-
CENTRES
Progammes & Centres
Location
Image Source: Getty
“Artificial Intelligence (AI) एआय म्हणजे भारताच्या वर्चस्वाचं प्रतीक आहे, हे आज संपूर्ण जग मान्य करत आहे. आता आपलं काम म्हणजे ही संधी हातून जाऊ न देणं.”
या शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘Startup Mahakumbh, 2024’ (स्टार्टअप महाकुंभ, 2024) च्या उद्घाटनप्रसंगी भारताचा जागतिक एआय (AI) क्रांतीतील वाढता प्रभाव अधोरेखित केला. पंतप्रधानांनी एआय (AI) क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आघाडी मिळवता येईल, यावर भर दिला. त्याचबरोबर, 2030 पर्यंत एआय (AI ) द्वारे जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या अंदाजे US$ 15.7 trillion (15.7 ट्रिलियन डॉलर्स) इतक्या योगदानातून भारताने स्वतःच्या विकासकथेचा पाया उभारावा, याचेही महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.
जगातील आघाडीचे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गजही पंतप्रधान मोदींच्या एआय (AI) संदर्भातील दृष्टिकोनाशी सहमत आहेत. गुगल (Google) चे सीईओ (CEO) सुंदर पिचाई यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं आणि एआय (AI) क्षेत्रातील वाढत्या क्षमतेवर स्तुतिसुमने उधळली आहेत, आरोग्य, शिक्षण, शेती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एआय (AI) वापरासाठी खासगी गुंतवणुकीचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं जातंय. त्याचप्रमाणे, एनव्हीडिया (Nvidia) चे सीईओ (CEO) जेन्सन हुआंग यांनीही भारताची आयटी (IT) आउटसोर्सिंग हब या भूमिकेतून पुढे जाऊन एआय (AI) नवोन्मेष केंद्र (AI innovation powerhouse) बनण्याची क्षमता अधोरेखित केली. भारताची उच्च तंत्रज्ञानातील कौशल्ये आणि व्यापक डेटा संसाधने ही भारताच्या एआय (AI) क्षेत्रातील उत्क्रांतीसाठी आधारभूत ठरू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
Google चे CEO सुंदर पिचाई यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं आणि एआय (AI) क्षेत्रातील वाढत्या क्षमतेवर स्तुतिसुमने उधळली आहेत. आरोग्य, शिक्षण, शेती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एआय (AI) वापरासाठी खासगी गुंतवणुकीचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं जातंय
संयुक्त राष्ट्र अमेरिका (USA) सारखे देश स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट (Stargate Project) सारख्या खाजगी नेतृत्वातील उपक्रमांच्या माध्यमातून एआय (AI) क्षेत्रात आपली पकड बळकट करत आहेत. अशा वेळी भारतानेही तितक्याच वेगाने स्वतःला अनुकूल करणे, नाविन्यपूर्ण क्षमतांचा विकास करणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल, असे स्थानिक एआय (AI) स्टार्टअप्सचे तंत्र उभे करणे गरजेचे आहे. अन्यथा, झपाट्याने बदलणाऱ्या या तंत्रज्ञान जगतात भारत मागे पडू शकतो.
एआय (AI) क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली असून तो आता जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचा एआय (AI) प्लेयर म्हणून उदयास आला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एआय (AI) इंडेक्स रिपोर्ट 2024 नुसार, 2013 ते 2023 दरम्यान एकूण $9.85 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह भारत सातव्या स्थानावर आहे. अमेरिका ($335.2 अब्ज), चीन ($103.7 अब्ज) आणि युनायटेड किंगडम ($22.3 अब्ज) सह पहिले तीन देश आहेत. तसंच, नव्याने भांडवल मिळवणाऱ्या 338 कंपन्यांसह भारत सातव्या स्थानावर आहे. तर अमेरिका (5,509), चीन (1,446) आणि युनायटेड किंगडम (727) पुढे देश पहिल्या तीन मध्ये आहेत. सध्या स्टार्ट अप इंडिया (Start Up India) कार्यक्रमांतर्गत भारतात 1,54,719 स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत, यातील 2,915 कंपन्या एआय (AI) क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित करत आहेत, आणि या कंपन्यांमुळे 23,918 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. 2016 मध्ये केवळ 500 स्टार्टअप्स असलेल्या भारताने अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे.
