुवा आहे, ज्यामुळे दक्षिणपूर्व आशियातून चीनपासून अखंड रेल्वे जोडणी होते. थायलंड आणि चीनमधील मालवाहतूक आणि व्यापार प्रवाह सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. हा रेल्वे मार्ग वाढवून, थायलंडचे उद्दीष्ट शेजारच्या देशांशी आर्थिक एकात्मता वाढवणे आणि प्रादेशिक आर्थिक वाढीस पाठिंबा देणे हे आहे.

नियोजन आणि कामाला सुरुवात झाली आहे.

खर्चाचा तपशील उपलब्ध नाही.

क्रा कालवा प्रकल्प (प्रास्तावित)

थायलंडच्या आखाताला अंदमान समुद्राशी जोडणारा दक्षिण थायलंडमधील क्रा इस्थमस ओलांडून नौवहन मार्ग तयार करण्याचा प्रस्तावित उपक्रम. हा कालवा मलक्काच्या गर्दीच्या सामुद्रधुनीला वगळून थेट सागरी मार्ग प्रदान करेल आणि नौवहन वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी करेल. हा प्रकल्प वर्धित व्यापार मार्ग आणि धोरणात्मक महत्त्व यासह भरीव आर्थिक लाभांचे आश्वासन देतो, परंतु त्याला मोठ्या प्रमाणात राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

प्रस्तावित

२८ बिलियन अमेरिकन डॉलर

रायोंग औद्योगिक क्षेत्र

ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या उच्च-तंत्रज्ञान उद्योगांवर लक्ष केंद्रित करणारा EEC चा भाग असलेला चिनी आणि थाई कंपन्यांमधील संयुक्त उपक्रम. हे औद्योगिक क्षेत्र कार्यरत आहे आणि नवीन गुंतवणूक आणि प्रकल्पांसह त्याचा विस्तार सुरूच आहे. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करून आणि थायलंडची उत्पादन क्षमता वाढवून हे BRI अंतर्गत सहकार्याच्या महत्त्वपूर्ण क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते. आर्थिक वाढीस चालना देऊन आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण सुलभ करून, रायोंग औद्योगिक क्षेत्र थायलंडच्या व्यापक आर्थिक विकास धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कार्यात्मक आणि विस्तार काम चालु

खर्चाचा तपशील उपलब्ध नाही.

लेम चाबांग बंदराचा विस्तार

EEC चा एक महत्त्वाचा घटक असलेल्या थायलंडच्या सर्वात मोठ्या बंदराचा विस्तार, BRI च्या सागरी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. या प्रकल्पाचा उद्देश बंदराची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवणे, व्यापारातील अपेक्षित वाढीस आधार देणे हा आहे. थायलंडच्या मालवाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी लेम चाबांग बंदर वाढवणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते प्रादेशिक आणि जागतिक व्यापार जाळ्यातील एक प्रमुख घटक बनले आहे. या विस्तारामुळे थायलंडच्या निर्यात क्षमतेला केवळ चालना मिळणार नाही तर आग्नेय आशियातील धोरणात्मक सागरी केंद्र म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल.

काम चालू आहे

५.५ बिलियन अमेरिकन डॉलर

स्त्रोत: लेखकाचा स्वतःचा, विविध स्त्रोतांकडून घेतलेला डेटा.

थायलंडचे संभाव्य ब्रिक्स सदस्यत्व अतिरिक्त गुंतवणूक आकर्षित करून आणि अधिक आर्थिक एकात्मतेला चालना देऊन या प्रकल्पांना पुनरुज्जीवित करू शकते. तथापि, आर्थिक असुरक्षितता, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि पर्यावरणीय शाश्वतता वरील चिंता या उपक्रमांमध्ये गुंतागुंतीचे स्तर वाढवतात. याव्यतिरिक्त, ब्रिक्स मध्ये सामील होणे थायलंडवर गटाच्या धोरणात्मक हितसंबंधांना जुळवून घेण्यासाठी दबाव आणू शकते, त्याचे धोरणात्मक स्वातंत्र्य मर्यादित करू शकते आणि कदाचित देशांतर्गत प्राधान्यांशी विसंगत असू शकते.

थायलंडचे संभाव्य ब्रिक्स सदस्यत्व अतिरिक्त गुंतवणूक आकर्षित करून आणि अधिक आर्थिक एकात्मतेला चालना देऊन या प्रकल्पांना पुनरुज्जीवित करू शकते.

ब्रिक्स सदस्यांमध्ये औपचारिक व्यापार आणि गुंतवणूक करार यांची अनुपस्थिती गटांची परिणामकारकता आणखी गुंतागुंतीची करते आणि गटातील व्यापार संबंध मार्गी लावण्यासाठी थायलंडसाठी अतिरिक्त आव्हाने निर्माण करू शकते. तथापि, भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या आर्थिक मुत्सद्देगिरीसारख्या ब्रिक्स मधील धोरणात्मक भागीदारी, स्पर्धेदरम्यान सहकार्याची क्षमता अधोरेखित करतात. न्यू डेव्हलपमेंट बँक आणि सदस्य देशांच्या व्यवहारांसाठी प्रस्तावित ब्रिक्स चलन यासारखे उपक्रम अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि पाश्चात्य आर्थिक प्रभावाचा प्रतिकार करण्याची गटांची महत्त्वाकांक्षा दर्शवतात. 

थायलंडची धोरणात्मक स्थिती

2024 च्या सुरुवातीला, ब्रिक्सचा विस्तार, ज्यामध्ये पाच नवीन सदस्यांचा समावेश आहे- सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इराण आणि इथिओपिया-गटांच्या क्षमतेत लक्षणीय बदल दर्शवितो, ज्यामुळे ती थायलंड सारख्या देशांसाठी आणखी आकर्षक युती बनते. ब्रिक्समध्ये प्रमुख तेल उत्पादक आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश जागतिक व्यापाराला आकार देऊ शकेल आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण करू शकेल, ज्यामुळे थायलंडला अधिक न्याय्य व्यापार अटी आणि पश्चिमेकडील पारंपरिक शक्ती केंद्रांच्या पलीकडे मजबूत आर्थिक युती मिळू शकेल.

2024 च्या सुरुवातीला, ब्रिक्सचा विस्तार, ज्यामध्ये पाच नवीन सदस्यांचा समावेश आहे-सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती,इजिप्त, इराण आणि इथिओपिया-गटाच्या क्षमतेत लक्षणीय बदल दर्शवितो, ज्यामुळे ती थायलंड सारख्या देशांसाठी आणखी आकर्षक युती बनते.

अखेरीस, ब्रिक्सचा विस्तार हा राजकारणाच्या अनेक पैलूंवर आणि बहुध्रुवीय युगात होत असतो, ज्यामुळे थायलंडला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या गुंतागुंतीना अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. ब्रिक्समध्ये थायलंडचे संभाव्य सदस्यत्व हे एक धोरणात्मक पाऊल दर्शवते जे त्याच्या आर्थिक आणि भू-राजकीय परिदृश्यावर लक्षणीय परिणाम करू शकते आणि वैविध्यपूर्ण जागतिक सहभागाच्या व्यापक कलांशी जुळवून घेऊ शकते.


सौम्य भौमिक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is an Associate Fellow at the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research focuses on sustainable development and ...

Read More +