Author : Clemens Chay

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 10, 2026 Updated 0 Hours ago

मध्यपूर्वेचा बराचसा भाग विस्कळीत असताना आखातातील देश इथल्या दळणवळणाला (कनेक्टिव्हिटी) आकार देत आहेत. विमान वाहतूक, सागरी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल नेटवर्कचा वापर करून हे देश या प्रदेशावरचे भूराजकीय वर्चस्व स्थापित करत आहेत.  

तेल नव्हे, कनेक्टिव्हिटी: गल्फची नवी जागतिक ओळख

    मे 2011 मध्ये अरब स्प्रिंगनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी परराष्ट्र खात्यातर्फे बंडखोरी करणाऱ्या पिढीच्या प्रतिनिधींना संबोधित केले. मध्यपूर्वेचा प्रदेश तेव्हाच उलथापालथीने हादरला होता. काही देशांना तेल आणि वायूच्या संपत्तीने आशिर्वाद मिळाला आहे, असे बराक ओबामा म्हणाले, पण त्याचवेळी ज्ञान आणि नवोपक्रमाने प्रेरित जगात कोणतीही विकास रणनीती केवळ जमिनीतून बाहेर पडणाऱ्या गोष्टींवर आधारित असू शकत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

    एक दशकाहून अधिक काळानंतर आखाती अरब देशांनी आता याला प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद क्रांतीद्वारे नाही तर पुनर्निर्मितीद्वारे दिला गेला. हेन्री किसिंजर यांनी लिहिल्याप्रमाणे मध्यपूर्वेचा बराचसा भाग खंडित झाला आहे आणि काही विशाल प्रदेश अराजकता आणि अतिरेकी कारवायांना सामोरे जात आहेत. असे असताना आखाती देशांच्या राजधान्या मात्र या भागातली मरुद्याने म्हणून आकाराला आल्या आहेत.

    गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत, आखाती प्रदेशात आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक परिवर्तन सुरू झाले आहे. जागतिक व्यापार, भांडवल आणि प्रतिभेच्या क्षेत्रात हे देशही पुढाकार घेत आहेत. IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2026 मध्ये GCC अर्थव्यवस्था 4.2 टक्के दराने वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.  हा दर जागतिक सरासरी 3.3 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामध्ये तेल नसलेल्या क्षेत्रांनी या गतीला बराचशी चालना दिली आहे.

    आखाताच्या सर्वंकष चित्राच्या अनेक आयामांपैकी विमान वाहतुकीचे चित्र सर्वात मोठे आहे. विमान वाहतुकीच्या केंद्रस्थानी एमिरेट्स, कतार एअरवेज आणि एतिहाद एअरवेज आहेत. या माध्यमातून हे देश आपले ब्रँडिंग, आर्थिक विकास आणि जागतिक पोहोच वाढवत असतात. विमानसेवा हे त्यांचे एक शक्तिशाली साधन आहे.

    याचा परिणाम म्हणून हवाई, समुद्र आणि जमिनीवरील जागतिक व्यापाराच्या धमन्यांमध्ये पसरलेली एक नवीन दळणवळणाची (कनेक्टिव्हिटी) रचना आकाराला आली आहे. ओबामांनी 2011 मध्ये त्याचा वेध घेतला होता, असे म्हणावे लागेल.   

    आकाशातला विजय

    आखाताच्या सर्वंकष चित्राच्या अनेक आयामांपैकी विमान वाहतुकीचे चित्र सर्वात मोठे आहे. विमान वाहतुकीच्या केंद्रस्थानी एमिरेट्स, कतार एअरवेज आणि एतिहाद एअरवेज आहेत. या माध्यमातून हे देश आपले ब्रँडिंग, आर्थिक विकास आणि जागतिक पोहोच वाढवत असतात. विमानसेवा हे त्यांचे एक शक्तिशाली साधन आहे.

    दुबई, दोहा आणि अबुधाबी इथे असलेल्या ME3 च्या हब-अँड-स्पोक मॉडेलमुळे आखात हे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जगातील प्रमुख कॉरिडॉर बनले आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये या विमानसेवांनी प्रवासी वाहतुकीत सर्व जागतिक प्रदेशांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली. ही वाढ 10.5 टक्के आहे.

    याचा आर्थिक परतावा देखील तितकाच मोठा आहे. मध्यपूर्वेच्या विमानसेवांना 2026 मध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक निव्वळ नफा 9.3 टक्के आणि प्रति प्रवासी सर्वाधिक नफा 28.60 टक्के अमेरिकन डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. हे अमेरिकन डॉलर्सच्या जागतिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. IATA या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय या प्रदेशाच्या जागतिक कनेक्टिंग हब म्हणून धोरणात्मक स्थानाला आणि त्यांच्या सकारात्मक ऑपरेटिंग वातावरणाला देते. अल मकतुम या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई सध्या 35 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टर्मिनल उभारते आहे. सौदी अरेबियादेखील रियाधमधील किंग सलमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेचं भव्य टर्मिनल बांधत आहे. 

