अफगाण ऑनलाइन नेटवर्क्स मीम्स, हॅशटॅग्स आणि विकेंद्रित मेसेजिंगचा वापर करून नरेटीव्ह वर्चस्वासाठीच्या संघर्षात पाकिस्तानच्या संस्थात्मक संवादापेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहेत
गेल्या वर्षापासून अफगाणिस्तानातील तालिबान सरकार आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेले तणाव हे दाखवून देतात की, ऑनलाइन नरेटीव्ह म्हणजेच कथनांवरील संघर्ष हा रणांगणावरील घडामोडींइतकाच महत्त्वाचा ठरू शकतो. ‘ऑपरेशन खैबर स्टॉर्म’पासून ‘ऑपरेशन गजब लिल हक’पर्यंत, पाकिस्तानच्या सैन्याने अफगाण तालिबानला केवळ लष्करी नव्हे तर संज्ञानात्मक (कॉग्निटीव्ह) युद्धाद्वारेही लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर, मीम्स, व्यंगचित्रे आणि व्हायरल विनोद हे प्रभाव टाकण्याची अनपेक्षित साधने बनली आहेत, जी जनमत घडवतात आणि पारंपरिक सरकारी संवाद पद्धतींना आव्हान देतात.
पारंपरिकपणे पाकिस्तानने नरेटीव्ह घडवण्यासाठी संस्थात्मक संवाद व्यवस्थेवर भर दिला असला, तरी अफगाण माहिती क्षेत्र आता अधिक विखुरलेले आणि बहुपदरी झाले आहे. आता संदेश अनेक स्रोतांकडून एकाच वेळी येतात, त्यात अधिकृत तालिबान प्रवक्ते, अफगाण पत्रकार, कार्यकर्ते, मीम पेजेस आणि परदेशातील अफगाण समुदाय यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून एक विकेंद्रित माहिती परिसंस्था तयार केली आहे, जी पाकिस्तानच्या अधिकृत संवाद यंत्रणेला, विशेषतः इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR), प्रभावीपणे आव्हान देऊ शकते.
पारंपरिकपणे पाकिस्तानने नरेटीव्ह घडवण्यासाठी संस्थात्मक संवाद व्यवस्थेवर भर दिला असला, तरी अफगाण माहिती क्षेत्र आता अधिक विखुरलेले आणि बहुपदरी झाले आहे.
या कथनात्मक संघर्षातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळेचे महत्त्व. फेब्रुवारी 2026 मध्ये हवाई हल्ले सुरू होताच अफगाण खात्यांनी लगेचच आपले नरेटीव्ह प्रसारित करण्यास सुरुवात केली. अधिकृत ISPR चॅनेल्सद्वारे निवेदने येईपर्यंत अफगाण नरेटीव्ह (कथन) आधीच ऑनलाइन प्रभाव निर्माण करून बसले होते. हे उदाहरण विकेंद्रित डिजिटल नेटवर्क्स आणि केंद्रीकृत राज्य संवाद व्यवस्थांमधील व्यापक संरचनात्मक असमतोल दर्शवतो. अनेक वेळा, विनोदी आणि व्यंगात्मक कथनांनी अधिकृत संदेशांना प्रभावीपणे आव्हान दिले आहे, विशेषतः जेव्हा राष्ट्र-प्रायोजित विनोद ऑनलाइन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतात.
अफगाण माहिती परिसंस्था प्रामुख्याने तीन परस्परसंबंधित डिजिटल माध्यमांद्वारे कार्य करते: i) अधिकृत निवेदने आणि राजकीय संदेश, ii) मीम्स आणि हॅशटॅग मोहिमा, आणि iii) समन्वित संदेश नेटवर्क्स.
हे तिन्ही मिळून एक बहुस्तरीय माहिती अभियान तयार करतात, जे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घटनांची धारणा घडवण्यास सक्षम आहे.
आधुनिक माहिती युद्धातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संघर्षाचे शेअर करण्यायोग्य डिजिटल सामग्रीत रूपांतर. लष्करी चकमकींच्या बातम्या समोर येताच सोशल मीडियावर मीम्स, विनोद आणि प्रतिक्रिया यांचा पूर येतो. वरवर पाहता हे तुच्छ वाटू शकते, परंतु डिजिटल माहिती परिसंस्थेत त्याची महत्त्वाची भूमिका असते. मीम्स जटिल राजकीय मुद्द्यांना आकर्षक दृश्य स्वरूपात मांडतात, जे सोशल मीडियावर वेगाने पसरतात. विनोद आणि प्रतीकात्मकतेच्या आधारे ते लक्ष वेधून घेतात आणि जनमत घडवण्यात प्रभावी ठरतात. परिणामी, मीम्स भू-राजकीय संघर्षाला कथनात्मक नाट्यात रूपांतरित करतात आणि भावनिक प्रभावाला एक प्रकारचे शस्त्र बनवतात.
अफगाण माहिती परिसंस्था प्रामुख्याने तीन परस्परसंबंधित डिजिटल माध्यमांद्वारे कार्य करते: i) अधिकृत निवेदने आणि राजकीय संदेश, ii) मीम्स आणि हॅशटॅग मोहिमा, आणि iii) समन्वित संदेश नेटवर्क्स.
हॅशटॅग मोहिमा या अफगाण डिजिटल चळवळीतील सर्वात दृश्यमान साधनांपैकी एक आहेत. पाकिस्तानसोबत तणाव वाढलेल्या काळात कार्यकर्ते आणि विश्लेषक अफगाण सार्वभौमत्व आणि पाकिस्तानच्या आक्रमकतेच्या चौकटीत कथन मांडण्यासाठी समन्वित हॅशटॅग्स पुढे आणतात. उदाहरणार्थ: #SanctionPakistan, #FreeAfghanistanFromPakistan, #PakistaniAggression, #AfghanSovereignty, #HandsoffAfghanistan, #PakistanProxyWar

