Author : Raj Shukla

Published on Apr 20, 2023 Commentaries 26 Days ago

अग्निपथ योजनेत समाविष्ट असलेल्या सुधारणांतून भारतीय संरक्षण व्यवस्थेत क्रांती घडण्यास मदत होईल.

अग्निवीर योजना: संरक्षण क्षेत्रात क्रांतीची चिन्हे

हा लेख ‘अग्निपथ योजना: मूलगामी किंवा अतार्किक?’ या निबंध मालिकेचा भाग आहे. 

_________________________________________________________________

अग्निपथ ही खरोखरच भारतीय लष्कराच्या मानव संसाधन व्यवस्थापनातील एक धाडसी, परिवर्तनकारी सुधारणा आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेत मोठा बदल करण्याच्या दृष्टिकोनातूनही या योजनेचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. या योजनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. विशेषत: राष्ट्रीय सुरक्षेविषयीचा बदलता धोका आणि युद्धांचे बदलते स्वरूप असे विविध हेतू यामागे आहेत. क्षमता निर्मिती आणि युद्ध लढणे या दोन्ही बाबी अधिक जटिल आणि स्पर्धात्मक होत आहेत. इतक्या की, तंत्रज्ञानविषयक नवकल्पना आणि रणनीतीबाबत जगभरातील लष्करे मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत आहेत, तसेच लष्करातील पदांवर योग्य उमेदवारांचा समावेश करण्यासाठी मनुष्यबळ विकासासंदर्भातही मोठ्या प्रमाणात सुधारणा हाती घेत आहेत. परराष्ट्र धोरणाच्या सावलीतून भारतातील संरक्षण विभाग बाहेर पडू लागला आहे. ही एक महत्त्वाची घटना आहे. ही वस्तुस्थिती अधोरेखित करणेही शहाणपणाचे ठरेल. प्रस्तावित सुधारणा या बदल योजणे, बदलांची रचना करणे आणि बदल अमलात आणणे, अशा भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतांची चाचणी आहे. एका प्रमुख संरचनात्मक सुधारणेद्वारे संरक्षण दल प्रमुखांचे आणि लष्करी व्यवहार विभागाचे सबलीकरण करून विस्तारित राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेमार्फत बदल आणणे हा संरक्षण दल प्रमुख/लष्करी व्यवहार विभाग सुरू करण्यामागचाही एक मध्यवर्ती हेतू होता. ‘अग्निपथ’च्या कल्पनेतच एका मोठ्या उद्देशाचे संकेत मिळतात.

सशस्त्र दलांमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांच्या क्षमता आणि सशस्त्र दलांतील पदांच्या गरजा यांच्यात सुसूत्रता येण्याकरता ऑनलाइन स्क्रीनिंग आणि उत्तम आकांक्षा या आवश्यक जुळणीचा समावेश असलेली उत्तम प्रारूपे विकसित केली गेली आहेत.