भारताचं एआय (AI) मार्केट सध्या US$ 7–10 अब्ज एवढे असून, ते 2027 पर्यंत 25–35 टक्क्यांच्या दराने दरवर्षी वाढण्याचा अंदाज आहे. ही प्रगती जागतिक एआय (AI) क्षेत्रातील विस्ताराच्या अनुषंगाने घडते आहे. या वाढीमागे केंद्र सरकारचे धोरणात्मक प्रयत्न आहेत, जे तीन मुख्य उद्दिष्टांवर केंद्रित आहेत – पहिलं, देशांतर्गत सशक्त आणि सेंद्रिय एआय (AI) इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं; दुसरं, संशोधन आणि विकास (R&D) क्षमतेत वाढ करणं; आणि तिसरं, AI स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत त्यांचं स्केलिंग साधणं. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शेती, आरोग्य, शिक्षण, आणि शासकीय सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अनेक धोरणात्मक उपक्रम राबवले गेले आहेत. हे सर्व मिळून भारताला एआय (AI) क्षेत्रात जागतिक पातळीवर स्पर्धात्मक स्थान मिळवून देण्याच्या दिशेने पुढे नेत आहेत.
भारताचं एआय (AI) मार्केट सध्या US$ 7–10 अब्ज एवढे असून, ते 2027 पर्यंत 25–35 टक्क्यांच्या दराने दरवर्षी वाढण्याचा अंदाज आहे. ही प्रगती जागतिक एआय (AI) क्षेत्रातील विस्ताराच्या अनुषंगाने घडते आहे.
धोरणात्मक आणि कार्यक्रम पातळीवर पाहिल्यास, भारताची एआय (AI) धोरणरचना नवकल्पनांना चालना देणं, डेटा इकोसिस्टम सक्षम करणं आणि नैतिक दृष्टिकोनातून एआय (AI) तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुनिश्चित करणं या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते. ‘नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर एआय (AI) ’ ही धोरणात्मक योजना आरोग्य, शेती, स्मार्ट मोबिलिटी, उत्पादन आणि शिक्षण यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. ही धोरणे संशोधन, कुशल मनुष्यबळ निर्माण, आणि अडथळे दूर करून एआय (AI) स्टार्टअप इकोसिस्टमला बळकट करत आहेत. एआय (AI) तंत्रज्ञानाच्या वापरातील पक्षपात, जबाबदारी आणि गोपनीयता यांसारख्या जोखमींना संबोधित करण्यासाठी, नीती (NITI) आयोगाने 2021 मध्ये ‘Principles for Responsible AI’ प्रकाशित केले. या अहवालाचा पहिला भाग पारदर्शकता, समावेश, निष्पक्षता आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत नैतिक तत्त्वांना अधोरेखित करतो. दुसरा भाग या तत्त्वांचे प्रत्यक्ष अंमलबजावणीत रूपांतर करून सरकारी, खाजगी क्षेत्र आणि संशोधन संस्था यांची भूमिका स्पष्ट करतो. यामध्ये खाजगी क्षेत्राला ‘ethics by design’ म्हणजेच नैतिकतेचा पाया असलेली तांत्रिक रचना अंगीकारण्याचं प्रोत्साहन दिलं जातं, जेणेकरून विश्वासार्ह आणि जबाबदार एआय (AI) इकोसिस्टम घडवता येईल. या धोरणात्मक प्रयत्नांमुळे भारतातील एआय (AI) स्टार्टअप्सना जबाबदारीने नवकल्पना मांडण्याची, मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होण्याची आणि भारताला जागतिक एआय (AI) क्षेत्रात आघाडीवर नेण्याची संधी प्राप्त होते.