स्रोत: X (ट्विटर)
हे हॅशटॅग्स अनेक रणनीतिक भूमिका बजावतात. पहिले म्हणजे, ते एकसंध चौकट निर्माण करतात, ज्यामुळे हजारो खाते एकाच संदेशाभोवती एकत्र येऊ शकतात. दुसरे म्हणजे, ते अल्गोरिदमद्वारे दृश्यता वाढवतात, ज्यामुळे हे नरेटीव्ह सोशल मीडियावर ट्रेंड होऊ शकते. तिसरे म्हणजे, ते वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवतात, ज्यामुळे पत्रकार, धोरणकर्ते आणि परदेशातील समुदायांचे लक्ष वेधले जाते.
हॅशटॅग्ससोबतच, मीम्स हे डिजिटल प्रचाराचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहेत. त्यांच्या प्रभावाचे कारण म्हणजे विनोद, प्रतीकात्मकता आणि भावनिक प्रभाव यांचा संगम. उदाहरणार्थ, काही मीम्समध्ये पाकिस्तानला अनेक दिशांनी दबावाखाली असल्याचे दाखवले जाते, ज्यातून एक विशिष्ट कथन म्हणजेच नरेटीव्ह तयार केले जाते.

स्रोत: VSK तमिळनाडू
अशा प्रकारच्या दृश्य मांडणीतून ऑनलाइन एक व्यापक कथन दिसून येते की पाकिस्तान अनेक आघाड्यांवर दबावाला सामोरे जात आहे जसे की भारत, अफगाण तालिबान, वेगळ्या बलुचची मागणी करणारा गट आणि अंतर्गत अस्थिरता.
मीम्सचा आणखी एक प्रकार पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या कमकुवत आणि रणनीतिकदृष्ट्या एकाकी दाखवतो. यात विशेषतः अफगाणिस्तानमध्ये “स्ट्रॅटेजिक डेप्थ” मिळवण्याच्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन धोरणाचा उलट परिणाम झाल्याचे दर्शवले जाते.

स्रोत: इंस्टाग्राम आणि ट्विटर
या दृश्य कथनांमध्ये सतत दिसणारा संदेश असा आहे की अफगाण संघर्षाच्या काळात पाकिस्तानने उग्रवादी गटांना दिलेल्या पाठिंब्यामुळे दीर्घकालीन सुरक्षा समस्या निर्माण झाल्या. हे कथन अफगाण राष्ट्रवादी विचारधारेत ठळकपणे दिसते, कारण 2001 ते 2021 दरम्यान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हस्तक्षेपात पाकिस्तानच्या भूमिकेच्या आठवणी अजूनही तीव्र आहेत. काही उदाहरणांमध्ये संकटाच्या काळात अफवा आणि चुकीची माहिती कशी पसरते हेही दाखवले जाते. जसे की विमान पाडल्याचे किंवा रणांगणातील विजयाचे दावे.

