-
CENTRES
Progammes & Centres
Location
२०३० साठी भारताची हवामानविषयक महत्त्वाकांक्षी वचनबद्धता आणि २०७० साठीचे निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्य या दोन्हीसाठी जलद डिकार्बोनायझेशनची गरज आहे.
२०३० साठी भारताची हवामानविषयक महत्त्वाकांक्षी वचनबद्धता आणि २०७० साठीचे निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्य या दोन्हीसाठी जलद डिकार्बोनायझेशनची गरज आहे. भविष्यात कमी कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल करण्यासाठी कॉर्पोरेट्स, उद्योग, धोरणकर्ते आणि स्टार्टअप्स यांसारख्या भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असणार आहे. जीवाश्म इंधने, पेट्रोकेमिकल्स आणि हायड्रोकार्बन्स यांना मूल्य साखळीतून हळूहळू काढण्यात प्रत्येक भागधारक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सामाजिक आणि आर्थिक कल्याणाच्या सर्व पैलूंवर परिणाम करणारे हवामान हे एक बहुविद्याशाखीय क्षेत्र आहे. यात ऊर्जेचा वापर, गतिशीलता आणि भौतिक नावीन्यता, अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाचा समावेश आहे.
थिआ येथे मोठ्या व अनडिसर्व बाजारपेठांसाठी स्केलेबल तंत्रज्ञान तयार करण्यासाठी वैज्ञानिक नवकल्पना वापरणाऱ्या हवामान उपायांसाठी भांडवल गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आमचा उद्देश आहे. यामध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्था, कार्बन क्रेडिट्स आणि पर्यायी साहित्य यासारख्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, वराहा या आमच्या पोर्टफोलिओ कंपनीद्वारे आधुनिक रिमोट सेन्सिंग अनॅलिटीक्स आणि सॉईल कार्बन मॉडेलिंगवरील निसर्ग-आधारित सोल्यूशन्सन काढण्यासाठी लहान शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट्स तयार करण्यास सक्षम करण्यात येते. कॅनव्हलूपसारख्या आणखी एक पोर्टफोलिओ कंपनीद्वारे अननस आणि केळी यांसारख्या कृषी कचऱ्याचे कापड फायबर आणि धाग्यात रूपांतर करून जागतिक वस्त्र उत्पादकांना विकण्यात येते. एंड-ऑफ-लाइफ इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरीमधून दुर्मिळ धातू काढण्यासाठी मेटास्टेबल मटेरिअल्स पेटंट कार्बोथर्मल रिडक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून केमिकल-फ्री बॅटरी रिसायकलिंग प्रक्रियेचा वापर करण्यात येतो. सौंदर्य आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये ग्रीन केमिस्ट्री फॉर्म्युला इनपुट्स सारख्या ऍप्लिकेशन्समध्ये वापरण्यासाठी अल्ट एम एफएमसीजी ही कंपनी कृषी कचऱ्यापासून लिग्नोसेल्युलोज काढते.
एंड-ऑफ-लाइफ इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरीमधून दुर्मिळ धातू काढण्यासाठी मेटास्टेबल मटेरिअल्स पेटंट कार्बोथर्मल रिडक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून केमिकल-फ्री बॅटरी रिसायकलिंग प्रक्रियेचा वापर करण्यात येतो.
या लेखामध्ये नेट झिरोला प्रभावीपणे समर्थन देण्यासाठी इलेक्ट्रिक ग्रिड आणि त्याच्या वाढीला चालना देण्यासाठी खाजगी भांडवलाची गरज, नवीकरणीय ऊर्जा आणि ईव्ही मागणीच्या एकत्रीकरणाला प्रोत्साहन व आधुनिकीकरण तसेच प्रगत तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान उर्जा पायाभूत सुविधा यांसारख्या हवामान तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या क्षेत्रात थिया महत्त्वपुर्ण भुमिका बजावत आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये उर्जेचा वापर दुप्पट झाल्याने भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक ठरलेला आहे. असे असले तरीही, भारतातील दरडोई ऊर्जेचा वापर जागतिक सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. एकीकडे भारतात ऊर्जेची मागणी जास्त आहे तर दुसरीकडे दुर्गम भागामध्ये मोठ्याप्रमाणावर भारनियमाचा त्रास सहन करावा लागत आहे, हे स्पष्ट आहे. भारतात ऊर्जा उपयोगिता कंपन्यांद्वारे ४१७ गिगावॅट ऊर्जा मालमत्ता वापरण्यायोग्य असली तरी अपुरे नियोजन आणि ट्रान्समिशनचे नुकसान यांसारख्या प्रकारांमुळे केवळ ३९ टक्के मालमत्ता पूर्णपणे वापरण्यात येत आहेत. अपुर्या पायाभूत सुविधा आणि मालमत्तेचा कमी वापर यामुळे या समस्यांमधे आणखी वाढ झाली आहे. यामुळे ऊर्जेची अकार्यक्षमता आणि दुर्गम भागाताल ग्राहकांसाठी पुरवठा खर्चात वाढ झाली आहे.
