-
CENTRES
Progammes & Centres
Location
फाळणीपासून ते अगदी पेनल्टी स्ट्रोकपर्यंत सगळीकडेच भारत-पाकिस्तान तणावाचे पडसाद उमटत राहिले आहेत. हे शत्रुत्व फक्त धावफलकापुरतेच मर्यादित नाही. ते त्याच्याही पलीकडले आहे.
Image Source: Getty
1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी संघ वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते, असे दिवंगत भारतीय हॉकी खेळाडू बलबीर सिंग सीनिअर यांनी नमूद केले होते. आपले जुने मित्र जाणूनबुजून आपल्यापासून अंतर ठेवत होते, असं ते म्हणाले. मैत्री तुटणे कसे समजावे? खेळाडू हस्तांदोलन करतात पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणून. हे दोन देशदूतांच्या हस्तांदोलनाइतकेच औपचारिक आहे. मैदानावरची स्पर्धाही फारशी मैत्रीपूर्ण नसते, असेही बलबीर सिंग सीनिअर यांनी म्हटले होते.
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानी लोक स्वतःची तुलना भारतीयांशी करताना स्वत:ला वेगळे आणि श्रेष्ठ समजत असत. पाकिस्तानचे दिवंगत पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुस्लीम राष्ट्र हे हिंदू भारताच्या बरोबरीने असल्याचे लिहिले होते. यामध्ये श्रेष्ठता नसली तरी समानतेची ही भावना अजूनही टिकून आहे. अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही ती बोलून दाखवली.
पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा इस्लामच्या वर्चस्ववादावर उभ्या असलेल्या राष्ट्राचे समर्थन करतात. टी- 20 विश्वचषक सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने भारतीय खेळाडूंसमोर इस्लामिक प्रार्थना का केली? या खेळाडूंना वैयक्तिक शत्रुत्व वाटत नसले तरी निधी मिळवण्यासाठी त्यांनाही देशाच्या विचारसरणीशी जुळवून घ्यावे लागते आहे. क्रीडा स्पर्धा या राजकारण आणि अर्थशास्त्राशी संबंधित नाहीत, असे मानले जाते. पण हे खरे नाही. इस्लामिक जगाच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तान हे मान्य करत नाही. पाकिस्तानचे सर्वोत्तम हॉकी व्यवस्थापक एअर चीफ मार्शल नूर खान आणि ब्रिगेडियर एम.एच. आतिफ हे सशस्त्र दलातून आले होते हे लक्षात घ्यायला हवे.
पाकिस्तानी लोकांमधली ही समतेची भावना शिगेला पोहोचली होती तेव्हा पाकिस्तानने भारतावर 74-42 असा विजय मिळवला होता. खेळाडूंनी हा विजय फाळणीच्या कथनाशी जोडण्याचा प्रयत्न केला. भारतीय खेळाडू देखील ही समतेची कल्पना पुढे नेतात, असे दिसते. माजी भारतीय हॉकी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांनी एकदा असे म्हटले होते की, भारताने केवळ पाकिस्तानला हरवणे किंवा आशियामध्ये जिंकणे यापेक्षा मोठे ध्येय ठेवले पाहिजे. आपण पाकिस्तान-केंद्रित नसावे, असे हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालक रवीकांत श्रीवास्तव हेही म्हणतात. परंतु खेळाडू अनेकदा हे समजून घेत नाहीत.
पाकिस्तानचा 82-67 हा रेकॉर्ड त्याला सर्वोत्तम संघ बनवतो का? नाही. पाकिस्तान 2014 आणि 2023 मध्ये विश्वचषक आणि 2016, 2020 आणि 2024 मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. तीन ऑलिम्पिक आणि चार विश्वचषक विजेतेपदे मिळवूनही पाकिस्तानची घसरण सुरूच आहे. 2015 पासून भारताने ऑलिम्पिकमधील दोन कास्यपदकांसह एलिट स्पर्धांमध्ये दोन रौप्य पदके आणि पाच कास्यपदके जिंकली आहेत. पण या आकडेवारीबद्दल बोलू नका कारण पाकिस्तान मागे पडला आहे, अशी पुष्टी श्रीवास्तव यांनी जोडली आहे.
तरीही केवळ धार्मिक उत्साह आणि सामरिक समानता यावरून पाकिस्तान एकेकाळी का विजयी झाला हे स्पष्ट होत नाही. यात आर्थिक घटक देखील महत्त्वाचे आहेत.
