भविष्यातील वापरासाठी तारण ठेवली जाणारी वस्तू म्हणून बिटकॉइन येत्या काही वर्षांत सोने आणि अमेरिकी डॉलरची जागा घेऊ शकते, भारताने आपल्या धोरणात्मक आर्थिक तारण ठेवीचा भाग म्हणून बिटकॉइनचा अवलंब करणे दूरदर्शीपणाचे ठरेल.
मे २०२२ च्या मध्यात, एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी ४४ विकसनशील देशांतील मध्यवर्ती बँकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, पहिल्या “डावोस ऑफ बिटकॉइन” म्हणून नावारूपास आलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ही घटना अगदीच अपारंपरिक आणि क्षुल्लक वाटू शकते, परंतु डॉलरच्या वर्चस्वाची घसरण, जगभरात झालेली मोठी महागाई, प्रचंड शक्ती संघर्ष आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेच्या चर्चा या संदर्भात पाहिले असता, पुढील जागतिक तारण चलनाचा स्पर्धक या अर्थाने बिटकॉइन कार्यक्रम हा उदयोन्मुख हितसंबंधांचा संकेत आहे.
आज बिटकॉइनचा अवलंब दडपून, भारत (आणि चीन) त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतील, अशा चुका करत आहेत. बिटकॉइन हा त्याच्या पूर्ण गणिती तुटवड्यातून शोधला गेलेला ‘हार्ड मनी’ आहे आणि इतर राष्ट्रांना त्याचा अवलंब करण्यापासून रोखता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तो अंगिकारणे ही भारताकरता राष्ट्रहिताची तर्कशुद्ध रणनीती आहे.
भविष्यातील वापरासाठी तारण ठेवल्या जाणाऱ्या जागतिक वस्तूचा किताब संपादन करण्याकरता अमेरिकी डॉलर, चिनी युआन आणि ओपन-सोर्स बिटकॉइन यांच्यातील सत्तास्थानासाठीची स्पर्धा ही या दशकातील एक भौगोलिक घटकांच्या प्रभावाखाली राजकारणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संबंधांचा वेधक भाग असेल.
दिग्गजांना पराभूत करण्याआधी बिटकॉइनला मोठा टप्पा पार करावा लागेल, मात्र ते जगाला विकेंद्रित जागतिकीकरण, वैयक्तिक सार्वभौमत्व आणि राष्ट्रांसाठी सामूहिक सुरक्षा असे काहीतरी अनोखे देते. अमेरिका आणि चीन वगळता प्रत्येक देशाला जागतिक व्यापारासाठी तटस्थ बिटकॉइन नेटवर्क वापरण्याकरता तार्किक प्रोत्साहन आहे. जेव्हा यांत्रिक प्रभावाने घसरण होत राहते, तेव्हा बिटकॉइन अमेरिका आणि चीनसाठीदेखील तर्कसंगत तडजोड होऊ शकते.
| अमेरिका, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी | चीन | भारत | इतर सर्व देश | |
| सर्वाधिक पसंती | डॉलर | युआन | बिटकॉइन | बिटकॉइन |
| तडजोड | बिटकॉइन | बिटकॉइन | डॉलर | डॉलर / युआन |
| किमान पसंती | युआन | डॉलर | युआन | डॉलर / युआन |
आकृती १: जागतिक तारण चलनासाठीच्या पटलावरील तर्कसंगत धोरणे
‘हार्ड मनी’ संदर्भातील आर्थिक मानकांकडे वळणारे देश बनण्याची ही प्रोत्साहनात्मक रचना- अलिप्त विकसनशील राष्ट्रांकरता आर्थिकदृष्या नावीन्यपूर्णतेतून जागतिक महासत्तेच्या दिशेने झेप घेण्याची अतुलनीय संधी आहे,
परंतु अनेक विकसनशील देश ही संधी गमावतील, काही माहितीच्या विषमतेने तयार केलेल्या अतार्किक धोरणांमुळे; काही चलनविषयक धोरणावर नियंत्रण ठेवू इच्छिणार्या मध्यवर्ती बँकांमुळे; आणि इतर देशांना जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, अमेरिका अथवा चीन यांनी परावृत्त केल्याने ही संधी गमावतील. एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ज्यांच्या हिताची तटस्थ तारण चलनाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे जपणूक होते, म्हणून भारताने लवकर बिटकॉइन अनुसरावे, याकरताचे हे तर्कसंगत प्रोत्साहन आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख देशी आणि विदेशी भागधारकांमधील हितसंबंधांच्या संघर्षाने नियामक वातावरण गुंतागुंतीचे बनले आहे. म्हणूनच, भारताच्या क्रिप्टोकरन्सी विषयीच्या नियमांना देशाचे राष्ट्रीय हित आणि घटनात्मक मूल्यांसह जोडण्यासाठी संसद, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेने मजबूत देखरेखीची भूमिका बजावायला हवी.
