भारत आपले जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण आफ्रिकेत नेण्याच्या दिशेने पुढे जात असताना, नायजेरिया या बदलाच्या अग्रस्थानी उभा आहे. नायजेरियामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) स्थापन होणे हे केवळ एक शैक्षणिक पाऊल नाही तर ती एक रणनीतिक भागीदारी आहे, जी 21व्या शतकात नायजेरियाच्या नवोन्मेष (इनोव्हेशन), औद्योगिकीकरण आणि जागतिक स्पर्धात्मकतेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाला नव्याने आकार देऊ शकते.
जुलै 2023 मध्ये, भारताच्या आईआईटी मद्रासने झांझिबार सरकारसोबत भारताबाहेरील पहिले IIT कॅम्पस उघडण्यासाठी ऐतिहासिक करार केला. या मॉडेलच्या यशाने पुढील महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी मार्ग मोकळा झाला: IIT नायजेरियाची निर्मिती. नायजेरियातील सुलेजास्थित फेडरल गवर्नमेंट अकॅडमी (FGA), ज्याला नायजेरियन अकॅडमी फॉर द गिफ्टेड म्हणूनही ओळखले जाते, याठिकाणी प्रस्तावित IIT नायजेरिया स्थापन करण्यात येणार आहे. हे संस्थान भारतीय शैक्षणिक उत्कृष्टता, नायजेरियाची पायाभूत सुविधा आणि स्थानिक कार्यसंचालन यांचा संगम असेल. या आराखड्यानुसार, भारत शिक्षकवर्ग, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक देखरेख पुरवेल, तर नायजेरिया पायाभूत सुविधा आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळेल. 2026 पासून वर्ग सुरू होण्याची अपेक्षा असून, नायजेरियाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
हे मॉडेल स्थानिक पातळीवर उपलब्ध करून नायजेरिया आपल्या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण स्वदेशीच देत आहे नाहीतर अनेक जण यासाठी परदेशावर अवलंबून राहिले असते.
नायजेरियासाठी ही भागीदारी केवळ परदेशी संस्था यजमान म्हणून ठेवण्यापेक्षा खूप अधिक महत्त्वाची आहे. मानवी भांडवल, तांत्रिक इनोव्हेशन आणि ज्ञान-आधारित राजनीती (डिप्लोमसी) यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासाची नव्याने कल्पना करण्याचा हा एक जाणिवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. अभियांत्रिकी, विज्ञान आणि नवकल्पनांमध्ये जगातील सर्वोत्तम प्रतिभा घडवणाऱ्या IIT मॉडेलमुळे नायजेरियन विद्यार्थ्यांना त्याच दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे ज्याने भारताच्या जागतिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेतील उत्थानाला आकार दिला. हे मॉडेल स्थानिक पातळीवर उपलब्ध करून नायजेरिया आपल्या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण स्वदेशीच देत आहे नाहीतर अनेक जण यासाठी परदेशावर अवलंबून राहिले असते.
या भागीदारीची वेळ देखील अत्यंत रणनीतिक आहे. अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांचा रिनीव्ड होप अजेंडा (Renewed Hope Agenda) मानव संसाधन विकास आणि तांत्रिक नवोन्मेष यांना नायजेरियाच्या भविष्यातील केंद्रबिंदू मानते. IIT नायजेरिया हे दीर्घकाळ औद्योगिक विविधीकरणात अडथळा ठरणाऱ्या कौशल्य-अभावाला पूरक ठरणार आहे. हे अनुप्रयुक्त संशोधन म्हणजेच अप्लाइड रिसर्च, उद्योजकता आणि नवकल्पना यांना चालना देणारी परिसंस्था तयार करण्यास मदत करेल. तसेच नायजेरियासमोरील एक कायमस्वरूपी आव्हान–ब्रेन ड्रेन–यावरही उपाय देईल. उच्च दर्जाचे शिक्षण देशातच उपलब्ध झाल्याने विद्यार्थी परदेशात जाण्याऐवजी राष्ट्रीय विकासात आपली क्षमता गुंतवण्याची शक्यता वाढेल.
ही भागीदारी दक्षिण-दक्षिण सहकार्यात नायजेरियाच्या उदयाचेही प्रतीक आहे. अनेक दशकांपासून भारत शिक्षण, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान-हस्तांतरण या क्षेत्रांत आफ्रिकेचा सातत्यपूर्ण भागीदार राहिला आहे. ITEC कार्यक्रम आणि पॅन आफ्रिका ई नेटवर्क (Pan-African e Network) सारख्या उपक्रमांनी तंत्रज्ञानापासून संरक्षण आणि सार्वजनिक प्रशासनापर्यंत विविध क्षेत्रांतील हजारो आफ्रिकन व्यावसायिकांना प्रशिक्षित केले आहे. त्यात अनेक नायजेरियनही आहेत. आता IIT कॅम्पस नायजेरियातच स्थापन करून ही भागीदारी एका नव्या उंचीवर पोहोचत आहे. जी परदेशातील प्रशिक्षणापासून स्थानिक संस्था-निर्मितीच्या दिशेने, आणि आफ्रिकेच्या उच्च-गुणवत्तेच्या, सुलभ आणि स्थानिक संदर्भात लागू होणाऱ्या शिक्षणाच्या मागणीशी थेट सुसंगत आहे.