केंद्रीय तत्त्वांच्या संदर्भात, प्रकल्पात तीन प्रारूपे आहेत: एक भरती प्रारूप, सेवा-अंतर्गत प्रशिक्षण प्रारूप आणि एक पुन्हा सेवेत दाखल होणे अथवा सेवामुक्त होण्याविषयीचे प्रारूप- यांतील प्रत्येक प्रारूप स्वतःमध्ये एक मोठी सुधारणा घडवणारा उपक्रम आहे, जो जास्तीत जास्त प्रतिभा आणि लढाऊ परिणाम संपादन करण्याचा प्रयत्न करतो. सध्याची देशातील भरतीची पद्धत काहीशी जुनाट आहे, जी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तंदुरुस्ती या त्रिसूत्रींवर आधारित आहे. सशस्त्र दलांमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांच्या क्षमता आणि सशस्त्र दलांतील पदांच्या गरजा यांच्यात सुसूत्रता येण्याकरता ऑनलाइन स्क्रीनिंग आणि उत्तम आकांक्षा या आवश्यक जुळणीचा समावेश असलेली उत्तम प्रारूपे विकसित केली गेली आहेत. ‘अग्निपथ’च्या चौकटीत, आपणही अधिक सूक्ष्म प्रारूप स्वीकारत आहोत. जशा प्रकारे सेवा-कार्यातील प्रशिक्षणात आधुनिक बाबी अंतर्भूत केल्या जात आहेत- उदा. या प्रशिक्षणाचा कालावधी प्रभावी करण्यात आला आहे, तशाच प्रकारे आरामदायी, लांबलचक, भूतकाळातील प्रारूपांचे पुनरावलोकन करून, वाचलेले पैसे सिम्युलेटर, थेट दृश्यात डिजिटल घटक जोडणे (ऑगमेन्टेड रिअॅलिटी) व आभासी वास्तव (व्हर्चुअल रिअॅलिटी) साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा, डिजिटल अभ्यासक्रम यांसारखे मूल्यवर्धन करीत- अत्याधुनिक, प्रशिक्षण चौकट तयार करण्यासाठी उपयोगात आणले जाईल. असे केल्याने, आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील उपलब्ध क्षमतांचा तसेच ‘स्किल इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या क्षमतांचा उपयोग प्रशिक्षण कालावधी अनुकूल करण्यासाठी आणि परिणाम वृद्धिंगत करण्यासाठी केला जाईल. एकंदरीत, सुधारित भरती पद्धतीद्वारे गुणात्मकरीत्या चांगल्या उमेदवारांची भरती होणे सुनिश्चित होईल आणि त्याचबरोबर अधिक नेमक्या प्रशिक्षण प्रारूपांमुळे अग्निवीर ही उत्कृष्ट योजना असल्याचे खात्रीदायकरीत्या म्हणता येईल. लढाऊ तैनातीमध्ये व्यतीत केलेली चार वर्षे अद्वितीय नीतिमत्तेला बळकटी देतील, त्याचवेळी उत्तम प्रकारे रचना केलेल्या पुन्हा सेवेत दाखल होण्याच्या उपक्रमाद्वारे केवळ सर्वोत्कृष्ट उमेदवारच सैन्यात राखले जातील, हेही सुनिश्चित होईल.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अनेक उपाययोजनांतून, या योजनेतून सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांना उत्तम सेवानिधी मिळणार असल्याचे स्पष्ट होते. शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या (अंतर्भूत केलेले अभ्यासक्रम, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी  आणि इतर अनेक विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त प्रावीण्य आणि अर्हता प्रमाणपत्र अभ्यासक्रम) त्यांच्या शैक्षणिक सुसज्जतेची खात्री देतील आणि सरकारी, निमलष्करी, भारतीय तटरक्षक दल, आसाम रायफल्स, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांमध्ये त्यांना सहजतेने प्रवेश मिळणे सुलभ होईल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ  तसेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद यांद्वारे लष्करी गुणधर्म/कौशल्यांची मान्यता मिळाल्याने त्यांच्या अर्हतेत मूल्यवर्धन होऊन हे उमेदवार अधिक सक्षम होतील. उद्यमशीलतेचा कल असलेल्या अग्निवीरांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांकडून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य कर्जपुरवठा केला जाईल. गेल्या ७० वर्षांत भारतीय लष्कराला ज्याचा सातत्याने पाठपुरावा करता आलेला नाही, ती गोष्ट अवघ्या एका आठवड्यात वास्तवात रूपांतरित झाली आहे.

लढाऊ तैनातीमध्ये व्यतीत केलेली चार वर्षे अद्वितीय नीतिमत्तेला बळकटी देतील, त्याचवेळी उत्तम प्रकारे रचना केलेल्या पुन्हा सेवेत दाखल होण्याच्या कार्यक्रमाद्वारे केवळ सर्वोत्कृष्ट उमेदवारच सैन्यात राखले जातील, हेही सुनिश्चित होईल.

ज्ञान आणि परिश्रमाने अग्निपथ योजनेला अशा भट्टीत विकसित केले जाऊ शकते की, ज्या भट्टीत तावून-सुलाखून निघत उत्कृष्ट पोलादनिर्मिती अर्थात उत्तमोत्तम मनुष्यबळाची निर्मिती होईल. हा या प्रकल्पाचा भारदस्त उद्देश आहे. त्यामुळे, अग्निवीरांना सक्षम बनवा की, ते केवळ नोकरी करण्याइतपतच नाही, तर नोकरीच्या बाजारपेठेत भरभराट करण्यासाठी पुरेसे स्पर्धात्मक आहेत. ब्रँड ‘अग्निवीर’चे दैनंदिन वास्तवात रूपांतर करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाच्या पलीकडे पोहोचणे आवश्यक आहे- याचा पाठपुरावा अनेक मंत्रालये, कॉर्पोरेट संस्था, स्टार्ट-अप परिसंस्था, शैक्षणिक संस्था आणि नीति आयोग यांसारख्या इतर संस्थांनीही करायला हवा. जर आपण निर्धाराने पुढाकार घेतला, तर भविष्यात लवकरच जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, त्यांच्या कर्मचारीवर्गात अनेक अग्निवीरांचा समावेश करतील. शहरे आणि नगरांतील लहान-मोठ्या व्यवसायांकरताही अग्निवीर हा पसंतीचा पर्याय बनेल.

