Author : Chaitanya Giri

Expert Speak Space Tracker
Published on May 23, 2025 Updated 0 Hours ago

स्टारलिंकच्या प्रवेशाला जलद गती देऊन, बांगलादेश सरकारने आधीच गरिबीने ग्रासलेल्या प्रदेशामध्ये सॅटेलाइट संघर्षाचे दार उघडले आहे.

बांगलादेशात स्टारलिंक: गरिबी, कर, आणि सॅटेलाइट युद्धाचा धोका!

Image Source: Getty

    अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली, बांगलादेशने स्टारलिंक कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. २० मे २०२५ रोजी, बांगलादेशच्या पोस्ट आणि टेलिकॉम मंत्रालयात विशेष सहाय्यक (राज्यमंत्र्यांच्या समतुल्य) पदावर असलेले फैज अहमद तैय्यब यांनी देशात स्टारलिंक सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्टारलिंकची सेवा ही स्टारलिंक रेसिडेन्स - ६,००० टाका (अंदाजे ४,२०० रुपये) आणि स्टारलिंक रेसिडेन्स लाइट - ४,२०० टाका (अंदाजे ३,००० रुपये समतुल्य) या दोन सेवा पॅकेजेसमध्ये उपलब्ध आहे. तर, स्टारलिंकच्या एका वेळेच्या उपकरणांच्या सेटअपचा खर्च ४७,००० टाका (अंदाजे ३८,००० रुपये समतुल्य) येणार आहे. या सेवा बांगलादेशच्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवाशी जुळणाऱ्या नाहीत.

    बांगलादेशातील दूरसंचार क्षेत्र बऱ्याच काळापासून कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे महसुलामध्ये लक्षणीय तोटा होत आहे. २०१५ पासून, बांगलादेशच्या दूरसंचार क्षेत्राने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (अव्हरेज रेव्हेन्यू पर युजर – ARPU) मध्ये ५६ टक्क्यांची घट अनुभवली आहे.

    जगात सर्वाधिक इंटरनेट सेवा कर आकारणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश आहे. भारत त्याच्या दूरसंचार सेवांवर १८ टक्के शुल्क आकारतो तर, बांगलादेश सरकार १८ टक्के मूल्यवर्धित कर आणि २१ टक्के सेक्टर स्पेसिफीर टॅक्स (क्षेत्र-विशिष्ट कर) आकारते. कॉर्पोरेट कराच्या बाबतीत, पब्लिकली ट्रेडेड दूरसंचार सेवा प्रदात्यांवर ४० टक्के कर आकारला जातो, तर नॉन पब्लिकली ट्रेडेड सेवा प्रदात्यांना ४५ टक्के कर आकारला जातो. बांगलादेशातील दूरसंचार क्षेत्र बऱ्याच काळापासून कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे महसुलामध्ये लक्षणीय तोटा होत आहे. २०१५ पासून, बांगलादेशच्या दूरसंचार क्षेत्राने प्रति वापरकर्ता सरासरी महसूला (अव्हरेज रेव्हेन्यू पर युजर – ARPU) मध्ये ५६ टक्क्यांची घट अनुभवली आहे. सध्या, ARPU फक्त १.३ डॉलरवर आहे, जो जागतिक स्तरावर सर्वात कमी आहे. इंटरनेटचा वापर जवळपास ४४ टक्के असल्याने, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत दूरसंचार क्षेत्राचा वाटा कमकुवत आहे.

    बांगलादेशातील सामाजिक-आर्थिक निर्देशकांची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. जागतिक बँकेच्या बांगलादेश डेव्हलपमेंट अपडेटमध्ये २०२४ मध्ये ७.७ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ९.३ टक्क्यांपर्यंत अति गरिबीचा दर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय गरिबीचा दर २०२४ मध्ये २०.५ टक्क्यांवरून २०२५ मध्ये २२.९ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे भाकित जागतिक बँकेनेही केले आहे. बांगलादेशच्या गरिबी निर्देशकांनुसार मासिक मूलभूत खर्चासाठी ३,८२२ टाकाची मर्यादा निश्चित केली आहे. स्टारलिंक रेसिडेन्स लाइट सेवा पॅकेज हे बांगलादेशच्या जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्येला परवडणारे नाहीत. या किंमतींचा विचार करता, स्टारलिंकची एन्ट्री बांगलादेशी बाजारपेठेच्या मागण्या आणि त्या देशातील असंख्य सामाजिक-आर्थिक वास्तवांशी विसंगत आहे. बाजारपेठ आणि सामाजिक-आर्थिक घटकांचा विचार न करता अमेरिकेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अंतरिम सरकारने उपग्रह संप्रेषण (सॅटकॉम) इंटरनेट सेवा सुरू केल्या आहेत.

    या किंमतींचा विचार करता, स्टारलिंकची एन्ट्री बांगलादेशी बाजारपेठेच्या मागण्या आणि त्या देशातील असंख्य सामाजिक-आर्थिक वास्तवाशी विसंगत आहे.