नायजेरियासाठी दीर्घकालीन परिणाम पुढील प्रमाणे आहेत. IIT कॅम्पस नायजेरियामध्ये अशा नवकल्पक पिढीची निर्मिती करेल जी शाश्वत औद्योगिक विकासाला गती देईल आणि नायजेरियाला विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रादेशिक केंद्र म्हणून स्थिर करेल. नायजेरियन व भारतीय संशोधकांच्या सहकार्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा म्हणजेच रेन्यूएबल एनर्जी, डिजिटल इनोव्हेशन, हवामान-लवचिकता (क्लायमेट रेसिलन्स) आणि आरोग्य तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत प्रगती होईल. काळानुसार या प्रयत्नांचे परिणाम नायजेरियाच्या सीमांपलीकडेही दिसतील. ज्याने पश्चिम आफ्रिकेतील इतर देशांतील विद्यार्थ्यांना आकर्षित करत आणि नायजेरियाची आफ्रिका खंडातील तांत्रिक शिक्षणातली आघाडी मजबूत होईल.
तितकेच महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे भारत आणि नायजेरिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही देश ग्लोबल साउथला अवलंबित्व नव्हेतर, सहकार्याद्वारे सक्षम करण्याच्या दृष्टीकोनावर एकमत आहेत. या सामायिक दृष्टिकोनात शिक्षण हे एक प्रभावी साधन म्हणून उदयास येत आहे. हे एक असे साधन आहे जे केवळ ज्ञानच नव्हे तर विश्वास आणि परस्पर समृद्धीही निर्माण करते. भारत आफ्रिकेत आपली शैक्षणिक उपस्थिती वाढवत असताना, नायजेरियाने IIT कॅम्पसचे यजमान म्हणून घेतलेला निर्णय त्यास दक्षिण-दक्षिण भागीदारीच्या नव्या युगाच्या मध्यवर्ती ठिकाणी आणून ठेवतो.
नायजेरियाची भारताशी भागीदारी हेच प्रदान करते शिक्षणाला औद्योगिक महत्त्वाशी आणि राजनयाला विकासाशी जोडणारी एक व्यावहारिक चौकट
आफ्रिकेची तरुण लोकसंख्या अशा सहकार्यांना अत्यंत आवश्यक आणि योग्य वेळेवर घेतलेला निर्णय बनवते. केवळ 19 वर्षांचे मध्यम वय आणि झपाट्याने वाढणारी कामगारसंख्या यामुळे आफ्रिका खंडाला कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रगतीसाठी शाश्वत मॉडेल्सची गरज आहे. नायजेरियाची भारताशी भागीदारी हेच प्रदान करते शिक्षणाला औद्योगिक महत्त्वाशी आणि राजनयाला विकासाशी जोडणारी एक व्यावहारिक चौकट. हे दर्शवते की आफ्रिकेचा प्रगतीचा मार्ग फक्त पाश्चात्त्य मदत किंवा संस्थांवर अवलंबून नाही, तर सामायिक मूल्ये आणि समान आकांक्षांवर आधारित परस्पर भागीदारीद्वारे घडवला जाऊ शकतो.
दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता, IIT नायजेरिया परिवर्तनकारी ठरू शकते आणि फक्त देशाच्या शिक्षणव्यवस्थेसाठीच नव्हे, तर त्याच्या व्यापक सामाजिक–आर्थिक प्रवासासाठीसुद्धा. हा बदल केवळ उपभोगातून निर्मितीकडे नाही, तर संसाधन आधारित असण्याकडून नवकल्पनांनी होणाऱ्या वाढीकडे होणारा बदल आहे. नायजेरियासाठी, ही भागीदारी केवळ भारताच्या अनुभवातून शिकण्याबद्दल नाही; तर त्या अनुभवाचा उपयोग करून विशिष्ट असा नायजेरियन तांत्रिक उत्कृष्टतेचे मॉडेल घडवण्याबद्दल आहे.
IIT नायजेरिया ही केवळ एक संस्था नाही ती नायजेरियाच्या ज्ञान, नवोन्मेष आणि धोरणात्मक जागतिक भागीदारीद्वारे आपले भविष्य घडवण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे. भारताशी हातमिळवणी करून, नायजेरिया केवळ शिक्षणात गुंतवणूक करत नाही; तर आपल्या भविष्यात आणि अधिक आत्मनिर्भर आफ्रिकेच्या आशेत गुंतवणूक करत आहे.
हा लेख मूळतः मॉडर्न घानामध्ये प्रकाशित झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Samir Bhattacharya is an Associate Fellow at Observer Research Foundation (ORF), where he works on geopolitics with particular reference to Africa in the changing global ...
Read More +