इंडिया एआय (IndiaAI) मिशन भारतातील एआय (AI) स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हे मिशन अत्यावश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, वित्तीय सहाय्य आणि धोरणात्मक पाठबळ प्रदान करून नवउद्योजकांना सक्षम करत आहे. इंडिया एआय स्टार्ट अप फायनान्स (‘IndiaAI Startup Financing’) या स्तंभावर आधारित उपक्रमाद्वारे, एआय (AI) क्षेत्रातील डीपटेक स्टार्टअप्सना नवीन कल्पना विकसित करण्यासाठी सुलभ निधी प्राप्तीची व्यवस्था केली जाते. भारताच्या एआय (AI) इकोसिस्टमला आणखी बळकटी देण्यासाठी 2025-2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (IT) मंत्रालयासाठी (MeitY) 2,000 कोटींचं बजेट राखीव ठेवण्यात आलं आहे. या निधीतून किमान 25 डीपटेक स्टार्टअप्सना सहाय्य करण्यात येणार आहे, उद्योगाभिमुख प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये 20 एआय (AI) क्युरेशन युनिट्स स्थापन केली जातील, आणि देशभरात 80 इंडिया एआय (IndiaAI) लॅब्स उभारण्यात येतील. याशिवाय, या मिशनअंतर्गत कंपन्यांचं एम्पॅनेलमेंट करून 18,000 हून अधिक GPU (Graphics Processing Units) परवडणाऱ्या दरात स्टार्टअप्स, अकॅडेमिया आणि संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर एआय (AI) मॉडेल्सचं प्रशिक्षण आणि डेटावर आधारित संशोधन शक्य होईल. इंडिया एआय (IndiaAI) मिशनचा उद्देश भारताला एआय (AI) आधारित नवकल्पनांमध्ये जागतिक नेतृत्वस्थानावर पोहोचवण्याचा आहे. हे मिशन उद्योजकतेला चालना देत, एआय (AI) क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढवत आणि नैतिक एआय (AI) विकासाला प्रोत्साहन देत एक मजबूत आणि समावेशी एआय (AI) इकोसिस्टम उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
इंडिया एआय (IndiaAI) मिशन भारतात एआय (AI) स्टार्टअप्सना चालना देण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे. इंडिया एआय (IndiaAI) मिशन हे केवळ अत्यावश्यक पायाभूत सुविधा, निधी आणि धोरणात्मक पाठबळ पुरवत नाही, तर नवकल्पनांना पोषक असं एक संपूर्ण पारिस्थितिक तंत्रज्ञान वातावरण (ecosystem) निर्माण करत आहे.
भारतातील स्थानिक लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) सुद्धा या विकासाचा महत्त्वाचा भाग आहेत. भारताचा एआय (AI) इकोसिस्टम जलद गतीने विकसित होत असून, BharatGen, Bhashini, आणि Krutrim AI Labs यासारख्या उपक्रमांमुळे नवकल्पनांना भक्कम आधार मिळत आहे. विशेषतः BharatGen हे जगातील पहिलं सरकारी निधीतून विकसित होत असलेलं मल्टीमोडल LLM उपक्रम असून, भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेनुसार तयार होणाऱ्या एआय (AI) मॉडेल्सद्वारे सार्वजनिक सेवा वितरणात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे एआय (AI) तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक प्रसार करणे, परदेशी तंत्रज्ञानावरची अवलंबन कमी करणे, आणि भारत-केंद्रित डेटासेट्सच्या माध्यमातून देशांतर्गत स्टार्टअप्सना शक्तिशाली एआय (AI) क्षमतांनी सज्ज करणे. 2026 पर्यंत हे मॉडेल्स विविध उद्योग क्षेत्रांत प्रभावीपणे वापरात आणण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकारे, इंडिया एआय (IndiaAI) मिशन आणि त्याअंतर्गत विकसित होत असलेली देशी LLMs भारताला केवळ एआय (AI) नवकल्पनांचा केंद्रबिंदू बनवत नाहीत, तर जगाच्या एआय (AI) भविष्यातही आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम करत आहेत.