लष्कर पदभरती अशा प्रकारे कार्य करेल की, महत्वाकांक्षी तरुण सैन्याच्या पटलाकडे खेचले जातील. सैन्य त्यांच्यातील कौशल्याचा विकास करेल, सैन्यात टिकून राहण्याची अथवा सैन्यात भरती होण्यासंबंधीची स्पर्धा अग्निवीरांना आपांपसात आगेकूच करण्यास आणि उच्चतम पातळीवर पोहोचण्यास प्रवृत्त करेल. जे सेवामुक्त होतील, त्यांना नोकरीसाठी कुणापुढे नाक घासावे लागणार नाही तर त्यांची पसंतीचे पर्याय म्हणून निवड केली जाईल.

या योजनेचा हेतू चांगला आहे, हे स्पष्ट असले तरी, आपले विभाग आणि रचनांची लढाऊ परिणामकारकता वाढवली जाईल आणि ती कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही हे सुनिश्चित करायला हवे. काही शंका आधीच दूर केल्या गेल्या आहेत; काहींना शांत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत- नेते आणि नेतृत्वाच्या गुणोत्तरामध्ये अधिक चांगला समतोल प्रस्थापित होणे, तसेच अनुभवाच्या दृष्टीने योग्य मिश्रण आणि युवा व्यक्तिरेखा हा फक्त एक पैलू आहे. अशा धाडसी आणि परिवर्तनीय सुधारणांमध्ये नक्कीच आव्हाने असतील, परंतु ती पूर्ण करता येणार नाहीत, असे काही नाही.

सैन्य त्यांच्यातील कौशल्याचा विकास करेल. सैन्यात टिकून राहण्याची अथवा सैन्यात भरती होण्याविषयीची स्पर्धा अग्निवीरांना आपांपसात आगेकूच करण्यास आणि उच्चतम पातळीवर पोहोचण्यास प्रवृत्त करेल.

आपले अत्यंत शक्तिशाली सेवा प्रमुख, संरक्षण सचिव, राष्ट्रीय सुरक्षा संस्था, माननीय संरक्षण मंत्री, पंतप्रधान कार्यालय, राज्यांचे मुख्यमंत्री, गृह मंत्रालय आणि इतर रोजगार निर्मिती आणि सक्षम करणार्‍या मंत्रालयांचे योगदान जर या प्रकल्पात असेल तर हे नक्कीच साध्य होईल; तसेच आनंद महिंद्र, हर्ष गोयंका, किरण शॉ, संगीता रेड्डी, एल अँड टी, अशोक लेलँड, भारत फोर्ज, एमिटी ग्रूप अशा व्यवसाय जगतातील काही शक्तिशाली नावांनी या योजनेला आपले समर्थन दर्शवले आहे.  

अग्निपथ ही एक सद्य पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारी संभाव्य योजना आहे. याचे कारण ही योजना आपल्या राजकारणातील नागरी आणि लष्करी या उत्कृष्टतेच्या दोन स्तंभामध्ये असलेली दगडी भिंत कोसळण्यास मदत करेल. इतरांना हस्तक्षेप करण्यापासून रोखणारी अशी स्वतंत्र संस्थाने, इतरांपासून अलिप्तता अशा भिंती कोसळण्यास आणि प्रतिभांच्या प्रवाहांना ऊर्जा मिळण्यास मदत होईल. परस्परविरोधी प्रवाहांमुळे लष्करी परिसंस्थेतील अनेक सुप्त गुणधर्म उलगडण्यास मदत होईल- विस्तृत राजनैतिक आणि रोजगार प्रणाली हे शोधून काढेल की, सैन्य हे केवळ सुरक्षा रक्षकांच्या समूहापेक्षा कितीतरी मोठे आहे- आपल्या सैनिकांचा एक मोठा भाग माहिती-तंत्रज्ञान, कॉर्पोरेट कामकाज, प्रशासन, पुरवठा साखळीचे व्यवस्थापन, संवाद, सामग्री व्यवस्थापन, संगणकीय कामकाज, कार्यालयीन प्रक्रिया, इव्हेंट व्यवस्थापन इत्यादी संघटनात्मक कौशल्यांमध्ये अत्यंत निपुण आहे. निष्ठा, समर्पण, कार्याभिमुखता, वचनबद्धता, सहकार्याची उच्च भावना तसेच संकट व्यवस्थापनाची उत्तम क्षमता ही त्यांची अद्वितीय वैशिष्ट्ये अंगी बाणवणे सोपे नाही. या वैविध्यपूर्ण कौशल्य संचांचा उपयोग करणे अपेक्षित आहे. 

