Author : Sunaina Kumar

Expert Speak Raisina Debates
Published on May 17, 2025 Updated 0 Hours ago

जसजसे केअर इकॉनॉमी (care economy) डिजिटल तंत्रज्ञान आणि गिग वर्क (gig work) सोबत जोडत आहे, तसतसे डिजिटल जेंडर गॅप्स (digital gender gaps) कमी करणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे समावेशक विकास, चांगल्या कामाच्या संधी आणि जेंडर इक्वालिटी (gender equality) सुनिश्चित करता येईल.

केअर इकॉनॉमीच भवितव्य: डिजिटालायझेशन आणि गिग वर्क

Image Source: Getty

    हा लेख नेशन्स, नेटवर्क्स, नरेटिव्हज: वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे 2025 या लेख मालिकेचा भाग आहे.


    डिजिटायझेशनमध्ये केअर इकॉनॉमी (care economy) सक्षम आणि बदलण्यासाठी मोठी क्षमता आहे. त्यामुळे केअर सर्विसेसमध्ये (care services) प्रवेश सोपा होतो आणि कार्यक्षमता वाढते. केअर इकॉनॉमी(Care economy) आणि डिजिटल इकॉनॉमी (digital economy) यांचं एकत्र येणं हे एक असं वास्तव आहे ज्याकडे अजूनही फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही. पण आज जगभरात डिजिटल तंत्रज्ञान वापरून केअर सर्विसेस (care services) देणारी अनेक नवी मॉडेल्स तयार होत आहेत. केअर इकॉनॉमी (Care economy) मध्ये childcare (बालसंगोपन), eldercare (ज्येष्ठांची काळजी) आणि घरगुती कामांशी संबंधित पेड (paid) आणि अन पेड (unpaid) सेवा येतात. ही इकॉनॉमी (economy) समावेशी आर्थिक विकासासाठी आणि लिंग समानतेसाठी अत्यावश्यक आहे, कारण महिलाच बहुतांश पेड (paid) आणि अन पेड केअर (unpaid care) काम करतात. सरासरीने पाहिलं तर महिलांकडून पुरुषांच्या तुलनेत तीनपट अधिक अन पेड केअर (unpaid care) काम केलं जात. भारतासारख्या विकासशील देशात हे प्रमाण जवळपास आठपट आहे. ही असमानता महिलांना नोकरीच्या संधींमध्ये सहभागी होण्यापासून आणि पुढे जाण्यापासून रोखते.

    केअर इकॉनॉमी (care economy), ज्याला पूर्वी धोरणात्मक चर्चांमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, ती कोविड-19 महामारीदरम्यान जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली. या काळात महिलांवर असलेल्या काळजीच्या असमान ओझ्याचं वास्तव उजेडात आलं. आज जागतिक स्तरावर केअर वर्कर्स (care workers) ची गरज वाढत आहे. हवामान बदलाचे संकट, वाढती आर्थिक विषमता, लोकसंख्येतील बदल आणि तांत्रिक परिवर्तन अशा अनेक आव्हानांमुळे ही गरज अधिक तीव्र होणार आहे. जर सरकार आणि समाजाने काळजी सेवा आणि यासंदर्भातील पायाभूत सुविधा यामध्ये गुंतवणूक केली, तर 2035 पर्यंत जवळपास 30 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. यातील सुमारे 70 ते 90 टक्के नोकऱ्या महिलांना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये एक मोठा हिस्सा डिजिटल एनॅब्लेड केअर इकॉनॉमी (digital-enabled care economy) मध्ये तयार होणाऱ्या नोकऱ्यांचा असेल.

    हवामान बदलाचे संकट, वाढती आर्थिक विषमता, लोकसंख्येतील बदल आणि तांत्रिक परिवर्तन अशा अनेक आव्हानांमुळे केअर इकॉनॉमीची गरज अधिक तीव्र होणार आहे.