    असे असले तरी ही संख्या या सगळ्या कहाणीचा एकच भाग आहे. विमान वाहतूक ही भू-राजकीय सॉफ्ट पॉवरसाठी एक साधन बनली आहे आणि आखात आणि आफ्रिकेचा भाग त्याचे सर्वात चांगले उदाहरण आहे. विमान सेवा हा केवळ व्यावसायिक उद्देश नाही तर ती या देशांचा इरादा स्पष्ट करते. एमिरेट्स आणि एअर पीसने पश्चिम आफ्रिका, यूएई आणि यूके यांच्यातील हवाई संपर्काचा विस्तार करण्यासाठी द्विपक्षीय इंटरलाइन करार सक्रिय केला आहे. कतार एअरवेजने तर आणखी पुढे जाऊन रवांडाएअरमध्ये 60 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. तसेच बुगेसेरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी 2 अब्ज अमेरिकी डाॅलरचा सहवित्तपुरवठा केला आहे. ह्या प्रकल्पामध्ये किगालीचे प्रादेशिक हवाई प्रवास केंद्रात रूपांतर होण्याची अपेक्षा आहे.

    या विमान कंपन्यांनी शांतपणे महत्त्वाची मानवतावादी भूमिका देखील स्वीकारली आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीत कतार एअरवेजचा सहभाग होता. गेल्या डिसेंबरमध्ये चक्रीवादळ दितवाहनंतर श्रीलंकेला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करण्यात आली. यात दुबईसोबत एमिरेट्सचा संयुक्त हवाई पूलच जोडण्यात आला. यामध्ये 100 टनांहून अधिक मदत पुरवठा करण्यात आला.  

    सुमद्रावरही वर्चस्व 

    समुद्रात आखाताच्या महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या आहेत.  कतार, सौदी अरेबिया आणि युएईने तीन वेगवेगळ्या धोरणांद्वारे जागतिक सागरी नेटवर्कमध्ये स्वतःला सामावून घेतले आहे. पहिले म्हणजे बंदर क्षमता. दुबईतील जेबेल अली हे जगातील सर्वात व्यग्र कंटेनर बंदरांपैकी एक आहे. त्यामुळे या प्रदेशात सागरी वर्चस्व स्थापित होते. 2019 मध्ये सुरू झालेल्या सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला बंदराने 2021 पर्यंत जगातील सर्वात कार्यक्षम कंटेनर बंदर म्हणून स्थान मिळवले आहे. कतारचे हमाद बंदर 2017 ते 2021 दरम्यान कंटेनर क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्यात विस्तारले, परंतु आखाती प्रदेशातल्या राजनैतिक संकटामुळे कतारला त्याचा व्यापार बदलण्यास भाग पाडले गेले.

    कतार, सौदी अरेबिया आणि युएई या तिन्ही देशांनी प्रमुख शिपिंग लाईन्स आकर्षित करण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. यामागचा तर्क स्पष्ट आहे. ज्या टर्मिनल्समध्ये त्यांचे ऑपरेशनल स्टेक आहेत अशाच टर्मिनल्समधून ते सेवा देतात. अबुधाबीच्या खलिफा पोर्टला जगातील चार सर्वात मोठ्या शिपिंग लाईन्सपैकी तीन - CSP COSCO, MSC आणि CMA CGM  कंपन्यांकडून वचनबद्धता मिळाली आहे. ते त्यांचे स्वतःचे कंटेनर टर्मिनल बांधतात आणि चालवतात. दम्माममधील किंग अब्दुलअझीझ बंदरातील एव्हरग्रीनच्या ARPG सेवेने सौदी अरेबिया आणि प्रमुख आशियाई बंदरांमध्ये थेट दुवा निर्माण केला आहे. दुबईस्थित सीलीडद्वारे चालवल्या जाणाऱ्या जेद्दाह इस्लामिक पोर्टची नवीन RESIN सेवा भारत, इजिप्त, जिबूती आणि UAE ला लाल समुद्राशी जोडते. तसेच यामुळे आखाताला दक्षिण आशियाई, पूर्व आफ्रिकन आणि GCC व्यापार मार्गांशीही जोडले जाते. 

    बहारीन आणि सौदी अरेबियामधील आणखी एक दुवा म्हणजे नियोजित किंग हमाद कॉजवे प्रकल्प. यात रस्ते मालवाहतूक आणि रेल्वे एकाच कॉरिडॉरमध्ये एकत्र करण्यात येणार आहे. हा विस्तृत GCC रेल्वेचा भाग असेल. हे 2 हजार 117 किलोमीटरचे नेटवर्क सर्व सहा सदस्य देशांना जोडेल आणि 2045 पर्यंत दरवर्षी 95 दशलक्ष टन माल वाहतूक करेल.