लष्करी पेशा हा व्यापार, कायदा किंवा औषध अशा इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच विस्तृत आणि सखोल आहे. या व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि ज्ञान वैशिष्ट्ये रुजतात. जर अग्निवीर उपक्रम यशस्वी झाला, तर लष्करातील सखोल प्रतिभा उदयास येईल. उदाहरणार्थ- अमेरिका, इस्रायल, चीन आणि अगदी तुर्कस्तान देशांमध्ये होते, त्यासारखे ते श्रेणी आणि कागदपत्रांची फाइल ओलांडून लष्करातील व्यावसायिक, व्यापार, तंत्रज्ञान उद्योजकता, वित्त, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्र, विज्ञानाच्या विविध शाखा यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांची उपयुक्तता सिद्ध करतील.  सरस्वती (आपले अध्ययन केंद्र), लक्ष्मी (संपत्ती निर्मिती आणि व्यवसायाचे केंद्र) आणि दुर्गा (सत्तेची साधने) यांचे एकत्रिकीकरण भारताला नव्या उंचीवर नेईल: प्रतिभा आणि गुणवत्तेला बळ मिळेल आणि आपल्या धोरणात्मक कसबाद्वारे समोरच्याला चपराक देता येईल.    

‘अग्निपथ’ला ‘आत्मनिर्भरते’शी (दोन्ही मोठे प्रयोग आणि संरक्षणात आत्मनिर्भरता) जोडले गेल्यास कामगिरी अधिक उंचावू शकेल; यांतून मानवी आणि आर्थिक उपक्रमांच्या व्यापक क्षेत्रांत नवकल्पना, ऊर्जा आणि उद्योजकतेची भावना वाढीस लागेल. ही योजना आपल्याला सरकारचा आकार कमी करण्याऐवजी वाढविणाऱ्या वेतन, निवृत्तीयोजना आणि अवलंबित्व या गोष्टींपासून सुटका करून घेण्यास मदत करेल. 

जर अग्निवीर उपक्रम यशस्वी झाला, तर लष्करातील सखोल प्रतिभा उदयास येईल. उदाहरणार्थ- अमेरिका, इस्रायल, चीन आणि अगदी तुर्कस्तान देशांमध्ये होते, त्यासारखे ते श्रेणी आणि कागदपत्रांची फाइल ओलांडून लष्करातील व्यावसायिक, व्यापार, तंत्रज्ञान उद्योजकता, वित्त, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्र, विज्ञानाच्या विविध शाखा यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांची उपयुक्तता सिद्ध करतील.

  

काही वेळा सशस्त्र दले बदल अंमलात आणण्याच्या आणि उत्क्रांतीवादी वळणाच्या पुढे राहण्याच्या स्वत: च्या क्षमतेला कमी लेखतात- अधिकारी पदांच्या भरतीकरता जेव्हा ‘टेक्निकल एंट्री स्कीम’चा प्रारंभ केला, तेव्हाही तितक्याच चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. आज, ‘टेक्निकल एंट्री स्कीम’द्वारे भरती झालेला अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्याच्या तोडीचा आहे. स्पर्धात्मक समतोलामध्ये ते तोडीस तोड आहेत. महिला अधिकाऱ्यांना समान आरक्षण दिले होते; आज, ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतील महिला छात्र आणि बेंगळुरू येथील कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस संस्थेतून पदवीधर झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी साऱ्या अपेक्षा पार केल्या आहेत. ‘राष्ट्रीय रायफल्स’बद्दलही आधी व्यापक साशंकता व्यक्त करण्यात आली होती. आज त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे; मात्र, भारतीय सैन्याची लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर आज कुणाचेही दुमत असू शकत नाही.

जर ‘अग्निपथ’ने गती मिळवली आणि पूर्ण सामर्थ्य प्राप्त केले, तर, काही काळातच, व्यापक भारतीय समाजात शिस्त, प्रेरणा, आत्मविश्वासाचे चैतन्य, मुक्तता, नवकल्पना, उपयोगितावादी उद्योजकता बिंबवता येईल. केवळ आपले दैनंदिन अस्तित्व अधिक उत्पादनक्षम बनविण्याकरताच नव्हे, तर जेव्हा भारतीय समाजाला संकटाला तोंड देणे भाग पडते, तेव्हा या गोष्टींचे महत्त्व आणखी मोठे आहे.

त्यामुळे अग्निपथ प्रकल्पाची शक्ती आणि उद्देश शांत चिंतनातून आत्मसात करणे आणि समजून घेणे गरजेचे आहे व त्यानंतर या प्रकल्पाची दृढतेने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.