    डिजिटल एनॅब्लेड केअर इकॉनॉमी  (digitally-enabled care economy) ही डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून केअर सेवा देणाऱ्यांची गरज आणि उपलब्धता यामध्ये समन्वय साधते. यासाठी विविध डिजिटल टूल्स (tools) आणि प्लॅटफॉर्म (platforms) चा वापर केला जातो, ज्यामुळे काळजी सेवा देणं अधिक सोपं आणि परिणामकारक होतं. केअर सर्विसेस (care services) चं डिझिटलायझेशन (digitalisation) हे एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतं, कारण आजही अनेक लोकांना सशुल्क आणि सुलभ care सेवा मिळत नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी डिजिटल केअर (digital care) मोठी भूमिका बजावू शकते. सध्या असलेल्या पेड केअर सर्विसेस (paid care services) अपुऱ्या असल्यामुळे महिलांवर अन पेड केअर (unpaid care) कामाचं ओझं अधिक येतं आणि त्यामुळे त्यांच्या क्षमतांवर मर्यादा येतात, रोजगार आणि संधी गमावल्या जातात. UN Women च्या दक्षिण-आशियातील संशोधनातून असं दिसून आलं आहे की डिजिटल केअर एंटरप्राइझेस (care enterprises) मुळे महिलांसाठी अनेक फायदे निर्माण होतात. हे मॉडेल्स कामाच्या वेळेत लवचिकता देतात, अधिक आणि स्थिर उत्पन्न देतात, तसेच शिकण्यासाठी आणि सोयीसाठी नवे पर्याय उपलब्ध करतात. हे सगळं मुख्यतः महिलांच्या कामाच्या संधी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं.

    डिजिटल केअर इकॉनॉमी (care economy)च्या दोन महत्त्वाच्या पैलूंवर अधिक सखोल विचार करण्याची गरज आहे: i) डिजिटल केअर सर्विसेस (care services) साठी उभ्या राहत असलेले नवे मॉडेल्स, ज्यात गिग वर्क (gig work) चाही समावेश आहे, ii) आणि या क्षेत्राच्या विकासात डिजिटल जेंडर गॅप (gender gap)चा परिणाम.

    इमर्जिंग मॉडेल्स फॉर डिजिटल केअर सर्विसेस (Emerging Models for Digital Care Services)

    डिजिटल केअर इकॉनॉमी (care economy) ही पारंपरिक केअर (care) सेवा नव्याने मांडते, ज्यामध्ये मोबाईल ऍप्स (mobile  apps), ऑनलाइन मार्केटप्लेस (online marketplace), केअर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (care management software) आणि रिमोट मॉनिटरिंग (remote monitoring) यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, दक्षिण आशियात काही डिजिटल केअर एंटरप्राइझेस (care enterprises) उभे राहत आहेत. मलेशियातील किडोकेअर (Kiddocare) ही लहान मुलांसाठी सेवा देते, जिथे मागणीप्रमाणे प्रशिक्षित बेबीसीटर्स (babysitters) उपलब्ध होतात. इंडोनेशियातील लव्हकेअर (LoveCare) ही एक प्लॅटफॉर्म (platform) आधारित सेवा आहे, जी वृद्धांसाठी केअर (care) सेवांचा पर्याय देते. अशा नव्या मॉडेल्समुळे केअर सर्विस (care service) अधिक सुलभ, मागणीनुसार आणि डिजिटल माध्यमातून सेवा देण्यासारख्या बनल्या आहेत.

    भारतात, जिथे लोकसंख्येतील बदल (demographic transition) आणि वेगाने होत असलेले डिजिटलीकरण एकत्र घडत आहे, तिथे बालसंगोपन (childcare), ज्येष्ठांची काळजी (eldercare) आणि डोमेस्टीक वर्क (domestic work) यांसारख्या सेवा देणाऱ्या डिजिटल केअर एंटरप्राइझेस (care enterprises) शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. बालसंगोपन (Childcare)  साठी क्ले (Klay) आणि ब्रूमीज (Broomees) सारखे प्लॅटफॉर्म्स ऑन-डिमांड बेबीसीटिंग (babysitting) सेवा देतात.
    ज्येष्ठांची काळजी (Eldercare) साठी ख्याल (Khyaal) आणि गुड फेलोज (Goodfellows) हे प्लॅटफॉर्म्स ऑन-डिमांड मदत करतात, त्यात companionship (दैनंदिन संवादासाठी सोबती), ऑनलाईन गेम्स (online games) , वर्कशॉप (workshops) अशा सेवा देऊन वृद्धांच्या सामाजिक एकटेपणावर मात करण्याचा प्रयत्न करतात.

    या सेवा वेगाने वाढत असल्यामुळे, केअर वर्क (care work) आता गिग वर्क (gig work) आणि क्विक कॉमर्स (quick commerce) प्लॅटफॉर्म्ससोबत एकत्र केलं जात आहे. अर्बन कंपनी (Urban Company), भारतातील महिलांमधील सर्वात मोठा गिग (gig) कामगार नियोक्ता, इन्स्टा हेल्प (Insta Help) सेवा देतो, ज्यात त्वरित घरगुती कामांसाठी (जसे स्वयंपाक, स्वच्छता) मदत मिळते. स्नबीट (Snabbit) सारखी प्लॅटफॉर्म्स फक्त 10 मिनिटांत ऑन-डिमांड डोमेस्टिक सर्विस (domestic services) उपलब्ध करून देतात. ही डिजिटल केअर इकॉनॉमी (care economy) आता केवळ सेवा देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गिग इकॉनॉमी (gig economy) आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एका नव्या स्वरूपात विकसित होत आहे.

