जागतिक नेतृत्व आणि सत्तेचे संतुलन वेगाने बदलत असल्याचे दावोसमधील चर्चासत्रांतून समोर आले आहे. वेगवेगळ्या देशांचे विचार जगाचे भविष्य कसे घडवत आहेत आणि भारताची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची का ठरत आहे हे आपण या लेखामधून समजून घेणार आहोत.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाला केवळ श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचा मेळावा म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हे नवीन युगाच्या मानसिकतेचे एक बॅरोमीटर आहे. जगावर प्रभाव टाकण्याची शक्ती असलेले नेते आणि शक्तिशाली लोक बदलत्या जागतिक परिदृश्याबद्दल काय विचार करतात हे या बैठकीत दिसून आले आहे. या वर्षीच्या व्यासपीठाने नेतृत्वाचे सहा पैलू प्रदर्शित केले आहेत. यातून एकमत नाही तर विरोधाभास दिसून आला आहे.
पहिला पैलू व्यवस्थापकीय देखभालीचा होता. हा पैलू प्रामुख्याने कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भाषणात दिसून आला. महासत्तांमधील वाढत्या स्पर्धेमुळे बहुतेक देश "अधिक धोरणात्मक स्वायत्तता" मिळविण्यास प्रवृत्त झाले आहेत, ज्यामुळे जागतिक अशांतता आणि गटबाजी वाढत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
कार्नी यांचे भाषण संस्थात्मक आत्मविश्वासावर आधारित होते. त्यांनी देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला आणि मानवी हक्क, शाश्वत विकास आणि सार्वभौमत्वाचा आदर करणाऱ्या जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार केला. जगाने 'तत्त्वनिष्ठ आणि व्यावहारिक' असले पाहिजे, जागतिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही, असा संदेश त्यांनी दिला. या नेतृत्वाचा विद्यमान संस्थांवर विश्वास आहे. तसेच या संस्था जागतिक प्रगतीसाठी भरीव योगदान देतील असा त्यांचा समज आहे.
कार्नी यांचे भाषण संस्थात्मक आत्मविश्वासावर आधारित होते. त्यांनी देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला आणि मानवी हक्क, शाश्वत विकास आणि सार्वभौमत्वाचा आदर करणाऱ्या जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार केला.
दुसरा दृष्टिकोन हा व्यवहारातील व्यत्ययाबाबत होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. ट्रम्प यांचे लक्ष बहुपक्षीय फायद्यांकडे नसून द्विपक्षीय फायद्यांवर एकवटलेले होते. त्यांनी आर्थिक फायद्याला प्राधान्य दिले आणि युतींना कर्तव्यांऐवजी साधने मानले आहे. समृद्धी प्रक्रियेतून येत नाही तर सत्तेतून येते, असा स्पष्ट संदेश ट्रम्प यांनी दिला. "अमेरिका ही एक महान शक्ती आहे आणि मला वाटते की जगाला ते समजले आहे", असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांचे लक्ष टेरिफ आणि व्यापार तूटी सारख्या अमेरिकेसाठी फायदेशीर घटकांवर होते. त्यांचे लक्ष नियम किंवा संस्था निर्मितीमध्ये नव्हते तर अमेरिकेच्या हितावर एकवटलेले होते.
दावोसचा तिसरा पैलू म्हणजे समान नेतृत्वाची इच्छा. अशी इच्छा युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी व्यक्त केली होती. सार्वत्रिक मूल्ये अजूनही सत्तेचा आधार बनू शकतात, या युरोपच्या विश्वासाला दृढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या संदर्भात, त्यांनी हवामान नेतृत्व, नियमांवर आधारित व्यापार आणि जबाबदार डिजिटल सहकार्य यांस धोरणात्मक ताकदीचे स्रोत म्हणून उद्धृत केले.
असे असले तरी दावोसमध्ये न सुटलेला तणाव दिसून आला. युरोपचा प्रभाव मानकांवर आधारित आहे, परंतु आता ही मानके लागू करण्याची क्षमता युरोपमध्ये आहे का याची जग चाचणी घेत आहे. सध्या, जग मूल्यांपेक्षा सत्तेला जास्त महत्त्व देत आहे. वॉन डेर लेयन यांचे भाषण आदर्शवादी, अर्थपूर्ण आणि तत्वनिष्ठ होते, परंतु ते थोडे उदासीन देखील होते. "25 वर्षांपूर्वी त्यांनी ज्या सहकारी जागतिक व्यवस्थेची कल्पना केली होती ती प्रत्यक्षात आलेली नाही", हे त्यांनी स्पष्टपणे मांडले.