खाली काही थीमॅटिक क्षेत्रांचा स्नॅपशॉट देण्यात आला आहे जिथे आम्ही, व्हेंचर कॅपिटल फर्म म्हणून, इलेक्ट्रिक ग्रिडच्या डिकार्बोनायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी भांडवल इंजेक्शनच्या संधी शोधत आहोत –
विजेच्या मागणीतील वाढ आणि वितरित मालमत्तेच्या प्रसारामुळे, विद्यमान इलेक्ट्रिक ग्रिड त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत पोहोचले आहेत. पुढे जाऊन, भारताला स्वयंचलित आणि विजेच्या वाढत्या जटिल गरजा व्यवस्थापित करू शकणाऱ्या नवीन प्रकारच्या ग्रीडवर अवलंबून राहण्याची गरज भासणार आहे. स्मार्ट ग्रिड हा एक सर्वसमावेशक उपाय आहे. यात माहिती तंत्रज्ञान संसाधनांच्या विस्तृत श्रेणीचा वापर करण्यासोबतच, विद्यमान आणि नवीन ग्रिडलाइनबाबत कचरा आणि ऊर्जा खर्च कमी करण्यास अनुमती मिळते. स्मार्ट ग्रिड्समुळे इलेक्ट्रिक ग्रिडमध्ये उच्च स्तरावरील अक्षय ऊर्जा एकत्रित करण्याचा फायदा देखील समाविष्ट आहे. जर सौर फोटो व्होल्टेइक (पीव्ही) प्रणाली आणि औद्योगिक वीज ग्राहक स्मार्ट ग्रिड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित केले गेले आणि हवामानातील व्यत्ययांमुळे सौर पीव्ही प्रणाली बंद झाली, तर स्मार्ट ग्रिड आपोआपच पारंपारिक उर्जा स्त्रोतांवर स्विच होते. शिवाय, स्मार्ट ग्रिड्स डिस्कॉम्सना सतत रिअल-टाइम माहिती आणि वितरीत नूतनीकरणक्षम प्रणाली कशा कार्यान्वित आहेत याचे निरीक्षण प्रदान करण्यासाठी सक्षम आहेत.
स्मार्ट ग्रिड हा एक सर्वसमावेशक उपाय आहे. यात माहिती तंत्रज्ञान संसाधनांच्या विस्तृत श्रेणीचा वापर करण्यासोबतच, विद्यमान आणि नवीन ग्रिडलाइनबाबत कचरा आणि ऊर्जा खर्च कमी करण्यास अनुमती मिळते.
आमची प्रोबस स्मार्ट थिंग्ज ही पोर्टफोलिओ कंपनी, या विभागात कार्यरत असून, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) द्वारे वितरण सबस्टेशन अनालिटीक्स तसेच रेडिओ फ्रिक्वेन्सी मेश तंत्रज्ञान वापरून वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी स्मार्ट मीटरची डिझाइन प्रदान करते. यामुळे स्मार्ट ग्रिड फोरम, इंडिया स्मार्ट ग्रिड टास्क फोर्स आणि नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन यासह अनेक सरकारी प्रायोजित कार्यक्रमांमुळे भारताला केंद्रीकृत ते विकेंद्रित वीजनिर्मितीकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे.
भारताने या दशकात ३५० गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जानिर्मिती करणे अपेक्षित आहे. ही क्षमता २०१० आणि २०२० दरम्यानच्या क्षमतेपेक्षा ४०० टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे ग्रीड स्थिरता राखण्यासाठी स्वच्छ ऊर्जा साठवण प्रणाली सारखे संतुलित स्त्रोत जोडणे आवश्यक ठरत आहे.