Bhashini हा उपक्रम डिजिटल समावेशनाला चालना देतो, ज्यामध्ये एआय (AI) -आधारित भाषांतर व व्हॉईस सेवा वापरून भाषेचे अडथळे दूर केले जातात. यामुळे आर्थिक सेवा व साक्षरता क्षेत्रात प्रवेशयोग्यता वाढते. ठोस विकास आराखड्यानुसार, Bhashini एआय (AI) -संचालित भाषा तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पना आणि स्थानिक उद्योजकतेसाठी सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. Krutrim AI Labs हे भारताचे पहिले फ्रंटियर एआय (AI) संशोधन केंद्र असून, स्थानिक गरजांसाठी उन्नत एआय (AI) मॉडेल्स विकसित करण्यात अग्रगण्य आहे. त्यांनी विकसित केलेली मॉडेल्स, Krutrim-1 (भारताचं पहिलं LLM), Vyakyarth-1 (Indic embedding model), आणि Dhwani-1 (speech LLM) ह्या देशांतर्गत वापरासाठी विशेषतः उपयुक्त आहेत. Document Intelligence Stack (DIS) हे OCR साठीचे समाधान आणि Drishti हे व्हिडिओ इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यांसारखी उपकरणे स्टार्टअप्सना विविध क्षेत्रांमध्ये वापरता येतील अशी मूलभूत एआय (AI) साधने पुरवतात. फेब्रुवारी 2025 मध्ये Krutrim-2 च्या प्रस्तावित लाँचसह, या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्टार्टअप्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधा, संशोधन सहकार्य आणि स्केलेबल एआय (AI) मॉडेल्सचा पुरवठा. हे सर्व मिळून भारताला जागतिक एआय (AI) महासत्ता म्हणून उभं राहण्यासाठी भक्कम पाया देतात.
भारताच्या Compute क्षमतांमध्ये वाढ: Quantum Technology (QT) आणि सेमीकंडक्टर्स (Semiconductors) क्षेत्रातील भारताची प्रगती ही देशाच्या एआय (AI) इकोसिस्टमसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. ह्या प्रगतीमुळे हाय परफॉर्मन्स काम्पुटिंग (high-performance computing), सुरक्षित संवाद आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी वाढ होत आहे. यासाठी National Quantum Mission द्वारे 50 ते 1000 qubit क्षमतेचे quantum processors विकसित करण्यासह, 2000 किमी लांबीच्या secure satellite-based quantum communication आणि quantum networks तयार करण्यावर भर दिला जात आहे. ही विकास प्रक्रिया विविध क्षेत्रांतील एआय (AI) -आधारित उपयोजनांना चालना देऊन स्टार्टअप्सना मूलभूत तंत्रज्ञानावर नवकल्पना करण्यास प्रोत्साहित करते. या उपक्रमांतर्गत quantum computing, communication, sensing, आणि materials यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांमध्ये नवकल्पना वाढवण्यासाठी आठ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे. हा प्रयत्न 2047 पर्यंत भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आहे. Digital India, Make in India, आणि Sustainable Development Goals (SDGs) यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांना पाठिंबा देणाऱ्या ह्या quantum प्रगतीमुळे, उच्च संगणकीय गती आणि एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाची गरज असलेल्या पुढील पिढीतील एआय (AI) प्रणालींना चालना मिळणार आहे.
आठ स्टार्टअप्सना प्रगत तंत्रज्ञान, quantum computing, communication, sensing आणि materials या क्षेत्रांतील नवकल्पना घडविण्यासाठी निवडण्यात आले आहे, जे भारताच्या 2047 पर्यंत तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.