इंडोनेशियन अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी मांडल्याप्रमाणे समावेशाच्या तत्त्वाकडे परतणे हा चौथा पैलू होता. त्यांनी त्यांच्या भाषणातून "शांतीशिवाय समृद्धी येणार नाही" ही बाब स्पष्टपणे मांडली. प्रबोवो यांनी इंडोनेशियाला "जागतिक उज्ज्वल बिंदू" म्हणून ओळखले जाण्याच्या गरजेवर भर दिला. इंडोनेशियाने सातत्याने विभाजनाऐवजी एकता आणि संघर्षाऐवजी सहकार्याच्या या वारशामुळे आणि कर्ज परतफेडीच्या सातत्याने निर्दोष रेकॉर्डमुळे हे यश मिळवले आहे, असे ते म्हणाले. त्यानिमित्ताने इंडोनेशियातील मजबूत देशांतर्गत गुंतवणूक आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेत आहे हे प्रबोवो सुबियांतो यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकत्रितपणे, या चार दृष्टिकोनातून एक तुटक जागतिक चित्र समोर आले आहे. गरज नसलेले व्यवस्थापन, जबाबदारीशिवाय व्यत्यय, पुरेशी शक्ती नसलेली मूल्ये आणि अराजकतेऐवजी शांतता याचे दर्शन यामुळे घडले आहे.
पाचवा, परंतु महत्त्वाचा पैलू भारताने केवळ शाब्दिक उथळपणापेक्षा तांत्रिक आत्मविश्वासाने सादर केला आहे. भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रभावीपणे भाषण केले. त्यांनी भारताचे उत्पादन कौशल्य आणि त्याच्या परिवर्तनकारी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील विकासाचे जगासमोर सादरीकरण केले. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या शर्यतीबद्दल वैष्णव म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करणे यावरून कोणत्याही देशाच्या यशाची हमी देता येत नाही. AI चा वापर किती सर्जनशीलपणे केला जातो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरते. विश्वासार्हता ही घोषणांमुळे नाही तर अंमलबजावणीमुळे येते हे अश्विनी वैष्णव यांनी यांच्या साध्या शैलीने दावोस येथे जमलेल्या दिग्गजांना पटवून दिले.
सहावा रंग राजकीय उपस्थितीचा होता, ज्याचे प्रतिनिधित्व स्मृती इराणी यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या लिड पॅव्हेलिअनमध्ये केले. महिला नेतृत्व, आरोग्य आणि उद्योजकतेबाबत भारताचा आवाज बळकट करणे याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. यास जागतिक हितसंबंधांच्या युती म्हणून सादर करण्यात आले.
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रभावीपणे भाषण केले. त्यांनी भारताचे उत्पादन कौशल्य आणि त्याच्या परिवर्तनकारी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील विकासाचे जगासमोर सादरीकरण केले.
स्थापनेपासून, या युतीने महिलांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले आहे. आता यास 'आर्थिक आणि राष्ट्रीय अत्यावश्यकता' म्हणून पाहिले जात आहे. स्मृती इराणी यांचा संदेश महिलांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा होता. हा संदेश सरकार आणि उद्योगजगतात प्रतिध्वनीत झाला.
एकत्रितपणे, हे सहा दृष्टिकोन नेतृत्वाच्या लँडस्केपची एक नवीन कथा कथन करतात. व्यवस्थापकीय, व्यवहारात्मक, मानकात्मक, समावेशक, तांत्रिक आणि राजकीय विचारधारांमध्ये विभाजित आहेत. जरी दावोस हे एक महत्त्वाचे व्यासपीठ राहिले असले तरी, तेथे जग पालटवणारे विचार मांडण्यात आले नाहीत. ज्यांना आत्मविश्वासाने आणि महत्त्वाकांक्षेने, तसेच क्षमतेने कामे कशी पूर्ण करायची हे माहित असते, त्यांच्याकडे सध्याचे नेतृत्व आहे.
या संदर्भात पाहिले तर, भारत आणि इंडोनेशियाचा दृष्टिकोन स्पष्टता दर्शवणारा आहे. यावरून असे दिसून आले आहे की हे जग फक्त बोलणाऱ्यांचे नसून शांतपणे, सात्यतपुर्णरितीने काम करणाऱ्यांचे आहे आणि अशीच लोकं अधिक चांगले भविष्य निर्माण करणार आहेत.
हा लेख द जकार्ता पोस्ट मध्ये प्रकाशित झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Samir Saran is the President of the Observer Research Foundation (ORF), India’s premier think tank, headquartered in New Delhi with affiliates in North America and ...
Read More +