तर्कसंगत रणनीती आणि सहभागी देशांच्या अपेक्षांच्या आधारे संभाव्य परिणाम मोजण्याकरता ‘दि प्रीझनर्स डायलेमा’ अर्थात हितकारक असला तरी सहकार्य न करण्याच्या सिद्धान्ताचा वापर केला जाऊ शकतो. बाजारपेठेत सहभागी असलेल्यांमध्ये सध्या इतर कोणतीही उपयुक्तता नसलेली शुद्ध आर्थिक मालमत्ता म्हणून, बिटकॉइनचा अवलंब आणि किमतीचा शोध हे या स्वतंत्र तर्कशुद्ध निर्णय घेणारे आणि इतर यांच्यातील परस्परसंवादाचे विश्लेषण आहे.
| भारताने बिटकॉइनवर बंदी घातली आहे | भारताने बिटकॉइन स्वीकारले | |
| क्ष देशाने बिटकॉइनवर बंदी घातली आहे |
बंदी अयशस्वी सरकारने जारी केलेल्या चलनाची स्थिती बिघडत जाते बिटकॉइन अनुसरण्यास वेग येतो
|
क्ष देशातून भांडवल बाहेर जाते. भारतात भांडवलाचा प्रवाह दाखल होतो. |
| क्ष देशाने बिटकॉइन स्वीकारले |
भारतातून भांडवल बाहेर जाते. क्ष देशात भांडवलाचा प्रवाह दाखल होतो. |
व्यापार आणि विशेषीकरणातून प्रत्येकजण जिंकतो. |
आकृती २: भारतासाठी बिटकॉइनसंदर्भातील ‘प्रीझनर्स डायलेमा’
जगभरातील प्रत्येक देशाला बिटकॉइनच्या बाबतीत समान कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आकृती २ चे विरोधी हितसंबंधांसह खेळलेल्या खेळाची खालील परिणामांसह एकापेक्षा अधिक देशांमध्ये पुनरावृत्ती होते:
| ‘य’ देशाने बिटकॉइनवर बंदी घातली आहे | ‘य’ देश बिटकॉइन स्वीकारतो | |
| ‘क्ष’ देशाने बिटकॉइनवर बंदी घातली आहे | बिटकॉइन हळूहळू जिंकते | बिटकॉइन क्रमाक्रमाने जिंकते |
| ‘क्ष’ देशाने बिटकॉइन स्वीकारले | बिटकॉइन क्रमाक्रमाने जिंकते | बिटकॉइन त्वरित जिंकते |
आकृती ३: एकापेक्षा अधिक देशांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या खेळांचे परिणाम
कालांतराने हे परिणाम सहभागी देशांना अधिक स्पष्ट झाल्यानंतर काय होईल, याचा आता विचार करा: अधिकाधिक देश अपरिहार्यतेचा अवलंब करण्यातील तर्कसंगत प्रोत्साहन पाहतील, आणि अचानक संभाव्य हालचाल करतील. त्यामुळे बिटकॉइन अनुसरण्याचा कल राष्ट्रांत हळूहळू सुरू झाला (बहुतेक देश त्यावर बंदी घालू पाहत आहेत), नंतर हळूहळू हा आलेख वरच्या दिशेने सरकला (काही देशांनी तो स्वीकारला) आणि या दशकात अचानक (अनेक देशांनी त्याचा अवलंब केल्याने) पुढे जाण्याच्या तयारीत तो आहे. २०१०च्या दशकात, सुरुवातीच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बिटकॉइनमध्ये जोखमीपेक्षा अधिक परतावा असल्याचे पाहिले. २०२०च्या दशकात, सुरुवातीचे भू-राजकीय गुंतवणूकदार अधिक समृद्ध आणि सामर्थ्यवान बनू शकतात, तर मागे पडलेल्या लोकांना भांडवलाचा प्रवाह देशाबाहेर जाण्याचा आणि धोरणात्मक कमकुवतपणाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
भारताने लवकर बिटकॉइन अनुसरावे, याकरता तर्कसंगत प्रोत्साहन आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख देशी आणि विदेशी भागधारकांमधील हितसंबंधांच्या संघर्षाने नियामक वातावरण गुंतागुंतीचे बनले आहे.
२१व्या शतकात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक सार्वभौमत्व आणि ऊर्जा स्वातंत्र्याकरता फक्त बिटकॉइन (इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये जरा जरी अपयश आले तर संपूर्ण व्यवस्था कोसळू शकते) महत्त्वाचे आहे. बिटकॉइन नेटवर्क हे तकलादू नाही, लष्करी दर्जाच्या क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित आहे, आणि त्याचा अवलंब करण्याविषयीचे प्रोत्साहन आण्विक तंत्रज्ञानासारखेच आहे, सुरुवातीच्या सहभागींना भू-राजकीय प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे.
