पाकिस्तान स्वतःच्या भ्रमजगात जगतो आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या युद्धविराम कराराला आपल्या राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात “ऐतिहासिक विजय” म्हणून गौरविले. भारताने जणू अन्यायकारक युद्ध लादल्याचा आरोप करत, आणि पहलगाम घटनेचा संदर्भ देत, त्यांनी पाकिस्तानला एक पीडित राष्ट्र म्हणून सादर केले. त्यांनी या युद्धविरामाला पाकिस्तानने पुढाकार घेतलेल्या राजनैतिक कराराप्रमाणे न मांडता, पाकिस्तानच्या तथाकथित लष्करी ताकदीचा परिणाम म्हणून सादर केले. मात्र वास्तविकता पूर्णपणे वेगळी आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारभार प्रमुखांनीच भारताशी संपर्क साधून संघर्ष थांबवण्याची विनंती केली, ज्यातून दोन्ही देशांमध्ये कोणतीही सवलत न देता परस्पर सहमतीने युद्धविराम ठरवण्यात आला.
भारताने गेल्या काही दिवसांत जी पावले उचलली आहेत, जसे की सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करणे, पाकिस्तानमधून आयातीवर बंदी घालणे आणि पाकिस्तानसाठी व पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे ती आगामी काळात सुरूच राहतील. यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे, युद्धविरामाच्या घोषणेच्या काही तासांपूर्वीच भारताने पाकिस्तानविषयीच्या धोरणात मोठा बदल जाहीर केला, ज्यात स्पष्टपणे सांगितले गेले की भारतावर होणारा भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला हा थेट युद्धाचा प्रकार मानला जाईल. जर पाकिस्तानने दहशतवादाला राष्ट्राच्या धोरणाचा भाग म्हणून वापरण्याची जुनी सवय बदलली नाही, तर ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी कारवाई पुन्हा केली जाईल, असा इशाराही भारताने दिला आहे. हिच आहे ‘नवीन सामान्य परिस्थिती’ (न्यू नॉर्मल) जी गोष्ट सध्या पाकिस्तानमध्ये खोटा विजय साजरा करणाऱ्यांनी आपल्या गणनेत समाविष्ट केली पाहिजे.
भारताने गेल्या काही दिवसांत जी पावले उचलली आहेत, जसे की सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करणे, पाकिस्तानमधून आयातीवर बंदी घालणे आणि पाकिस्तानसाठी व पाकिस्तानकडून येणाऱ्या विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे ती आगामी काळात सुरूच राहतील.
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ला आणि गेल्या काही महिन्यांपासून रावळपिंडीहून पुढे आलेली ‘मुनीर’ संकल्पना यांनी मिळून हे निश्चित केले की, आपल्या शेजारी तयार होत असलेल्या वादळाकडे आता भारत फक्त तुकड्यांत विचार करण्याच्या मानसिकतेत राहू शकत नाही. पाकिस्तानच्या लष्करासाठी हे शेवटचे प्रयत्न होते. देशांतर्गत पाकिस्तानची विश्वासार्हता झपाट्याने घसरत असताना, त्याचवेळेस भारत पाकिस्तानकडे लक्ष न देता वेगाने उभारी घेत आहे. जगभरात पाकिस्तानच्या बनावट ‘पीडित’ कथेला मिळणारा पाठिंबा घटत आहे आणि कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये सुरू झालेल्या सामान्यतेमुळे हा मुद्दा कायमचा गमावण्याची शक्यता आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ‘दोन राष्ट्रांची संकल्पना’ पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही मुलांना पाकिस्तानची गोष्ट सांगितली पाहिजे, जेणेकरून त्यांनी हे विसरता कामा नये की आपले पूर्वज हिंदूंपेक्षा प्रत्येक पैलूमध्ये वेगळे असल्याचे मानत होते,” असा उपदेश त्यांनी दिला. काश्मीरला पाकिस्तानची “जग्युलर व्हेन” म्हणजेच गळ्याकडे जाणारी रक्तवाहिनी असे म्हणत, त्यांनी भारतीय अधिपत्याविरुद्ध काश्मिरी जनतेच्या तथाकथित संघर्षाला पाठिंबा देण्याची जुनी लष्करी भाषा पुन्हा वापरली.