भविष्यातील बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली या डिझेल सेटचा वापर कमी करून व्होल्टेज सपोर्ट देऊन २४×७ ग्रिडला सपोर्ट करू शकते. या प्रकारचे अॅप्लिकेशन पॉवर बॅक-अप, पीक लोड शेव्हिंग, फ्रिक्वेंसी आणि व्होल्टेज रेग्युलेशन आणि ग्रीडवर पॉवर परत पाठवण्याची परवानगी देते. याही पुढे ऑफ-पीक डिमांड कालावधीत टाइम ऑफ डे (टीओडी) शुल्क वापरण्याच्या दृष्टीने ग्रिड स्थिरीकरणासाठी या ऊर्जा साठवण प्रणाली सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही) सह एकत्रित केल्या जाऊ शकतात. उल्लेखनीयरित्या उर्जा मंत्रालयाने अलीकडेच २०२४ पासून विजेसाठी टीओडी दर अधिसूचित केले आहेत.
यात सर्वाधिक योगदान ईव्ही विभागाचे (६४ टक्के) असेल अशी अपेक्षा आहे. याबाबत आमच्या पोर्टफोलिओमध्ये, एजग्रीड आणि शेरू या दोन कंपन्या कार्यरत आहेत.
बाजाराच्या आकाराचा विचार करता, २०२२ च्या मागणीच्या तुलनेत वार्षिक मागणीत ४४.५ टक्के सीएजीआरसह वाढ होऊन ती २०३० पर्यंत १६२ गिगावॅटपर्यंत पोहोचून भारतातील बॅटरी स्टोरेजची संचयी क्षमता ६०१ गिगावॅट होण्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक योगदान ईव्ही विभागाचे (६४ टक्के) असेल अशी अपेक्षा आहे. याबाबत आमच्या पोर्टफोलिओमध्ये, एजग्रीड आणि शेरू या दोन कंपन्या कार्यरत आहेत. ग्रीडला मागणी आणि पुरवठ्यातील बदलांना त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी अधिक लवचिकता आणि पॉवर सिस्टमच्या व्यवस्थापनामध्ये नियंत्रण ठेवण्यास समर्थन देणारे तंत्रज्ञान तयार करण्याचे काम दोन्ही कंपन्या करत आहेत.
व्हर्च्युअल पॉवर प्लांट्स (व्हीपीपी) हे क्लाउड-आधारित पॉवर प्लांट आहेत. हे जनरेटर, इलेक्ट्रिकल लोड आणि स्टोरेज युनिट्स एकत्रितपणे काम करतात. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान आणि आयओटीचा फायदा घेऊन, व्हीव्हीपीज या इष्टतम ऊर्जा निर्मिती सुनिश्चित करतात तसेच ग्रीडमध्ये अक्षय उर्जेचे एकत्रीकरणही सक्षम करतात. ते ग्रिडची विश्वासार्हता वाढवतातच पण त्यासोबत पॉवर आउटेज आणि ब्लॅकआउट्स, वारंवारता आणि व्होल्टेज असंतुलन आणि नेटवर्क स्थिरता यांसारख्या समस्याही दूर करतात. भारतात, व्हीपीपी हे रूफटॉप सोलर सिस्टीमच्या वाढीसह बदलत्या उर्जेच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करू शकतात. युटिलिटिज त्यांचा वापर करून वापरलेल्या आणि व्युत्पन्न केलेल्या उर्जेचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतात. भारतात आजही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे व्हीव्हीपीज तैनात केल्याने अप्रत्यक्षपणे अशा क्षेत्रांमध्ये अधिक नूतनीकरणीय संसाधने उपयोजित करून विजेचा वापर वाढू शकतो.
परंतु, व्हीव्हीपीजचा उदय हा निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी डीईआर मालमत्तेचा अवलंब करण्यावर तसेच ग्राहकांना ऊर्जेच्या वापरासाठी तयार घाऊक बाजारावर अवलंबून असणार आहे.
व्हर्च्युअल पॉवर प्लांट्स (व्हीपीपी) हे क्लाउड-आधारित पॉवर प्लांट आहेत. हे जनरेटर, इलेक्ट्रिकल लोड आणि स्टोरेज युनिट्स एकत्रितपणे काम करतात.
