मार्क रुट्टे यांनी युरोपच्या संरक्षण आत्मनिर्भरतेवर केलेल्या विधानामुळे नाटो सदस्यांमध्ये त्यांच्या भुमिकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या टिप्पणीचा नाटोच्या भविष्यावर आणि अमेरिका – युरोपच्या संरक्षण संतुलनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे पाहणे गरजेचे आहे.
ईयू (European Union) च्या संरक्षण खर्चाच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यास आणि युरोपच्या खंडीय सुरक्षेची अधिक जबाबदारी घेण्यास युरोपीय देश तयार आहेत हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना वेळोवेळी दाखवणे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळापासून युरोपचे केंद्रीय उद्दिष्ट ठरलेले आहे. एकीकडे अमेरिका आपल्या मित्रराष्ट्रांना संरक्षण खर्च वाढवण्यासाठी दबाव वाढवत आहे तर दुसरीकडे रशियामुळे संपुर्ण युरोप खंडालाच धोका निर्माण झाला आहे. या दोन आव्हानात्मक परिस्थितींमध्ये युरोपच्या नाटो सदस्यांनी ठोस भुमिका घेण्याचे धाडस दाखवले आहे. यासाठी युरोपीय देशांचे कौतुक करणेही गरजेचे आहे. परंतू नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेशिवाय आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो असे युरोपला वाटत असेल, तर वर्षानुवर्षे होत असलेल्या ठोस प्रगतीला मोठा धक्का पोहोचणार आहे, अशी टिप्पणी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांची या आठवड्यात केली आहे.
2014 च्या वेल्स शिखर परिषदेत निश्चित करण्यात आल्याप्रमाणे जवळजवळ सर्व मित्र राष्ट्रे आता संरक्षण खर्चावरील जीडीपीच्या 2 टक्के लक्ष्य पूर्ण करत आहेत. अर्थात ही अंमलबजावणी वर्षानुवर्षाच्या विसंगत पालन आणि विलंबानंतर करण्यात येत आहे. जून 2025 मध्ये हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेत, सर्व सहयोगी देशांनी 2035 पर्यंत संरक्षणावर जीडीपीच्या 5 टक्के खर्च करणे, त्यातील 3.5 टक्के संरक्षणाच्या मुख्य गरजांवर आणि 1.5 टक्के पायाभूत सुविधांच्या सुधारणांसारख्या इतर सुरक्षेशी संबंधित गरजांवर खर्च करणे अशा अधिक महत्त्वाकांक्षी ध्येयावर सहमती दर्शविली आहे. यात अकार्यक्षम खर्च लपवणाऱ्या सर्जनशील लेखांकनाचा अवलंब न करता उद्दिष्टे गाठणे, त्या खर्चाचे वास्तविक संरक्षण क्षमतांमध्ये रूपांतर करणे, अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्यासाठी युरोपियन देशांमध्ये नियोजन राखणे आणि युनायटेड स्टेट्स त्याच्या युती वचनबद्धतेशी वचनबद्ध राहते याची खात्री करणे ही चार प्रमुख आव्हाने आहेत.
अमेरिकेशिवाय आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो असे युरोपला वाटत असेल, तर वर्षानुवर्षे होत असलेल्या ठोस प्रगतीला मोठा धक्का पोहोचणार आहे, अशी टिप्पणी नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांची या आठवड्यात केली आहे.
यातील तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. युरोपचे संरक्षण क्षेत्र कितीही एकीकृत झाले तरीही डुप्लिकेशन टाळण्याचे आव्हान कायम राहणार आहे. खरं तर, काही प्रमाणात अंगभूत अतिरिक्त व्यवस्था नेहमीच आवश्यक ठरणार आहे. इयू हे कधीही सुरक्षा नियोजक किंवा प्रदाता म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले नव्हते, हे समजणे आवश्यक आहे आणि हेच महत्त्वाचे आव्हान आहे. यालाच चौथ्या मुद्याची जोड देणे गरजेचे आहे. युरोपच्या खंडीय संरक्षणाचा पाया नेहमीच नाटोमध्ये राहिलेला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर सदस्य राष्ट्रांना परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करावी लागणार आहेच पण त्यासोबत काही प्रमाणात अमेरिकेवरही अवलंबून राहावे लागणार आहे. अमेरिका अंतिम सुरक्षा हमीदाराच्या भुमिकेत कायम राहणार हे मान्य करणे गरजेचे आहे.
खरेतर, युरोप आणि अमेरिकेच्या संबंधांचा विचार करता, भविष्यात हे संबंध वेगळे वळण घेण्याची दाट शक्यता आहे. ट्रम्प यांनी पद सोडल्यानंतरही, पुढील अमेरिकन अध्यक्ष, मग तो डेमोक्रॅट असो वा रिपब्लिकन, संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात सांगायचे तर, आता परतीचे दोर कापले गेले आहेत.
हा दृष्टिकोन सध्याच्या अमेरिकन प्रशासनात लोकप्रिय आहे आणि पुढच्या काळातही तो लोकप्रिय राहणार आहे. नाटोमधील एका गटाला असेही वाटते की युरोप अंतर्गत जर मजबूत आधारस्तंभ उभा राहू शकला तर युरोपच्या क्षमतांबाबत एक ठोस संदेश दिला जाईल.
नाटोमध्ये दोन परस्परविरोधी विचारसरणींमध्ये तणाव निर्माण झाला आहे. युरोपिय रणनितीमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप कायम राहणार आहे, हे सहयोगी सदस्यांनी एकप्रकारे मान्यच केले आहे. हा दृष्टिकोन सध्याच्या अमेरिकन प्रशासनात लोकप्रिय आहे आणि पुढच्या काळातही तो लोकप्रिय राहणार आहे. नाटोमधील एका गटाला असेही वाटते की युरोप अंतर्गत जर मजबूत आधारस्तंभ उभा राहू शकला तर युरोपच्या क्षमतांबाबत एक ठोस संदेश दिला जाईल. अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवायही युरोप उत्तम कामगिरी करू शकतो हे दाखवून देण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. स्वायत्त युरोप आणि त्याने घेतलेले धोरणात्मक निर्णय यामुळे काही चिंता वाढीस लागल्या आहेत.
सरचिटणीस मार्क रुट यांच्या अलीकडील टिप्पण्यांमुळे या दुसऱ्या युक्तिवादाला बळकटी मिळण्याचा धोका आहे. एक प्रकारे त्यांची टिप्पणी ही दिशाभुल करणारी आहेच कारण कोणत्याही प्रकारे इयूमध्ये एक आधारस्तंभ निर्माण होण्याची शक्यता अगदी कमी आहे. युरोपचे रक्षण करण्यासाठी नेहमीच अमेरिकेची आवश्यकता असेल किंवा सर्वात वाईट परिस्थितीतही, अमेरिका त्याचे रक्षण करण्यासाठी नेहमीच उपस्थित राहील, या कल्पनेलाही युरोपने चिकटून राहता कामा नये. खरेतर, नाटोचे युरोपीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे या युतीचे ध्येय आणि अर्थ दोन्हीमध्ये परिवर्तन आणणे आवश्यक आहे.
हा लेख मूळतः 'वॉशिंग्टन एक्झॅमिनर' (Washington Examiner) मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Rachel Rizzo is a Senior Fellow with ORF’s Strategic Studies Programme. Her work focuses on US foreign and defence policy, the transatlantic partnership, and US-Europe-India ...
Read More +