म्हणूनच पहलगामचा नरसंहार आणि त्यानंतर घडलेली व झपाट्याने वाढलेली संघर्षाची तीव्रता ही काही आश्चर्यकारक नव्हती. हा संपूर्ण प्रकार पाकिस्तानच्या त्या दृष्टिकोनातून उगम पावलेला होता, ज्यात ते संघर्षाकडे धार्मिक चष्म्यातून पाहत होते, तर भारताने नुकत्याच घडलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला माफ करून टाकण्याचा कोणताही विचार केला नाही. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवादी संरचनांवर प्रतिहल्ला चढवला आणि त्यास “लक्ष्यित, मोजकी आणि संघर्षात वाढ न करणारी कारवाई” असे संबोधून पाकिस्तानसमोर एक मार्ग खुला ठेवला. भारताने स्पष्ट केलं की ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांवर लक्ष केंद्रित करणारी होती पाकिस्तानच्या लष्करी तळांवर किंवा नागरी भागांवर नव्हे.
भारत पूर्णपणे सज्ज होता आणि त्याने स्वतःच्या लष्करी क्षमतेचा वापर करत प्रत्युत्तर दिलं. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानकडून झालेले बहुतांश हल्ले अचूकपणे थोपवले.
अपेक्षेप्रमाणे, पाकिस्तानने भारतातील नागरी आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून प्रत्युत्तर दिलं. मात्र भारत पूर्णपणे सज्ज होता आणि त्याने स्वतःच्या लष्करी क्षमतेचा वापर करत प्रत्युत्तर दिलं. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानकडून झालेले बहुतांश हल्ले अचूकपणे थोपवले. आणि जेव्हा भारताच्या ब्रह्मोस एअर-लाँच क्रूझ क्षेपणास्त्रांनी रावळपिंडीजवळील चकलाला, पंजाब प्रांतातील सरगोधा, तसेच जेकबाबाद, भोलारी आणि स्कर्दू येथील पाकिस्तान हवाई दलाच्या महत्त्वाच्या तळांवर निशाणा साधला, तेव्हा पाक लष्करासह आंतरराष्ट्रीय समुदायालाही एक ठाम आणि स्पष्ट संदेश मिळाला: भारत केवळ संघर्ष वाढवण्याची क्षमता ठेवत नाही, तर गरज भासल्यास त्यात टप्प्याटप्प्याने सहभाग घेण्यासही मागे हटणार नाही. ज्याप्रमाणे पूर्वी भारताच्या धोरणात्मक संयमामुळे अमेरिकेने दक्षिण आशियातील आपले गणित बदलले होते, तसेच आता भारताच्या धोरणात्मक धोके पत्करण्याच्या तयारीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायालाही आपली भूमिका बदलण्यास भाग पाडले जात आहे. आपल्या सुरक्षेच्या हितासाठी ठाम उभा राहणारा भारत हा इतर जागतिक शक्तींशी बरोबरीने संवाद साधू शकतो, असा आजचा नवा भारत आहे.
गेल्या आठवड्यातील संघर्ष- प्रतिसंघर्षाच्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती: भारताचा अनंतकाळ चालणाऱ्या युद्धाच्या दलदलीत अडकण्याचा कोणताही हेतू नव्हता. भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाचा मुख्य रणनीतिक उद्देश हा भारतीय आर्थिक प्रगतीला पूर्ण क्षमतेने साध्य करण्यासाठी एक सक्षम वातावरण निर्माण करणे हाच आहे. रशिया, इस्रायल किंवा १९७१ च्या युद्धाशी केलेल्या बालिश तुलना केवळ या संघर्षांच्या संपूर्ण वेगळ्या संदर्भांवरचे अज्ञान दर्शवतात, तसेच आजच्या जागतिक भू-राजकारणात भारताच्या निर्णायक क्षणाचे खरे कारणही दुर्लक्षित करतात. जोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत राहिल, तोपर्यंत भारताकडे अधिक क्षमताही असतील, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांशी भागीदारीही आकर्षित होईल, आणि त्याचबरोबर पाकिस्तानपासून कायमस्वरूपी स्वतंत्र असलेली भारताची ओळखही टिकवून ठेवली जाईल. हीच ती ओळख आहे जी मुनीरसारखे इस्लामी कट्टरतावादी पुन्हा मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
भारताने या सापळ्यात न अडकता अत्यंत योग्य पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर दहशतवादाची किंमत थेट त्याच्या मूळ केंद्रावर म्हणजेच पाकिस्तानकडे स्थानांतरित करण्याचा निर्धार दाखवला आहे आणि हाच खरा "ऑपरेशन सिंदूर" मधून जाणीवपूर्वक पोहचवलेला संदेश आहे!
हा लेख मूळतः मिंटमध्ये प्रकाशित झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.