    अर्बन कंपनी (Urban Company), भारतातील महिलांमधील सर्वात मोठी गिग (gig) कामगार नियोक्ती, इन्स्टा हेल्प (Insta Help) सेवा देते, ज्यात त्वरित घरगुती कामांसाठी (जसे स्वयंपाक, स्वच्छता) मदत मिळते.

    भारतामधील केअर वर्क (care work) मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक आहे आणि यात योग्य कामाच्या मानकांची, जसे की योग्य पगार, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणाची कमतरता आहे. डिजिटलीकरण आणि केअर वर्क (care work) च्या प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे महिला कामगारांच्या उत्पन्न आणि स्वातंत्र्यात वाढ होऊ शकते, पण भारतातील महिला गिग (gig) कामगारांच्या अनुभवांवरून असे दिसून आले आहे की त्यांना अजूनही अनेक समस्या आहेत. जसे की योग्य वेतन न मिळणं, नोकरीची सुरक्षितता नसणं, बार्गेनिंग पॉवर कमी असणं आणि अल्गोरिदमिक भेदभाव. म्हणूनच, केअर इकॉनॉमी (care economy) चं डिजिटलीकरण आणि औपचारिकरण (formalisation) म्हणजेच योग्य कामाच्या मानकांची अंमलबजावणी एकाच वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे.

    डिजिटल जेंडर गॅप्स (Gender Gaps)

    यावर्षीच्या जागतिक टेलिकम्युनिकेशन आणि माहिती समाज दिनाचा विषय जेंडर इक्वालिटी इन डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन (Gender equality in digital transformation) म्हणजेच डिजिटली रूपांतरातील लिंग समानता हा विषय खूप महत्त्वाचा आहे. हा विषय दाखवतो की डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रवेश महिलांना नसल्यामुळे त्यांना आर्थिक संधी, कौशल्य विकास आणि एकंदर डिजिटल अर्थव्यवस्थेत व समाजात सहभाग मर्यादित होतो. डिजिटल तंत्रज्ञान सगळ्यांसाठी संधी उघडू शकते, पण जगात अजूनही 2.6 अब्ज लोक ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, त्यातील बहुसंख्य महिला आणि मुली आहेत. भारतात डिजिटल जेंडर गॅप (gender gap) म्हणजेच पुरुष आणि महिलांमधील डिजिटल तंत्रज्ञानाचा फरक जगातील सर्वाधिक आहे. GSMA च्या 2024 च्या अहवालानुसार, भारतात फक्त 75% महिलांकडे मोबाईल फोन आहे, तर पुरुषांत हा आकडा 85% आहे; आणि फक्त 35% महिलांकडे स्मार्टफोन आहे.

    डिजिटल तंत्रज्ञान सगळ्यांसाठी संधी उघडू शकते, पण जगात अजूनही 2.6 अब्ज लोक ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, त्यातील बहुसंख्य महिला आणि मुली आहेत.

    जसे केअर इकॉनॉमी (care economy) चा भविष्यात डिजिटल इकॉनॉमी (digital economy) सोबत जास्त जोडला जाणार आहे, तसतसे access आणि डिजिटल लिटरसी (digital literacy) मधील डिजिटल जेंडर गॅप्स(digital gender gaps) मुळे महिलांचा केअर इकॉनॉमी (care economy) मधील सहभाग प्रभावित होईल. महिलांचं अनपेड वर्क (unpaid work), जे घरं, समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, ते अजूनही फारसं ओळखलं जात नाही आणि त्याला कमी महत्त्व दिलं जातं. अनपेड वर्क (unpaid work) चे असमान वाटप दूर करण्यासाठी केअर इकॉनॉमी (care economy) मध्ये गुंतवणूक वाढवणं हा एक योग्य मार्ग आहे.

    जेंडर इक्वालिटी (gender equality) साध्य करण्यासाठी डिजिटल जेंडर गॅप (digital gender gap) कमी करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे महिलांचा केअर इकॉनॉमी (care economy) मध्ये पूर्णपणे सहभाग वाढू शकेल.


    सुनैना कुमार या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सिनियर फेलो आहेत.
    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.