टेबल क्र 1
दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि हॉकीमधील प्रमुख विक्रम (1950-2004)
(1990 आंतरराष्ट्रीय गेरी- खामिस डॉलर्स)
स्रोत: अँगस मॅडिसनच्या द वर्ल्ड इकॉनॉमी (2007) मधील जीडीपी डेटा आणि Bharatiyahockey.org. वरील रेकॉर्ड
एस. अकबर झैदी यांच्या मते, शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये बाह्य मदतीचा वाटा 5 टक्के होता. 1960 च्या दशकाच्या मध्यापर्यंत पाकिस्तानची अर्थव्यवस्था लोकसंख्या वाढीच्या दुप्पट दराने वाढली. गुंतवणूक जीडीपीच्या 20 टक्के होती, किमती स्थिर होत्या आणि परकीय चलन साठा दरवर्षी 7.5 टक्क्यांनी वाढत होता. (1950 ते 1973 दरम्यान) त्यावेळी भारताचा जीडीपी दरवर्षी फक्त 3.54 टक्क्यांनी वाढला. 1979 मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर आणि 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या परकीय मदतीनंतर पाकिस्तानचा वार्षिक सरासरी विकास दर 6. 2 टक्क्यांपर्यंत पोहोचला (1977-1981). 1980 ते ते 2000 दरम्यान पाकिस्तानने हॉकी स्पर्धा 35-23 ने जिंकली.
बीबीसीने उद्धृत केलेल्या अरविंद पनगढिया यांच्या मते, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या 17 वर्षांत भारताचे दरडोई उत्पन्न संपूर्ण विसाव्या शतकाच्या तुलनेत जास्त वेगाने वाढले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनात (एप्रिल 2024) भारताचा दरडोई जीडीपी 2,730 अमेरिकन डॉलर्स आणि पाकिस्तानचा 1, 460 अमेरिकन डॉलर्स इतका ठेवण्यात आला आहे. 2010 ते 2024 दरम्यान, भारताने 24 सामने जिंकले तर पाकिस्तानने फक्त 8 सामने जिंकले.
पाकिस्तानच्या आर्थिक घसरणीसह समतेची संकल्पनाही घसरत चालली आहे. ‘द डॉन’ वृत्तपत्र या मानसिक अडथळ्याचा उल्लेख करते. पाकिस्तानी खेळाडू आता कनिष्ठतेला बळी पडलेले दिसतात. जर ही तरुण मुले मैदानात उतरली, भारताविरुद्ध लढली आणि बरोबरीने उभी राहिली तर प्रशिक्षक म्हणून तो आमच्यासाठी विजय असेल, असे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक रेहान बट यांनी 2023 मध्ये म्हटले होते. याउलट भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेला अतिराष्ट्रवादाने आकार दिला आहे. आम्हाला पराभव करून आमच्या सैनिकांना निराश करायचे नाही, असे पी.आर. श्रीजेश ठामपणे सांगतात.
ही दरी इतकी वाढते आहे की ही स्पर्धा सर्वात भयंकर आहे का, अशी शंका निर्माण होते. भारत आणि पाकिस्तानचे चाहते एकनिष्ठ राहिले आहेत पण किती काळ? हा प्रश्नच आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धा वगळता भारताच्या अविरत बहिष्कारांमुळे ही स्पर्धा स्मृतीतून पुसली जाण्याचा धोका आहे. खेळाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने एक कबुली दिली. पाकिस्तानचा हल्ल्यातला सहभाग सिद्ध न करताही भारताला पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे हे त्यांनी मान्य केले. भारताचा वाढता प्रभाव समजून घेण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन केले गेले आहे का? आता स्पष्ट झालेले मानसिक वर्चस्व पाहता तसेच वाटते.
शीतयुद्ध आणि त्यासोबत आलेल्या परकीय मदतीमुळे एकेकाळी पाकिस्तानचा हॉकी महासत्ता म्हणून उदय होण्यास मदत झाली. परंतु आता 2025 मध्ये अभ्यासक आणि विद्वानांनी खेळाच्या पलीकडे पाहिले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत खेळ आणि सत्ता यांच्यातल्या फरकाचा विचार केला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात खेळाकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
जितेंद्र नाथ मिश्रा हे माजी राजदूत आहेत. ते सोनीपत येथील ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमॅटिक प्रॅक्टिसचे प्राध्यापक आहेत. ते राधालँड आणि वर्ल्ड्स बियॉन्डचे संपादक आणि सह-लेखक आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Jitendra Nath Misra is a former ambassador, serving as Professor of Diplomatic Practice at O.P. Jindal Global University, Sonipat. He is the editor and co-author ...
Read More +