इतिहासातून आपण शिकू शकतो; १९व्या शतकाच्या उत्तरार्धात, जगातील बरेचसे देश हार्डर गोल्ड स्टँडर्डकडे (सोने ही एक चलन प्रणाली आहे, ज्यात खात्याचे मानक आर्थिक एकक सोन्याच्या निश्चित प्रमाणावर आधारित असते.) वळले, भारत आणि चीन चांदीच्या मानकावर स्थिरावले. यामुळे हळूहळू त्यांच्या व्यापाराच्या संधी मर्यादित झाल्या आणि धोरणात्मक कमजोरी आणि आर्थिक मागासलेपणाला कारणीभूत ठरला, जो अनेक दशके टिकला आहे. आज बिटकॉइनचा अवलंब करण्याचे दडपून, भारत (आणि चीन) त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतील, अशा चुका करत असेल. बिटकॉइन हा त्याच्या पूर्ण गणिती तुटवड्यातून शोधला गेलेला ‘हार्ड मनी’ आहे आणि इतर राष्ट्रांना त्याचा अवलंब करण्यापासून रोखता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अंगिकारणे ही भारताकरता राष्ट्रहिताची तर्कशुद्ध रणनीती आहे.
सध्याची डॉलरवर आधारित जागतिक आर्थिक व्यवस्था भारताला अनुकूल नाही. याउलट, भारताला अमेरिकन चलनविषयक धोरणाचे सर्वात वाईट दुसऱ्या क्रमाचे परिणाम सहन करावे लागतील: उदाहरणार्थ, उच्च चलनवाढीचा सध्याचा वेग. तसेच रशियाने दर्शवल्याप्रमाणे, सार्वभौम परदेशी मालमत्ता खरोखर सार्वभौम नसते; आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट रेल ही पायाभूत सुविधा जी बँका आणि वित्तीय संस्थांना परस्परांशी जोडतात आणि त्याचे पैसे आकारतात, या खरोखरीच तटस्थ नसतात.
परिणामी, डॉलरची जागतिक शक्ती आता क्षीण होत आहे- अलीकडील भू-राजकीय घटना, तारण चलनांचा इतिहास आणि डॉलरच्या वर्चस्वातून कमी होत असलेले अमेरिकी प्रोत्साहन- हे सर्व जागतिक वित्त क्षेत्रात सुरू असलेल्या एका महत्त्वपूर्ण संक्रमणाचे संकेत देतात. चलन संकटाच्या काळात डॉलर-आधारित प्रणाली आकुंचन पावत असताना किंवा कोसळत असताना, ज्या देशांपाशी अडचणीच्या काळात बाहेर पडण्याचे बिटकॉइन हे साधन आहे, ते देश विकेंद्रित जागतिकीकरणाच्या नव्या युगात टिकून राहण्यासाठी आणि भरभराटीसाठी अधिक चांगल्या स्थितीत असू शकतात.
चलन संकटाच्या काळात डॉलर-आधारित प्रणाली आकुंचन पावत असताना किंवा कोसळत असताना, ज्या देशांपाशी अडचणीच्या काळात बाहेर पडण्याचे बिटकॉइन हे साधन आहे, ते देश विकेंद्रित जागतिकीकरणाच्या नव्या युगात टिकून राहू शकतात.
४ मार्च २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीवर घातलेली बंदी रद्द केली, ही बाब महत्त्वाची आहे आणि असे निरीक्षण नोंदवले- “हे परिपत्रक “वाजवी नसलेल्या वर्गीकरणावर आधारित, स्पष्टपणे कारणपरंपरा नसलेले आहे आणि ते विषम निर्बंध लादते.” न्यायालयाने मान्य केले की, बंदी हा भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (जी) मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही व्यवसायाचा, किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा व्यवसाय चालवण्याच्या अधिकारावर निर्बंध आहे आणि कलम १९(६) अंतर्गत “सामान्य जनतेच्या हितासाठी” हे लादले गेले आहे का, याचा विचार न्यायालयाने केला.
भारत सरकार आता “क्रिप्टो उद्योगा”चे नियमन करण्यासाठी एका विधेयकावर काम करत आहे, जे या वर्षाच्या शेवटी संसदेत सादर केले जाईल. या क्षणी बहुतेक “क्रिप्टो उद्योग” हे सट्टा तंत्रज्ञान आहे, बिटकॉइनला उर्वरित उद्योगांसोबत जोडणे ही एक गंभीर धोरण त्रुटी असेल, जी भारताला काही दशके मागे लोटू शकते.
वर्गीकरण: बिटकॉइन हे तंत्रज्ञान, आर्थिक, भू-राजकीय आणि कायदेशीर स्तरांवर इतर डिजिटल चलन अथवा मालमत्ता प्रवर्गापेक्षा मूलभूतपणे वेगळे आहे. बिटकॉइन ही एक “डिजिटल सिंथेटिक कमोडिटी” आहे, जी सोन्याशी (परंतु त्याहीपेक्षा चांगली) अनुरूप आहे. इतर प्रत्येक डिजिटल प्रतीक हे सट्टा तंत्रज्ञान कंपनीमधील समभागासारखे आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Sambuddha Mitra Mustafi is a journalist and filmmaker currently writing a book on Bitcoin's political theory titled The Consensus of Civilizations. Earlier he was South ...
Read More +