    हे देश त्यांच्या स्वतःच्या किनाऱ्याच्या पलीकडे जागतिक बंदरांमध्ये धोरणात्मक पाय रोवण्यासाठी पुढे गेले आहेत. 2019 मध्ये DP वर्ल्डने P&O च्या पोर्ट-टर्मिनल व्यवसायाचे पुनर्संपादन आणि रॉटरडॅमच्या कंटेनर टर्मिनलचे ऑपरेटर असलेले क्रॅमर होल्डिंगमधला कतारचा हिस्सा ही निष्क्रिय गुंतवणूक नाही. ती जागतिक व्यापाराच्या धमन्यांमध्ये जाणूनबुजून केलेली गुंतवणूक आहे. सौदी अरेबियानेही त्याचे अनुकरण केले आहे. रेड सी गेटवे टर्मिनल हे एका सौदी विकासकाने घेतले आहे. बांगलादेशातील चितगावच्या पटेंगा कंटेनर टर्मिनलचे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठीही 22 वर्षांचा करार केला आहे. हे बंगालच्या उपसागरातील सर्वात व्यग्र कंटेनर बंदर आहे. एखाद्या परदेशी कंपनीने बांगलादेशी बंदर चालवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

    शेवटची आघाडी

    मध्य पूर्वेतील जमिनीवरचे दळणवळण ही सर्वात असमान आघाडी आहे. अजनूही सुरू असलेल्या संघर्षांमुळे आणि प्रादेशिक वादांमुळे ती मर्यादित राहिली आहे. त्यावर कोणताही पायाभूत सुविधांचा निधी सहजपणे मात करू शकत नाही. तरीही आखाताने ते बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

    शहरांमध्ये कारचे वर्चस्व हळूहळू कमी होते आहे. दोहा आणि रियाध यांनी दुबईमध्ये शहरी मेट्रो सिस्टीम उभारण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. बहारीनचे स्वतःचे नेटवर्क सुरू आहे. सर्वात परिणामी, एतिहाद रेलची आगामी प्रवासी सेवा यूएईच्या प्रवाशांना जोडेल. या नेटवर्कमध्ये मालवाहतूक सेवा सुरू केल्यापासून ट्रकच्या पाच लाख फेऱ्या बंद झाल्या आहेत.  

    धावपट्टी आणि कंटेनर टर्मिनल्सच्या खाली एक डिजिटल रचना शांतपणे आकार घेते आहे. आखाती किनाऱ्यांवर एकत्रित होणारे सबसी केबल नेटवर्क, हायपरस्केल डेटा सेंटर आणि 66 अब्ज अमेरिकन डॉलर्स घालून बांधण्यात येणारे AI इन्फ्रास्ट्रक्चर ही त्याचीच उदाहरणे आहेत. यामुळे सार्वभौम संपत्तीचा निधी पुढील युगासाठी ऊर्जा विपुलतेच्या संगणकीय शक्तीमध्ये रूपांतरीत होतो आहे. 

    पायाभूत सुविधांच्या पलीकडे

    भौतिक पायाभूत सुविधा हा एक वेगळा प्रकल्प नाही. तो अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा पाया आहे. उड्डाण मार्ग, शिपिंग लेन, रेल्वे कॉरिडॉर आणि फायबर केबल्स यांचा एकत्र विचार केला तर आखाती देशांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते आता फक्त ऊर्जा निर्यातदार देश राहिलेले नाहीत तर ते जगातील आघाडीचे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हब आहेत. सतत बदलणाऱ्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा ते एक मोठा भाग बनले आहेत.  

    यात आणखीही काही प्रकल्पांचा विचार करणे आवश्यक आहे. 2023 च्या G20 शिखर परिषदेत जाहीर करण्यात आलेला भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC) महत्त्वाकांक्षा आणि धोरणलकवा यांच्यात अडकला आहे. 2011 मध्ये ओबामांनी नमूद केलेल्या प्रादेशिक अस्थिरतेमुळेच हा प्रकल्प रखडला आहे. आखाती देश हे सर्वात विश्वासार्ह विजेते राहिले आहेत. IMEC हायपरड्राइव्हवरील कनेक्टिव्हिटी काय देऊ शकते ते याचे उदाहरण आहे. असे असले तरी मध्यपूर्वेला शाश्वत शांतता मिळाली तरच आखाती देश या प्रदेशाच्या विकासामध्ये त्यांची भूमिका बजावू शकतात.


    क्लेमेन्स चाय हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन - मध्यपूर्व येथे भू-राजकारणाचे वरिष्ठ फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.