भारतातील डिस्कॉम्सना डीईआर एकत्रीकरण सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मसह भागीदारी करण्याची इच्छा प्रदर्शित करणे आवश्यक आहे. असे केल्यास शेकडो व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांच्या मीटरच्या मागे स्टोरेज सिस्टमचा (सौर, इलेक्ट्रिक वाहन चार्जर आणि बॅटरीसह) वापर करणे शक्य आहे. यामुळे वीज वितरणाची विश्वासार्हता आणि कार्यप्रदर्शन सुधारण्यास मदत होणार आहे. उदाहरणार्थ, शेरूने भारतातील पहिले व्हेईकल-टू-ग्रिड स्टेशन सुरू करण्यासाठी बीएसईएस राजधानीसोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमाद्वारे, शेरू त्याच्या द्विदिशात्मक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा उपयोग अदलाबदल करण्यायोग्य बॅटरी प्रदान करण्यासाठी करणार आहे तसेच डीआर म्हणून स्वॅपिंग स्टेशन्सच्या बॅटरी क्षमतेचा वापर करून बीआरपीएलला त्याच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होणार आहे.
स्मार्ट ग्रिड, बॅटरी एनर्जी स्टोरेज सोल्यूशन्स आणि व्हीपीपीज यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने भारतातील विजेसंबंधित पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवण्याची महत्त्वपूर्ण क्षमता निर्माण झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील बाह्य बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खाजगी आणि परवानामुक्ती उपायांचा मार्ग मोकळा झाला आहे. यात इंडियन एनर्जी एक्सचेंजद्वारे रिअल-टाइम एनर्जी मार्केट आणि ग्रीन टर्म अहेड मार्केट (जीटीएएम) ची निर्मिती व अपारंपारिक ऊर्जेच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी रिन्यूएबल एनर्जी सर्टिफिकेट्स (आरईसीज) यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये, भारत सरकारने ग्रीन एनर्जी ओपन ऍक्सेसचे नियम देखील अधिसूचित केले. यात ओपन ऍक्सेस व्यवहार मर्यादा १०० किलोवॅट (१ मेगावॅट वरून) कमी करण्यात आली, ज्यामुळे ग्राहकांना वीज खरेदी आणि व्यापार करण्याची परवानगी मिळणार आहे.
आमच्या मते, कन्वेशनल व्हीसी हे क्षेत्र अत्यंत नियमन केलेले असल्याने व्हीसी क्रियाकलाप अत्यंत मर्यादित आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, केवळ मोठ्या पायाभूत सुविधा निधींनी इलेक्ट्रिक ग्रिड क्षेत्रात सक्रियपणे गुंतवणूक केली आहे. तरीही, तांत्रिक नवकल्पना, विशेषत: ‘डिजिटल डिकार्बोनायझेशन’ संकल्पनेच्या आसपासच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि एनर्जी ब्लॉकचेन यांसारख्या पद्धतींमध्ये, जर स्टार्ट-अप स्तरावर एकत्रिकरण करण्यात आले तर या क्षेत्रात मुख्य प्रवाहातील भांडवल आकर्षक होऊ शकेल. याशिवाय, बँका, (जोखीममुक्त) भांडवल, औद्योगिक घटक, विद्यापीठाच्या आर अण्ड डी प्रयोगशाळा आणि सरकार यांसारख्या इतर भांडवल पुरवठादारांमध्ये प्रभावी सहकार्य देखील उत्पादन जोखीम अधोरेखित करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. असे झाले तर खऱ्या अर्थी सौर आणि ईव्ही क्षेत्रे विशेषतः उपयुक्त ठरू शकतात.
२०७० पर्यंत नेट झिरोबाबतच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि अपारंपारिक ऊर्जेवरील वाढता फोकस, तसेच वीज ग्रीड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे. व्हिसीने या क्षेत्रातील परिवर्तनाची क्षमता ओळखणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील कंपन्यांना आणि लोकांकडून समर्थन मिळवण्यासाठी अधिक सक्रिय दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे. असा दृष्टिकोन या क्षेत्रातील खाजगी गुंतवणुकीच्या वाढीस चालना देणार आहे. असे केल्याने, भारतातील शेवटच्या मैलापर्यंत अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञान-सक्षम, कमी कार्बन आणि लवचिक वीज ग्रीड तयार करण्यात प्रभावीपणे योगदान देणे शक्य होणार आहे.
प्रिया शाह ह्या थिया व्हेंचरच्या संस्थापक आणि जनरल पार्टनर आहेत.
हिमांशु शर्मा हे थिया व्हेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट असोसिएट आहेत.
मरुन छाबरा हे थिया व्हेंचरमध्ये अल्पकालीन सहयोगी होते.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Priya is the General Partner of Theia Ventures which is a seed stage fund in India investing in high impact technology-enabled climate tech businesses operating ...
Read More +