स्रोत: सुपीक्सी न्यूज, X
जरी अशा दाव्यांना “अप्रमाणित” असे लेबल लावले गेले तरी, ते जनमतावर परिणाम करतात, कारण ते अनिश्चितता निर्माण करतात आणि पाकिस्तानविरोधी भावना अधिक तीव्र करतात. अनेक मीम्समध्ये रणांगणावरील अपमानास्पद परिस्थिती दाखवून पाकिस्तानच्या सैन्याला लक्ष्य केले जाते.

स्रोत: हिंदुस्तान टाइम्स आणि इन्स्टाग्राम
या प्रतिमा केवळ दृश्य मांडणी नसून त्यांचा प्रतीकात्मक उद्देश स्पष्ट आहे की पाकिस्तानच्या लष्करी विश्वासार्हतेला धक्का देणे आणि सीमापार संघर्षांमध्ये तालिबान लढवय्यांना विजयी दाखवणे.
अफगाण माहिती मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध घटकांमधील समन्वय. जरी केंद्रीकृत नियंत्रणाचे स्पष्ट पुरावे कमी असले तरी, संपूर्ण संदेश परिसंस्था एक ठराविक पॅटर्नचे पालन करताना दिसते.
प्रथम, तालिबानचे अधिकृत प्रवक्ते लष्करी किंवा राजकीय घडामोडींवर निवेदने देतात, ज्यामध्ये अफगाण सार्वभौमत्वावर भर दिला जातो आणि बाह्य हस्तक्षेपाचा निषेध केला जातो. त्यानंतर पत्रकार आणि विश्लेषक हे कथन अधिक व्यापक करतात, संदर्भ देतात आणि अधिकृत विधानांचा प्रसार करतात. पुढे, कार्यकर्ते समन्वित हॅशटॅग मोहिमा चालवतात, ज्यामुळे X सारख्या प्लॅटफॉर्मवर दृश्यता वाढते. त्यानंतर मीम पेजेस आणि दृश्य प्रचार करणारी खाती या कथनाला सहज शेअर करता येईल अशा स्वरूपात रूपांतरित करतात. शेवटी, परदेशातील अफगाण समुदाय हे कथन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवतात, विशेषतः पाश्चिमात्य प्रेक्षक आणि मानवाधिकार संस्थांकडे.
ही बहुस्तरीय संवाद रचना एक प्रभावी फीडबॅक लूप तयार करते. प्रत्येक घटक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून राजकीय, पत्रकारिता, कार्यकर्ते किंवा विनोद एकच कथन मजबूत करतो, ज्यामुळे संपूर्ण मोहिम नैसर्गिक वाटते पण संदेशाची सुसंगती कायम राहते.
राष्ट्राशी संबंधित व्यक्तींनी इंटरनेटवरील विनोदाची शैली आत्मसात करण्याचे प्रयत्न नेहमी यशस्वी ठरत नाहीत. याचे एक उदाहरण म्हणजे पाकिस्तानी राजकीय विश्लेषक आणि माजी सल्लागार बॅरिस्टर शाहझाद वर्राइच यांनी सोशल मीडियावर केलेली “अच्छा जी” अशी पोस्ट, ज्यात त्यांनी अफगाण नागरिकांना उद्देशून हलक्या-फुलक्या पद्धतीने पाकिस्तानच्या सैन्याच्या समर्थनार्थ संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

स्रोत: X, हँडल – बदर शहबाज (@BSWarraich)
विस्तृत पाठिंबा मिळण्याऐवजी, ही पोस्ट लवकरच ऑनलाइन चेष्टेचा विषय बनली. अनेक वापरकर्त्यांनी त्या संदेशाच्या शैलीची खिल्ली उडवणारे स्वतःचे मीम्स तयार केले, तर काहींनी देशभक्तीपर संदेशासाठी विनोदाचा वापर करण्याच्या प्रयत्नावर टीका केली.

स्रोत: X,

स्रोत: X हँडल: Badar Shahbaz (@BSWarraich)