अशा परिवर्तनशील उपक्रमांद्वारे, भारत हळूहळू ज्ञान-केंद्रित डिजिटल अर्थव्यवस्थेकडे संक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, जी आत्मनिर्भर असून तंत्रज्ञानाच्या नवोन्मेषात आघाडीवर असेल. भारताला हे समजले आहे की यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे खासगी नवकल्पना, ज्याला सार्वजनिक आधार, पाठिंबा देणाऱ्या प्रणाली आणि वातावरणाने संपूर्ण प्रक्रियेत मदत केली पाहिजे. या उपक्रमांनी नक्कीच भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेवर ठळक परिणाम केला आहे. तथापि, जर भारताला एआय (AI) स्टार्टअप-आधारित नवोन्मेषात आघाडीवर येण्याचे आणि उपाय-आधारित अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साधायचे असेल, तर अजून बरेच काही करण्याची गरज आहे.
भारताच्या फलदायी एआय (AI) स्टार्टअप परिसंस्थेच्या वृद्धीसाठी समर्पित एआय (AI) नियामक प्राधिकरण स्थापन करणे आणि एआय (AI) पायाभूत सुविधांमध्ये धोरणात्मक राष्ट्रीय गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. एआय (AI) तंत्रज्ञान विविध क्षेत्रांत वाढत असल्याने, केंद्रीय नियामक संस्थाचा नैतिक वापर, नियमांचे पालन, आणि जबाबदार नवकल्पना यांना सुनिश्चित करेल, तसेच पक्षपात, गैरवापर आणि डेटा गोपनीयतेसंबंधी धोके यांचा प्रभावीपणे सामना करेल. यामुळे एआय (AI) अनुप्रयोगांवरील जनतेचा विश्वास वाढेल आणि भारताच्या एआय (AI) परिसंस्थेला जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत केले जाईल, ज्यामुळे स्टार्टअप्ससाठी स्थिर आणि पूर्वानुमानित धोरणात्मक वातावरण तयार होईल. संस्थात्मक सुपरकंप्युटिंग क्षमतेचा विस्तार आणि जागतिक भागीदाऱ्यांसोबतच्या सहकार्याद्वारे, एआय (AI) स्टार्टअप्सना आवश्यक संगणकीय संसाधने मिळतील, ज्यामुळे नवकल्पनेवरील अडथळे कमी होतील आणि एआय (AI) -चालित उपायांची व्याप्ती वाढवता येईल.
शेवटी, ‘Freshworks’ च्या AI Workplace Report’ नुसार, भारतातील एआय (AI) केंद्रित व्यवसायांपैकी 88 टक्के व्यवसाय आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एआय (AI) प्रशिक्षणात गुंतवणूक करत आहेत, जे जागतिक देशांमध्ये सर्वाधिक आहे; उदाहरणार्थ, युनायटेड किंगडममध्ये 66 टक्के, ऑस्ट्रेलियात 62 टक्के आणि युरोपमध्ये 67 टक्के आहे. हे भारताच्या भविष्यात एआय (AI) स्वीकारण्याच्या तयारीचे दर्शवणारे संकेत आहे, मात्र देशात तत्पर एआय (AI)-कौशल्य असलेल्या कामगारांची कमतरता देखील अधोरेखित होते. अशा कौशल्यधारक मनुष्यबळाची गरज एआय (AI) संबंधित देखभाल, नियम पालन, कायदेशीर बाबी अशा विविध मुद्द्यांवर तज्ज्ञ हाताळणीसाठी असते. भारताच्या एआय (AI) स्टार्टअप परिसंस्थेच्या प्रगतीसाठी, या क्षेत्रविशिष्ट आव्हानांवर आणि कौशल्यांच्या कमतरतेवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यासाठी धोरणात्मक निर्णय, उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य आणि एआय (AI) साठी विशेष अभ्यासक्रम विकसित करून आवश्यक कौशल्ये प्रदान केली पाहिजेत.
देबज्योती चक्रवर्ती हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Debajyoti Chakravarty is a Research Assistant at ORF’s Center for New Economic Diplomacy (CNED) and is based at ORF Kolkata. His work focuses on the use ...
Read More +