Image Source: Getty
टाइम युज सर्वे म्हणजे या गोष्टीचे सर्वेक्षण की लोक आपला वेळ कसा व्यतीत करतात. जो 19व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंड आणि फ्रान्समधील कामकाजी (वर्किंग क्लास) कुटुंबांमध्ये सुरू झाला, सुरुवातीला कुटुंबाच्या बजेटचे परीक्षण करण्यासाठी आणि लोकांच्या वेळेच्या वापरावर आधारित वर्तणुकीचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आला होता. 20व्या शतकात, टाइम युज सर्वेच्या व्याप्तीमध्ये प्रगती झाली आणि यामध्ये श्रमिक बाजारपेठेच्या बाहेर केलेल्या कामाचे सर्वेक्षण होऊ लागले यासोबतच घरामध्ये वेतनाशिवाय (अनपेड) केल्या जाणाऱ्या कामाचे आर्थिक मूल्य मोजले जाऊ लागले."
जरी कुटुंबातील बहुतेक वेतनाशिवायची कामे महिलाच करतात, तरी टाइम युज सर्वे स्त्री-पुरुष समानता मोजण्यासाठी आणि महिलांच्या वेतनाशिवाय केल्या जाणाऱ्या म्हणजेच अनपेड कामांचे राष्ट्रीय कल्याण आणि एकूण घरेलु उत्पादन (GDP) मध्ये काय योगदान आहे, हे मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बनले आहेत. जागतिक स्तरावर, महिलांद्वारे जगातील तीन-चतुर्थांश अनपेड कामे केली जातात. कुटुंबांमधील कामाचे लिंग आधारित विभाजन महिलांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधीत अडथळा आणते.
भारतीय महिलांनी अनपेड घरगुती आणि देखभाल कार्यावर घालवलेला वेळ पुरुषांपेक्षा आठपट जास्त होता आणि तो इतर अनेक देशांच्या तुलनेत अधिक होता.
ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि चीन या देशांप्रमाणे भारत ही एक असा देश आहे, जे राष्ट्रीय स्तरावर टाईम युज सर्वेक्षणे करतात. भारतातील पहिले सर्वेक्षण 1998 मध्ये प्रायोगिक तत्वावर केले गेले होते, ज्यामध्ये सहा राज्यांचा समावेश होता आणि ज्यामुळे 2019 मध्ये एक मोठे सर्वेक्षण करण्याची पायाभरणी केली गेली. 2019 च्या सर्वेक्षणाने भारतातील पुरुष आणि महिलांमधील वेळेच्या वापरातील भेद खुला केला. भारतीय महिलांनी अनपेड घरगुती आणि देखभाल कार्यावर घालवलेला वेळ पुरुषांपेक्षा आठपट जास्त होता आणि तो इतर अनेक देशांच्या तुलनेत अधिक होता. भारतातील महिलांचा श्रमिक भागीदारी दर घटण्याचे कारण टाईम युज सर्वेक्षणात सापडते.
वेळेचा अभाव एक लिंगावर आधारित असलेली समस्या आहे, जी पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक परिणाम करते. संशोधनांतून सिद्ध झाले आहे की, वेतनाशिवाय आणि वेतनआधारित कामांच्या अती ओझ्यामुळे महिलांना त्यांच्या हिताच्या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्याकडे वेतन देणारा रोजगार, शिक्षण आणि मनोरंजनासाठी कमी वेळ राहतो, आणि यामुळे त्यांच्यावर गरिबीत अडकण्याचा किंवा गरिबीतच राहण्याचा धोका वाढतो.
2024 च्या सर्वेक्षणाचे आकडे आणि महिलांकडील वेळेचा अभाव
2024 च्या टाइम-यूज सर्वेक्षणाचे प्राथमिक निष्कर्ष (जानेवारी–डिसेंबर 2024) नुकतेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केले आहेत. या सर्वेक्षणानुसार, 6 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या महिलांना रोज घरकामासाठी 289 मिनिटे खर्च करावी लागतात ज्याचे त्यांना कोणतेही वेतन मिळत नाही, तर पुरुषांनी 88 मिनिटे खर्च केली आहेत. एकूण दिवसभरातील वेळेच्या 16.4 टक्के वेळेत महिलांनी विना वेतनाचे (अनपेड) घरकाम केले, तर पुरुषांनी यामध्ये फक्त 1.7 टक्के वेळ खर्च केला आहे. एवढेच नाही तर घरकामाव्यतिरिक्त, भारतातील महिलांनी रोज 137 मिनिटे मुले आणि वयोवृद्धांची देखभाल करण्यास घालवली, तर पुरुषांनी यासाठी 75 मिनिटे खर्च केली.