स्रोत: X, हँडल: फातिमा बलुच आणि पीस विदिन
या घटनेने संस्थात्मक संवाद धोरणांसमोरील एक महत्त्वाचे आव्हान अधोरेखित केले. इंटरनेटवरील विनोद प्रामुख्याने ऑनलाइन समुदायांतून नैसर्गिकरीत्या निर्माण होतो, अधिकृत मोहिमांमधून नव्हे. जेव्हा राष्ट्राशी संबंधित व्यक्ती टॉप डाउन पद्धतीने मीम संस्कृतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तो कृत्रिम किंवा दिखाऊ वाटू शकतो. अफगाण माहिती संघर्षाच्या संदर्भात अशा चुका कथनाच्या विश्वासार्हतेला धक्का देऊ शकतात.
अफगाण आणि पाकिस्तानी माहिती संरचनांमधील फरक डिजिटल माहिती युद्धातील एक महत्त्वाचा असमतोल दाखवतो.
पाकिस्तानची संवाद रणनीती, विशेषतः ISPR द्वारे, संस्थात्मक आणि केंद्रीकृत आहे. अधिकृत निवेदने सहसा पडताळलेली, काळजीपूर्वक शब्दबद्ध केलेली आणि औपचारिक माध्यमांतून प्रसिद्ध केली जातात. या पद्धतीमुळे विश्वासार्हता वाढते, परंतु वेगाने घडणाऱ्या घटनांमध्ये प्रतिक्रिया देण्यास विलंब होऊ शकतो. त्याउलट, अफगाण डिजिटल नेटवर्क्स अधिक विकेंद्रित आणि लवचिक आहेत. कार्यकर्ते, पत्रकार आणि अनामिक खाती स्वतंत्रपणे कार्य करत असल्यामुळे, कोणत्याही घटनेनंतर काही मिनिटांतच कथन पसरू शकते. परिणामी, या माहिती वातावरणात संस्थात्मक अधिकारापेक्षा वेग आणि प्रमाणाला अधिक प्राधान्य दिले जाते.
ही विकेंद्रित रचना अनेकदा अफगाण कथनांना माहिती प्रवाहाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच वर्चस्व मिळवून देते, जरी पाकिस्तान नंतर अधिकृत स्पष्टीकरण देत असला तरी.
ही विकेंद्रित रचना अनेकदा अफगाण कथनांना माहिती प्रवाहाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच वर्चस्व मिळवून देते, जरी पाकिस्तान नंतर अधिकृत स्पष्टीकरण देत असला तरी. अफगाण माहिती मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रवासी (डायस्पोरा) समुदायाची भूमिका. या समुदायाला आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि धोरणात्मक नेटवर्क्समध्ये अधिक प्रवेश असल्यामुळे ते प्रादेशिक वादांना जागतिक स्तरावर नेऊ शकतात. ऑनलाइन याचिका, प्रचार मोहिमा आणि सोशल मीडिया चळवळींच्या माध्यमातून हे घटक स्थानिक संघर्षांना जागतिक राजकीय चर्चेत रूपांतरित करतात.
अफगाणिस्तान–पाकिस्तान तणावातील बदलत्या परिस्थितीत माहिती युद्ध हे प्रादेशिक भू-राजकारणाचे एक केंद्रस्थानी असलेला घटक बनले आहे. तालिबान प्रवक्ते, पत्रकार, कार्यकर्ते आणि प्रवासी समुदाय यांचा समावेश असलेल्या अफगाण डिजिटल नेटवर्क्सनी एक विकेंद्रित संवाद परिसंस्था विकसित केली आहे, जी पाकिस्तानच्या रणनीतिक संदेशांना प्रभावीपणे आव्हान देऊ शकते. या परिसंस्थेत विनोद हे एक अनपेक्षित पण प्रभावी साधन बनले आहे. मीम्स आणि व्यंगचित्रे भू-राजकीय संघर्षाला सहज शेअर करता येईल अशा स्वरूपात रूपांतरित करतात आणि दृश्य कथन व व्हायरल विनोदाच्या माध्यमातून जनमत घडवतात.
पाकिस्तानसाठी आव्हान केवळ विशिष्ट कथनांना प्रत्युत्तर देण्याचे नाही, तर बदलत्या माहिती वातावरणाशी जुळवून घेण्याचे आहे, जिथे विकेंद्रित डिजिटल घटकांचा प्रभाव वाढत आहे. सोशल मीडियामुळे राजकीय संवादाची व्याख्या बदलत असताना, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील कथनात्मक संघर्ष त्यांच्या गुंतागुंतीच्या संबंधांचा कायमस्वरूपी भाग राहण्याची शक्यता आहे. माहितीच्या युगात, कथन वर्चस्वासाठीची लढाई लष्करी कारवाया संपल्यानंतरही थांबत नाही. ती ऑनलाइन सुरूच राहते, जिथे पुढचा व्हायरल मीम कोणत्याही अधिकृत निवेदनापेक्षा अधिक वेगाने जनमत बदलू शकतो.
सौम्या अवस्थी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी येथे फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr Soumya Awasthi is a Fellow, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation. Her work focuses on the intersection of technology and ...
Read More +