    युनूस हे दूरसंचार क्षेत्रामध्ये नवीन नाहीत. ते १९९७ मध्ये स्थापन झालेल्या बांगलादेशी दूरसंचार सेवा प्रदात्या ग्रामीणफोनचे (Grameenphone) संस्थापक आहेत. यातील बहुसंख्य भागभांडवल नॉर्वेजियन प्रदात्या टेलिनॉरकडून आले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत, ग्रामीण फोनच्या व्यवसायात घट झाली आहे. हसिना प्रशासनाच्या काळात बांगलादेश दूरसंचार नियामक आयोगाने (बांगलादेश टेलिकम्युनिकेशन्स रेग्युलेटरी कमिशन - बीटीआरसी) अवलंबलेल्या उपाययोजना हे यामागील मुख्य कारण आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा प्रदान करण्यात अपयशी ठरल्यामुळे, २०२२ मध्ये, बीटीआरसीने ग्रामीण फोनला जुने आणि नवीन असे दोन्ही सिम कार्ड विकण्यापासून निलंबित केले आहे. हसीना प्रशासनाने युनूस यांच्या विरुद्ध केलेल्या शेवटच्या कारवाईंपैकी एक कारवाई ही ग्रामीणफोनशी संबंधित होती. यामध्ये युनूस यांच्यावर दूरसंचार कंपनीकडून २ दशलक्ष डॉलरचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ग्रामीण फोनच्या निव्वळ नफ्यात ५३ टक्के घट झाल्याचे समोर आल्यावर बीटीआरसीचे निरीक्षण खरे ठरले. मोबाईल आणि डेटा वापरात घट झाल्यामुळे, कंपनीने मे २०२५ मध्ये ग्रामीणफोनच्या वितरण नेटवर्कचा वापर करून मोबाईल हँडसेट विक्री व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी केवळ शेन्झेन-आधारित उत्पादक ट्रान्सशन होल्डिंग्जच्या हँडसेटची विक्री करते. त्याचप्रमाणे, बांगलादेशमध्ये उच्च दर्जाचे स्टारलिंक वापरकर्ता टर्मिनल्स विकण्यासाठी त्याच ग्रामीणफोन वितरण नेटवर्कचा वापर केला जाऊ शकतो.

    ७ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात, युनूस यांनी "काही टेस्टींगल रिक्वायरमेंट्स काढून टाकण्याचे, पॅकेजिंग, लेबलिंग आणि प्रमाणन आवश्यकतांचे तर्कसंगतीकरण करण्याचे आणि सीमाशुल्क प्रक्रिया आणि मानके सुलभ करण्याचे" आश्वासन दिले आहे. बांगलादेश आणि त्याच्या परिसरातील दूरसंचार सुरक्षेचा योग्य विचार करून बीटीआरसीने या उपकरणांची चाचणी आणि प्रमाणन केले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. फेब्रुवारी २०२५ पासून ९० दिवसांच्या आत बांगलादेशात स्टारलिंकचा प्रवेश सुलभ करण्यासाठी हे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाचे पालन करण्यात आले आहे आणि बांगलादेशी उद्योगावर पूर्वीचे लादलेले शुल्क यशस्वीरित्या टाळण्यात आले आहे.

    डिसेंबर २०२४ मध्ये मणिपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलेले स्टारलिंकचे टर्मिनल हे रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंटची सशस्त्र शाखा असलेल्या सिल्हेटमधील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मालकीचे होते हे सिद्ध झाले आहे.

    सध्याचे सरकार हे विरोधकांऐवजी दहशतवादी गटांबाबत अधिक मवाळ भुमिकेत आहे. त्यामुळे बांगलादेशमधील स्टारलिंक सेवेमुळे निःसंशयपणे देशात आणि संपूर्ण प्रदेशात सुरक्षा आव्हाने निर्माण होणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये मणिपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलेले स्टारलिंकचे टर्मिनल हे रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंटची सशस्त्र शाखा असलेल्या सिल्हेटमधील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मालकीचे होते हे सिद्ध झाले आहे. असे हे टर्मिनल बांगलादेशात असलेल्या तस्करी केलेल्या टर्मिनल्सच्या मोठ्या साठ्याचा भाग असतील, तर ही सेवा सुरू केल्यास दहशतवादी गटांना शेजारील देशांच्या सीमावर्ती भागात कारवाया करताना या संसाधनांचा वापर करता येणार आहे. स्टारलिंकचा बांगलादेशमध्ये अधिकृत प्रवेश आणि म्यानमारच्या बंडखोरांनी केलेला त्याचा वापर यामुळे, पद्मा-इरावती नदीच्या खोऱ्यांमध्ये युएस आणि चीन यांच्या प्रॉक्सी वॉरमध्ये मोठ्या प्रमाणावर माहितीचा वापर करण्यात येणार आहे. कदाचित जगातील हे प्रथम सॅटलाईट इन्फॉरमाटाईझ युद्ध असणार आहे. सुंदरबनच्या दलदलीत आणि चट्टोग्रामच्या डोंगराळ जंगलात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढण्यात स्टारलिंकचे योगदान असणार आहे. पण याचा वापर दहशतवादी संघटना आणि स्टेट प्रॉक्सींकडून होण्याचा धोका अधिक आहे.


    चैतन्य गिरी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीचे फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.