वाढत्या वयानुसार विनावेतन घरकाम आणि देखभालीचा महिलांवरील भार वाढत जात आहे. 15–59 वर्षे वयाच्या महिलांनी अशा कामांसाठी रोज 305 मिनिटे खर्च केली, जी 2019 मध्ये 315 मिनिटे होती, म्हणजेच थोडा वेळ कमी झाला आहे. या वयाच्या गटातील 41 टक्के महिलांनी घरातील सदस्यांची देखभाल केली, तर पुरुषांमध्ये ही संख्या 21.4 टक्के होती.
15–59 वर्षे वयाच्या महिलांनी अशा कामांसाठी रोज 305 मिनिटे खर्च केली, जी 2019 मध्ये 315 मिनिटे होती, म्हणजेच थोडा वेळ कमी झाला आहे.
या सर्वेक्षणातून असे समोर येते की महिलांवर असलेल्या या घरगुती जबाबदाऱ्यांमूळे ज्याचे त्यांना कोणतेही वेतन मिळत नाही, रोजगार म्हणजेच असे काम ज्याबदल्यात आर्थिक मोबदला मिळेल, करण्यास वेळ उरत नाही. टाइम-यूज सर्वेनुसार 15–59 वर्षे वयाच्या 75 टक्के पुरुषांनी 24 तासांच्या संदर्भ कालावधीत पगारी रोजगार आणि संबंधित क्रियांमध्ये सहभाग घेतला, तर केवळ 25 टक्के महिलांनी पगारी कामकाजात सहभाग घेतला.
विनावेतन कामाचे आर्थिक मूल्य
भारतामध्ये गेल्या दशकात महिलांची बँक खाती आणि डिजिटल वित्तीय समावेशनामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, परिणामी महिलांचे सक्षमीकरण आणि कुटुंबामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला आहे. भौतीक पायाभूत सुविधा जसे की स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन, पाइपलाइनने पाणी पुरवठा, वीज, रस्ते बांधणी, आणि स्वच्छता सेवा यामध्ये सुधारणा झाल्या आहेत, ज्या सर्व विकसनशील देशांमध्ये महिलांच्या वेळेच्या अभावास दुर करण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. तरीसुद्धा, भारतीय महिलांवरील एकूण कामाचा भार कमी झालेला नाही. 2019 च्या सर्वेक्षणानुसार, स्वयंपाक, स्वच्छता आणि मुलांची देखभाल ह्या विनावेतन केल्या जाणाऱ्या कामात महिलांचा 85 टक्के वेळ व्यतीत होत आहे. महिला सहाय्यक धोरणे असतानाही, महिलांच्या विनावेतन कामाबाबतचे सामाजिक नियमांमध्ये कोणतेही बदल होताना दिसत नाहीत.
जरी अनपेड म्हणजे विनावेतन काम कौटुंबिक आणि सामूहिक समृद्धीसाठी तसेच एकूण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असले तरी, महिलांच्या या योगदानास फारशी मान्यता आणि किंमत दिली जात नाही. तथापि, संशोधक टाईम युज सर्वेक्षणातील माहिती वापरून महिलांच्या विनवेतन कामाचे आर्थिक मूल्य मोजू लागले आहेत. गेल्या वर्षी सरकारने दिलेल्या एका अहवालानुसार, भारताच्या जीडीपी च्या 15 टक्के ते 17 टक्के इतके महिलांच्या विनावेतन घरगुती कामाचे आर्थिक मूल्य आहे, अशी गणना करण्यात आली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की घरगुती कामामध्ये महिलांच्या योगदानामुळे निर्माण होणारे महत्त्वाचे मूल्य बहुतेक वेळा दुर्लक्षित होते कारण ते श्रमिक बाजाराच्या बाहेर आहे.
अलीकडील टाईम युज सर्वेक्षणाने घरातील विनावेतन कामाच्या असमान वितरणाला म्हणजेच महिलांच्या तुलनेत पूरूषांवर असणारा कमी भार संबोधित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील सहकार्य, देखभाल मूलभूत सुविधा (केअर इन्फ्रास्ट्रक्चर) मध्ये वाढीव गुंतवणूक, सहज मिळणाऱ्या रजा आणि लाभदायक धोरणे, कौशल्य प्रशिक्षण, आणि देखभाल सेवा क्षेत्रात नोकरी निर्माण करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून वेळेच्या अभावातील लिंग आधारित असमानता आणि महिलांना कामकाजी सहभागाला मर्यादित करणारी तफावत दूर करण्यासाठी आवश्यक असेल.
सुनैना कुमार ह्या ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये सिनियर फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.